क्लूलेस - ८

Submitted by गजानन on 26 October, 2012 - 13:21

क्लूलेस - ८ च्या चर्चेसाठी हा धागा.

खालील दुव्यावरून या खेळाला सुरुवात करता येईल.

http://ahvan.in/ahvan/ahvan12/klueless8/specter/justclicktogo.asp

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुमेधा. Sad (एवढं सगळं लिहिण्यापेक्षा थेट उत्तरच चाललं असतं ना! असो. मला आता तेच मुद्दे लिहायचा कंटाळा आला.) ज्या लोकांना इतके तपशीलवार काय काय कसं करायचं असे क्लू हवे आहेत, त्यांना क्लूलेसमध्ये नक्की कशाने मजा येते? Sad असो. या विषयावर हेमाशेपो.

सातवीचे वर्णन टाका. आत्ता आठवत नाहीये.

सर्वांनी प्लिज, क्ल्यु "लेस" चे एथिक पाळूयात ना Happy
श्रद्धा, सहावीला त्या दोघांपर्यंत पोहोचले. पण पुढे गाडी अडलीय...पिंक मॅन, होस्टेज काय कळना
तू कुठे पोहोचलीस ?

श्रद्धा, अगं एवढं लिहुनही थेट नाही सापडत उत्तर त्या लेव्हेलचं पटकन Happy तुला मला क्लीयर झाली म्हणुन असं वाटतं Happy असो. तरीही मान्य. परत थेट सुचना करत नाही.
मी आता नवव्या लेवेल वर. बराच वेळ अडकली आहे.

सुमेधा : नववीला बरीच धडपड कराया लागली. युआरेल हिंट, चित्रं सोर्स्क्लू.... Sad काही संबंधित चित्रपट मिळाले का?

दहावीचा काही क्लू द्याल का कोणीतरी?

मी अकरावी पूर्ण केली दुपारी. नंतर बघितलं नाहीये.

अभ्यासातून अधूनमधून ब्रेक घेऊन इकडे आणि तिकडे बघत होते. Sad (लेव्हल कठीण होत जाणार आता त्यामुळे मी बंद केला खेळ. Sad :()या लोकांनाही हीच वेळ मिळाली क्लूलेस सुरू करायला.

अरेच्या, तुला वेळ नाही अन मला डोकं नाही Wink एक काम कर तुझं डोकं पाठव माझ्याकडॅ, अर्र्र पण मग तुझ्या अभ्यासाचं काय Wink रच्याकने कसला अभ्यास ? माझ्या सहावीचं सांग ना बयो Happy

लेव्हल ६ : अवल, चित्रातल्या दोन चिन्हांमधून दोन ठळक क्लू मिळतील. शीर्षक आणि चित्राचे नाव त्या दोन क्लूंना आणखी ठळक करतील आणि तुम्हाला परस्परविरोधी अशा दोन विचित्र बाबींच्या विकी पानावर नेऊन सोडतील. Happy

श्रद्धा, परीक्षा आणि क्लूलेस... म्हणजे सेकंडसेमच्या मेकॅनिक्सच्या पेप्राच्या पूर्वसंध्येला विश्वकपातली भारत-पाक म्याच असल्यासारखे!

मी आता पंधराव्या लेव्हलीवर.

सतरावी कृपया मदत करा.

.... आणि हसत 'त्या' घटनेपर्यंत पोचलोय. ब्लॉगवरच्या सगळ्या हिंटा पण वाचल्या. पण सुटत नाही. स्पेशल कॅरॅक्टर्स वगळून अर्धे तसेच अख्खे उत्तर टाकून पाहिले मग कंटाळून झोपलो काल... Sad

माझ्याकडे आज त्यांचा ब्लॉगच उघडत नाही.

त्या प्रत्येक इमेजीमधून जे येतंय त्यांचा पुन्हा एकत्र शोध घ्यायचा आहे, ज्यातून एक प्रकल्प ध्वनीत होईल. त्याची माहिती विकीवरून वाचा.

विसाव्वीच्या तीन समांतर शाखा निघाल्या.. Uhoh

Pages