क्लूलेस - ८

Submitted by गजानन on 26 October, 2012 - 13:21

क्लूलेस - ८ च्या चर्चेसाठी हा धागा.

खालील दुव्यावरून या खेळाला सुरुवात करता येईल.

http://ahvan.in/ahvan/ahvan12/klueless8/specter/justclicktogo.asp

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मजा म्हणजे त्या लेव्हलचा पहिला क्लू मला एका मराठी पुस्तकावरून कळला. Happy

१९ची माशी सापडली रे. पण पुढचं लौकर सापडेना म्हणून सध्या बंद केलंय आणि ब्याक टू अभ्यास. क्लू दे ना प्लीज. तू कितव्या लेव्हलमध्ये आहेस आता?

मी आता २०ब वर आहे. आज जेवढं होईल तेवढं, यानंतर बहुदा पुढच्या आठवडाखेरीतच वेळ मिळेल.
१९ : माशीला धरून थोडावेळ बाजूला ठेव. टायटलमधून लपलेली बाब शोधून ती आणि टायटलातले इतर क्लू यात एकाचवेळी चमकलेल्या घटना बघ. त्यातून काय घ्यायचे हे युआरेल सांगेल. आता त्या माशीपुढं या कवड्या टाक. चित्रात कशाची कमतरता आहे त्यावर माशी बसेल.

त्या लेव्हलचा पहिला क्लू मला एका मराठी पुस्तकावरून कळला. <<< म्हणजे माझ्या पोस्टीत मी वेगळ्या अक्षरात लिहिलेला का? Happy

हां तोही. मुळात ते चित्र पाहिलं तेव्हा मला एकदम त्या पुस्तकाचं नावच आठवलं आणि अक्षरश: दोन मिन्टात उत्तर आलं होतं. पण इंस्त्रक्षण फॉलू करायला चुकले त्यामुळे वेळ गेला. (जितना बताया उतनाइच देनेका, बाकी अपनेपास रखनेका.. :-))

अवल, सहावीला तुला काय मिळालंय? त्या दोन्हीत कॉमन काय? मुख्य ब्लॉगावरही त्यांनी बराच थेट क्लू दिला आहे. तो बघितलास का? तिथे लोकांच्या कमेंटींमध्ये उत्तर मॉडरेट केलं आहे पण आजूबाजूचे शब्द तसेच आहेत, ते पाहिलंस का? तुला जी माहिती मिळालीय ती गूगल करून पाहिलीस का? मग त्यातून काही सापडलं नाही का?

मी १२ वर. अकराने डोळे खराब केले म्हन्ता म्हन्ता बाराने पार आंधळं कराय्चं ठरवलेलें दिसतय.

ते पिक्चर सेव्ह करता येइना. कसे सेव्ह करू ते सांगा प्लीज.

बारा म्हणजे फिरत्या आकृतीची का?असेल तर तुझ्या दुसर्‍या वाक्यातच एक क्लू आहे त्याला चित्राच्या अनुषंगाने गूगल कर. तू म्हणतेस ती अवस्था चित्रातल्या नेमक्या कोणत्या गोष्टीने होतेय?

अकराने डोळे खराब केले म्हन्ता म्हन्ता बाराने पार आंधळं कराय्चं ठरवलेलें दिसतय.>>>>
नंदिनी, का? का?? का होशील आंधळी बरं? अंधे हो तेरे दुश्मन.. Proud

सुटलीलेव्हल. कितीतरी वेळ मी काळ्या कपड्यांतल्या माणसांच्या मूव्हीमधे शोधत होते. यडपटपणा.

१३ वी पण सुटली. थोडी सोपी होती. गूगलदेव लवकर प्रसन्न झाले.

१४मधल्या सर्वात शेवटच्या चित्राचे भाव कुणी मला सांगेल का? Proud

४-६ दिवस गदबडीत Sad तो पर्यंत तुम्ही पार पल्याड पोचाल न Happy पण पुन्हा येईन तेव्हा प्लिज मदत करा बरं.
गजानन, श्रद्धा तुमच्या हिंट्स लक्षात ठेवते. मी तुम्ही दोघं म्हणताय तिथेच आहे पण क्लिक होईना. बहुदा डोक्यात इतर गोष्टींची गर्दी कमी झाली की होईल क्लिक. धन्यवाद Happy

गजानन, मी २१वर. २०ब सुटली की क्ल्यू देऊ? Happy

रोज अर्ध्या तासात जितक्या सुटतील लेव्हल तितक्या असं धोरण ठेवलं आहे. Sad पण काल रात्री २०बने फारच वेळ खाल्ला.

अखी, त्या चित्रात लिहिलंय ते गूगलून पहा एक नाव मिळेल, त्यात सोर्स क्लू घालून काय मिळतंय का पहा.

श्रद्धा, २१ नक्की काय गोंधळ आहे कळत नाही. Sad सहळे म्हणताहेत सोप्पं आहे, पण सगळे करून पाहिलं.

९मधले सगळे कीवर्ड(पेज सोर्समधला क्ल्यू: त्या अवस्थेला काय म्हणतात?) पहा आणि ऑफिशियल ब्लॉगावरची लिंक पहा. त्यांनी दिलेल्या क्ल्यूने खूपच सोपी झाली आहे लेव्हल.

श्रद्धा, २१ नक्की काय गोंधळ आहे कळत नाही. सहळे म्हणताहेत सोप्पं आहे, पण सगळे करून पाहिलं.
>> गजा, मी पण आहे मग तुझ्यासोबत. मलापण नक्की झोल कळत नाहीये/

आलो सहावीत. Happy
पाचवीत अतिशहाणपणाने अति खोलात शिरल्याने वेळ लागला. Lol

२१ला काय करायचंय ते कळलंय. पण नंबर बरोबर मिळत नाहीयेत. म्हणून मी बंद केलं. तुला मिळाले बरोबर नंबर, तर मला पण सांग.

अखी, तुम्ही ब्लॉगावर त्यांनी टाकलेला क्लू पाहिला की नाही?

श्री, एकदा हा खेळ सुरू केला की सोडायला जीवावर येईल आणि वेळही खाईल म्हणून सुरूच करणार नाहीये.

आम्हाला बाबा कामं असतात, तुमच्यासारखं थोड्डीच्चे!!! Proud

मलाही ते लोक जे सांगताहेत ते समजण्यात कुठे गफलत होतेय ते कळत नाही. डोक्यात येतील त्या सगळ्या शक्यता बघितल्या.

Pages