खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? 
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!
फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!
Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मीही पर्पल वापरलीय. लॅक्मेची
मीही पर्पल वापरलीय. लॅक्मेची मॉव फिएस्टा म्हणुन एक होती. काही काही ड्रेसेसवर इतकी सुंदर दिसाय्ची
दक्स.. लॅक्मे ची आयकॉनिक
दक्स.. लॅक्मे ची आयकॉनिक सेल्फ शार्पनिन्ग पेंसिल आहे पण चांगली डार्क आहे
)ग्रीन, डीप नेवी खूप्पच मस्त दिसतात. फ्रीज मधे ठेवल्या कि शार्पनर ने आरामात शार्प करता येतात.
लॅक्मे च्या ' ग्लाईड ऑन' रेंज मधे पीकॉक ब्लू, शायनी (आहूजा ना>>ही
दक्स तू डीप नेवी ब्लू ट्राय करच.. खूप सूट होईल तुला हा रंग..
eye liner लावणाऱ्या सर्वाना
eye liner लावणाऱ्या सर्वाना माझा एक अगदी बाळबोध प्रश्न
वरच्या पापणीला लावता येते पण डोळ्याच्या खालून कसे लावतात.?
वेगळे काही product असते का ?
साधना, मी आत्ताच प्रॉ.
साधना, मी आत्ताच प्रॉ. कॉस्टिंग मधुन थोडासा ब्रेक घेतला तर तुमची पोस्ट वाचली. एकदम तुमासमै. फीलिन्ग आले.
मी १६ - १७ ची होते तेव्हा लॅक्मे लिप्स्टीक ग्रेट वाट्त असे. अजूनही ७०० - १००० देऊन लिप्स्टिक घेववत नाही. माझी पहिली लिप्स्टिक ३० रु. ची लॅक्मेची. पिंक. सध्या नॅचरल पि़ंक छान कुठली शेड आहे?
इथे टिकल्या बिंदी फॅन आहेत का कोणी. मला ते ५- ७ रंगांची डबी मिळते त्यातून रोज नवी बिंदी रेखाटून जायला फार आवड्ते. फार ब्लिंग नाही पन ड्रेस मधील एक कलर आणि एक काळी रेघ.
ठिपका, नागमोडी असे काहीतरी.
इथे टिकल्या बिंदी फॅन आहेत का
इथे टिकल्या बिंदी फॅन आहेत का कोणी >>
अश्विनीमामी, मी आहे!
मृणाल डोळ्याच्या खाली पण
मृणाल
डोळ्याच्या खाली पण लावता येते, ब्रश थोडा तिरका म्हणजे डोळ्याला पॅरलल, (आडवा) करून लावावे लागते. मला येते.
पूर्वी कॉलेजात असताना होते मी
पूर्वी कॉलेजात असताना होते मी टिकल्या-बिंदी फॅन. हल्ली टिकल्या/बिंदी लावल्याच जात नाही. लावलीच तर अगदीच छोटीशी गोल किंवा उभी काळी /मरुन टिकली. बस्स.
अमा तु याची प्रिंट काढून घेऊन
अमा तु याची प्रिंट काढून घेऊन जा.. लावत असशील तर रेफ्रन्स ला.
मी पण टिकली लावत नाही अजिबात.
मी पण टिकली लावत नाही अजिबात. मला चांगली दिसत नाही.
डोळ्याच्या खाली पण लावता
डोळ्याच्या खाली पण लावता येते, ब्रश थोडा तिरका म्हणजे डोळ्याला पॅरलल, (आडवा) करून लावावे लागते. मला येते.>>>> liquid eyeliner का pencil का अजून दुसरे काही
पार डोळ्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एकसारखे eyeliner लावायचे आहे एकदा. थोडे जरी चुकले तरी शुभस्य शीघ्रम करावे लागते
पूर्वी कॉलेजात असताना होते मी
पूर्वी कॉलेजात असताना होते मी टिकल्या-बिंदी फॅन. हल्ली टिकल्या/बिंदी लावल्याच जात नाही. लावलीच तर अगदीच छोटीशी गोल किंवा उभी काळी /मरुन टिकली. बस्स. +१
मृणाल पेन्सिल नाही लिक्विडने
मृणाल पेन्सिल नाही लिक्विडने लावू शकते मी. डोळ्याच्या आत काजळ घालायचं आणि त्याच रेषेत डोळ्याखालून लिक्विड लायनरचा ब्रश फिरवायचा.
इथे कोणी वेगवेगळ्या रंगाच्या
इथे कोणी वेगवेगळ्या रंगाच्या लेन्सेस वापरल्या आहेत का?
लेन्सेस डोळ्याचा मेकअप केल्यावर लावायच्या का नंतर ?
दक्षिणा आता बघते प्रयत्न करून
दक्षिणा
आता बघते प्रयत्न करून . तू कोणते लायनर वापरतेस?
लेन्सेस डोळ्याचा मेकअप
लेन्सेस डोळ्याचा मेकअप केल्यावर लावायच्या का नंतर ?>> आधी लावायच्या.
मी पण टिकली लावत नाही अजिबात.
मी पण टिकली लावत नाही अजिबात. मला चांगली दिसत नाही.>>>>>>>>. मला पण
दक्शीणा>>>>>>>>.. पुर्वी
दक्शीणा>>>>>>>>.. पुर्वी शिंगार च्या छोट्या बाटल्या याय्च्या वेग्व्वेगळ्या रंगाच्या त्यात अशी डिजाईन चा कागद यायचा
नंदिनी हो क? पण पुर्वी मी
नंदिनी हो क? पण पुर्वी मी जेव्हा कलर्ड लेन्स वापरल्या तेव्हा मला स्ट्रिक्टली काजळ फिजळ लावायचं नाही असं सांगण्यात आलेलं. मेकप केला तर चालतो का लेन्सेस लावल्यावर?
अनिश्का मी कॉलेजात असताना ते
अनिश्का मी कॉलेजात असताना ते आख्खं डबडं ९ रूपयाला मिळायचं. नंतर त्याची किंमत ११ रूपये झाली. अगदी पैसे साठवून साठवून घेतलेलं विकत. २-४ दिवसाच्या वर वापरलं नाही ते वेगळंच.
तू कोणते लायनर वापरतेस? >
तू कोणते लायनर वापरतेस? > मृणाल मी अगदी पहिल्यापासून लॅक्मेच... मध्ये एवॉन वगैरे वापरलं पण परत लॅक्मे वर आले.
अगदी पैसे साठवून साठवून
अगदी पैसे साठवून साठवून घेतलेलं विकत. २-४ दिवसाच्या वर वापरलं नाही ते वेगळंच>>>>>>. मी शाळेत होती त्या वेळेला...... रोज लावुन जायची मी त्या कागदावरचं बघुन...डिझायनर माझी मम्मी...
(No subject)
दक्षिणा, मी पण आता परत
दक्षिणा, मी पण आता परत लॅक्मेच वापरते आहे,
थोडा वेळ काढून प्रयत्न करून बघते.
लेन्सेस - मी पण कलर्ड लेन्स घेतल्या तेंव्हा मेकप चालेल अस सांगितले होते . पण त्या लेन्सेस लावतानाच इतके पाणी येते डोळ्या तून की बस्स. मग त्या लावल्याच जात नाहीत. आणि आता मग त्या मेकप आधी का नंतर च्या सूचना विसरले.
पण लेन्सेस लावल्या की खूप चमकदार & सुंदर दिसतात डोळे
दक्षिणा, लॅक्मेच्या कलर आय
दक्षिणा, लॅक्मेच्या कलर आय पेन्सील्स कुठल्या घेतल्यास? साईटवर तर फार वेगवेगळं बरंच काही दिलंय... मी भंजाळले...
Lakme forever silk eyeliner, Shadow artist shimer stick, lakme glide on eye color यांपैकी काय?
अरे कोणीतरी मेकअपचे वर्कशॉप्स
अरे कोणीतरी मेकअपचे वर्कशॉप्स घ्या ..आय मेकअप पण ..
अगदी लाईनर कसे नि कुठे वापरायचे इथुन सुरुवात
मला काही येत नाही
चांगलं कन्सिलर कुठलं? किंचित
चांगलं कन्सिलर कुठलं? किंचित शिमर हवं असेल तर कुठलं घ्यावं?
लायनर चि माझी पण प्रॅक्टिस
लायनर चि माझी पण प्रॅक्टिस झालिय पण खालच्या पापणीवर नाहि कधि लावला. चांगलं दिसतं का ते?
दक्षे, मी लेन्सेस (नंबरच्या,
दक्षे, मी लेन्सेस (नंबरच्या, मेकप लेन्सेस नव्हे) लावल्यावर काजळ, आयलाईनर लावू शकते. फक्त कॉस्मेटिकचा टच लेन्सला होता कामा नये. फार काळजीपूर्वक करावं लागतं पण एकदा सवय झाली की काही खास नाही.
एवढ्या हिरवीणी सतत लेन्सेस लावून फिरतात त्या काय मेकप न करता फिरत असतील का???
कसला भारी, मस्त धागा आहे
कसला भारी, मस्त धागा आहे हा.... नुकतीच भारतवारी त्यातून तुबा, लक्ष्मी रोड वारी झाल्यामुळे छानच वाटतंय.
मी एक कानातलं घेतलंय त्यालाच वेल जोडले आहेत पण नणंद म्हटली की ते वेल कानामागून घेऊन सोडून द्यायचे. केसात नाही अडकवायचे. कोणी घेतलंय का हे असं काही? याची खूप फॅशन आहे म्हणे.
आणि मला सांगा चिकन च्या व्हाईट टॉप बरोबर खाली हे असं चांगलं दिसेल का (हेरम की काय म्हणतात) माझी उंची ५ फूट आहे फक्त... की सरधोपट जिन्सवर बरंय?
दक्षे, मी लेन्सेस (नंबरच्या, मेकप लेन्सेस नव्हे) लावल्यावर काजळ, आयलाईनर लावू शकते>>> आं.... मला वाटलं होतं मी आता आय मेकप ला मुकले लेन्सेस लावल्यामुळे.
खालच्या पापणीवर मस्त वाटतं आयलायनर. पण ते लेन्सला लागेल त्यामुळे मी कधीच ट्राय केलं नाहीये.
याच्यावर स्पगेटी किंवा टँक
याच्यावर स्पगेटी किंवा टँक किंवा बेसिक टि घाल उंची कमी असेल तर मस्त
Pages