Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वत्सला, २०० लाडु? ग्रेट! मला
वत्सला, २०० लाडु? ग्रेट!
मला दह्यातली भेंडी कशी करतात ते हवे आहे. भेंडी रायता, दह्यातली भेंडी सेमचं का?
नाही दोन्ही वेगळे.
नाही दोन्ही वेगळे. रायत्यासाठी चकत्या खरपूस परतून मग त्यात दही आणि इतर मसाला घालतात. दह्यातली भेंडी, दह्यातच शिजवतात.
चकलीच्या भाजणीपासुन एंड
चकलीच्या भाजणीपासुन एंड पर्यंत न चुकणारी पाक्रु ची माहिती हवी आहे.. लिन्क असेल तरीही चालेल.
चकल्या खुसखुशीत झाल्या पाहिजेत...
दिनेशदा, कॄती (हे कसे
दिनेशदा, कॄती (हे कसे लिहावे?) कुठे मिळेल सांगता येईल का?
इथे कोणी कधी लिहिलि आहे का? मला सापडली नाही.
सापडली दही भेंडी:
सापडली
दही भेंडी: http://www.maayboli.com/node/21154
रायते: http://www.maayboli.com/node/26689
अजुन कही प्रकार आहेत का?
कृती = kRutI
कृती = kRutI
रुचिरामधली चकली रेसिपि झकास
रुचिरामधली चकली रेसिपि झकास आहे. आपले डोके न लावता दिलेल्या कृतीप्रमाणे सर्व करत गेल्यास, जगातील सर्वोत्तम चकली बनवता येते. अनुभवाचे बोल ! मी रुचिराभक्त आहे त्यामुळे आजवर मला चकली कशी फसते हे समजले नाहीये...कमलाबाई ओगले झिंदाबाद
भाजणी दळायला देताना मात्र खबरदारी म्हणून आपणच आधी डाळ दळायला देणे व त्यावर भाजणी दळावयास सांगणे. कणकेवर भाजणी दळल्यास चकली मउ पडते. जिथे भाजणीसाठी वेगळी गिरणी असेल तिथे हे टेन्शन नाही.
रुचिरातली काय रेसीपी आहे
रुचिरातली काय रेसीपी आहे मग?
आता दळायचे वगैरे चक्कर असल्यास बाद. इथे कुठे दळणार...
सुमेधाव्ही.. रुचिरातली रेसिपी
सुमेधाव्ही.. रुचिरातली रेसिपी असल्यास टाका ...
अमेरिकेतल्या बायकांनो,
अमेरिकेतल्या बायकांनो, वडापावसाठी कोणता गोलपाव वापरता जो पौष्टिक असतो? मैद्याची गोलपाव भयंकर असतात..
१२० लोकांसाठी किती श्रीखंड
१२० लोकांसाठी किती श्रीखंड किती लागेल? काही कल्पना? पौंडामध्ये किंवा किलोमध्ये सांगा, प्लीज.
वेका -- मी साधारण इथल्या
वेका -- मी साधारण इथल्या रेसिपीने एकदा सुप केलेले भोपळ्याचे. छान झाले होते. http://www.skinnytaste.com/2010/10/coconut-curry-butternut-squash-soup.html
मी आपला सांबार मसाला वापरला होता. फॉल साठी मस्त रेसिपी आहे.
मी डिनर रोल आणते, ते आपल्या
मी डिनर रोल आणते, ते आपल्या पावासारखे लागतात.
ऑफीस मधे दिवाळी पार्टी साठी
ऑफीस मधे दिवाळी पार्टी साठी ५० लोकांसाठी स्नॅक्स किती ऑर्डर करायचे याचा अंदाज हवा आहे. पदार्थ कमी नको पडायला, थोडे उरले तरी हरकत नाही
१>सामोसे (?)
२>ढोकळा ( ?)
३>चकली ( ?)
४>जिलेबी( ?)
५>बेसन लाडू (?)
६>चिवडा (?)
आर्च, पाउंडाचा हिशोब नाही पण
आर्च, पाउंडाचा हिशोब नाही पण साधारण २५ लोकांसाठी तीन गॅलन दुधाचे श्रीखंड केले होते. थोडेसेच उरले होते.
रुचिरा मधे म्हटलंय
१०० माणसांच्या जेवणास १५ किलो चक्का अथवा ५० लिटर दूध , १५ किलो साखर, ४ ग्रॅम केशर, सहा जायफळे, १०० गग्रॅम चारोळी ,
पुर्यांकरता ६ किलो कणिक अन तळायला दोन किलो तूप / डालडा.
प्रतिभा कोठावळे पर्फेक्ट रेसिपीज मधे म्हणतात की १ किलो श्रीखंड ( दोन ते अडीच लिटर दूध ) ( अर्धाकिलो चक्का अर्धा किलो साखर ) ७-८ माणसांना पुरेल .
आता या तिन्ही मॉडेल्सचा मिडियन काढ, त्याप्रमाणात कर अन मग इथेच लिही किती केलंस अन पुरलं की उरलं ते
अरे देवा, स्वयंपाकातही गणित
अरे देवा, स्वयंपाकातही गणित काही पाठ सोडत नाही
अजून एक हिशोब्...एक वाटीभर
अजून एक हिशोब्...एक वाटीभर तयार श्रिखंड असते १०० ग्रॅम. वाट्यांवर मोजायला हरकत नाही. लिमिटेड स्वीट मधे नॉर्मल साईज १० वाटया भरतात १ किलो श्रिखंडात.
काल मी फूडफुड वर बेक्ड
काल मी फूडफुड वर बेक्ड बाकरवडी च नाव एकल...कोणीतरी ते नक्की कस करता येइन ते सांगा ना...
म्हण्जे मावे मधे टेम्परेचर कस आनि किती सेट कराव आनि मग पारी किती जड्/पातळ ठेवावी?????
की फक्त नेहमी प्रमाणे करुन वरुन तेलाचा ब्रश फिरवायचा ???
मी प्रयोग करुन पाहणार होते...पण फसला तर आजी च बरंच एकाव लागेल..
रव्याच्या करंज्या कश्या
रव्याच्या करंज्या कश्या करायच्या ... आणि प्रमाण पण हवय... मैदा अजिबात नकोय .. माहिते का कुणाला..
काल आइ कडे ड्रायफ्रुट च्या
काल आइ कडे ड्रायफ्रुट च्या करंज्या केल्या होत्या मला फरशा आवडत नाही तरी तिने आग्रह करुन १ दिली तर मि अजुन एक फस्त केली मस्त वाटली चव
सारण म्हणजेच ड्राय फ्रुट्स
[चे वाटण अर्थात :)]
अभिनंदन दिवाळिच्या
अभिनंदन

दिवाळिच्या तोंडावर
२००० प्रतिसाद पुर्ण
दिवाळीच्या (प्रश्न) धामधुमीत
दिवाळीच्या (प्रश्न) धामधुमीत उत्तर दिल्याबद्दल धन्सं सानुली
रेसिपी वेगळी वाटते. कोकोनट मिल्क सूपमध्ये वापरलं नव्हतं. आत्ता इडलीला साकडं घातलंय म्हणजे थोडा भो त्या सांबारमध्ये घुसवता येईल.
पण सुपची फर्माईश होती...हायला शाळेत काहीतरी डोक्यात घुसवून येतात...प्रायोगिक तत्वावर दोनेक वाट्यातरी करावं लागणार आहे...सो आभार्स 
मेधा आणि सुमेधा, मनापासून
मेधा आणि सुमेधा, मनापासून धन्यवाद.
वेका ही रेसिपी ट्राय करून
वेका ही रेसिपी ट्राय करून बघा. मी नेहेमी करते ह्या रेसिपीने. छान होतं सूप.
http://www.maayboli.com/node/33199
फेटलेली कॉफी नक्की कशी
फेटलेली कॉफी नक्की कशी करतात??
खरतर ही पाकृ. मी माबो वरच वाचलेली, पण मला नक्की आठवत नाही की कोणत्या धाग्यावर होत ते.
कोणाला हवी असल्यास लिंक द्या किंवा पाकृ लिहा.
मी_चिऊ तुम्हाला हा धागा हवा
मी_चिऊ तुम्हाला हा धागा हवा आहे का?
कॉफी आणि हवी तितकी साखर कपात
कॉफी आणि हवी तितकी साखर कपात घालायची आणि त्यात एक थेंब पाणी घालून जोरात चमच्याने हलवायची.. हळू हळू पाणि सुटून कॉफी आणि साखरेचं मिश्रण तयार होतं. त्या कपात मग वरून उकळतं दूध ओतायचं. झाली कॉफी तय्यार. बरंच वरून दूध ओतलं की फेसाळ कॉफी.. आणि ओट्यावर नक्षी फुकट
हो चिंगी धन्यवाद. दक्षिणा
हो चिंगी
धन्यवाद.
दक्षिणा धन्यवाद
अगदी हेच हव होत.
मला आपल्याकडच्या कॉफीची फार
मला आपल्याकडच्या कॉफीची फार आठवण येतेय. इकडे अंगोलात होते कॉफी, पण यांना जरा कडवट आवडते. मोठ्या कपाला, जेमतेम अर्धा टिस्पून, घातली, तरी फार स्ट्राँग वाटते, मला.
दिनेश, अंगोलात चिकोरी बिया
दिनेश, अंगोलात चिकोरी बिया अॅड करत असतील कॉफीत. भारतात पण तसली कॉफी आली होती. फसली ती. नेस्काफे क्लासिक पाठवू का? अशीच भाउबिजेची? मी खूप दिवसांनी घेतली आहे.
Pages