फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!

Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28

खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्‍याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? Wink
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते अ‍ॅबसोल्यूटचं आयलायनर लावायला सोप्पं आहे का? मला काही केल्या जमत नाही>> माझाही आयलायनरचा सेम प्रॉब आहे. Sad

सध्या बाळाबरोबर आमचीही जाग्रणं चालू असल्याने डोळ्यांवर गॉगल चढलेत काळे Sad
काजळ पेन्सील तर नाहीच वापरू शकत काजल उतरल्यावर डोळ्याखालची काजळी गडद होतेय. मस्त टपोरे मोठाले डोळे आहेत आणि आय मेकअप करू शकत नाही Sad

नाही माधवी वाटत तर नाहीत तसे... मी गुगललेय ते. घेतलेले नाहीयेत पण हातावरील शेड्स मॅट वाटत नाहीयेत. सॉफ्ट फील हवा असेल तर मी नक्कीच लॅक्मे सुचवेन... ग्लोसचीही गरज नसते खरं तर पण असल्यास अ‍ॅड ऑन!

माधवी खरं सांगू तर आय लायनर लावायची एक पद्धत असावी (अपेक्षित सायंटिफिक) पण मी माझी एक पद्धत ठरवून घेतली आहे. मोस्टली लोक आयलायनर लावताना एक डोळा झाकून त्यावर लायनर लावायचा प्रयत्न करतात जो हमखास फसतो.. कारण एक डोळा उघडा आणि एक बंद हे मारक ठरते. किंवा मग डोळा फडकवला जातो आणि ब्रश सरकतो..
मी दोन्ही डोळे अर्धोन्मिलित ठेवून लायनर लावते. इयत्ता अकरावी पासून लावतेय, त्यामुळे आता छान जमते. मग कंपनी कोणतीही असो.. ब्रश पण कसाही असो.. प्रॅक्टीस मेक्स मॅन परफेक्ट... नाही का? Happy

दक्षे, पांढर्‍या आयलनरचे उत्तर लिवल ते बघितले का? डोळे मोठे दिसायला वा झोपून सुजलेले डोळे जरा ठिक करायला लावतात.

dreamgirl: माझेसुध्दा आधी काजळ लावल्यावर ते उतरायचे. पण मागच्या वेळेस पुण्यात गेले होते तेव्हा एक छान काजळ पेन्सिल मिळाली. घरी गेल्यावर सांगते कोणत्या कंपनीची आहे ते.

प्रॅक्टीस खरंय! Sad

रोज प्रॅक्टीसच्या नावाखाली लायनर लावून बसले तर "अहो" घाबरतील. आधीच विचित्र नजरेने बघत असतो... "फॅशनचा फ ही कळत नसताना ही आजकाल फॅशनचा कीडा चावल्यासारखी काय दागिने, मेकअप वगैरे धुंडाळत बसलेली असते?" Happy

ड्रिमगर्ल डोळ्यात काजळ घातल्यावर खाली उतरत असेल तर डोळ्याच्या कडांखाली आपली नेहमीची फेस पावडर लावायची किंवा कॉम्पॅक्ट पण चालेल. त्याने ओघळत नाही. करून पहा एकदा.

आणि मेबलिन चं हे नवं काजळ उत्कृष्ट आहे. जरूर वापरून पहा.. अजिबात ओघळत नाही. मी नाना प्रकारची वापरली आहेत, हे नंबर एक. शिवाय आयलायनरसारखे वरच्या पापणीला ही नीट लावता येते.

maybelline-the-colossal-kajal-800x800.jpg

हम्म्म्म..दक्षिणा
मला वाटते रात्री घरी गेल्यावर प्रॅक्टिस केली पाहिजे. किती दिवसात जमू शकेल? Happy
आणि कुठला घेऊ आयलायनर?

अरे मेबेलिनची काजल पेन्सील! मी हे गेले २ महीने असंच टक लावून बघते घेऊ की नको च्या तळ्यात मळ्यात आणि मग नकोच ते पडून राहील उगाच म्हणून हिरमुसल्या चेहर्‍याने परत फिरतेय Sad घेऊन टाकूच काय?

माधवी आता नवशिकी असशील तर पेन्सिलनेही ट्राय करू शकतेस... डिपेन्ड्स ऑन यूअर कम्फर्टॅबिलिटी. मला पेन्सिल्ने लावलेले आवडत नाही कारण ते सफाईदार नाही दिसत. पण लिक्विडला पेशन्स लागतो. तु पुण्यात असलीस तर मी तुला आयलायनर कसे लावावे याचे खास (माझे माझे बरं का) धडे देऊ शकेन. Wink

ड्रिमगर्ल नक्की घे. आवडेल तुला बघ.

माधवी हिमालय ची प्रॉडक्स्ट बेस्टच. नो डाऊट. Happy

अगं सहा शेडस असतात असं म्हणत होते. आणि सिल्वर कवर होतं गं Happy
दक्स ती शेड सही आहे. माझ्याकडे एक नेहमी असते. पण लॅक्मे चे मला फार आवडत नाहीत. लगेच खाते मी Sad
आणि मेबिलिन चं काजल आता घेणार.:)

लिक्विड लायनर मात्र लॅक्मेचा मस्त. हल्ली लिक्विड मिळतच नाहीत. लॉरियालचं पेन्सिल लायनर घेतलं तर डोळ्यांना जखमा झाल्यासारखं दिसायलागलं Uhoh

पारे पेन्सिल लायनर्स म्हणजे ती पेनसारखी असतात तीच ना? ती नेहमी टिप-डाऊन ठेवावी लागतात, फिकी लागली तर आपण घासतो.. मला तरी लिक्विडच आवडते. डोळे नीट डिफाईन्ड दिसतात.. आणि डार्कनेसमुळे डोळे उठून दिसतात. Happy

ड्रीमगर्ल .. Lol

आय लायनर लावायला प्रॅक्टीसच लागते.. तू पेंसिलीने सुरु कर..
आय पेंसिल्स डीप फ्रीझर मधे रात्रभर ठेवून सकाळी शार्पनरने शार्प केल्यास मस्त टोकदार होतात न तुटता..

बादवे यंदा लॅक्मे ची आयकॉनिक पेंसिल घेतली ..ती करीना कपूर वाली.. चांगल्या आय मेकप रिमूवर ने घास घास घासली तरी मेली पुसली जात नाही.. एकवेळ डोळे,पापण्या भाईर निघतील पर आयकॉनिक काजल.. नो वे... Uhoh

मस्त शेड आहे लिप्स्टिक ची.....

मी सध्या अ‍ॅवॉन च्या लिप्स्टिक वापरते. मस्त आहेत. लॅक्मे मधे मी मॅट फिनीश घेतली आहे. आय लायनर पेन वापरते आहे मोदी केअर चं. मस्त आणि काही झंझट्च नाही. स्केच पेन सारखं असतं. लावायला एकदम सुकर.

ही लिंक पहा
www.modicare.com

झंपे $$$$$$$$$$$$ तुझी पोस्ट वाचली आहे गं... थँक्स Happy

वर्षु आयकॉनिक इज व्हॉट? पेन्सिल ऑर लिक्विड? Uhoh

ही नोजरिंग्/नथ कुठल्या प्रकारची?

types-of-nose-rings.jpg
बेबोने रावन च्या छम्मकछल्लो साँगमध्ये घातलंय. तू तिथे मी मध्ये मंजीरीच्या बहीणीनेही लग्नात घातली होती.

मी कोणे एके काळी लॅक्मेच्या फॅक्टरीत कामाला होते, काम होते प्रॉडक्ट कॉस्टींगचे, त्यामुळे मला त्यांच्या R&D लॅबमध्ये प्रवेश होता. R&D लॅबमधले लोक मला नेहमी नविन प्रॉडक्ट्स ट्राय करायला द्याय्चे.

आपल्या कपड्यांना आणि इतर अ‍ॅसेसरीजना मॅच होतील अशा शेड्स वापरल्या तर त्या आपल्याला चांगल्या दिसतात हा शोध मला तिथे असताना लागला. त्याआधी मी कायम चॉकलेटी शेड वापरायचे, माझ्या भारतीय सावळ्या स्किनला फक्त हीच सुट होते असा माझा (गैर)समज होता. तिथल्या दोन वर्षात तो समज खोटा आहे हे लक्षात आले. Happy

बेबे अनुमोदन तुला.
मी पण असाच विचार करायचे.
पण माझ्याकडे एक पर्पल शेड आहे लिप्स्टिकची ती मी नेहमी आसपास जाणार्‍या ड्रेसवर लावते, चांगली दिसते. मला मात्र ही प्रेरणा हापिसातल्या मैत्रिणीकडून मिळाली. ती निळं आयलायनर वगैरे लावते.. माझी काही इतकी उडी नाही बाबा. Uhoh

Pages