फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!

Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28

खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्‍याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? Wink
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एनीबडी नोज अबाऊट टिथ ज्वेलरी >>
ते जुन्या हिंदी सिनेमामधे व्हिलनचं तोंड उघडल्यावर कसं सोन्याचा दात दिसायचा.. तसं वाटतय!

एनीबडी नोज अबाऊट टिथ ज्वेलरी >>
मी तरी कुठेच बघितले नाही बाई.
हि ज्वेलरी अगदी teen ages ना चांगली दिसेल अस वाटतं
teeth correction साठी clips लावतात त्या सुद्धा आज काल coloured असतात म्हणे.

ऐ ... मीही लावून घेतला होता एक डायमेंटी ,काही वर्षांपूर्वी एका डेंटिस्ट कडून. तेंव्हा मला भरपूर स्टायलिश वगैरे वाटलेलं... नंतर घरचे मला 'तू एकदम सिंधीफाईड' झालीयेस म्हणून चिडवू लागले म्हणून काढून टाकला Proud

वर्षु त्याचा काही त्रास होतो का?दात खोलगट करून त्यात डायमंड बसवतात का? काढणे/घालणेबल असतो का? खर्च किती आला? Uhoh

काह्ही त्रास होत नाही,स्लाईटली ,सरफेस रफ करून सुपरफिशलीच चिकटवला होता . .. ३००० रुपये चार्ज होता.. बरीच वर्षं झाली दक्षु.. काढताना मीच घरी खरवडून काढून टाकला.. Happy
डोंट बॉदर टू डू इट.. इट्स नॉट वर्थ

बादवे एक सजेशन..
या धाग्यावर १००० पोस्टी झाल्या कि मग या धाग्या चा भाग २ असा क्रमांक देऊन नवीन चालू करावा का??? जस्ट लाईक ' निसर्गाच्या गप्पा' या धाग्याप्रमाणे..

न्हाय गा मृणाल१ .. छोटुसा डायमंड असतो ना म्हणून त्याचं लाडाचं नाव डायमेंटी... नॉट ऑफिशिअल

पिळाच्या ओढणीच्या टीपांबद्दल ध्न्स सगळ्यांना. नीरजेच्या सांगण्याप्रमणे चुण्या करून दोर्‍याने परत आवळून टाकणार आहे आता त्या ओढणीला. नाहीतरी माझ्या सुंदर पांढर्‍या पर्सची वाट त्याच लाल रंगाने लागली आहे. किमान त्याचे शासन दिल्याचा आनंद Happy

Pages