युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Now, I think it's time to tell Happy
हे पीठ मागच्या शनिवारपासून फ्रीजमधे आहे. Happy

इथे उडदाच्या डाळीच्या पेस्टचे मैदा घालून डोसे आहेत. मैद्याऐवजी रवा, अन्य पिठे वापरूनही व्हावेत.

त्या पेस्टच वापर बेसनासारखा उटणे/साबण/ बॉडी स्क्रब यासारखाही होऊ शकेल. पेस्ट जास्त आंबलेली आहे, त्यामुळे आधी ट्रायल टेस्ट करून घ्या.
http://www.spiceflair.com/pulse-for-beauty-and-health-black-gram-urad-dal/

मी रात्रभर डाळ भिजवली होती आणि सकाळी वाटल्यावर साधारण २ तासानी वडे चालू केले.>>>> म्हणुनच वडे तेलकट झाले. मेदु वडे करताना डाळ वाटली की लगेच करायचे असतात नाहितर वडे तेल पितातच. Happy

वाटलेल्या डाळीमधे तांदळाचे पिठ, मोहन, हवी असेल तर हळद घालुन मळायचे आणि वडे करायचे मग ते वडे मटणाबरोबर खायचे. Happy

२ दिवसांपूर्वी रेडीमेड पावभाजी आणली होती. त्याबरोबर बारीक चिरलेला कांदा भरपूर आला आहे. उरलेला कांदा गेले २ दिवस फ्रीज मध्ये बंद झाकणाच्या डब्यात ठेवला होता. (पूर्वी मी स्टीलच्या वाडग्यात/ वाटीत झाकण घालून ठेवत असे. तरीही फ्रीज मध्ये वास दरवळत असे. म्हणून ह्या वेळी लॉक अँड लॉक च्या डब्यात ठेवला.) आज सकाळी थोडा भाजीत घातला. तरीही बराच उरलाय. मग आठवले की इथे माबोवर कुठेतरी वाचले होते की उन्हात वाळवून ठेवायचा कांदा! पण त्याचे नंतर काय करायचे ते आठवतच नाहीये. सकाळी बॉक्स ग्रिल मध्ये उन्हात वाळायला घालून आलेय. कबूतरांच्या तावडीतून वाचले तर त्याचे काय काय करता येईल आणि कसे / कुठे साठवायचा असला वाळलेला कांदा हे सांगा प्लीज! (कबूतरांना कांदा आवडत नसल्यास उत्तम आहे! Proud )

वाळलेला कांदा, कुठल्याही भाजीत / आमटीत घालता येतो. तो पटकन तळला जातो.
खास करुन चिवड्यात घालतात. खुप छान लागतो.

निंबे इतका कांदा दिलाय त्याने? की तेव्हा खाऊन आज भाजीत घालून ही उरलाय? Uhoh
नुसतं पाहतेस की काय कांद्याकडे? Proud

निंबे इतका कांदा दिलाय त्याने? की तेव्हा खाऊन आज भाजीत घालून ही उरलाय? >>
अगं खरंच... चांगला मध्यम आकाराच्या वाडग्याइतका दिला होता. रात्री उशीरा घेतली त्याच्याकडून पावभाजी जेव्हा तो पाभाची गाडी बंद करायला निघाला होता. मग उरला सुरला सगळा कांदा त्याने पार्सलात घातला होता. घरी आप्ल्यावर पार्सल उघडल्यानंतर लक्षात आले Uhoh

बरं पाभा तरी किती घेतली होती माहितीये का? फल्त १ प्लेट! Proud नवरोबाला अचानक पाभा खायची हुक्की आली होती. Proud

मला या वेळेस तुप विकत घ्यायचे आहे नेहमी घरी करते पण गायीचे दुध लवल्या पासुन साय कमी साठत
कोणते तुप चांगले आहे
अमुल , गोवर्धन ई पैकी?

प्रीती, कोणतंही तुप चांगलं नाही. अगदी कोणतंही. सरळ लोणी आणुन घरीच बनव ना. मी एकुण एक ब्रॅन्ड ट्राय केले, चितळे सुद्धा आवडलं नाही. सगळ्या नोन्-अननोन ब्रॅन्ड्समधे पुण्याचं ABC फार्मचं आणि नारायण पेठेतल्या आठवले डेअरीचं ही दोनच तुपं माझ्या पसंतीस उतरली. पण तरीही मी ABC चं लोणी आणुन तुप बनवणंच प्रिफर करते. घरी कढवलेल्या तुपाची चव कोणत्याही ब्रॅन्डला नाही. Happy

बाजारचे तूप, घरच्यासारखे विरजून वगैरे केलेले नसते तर ते थेट क्रीमपासूनच केलेले असते, त्यामूळे त्याला तो स्वाद आणि चव येणे शक्यच नाही. जरी घेतले तरी, ते घरी परत कढवले तर त्याचा स्वाद थोडाफार सुधारतो.

प्रीती, मुंबईमधे माहित नाही. गुगलवर शोधावं लागेल तुला. किंवा मग 'जस्ट डायल' Happy

जरी घेतले तरी, ते घरी परत कढवले तर त्याचा स्वाद थोडाफार सुधारतो. >>> हो दिनेशदा. ही टीप तुम्हीच पुर्वी दिली होतीत कोणालातरी कुठे तरी. तेव्हापासुन विकत आणलंच तर मी तुप डब्यात सोडतच नाही. आधी पातेल्यात थोडंस उकळते/कढवते. याने नक्कीच फरक चवीत पडतो.

घरी कढवलेल्या तुपाची चव कोणत्याही ब्रॅन्डला नाही.
>>
यु सेड इट माऊ Happy
मनिमाऊ कडून तुपाची तारीफ आली नाही तरच नवल नै का! Proud

माझी ताई तर क्रिम आणते बाहेरून आणि त्याचं तूप करते. तिच्या हातच्या तुपासारखं तूप मी आयुष्यात खाल्लेलं नाही.

माझी ताई तर क्रिम आणते बाहेरून आणि त्याचं तूप करते. >> कुठुन आणते ते सांग Happy

वर्षे पुर्वी कात्रज आणत होती.. तुला शेडगे डेअरी माहित आहे का? त्यांची सर्व प्रॉडक्ट्स अप्रतिम असतात. ट्राय कर, आपल्या रोडलाच आहे. नित्यानंद हॉल समोर

गोवर्धनचं मला तरी चांगलं वाटलंय
>>
मी पण सध्या हेच वापरतेय. अमुलपेक्षाही छान वाटलं 'गोवर्धन'. का कोण जाणे पण मला पहिल्यापासुनच अमुल तुप आवडत नाही.

घरच्या तुपाची महती खरी असली तरी गाईचं दूध ज्या प्रमाणात लागतं ते बघता वाडगाभर तुपासाठी २ महिने साय साठवावी लागेल. Happy
बाहेरून लोणी आणायचं तर पार्ल्यात तरी मला सापडला नाहीये बरा पर्याय. सामंतांकडचं एकदा आणलं होतं. काहीतरी भयंकर वास होता त्याला. परत नाही आणलं.

नित्यानंद हॉल समोर >> सिं रोडवरुन आत जायचं का?
तसेही कात्रजचे मिळते जवळ.. पण गाईचे असते Uhoh

होय, द्वारिका बेकरीच्या रस्त्यावरून आत जायचं. जास्ती नाही ३०० मीटर आहे फक्त.

दक्षिणा, ताईला विचारून सविस्तर लिही प्लिज. क्रिम घुसळून लोणी काढून तूप कढवायचं की डायरेक्ट किर्मच कढवायचं? त्या क्रिमची कन्सिस्टन्सी कशी असते?

द्वारिका बेकरीच्या रस्त्यावरून आत जायचं. >> फॉर युवर इंफो.. बंद झाली द्वारीका बेकरी आता Uhoh तिथे केक शॉप होते आहे.

झालं परत दही-तुप पुराण सुरु. Happy हा आपल्या सगळ्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. येवुन जावुन आपण तिथे येवुन ठेपतोच. आणि हा विषय निघाला कि पोस्ट्स पण धपाधप पडायला लागतात. Happy

मने कोल्हापूरात एक उक्ती आहे.
बायका एकवेळ आपला नवरा देतील पण विरजण देणार नाहीत. Uhoh

Lol कायपण!

नी,
सामंताच लोणी कढवुन तूप खुप वर्ष वापरते आहे मी..चांगला असत. मला नुसत खायला पण आवडत Happy
तूप..

Pages