गर्लफ्रेंड असावी पुणेरी आणि बायको मराठवाड्यातील !!

Submitted by सारंग पात्रुडकर on 14 October, 2012 - 09:17

!!गर्लफ्रेंड असावी पुणेरी आणि बायको मराठवाड्यातील !!

पु. लं. ना स्मरून...
तसा स्फोटक विषय आहे पण ललित गद्य समजून "रस" ग्रहण करावे.
कुठलाही भेदभाव करणे तसे चांगले नाहीच पण इथे मी फक्त स्वभाव वैशिष्टे मांडत आहे.
खरतर स्त्रीस्वभाव विश्वात सगळीकडे सारखा पण फरक लग्न-आधी आणि नंतरचा आहे.

लग्नआधी मुलींचा अपेक्षा खुपदा माफक असतात फार तर कॉफी, सिनेमा अश्या मागण्या.
त्या मागायला पुणेरी मुलगी बिनधास्तपणे
पुढे सरसावते पुणे-इतर मुली पदार्थांचे/तिकिटाचे भाव वैगेरे अश्या गोष्टी मध्ये गुंतून जातात, रोमान्स कशाशी खातो असा काही विचार तेंव्हा डोक्यात तरळतो.
जीन्स-टॉप घालणारा पुणेरी बिनधास्तपणा आणि रोखठोकपणा त्या दिवसांमध्ये(लग्नाआधी) खूप छान वाटतो.
हातात हात गुंफून फिरणे (अगदी गळ्यात गळे म्हणायला हरकत नाही), बाईक वर हुंदडणे वैगेरे.
मराठवाड्यातील मुली इथे कमी पडतात नेहमी वेताळ मानेवर बसल्या सारखे त्यांचे वागणे असते जसे काही US ने सोडलेले satellite यांचे थेट प्रक्षेपण त्यांच्या बापाला LIVE दाखवणार आहे, असे.
पुण्यातील मुली या विषयात अगदी पारंगत आहेत, आधीच्या काळात घुंघट असायचा त्याचा आधुनिक अवतार चेहऱ्या भोवती गुंडाळण्याचा स्कार्फ चा शोध पुण्यात लागला असं म्हणायला हरकत नाही.
बाईकवर बसण्याचे एटीकेटस शिकावे ते पुणेरी मुलींकडून!!

मुख्य फरक लग्नानंतर जाणवायला चालू होतो पुणेरी मुलीना अंग झाडून जाउदे पण अंग हलवून काम करणे म्हणजे काय हे देखील माहित नसते.
याबाबतीत मराठवाड्यातल्या मुली वाघीणी. देवी अंगात संचार करते तसे काम दिसलं की यांचं होतं.
अगदी २५ लोक जेऊन दमतील पण या तेवढा स्वयापंक करून दमत नाहीत आणि सासू-नणणदे वर खुन्नस खाऊन नंतर ची आवर आवर आणि भांडे पण धुवून टाकतील.
पण पुणेरी मुली मात्र याबातीत अतीव मागास.
२५ लोक असतील तर किती ग्लास पाणी हे देखील google करतील एवढ्द्या सुगरण!!

अगदी मधुचंद्राला कोठे जायचे, हॉटेल कोणतं, ब्रेकफास्ट ला पास्ता, बेडवर फुलं कोणती या सगळ्या गोष्टी मधे पुणेरींचा चोखंदळपणा तसा रोमांटीक वाटतो पण नंतर बिल पाहून दिल तुटतं.

लग्नानंतर पुरूषाला खरेदी म्हटलं कि घाम फुटतो इथेपण मराठवाडी मुलगी किमती वैगेरे पाहून थोडं आवरत घेण्याची भाषा तरी कमीत कमी करतात पण जर बायको पुणेरी असेल तर त्यांचं लग्नाआधीचा या बाबतील कौशल्य आता संकट वाटायला लागत.

सासू आणि सासर कडचे लोक या शत्रू पक्षा वरील मता मधे पण दोन्ही मुलींमध्ये प्रादेशिक फरक स्पष्ट जाणवतो. पुणेरी मुलीचे सुरुवाती पासूनच या विषयावर ठाम न-कारात्मक विचार असतात.
मराठवाड्या मधील मुली सुरुवातीला खूप सासू उपासक वाटतात हळू हळू कडव्या उपहासात्मक बनतात.

अजून काही प्रमाणात तरी नवऱ्याचा मान मराठवाड्यातील मुली "सुरुवातीला" ठेवतात. कमीत कमी त्याच्या कडून काम वैगेरे तरी अपेक्षा ठेवत नाहीत. पुणेरी मुलींचे नवऱ्याकडुन कसे काम करून घ्यावे हे कौशल्य वादातीत वर तेही आवाज वैगेरे न करता. कदाचित नवऱ्या मधे जगण्या साठी च्या वृत्ती मधून झालेली उत्क्रांती असे शालेय भाषेत उदाहरणा दाखल म्हणता येईल.

ड्रेस स्टाईल पासून ते लाईफ स्टाईल पर्यंत चे पाश्यात्य पुणेरी विचार हा लग्नाआधीचा कौतुकास्पद विचार नंतर रावणाच्या अंगावर पडलेल्या शीव धनुष्या प्रमाणे वाटू लागतो पण तोपर्यंत बाण(खरे तर बाणा ) सुटलेला असतो. नंतर मात्र 10 महिने (वर्ष नव्हे) एक साडी वापरणारी मराठवाडी मुलगी गुणी पतिव्रता वाटायला लागते.. फेशनेबल पुणेरी मूली समोर !!

या सर्व गोष्टींचा काथ्याकूट केल्यानंतर तरी त्यातल्या त्यात गर्लफ्रेंड पुणेरी आणि बायको
मराठवाडी असावी असा एक मौलिक मध्यममार्ग मध्यमवर्गीयांनी स्वीकारावा अस तात्पर्य!!

--सारंग पात्रुडकर

विशेष सूचना: (हे माझे फक्त ललित विचार आहेत मी अजूनही पूर्ण अविवाहित आहे म्हणूनच माझ्या पूर्ण प्रतिभाशक्तीने हे विचार मांडू शकलो आहे माझ्या वास्तविक जीवनाशी याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न कोणीहि करू नये.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरण भौ
मी आपला पंखा झालो. पुण्याच्या बायकोच्या कानात जोरात टाळ वाजवलेत का ? असं करू नका पुन्हा.. ह्रुदयक्रीया चालू द्या बिचारीची. कुचाळक्या करून आधीच कमकुबत झालं असणार .

छान्.....सॉलीड धमाल आहे....मजा येणार आहे.....
येऊ देत...आम्ही आहोतच.......

सावरी

चक्रमचाचा

तुमच्या अन्यत्र असलेल्या पोस्टी पाहिल्या. ड्युआय असावा अशी शंका असूनही व्यवस्थित आहेत. इथे मूळ आयडीनेही लोकांना सभ्य पोष्टी टाकता येत नाहीत. तुम्ही ड्युआय असलात तरी कुणाचा याच्याशी मला देणेघेणे नाही कारण तसं कळवणारे कुणीही माझ्या संपर्कात नाहीत. मात्र केवळ वर दिलेल्या कारणाने ही पोष्ट लिहीण्याचे कष्ट घेत आहे. आपण समजून घ्याल ही प्रचंड अपेक्षा आहे. अन्यथा इतरांना मी गागुचका न्याय लावून मोकळा होत असतो.

आपण माझे पंखा झालात असं म्हणत आहात म्हणजे किमान हितचिंतक असणार असं समजतो. यावर विश्वास ठेवून माझे गा-हाणे आपल्याकडे मांडतोय. आपल्या कॉम्प्लिमेण्टने माझी अडचण वाढली आहे असं मला वाटतंय. कुणाचा असलेला नसलेला आजार, व्यंग यावर विनोद करणे, हसणे हे माझ्या स्वभावात बसत नाही. अशिक्षित मनुष्य देखील असे करत नाही. कित्येक वेळा अशिक्षितांकडून शिकण्यासारखे बरेच असते. विश्वास असो नसो, खेड्यात असं म्हणतात कि नियती तुमच्या खांद्यावर बसून तथास्तु म्हणत असते. दुस-याबद्दलचे असे विचार तथास्तु म्हणण्यायोग्य आहेत का ? कधीकधी हे आपल्यावरच उलटते. काहींना त्याचा अनुभवही आहे. काही ठिकाणी असे म्हटले जाते कि दिवसाच्या चोवीस तासातून एक क्षण आपल्या जिभेवर सरस्वती नाचत असते. पण तो क्षण कोणता हे सांगता येत नाही. तात्पर्य एकच, कि नेहमी सकारात्मक आणि इतरांप्रती द्वेष बाजूला ठेवून बोलावे. कुठल्या वेळी सरस्रव्ती जिभेवर असेल सांगता येत नाही.

याचं सार आपल्याला समजावून सांगण्याची गरज नाही. जसं अ‍ॅब्स्ट्रेक्ट आर्टची ओढ असून ती प्रत्येकाला समजावून सांगायला हवी असा आग्रह नाही. प्रतिमा आणि प्रतिकं जी ज्ञानेश्वरांपासून चालत आली आहेत ती ज्यांना माहीत नाहीत म्हणून ती हास्यास्पद अशी विचारसरणी ठेवणा-यांना समजावून सांगण्यात अर्थ नाही. अर्थात त्यांच्याकडून शिकण्यासारखे जे आहे ते गुमान घ्यावे या मताचा मी आहे. त्यांनी त्यांच्या द्नाय्नाबाहेर केलेल्या मल्लिनाथीला फारसे महत्व देऊ नये याही मताचा आहे. आपण ज्ञानी आहात. माझी मुद्दलातली पोस्टही अ‍ॅब्स्ट्रेक्ट असल्याचे आपल्या लक्षात आलेच असेल अशी अपेक्षा करतो. याउप्पर इथे येण्यास मला वेळ नसल्याने आपले स्पष्टीकरण कधी वाचनात येईल हे सांगता येत नाही. धन्यवाद.

@ बेफिकीर:
>>मी गेले दोन दिवस तुमचा लेख आणि प्रतिसाद वाचल्यानंतर माझा प्रतिसाद् दिला होता. असो. तुमच्या संशोधनांस शुभेच्छा!

परत गैरसमज झाला आपला.

मी असे लिहिले होते: >> प्रतिसाद वाचुन लगेच घाईघाईने प्रतिक्रिया देणे इष्ट नाही.

म्हणजे मला जे प्रतिसाद(response) मिळाले आहेत, त्यावर मी लगेच घाईने प्रतिक्रीया(react होणे) देणे चुकिचे आहे.

@ बेफिकीर आणि सर्वजण:
मी प्रथमच इथे लिहिले तर कोण खेचत आहे, कोणाला काय व का खटकले असेल त्याची शहनिशा न करता तिरिमिरीत
उत्तर देणे चूक.

मी लेखन इथे त्यावरिल प्रतिक्रिंयासाठी तर प्रकाशित केले आहे.
वाचकांच्या प्रतिक्रियांमधून दिशा मिळते, चुका कळतात, हुरुप येतो.
इथला बहुतांश वाचकवर्ग स्वतः लेखकही आहेत; गटण्याच्या भाषेत बोलयचे तर देवाण-घेवाणी मधून "व्यासंगही" वाढतो :), खरंच.

आणि
>> "मी गेले दोन दिवस तुमचा लेख आणि प्रतिसाद वाचल्यानंतर माझा प्रतिसाद् दिला होता."
याबद्द्ल खरंच आभारि आहे.

त्यांचे आराध्य दैवत असतील पुलं, त्यांना स्मरून लिहीत आहेत. तुमची हरकत असण्याचा काय संबंध? का आता हिथे पण 'भावना दुखावल्या'चा बिनडोक खेळ सुरू करायचाय? >> +१

यावरून आपली मते ठासण्यासाठी अश्या धाग्यांचा जमेल तितका उपयोग करण्याची इच्छा दिसते. सोडून द्या राव ? कश्श्शाला प्रतिसाद देताय? >> +१

पात्रुडकर, तुम्ही वर स्पष्ट लिहुनही लोकांनी पर्सनली घेतलच की हो. हा मायबोलीवरच्या काही लोकांचा महिमा! नाही आवडलं तर पायदळी तुडवायचं. आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकुण कर्तृत्व काय ह्याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. विषय कुठलाही असो! (साभार मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर) तुमचा लेख आवडला नाही हे सरळ सांगून मार्गी लागायच्या ऐवजी पर्सनल अ‍ॅटॅक्स, फेसबूक वर प्रोफाईल शोधून त्यावद्दल टिकाटिप्पणी. पॉपकॉर्न काय नी खुर्च्या काय. ह्यांच्या बौद्धीक पातळीची कीव करावी तेवढी कमी आहे. काय सिरियसली घ्यायचे आणि काय सोडून द्यायचे हे ७-८ वर्षाच्या मुलांना कळेल, पण ही लोकं इथे येताना बुद्धी गहाण ठेऊन येतात त्याला कोण काय करणार.

असो, तुम्ही खूप स्पोर्टींगली घेतेलं ही चांगली गोष्ट आहे. तुमचे ललित एक प्रयत्न म्हणून ठीक आहे, पण अजून पंचेस जास्त इफेक्टीव्ह हवे. जास्त खुलवून लिहिता आले तर अधिक चांगले वाटेल. विनोदात टिका देखील (कोणी पर्सनली घेणारे नसले तरी) कोणाच्या जास्त अंगी येणार नाही अश्या प्रकारे करता यायला हवी. अधिक तयारीने तुम्हाला ते जमेल. पुढील लेखनास शुभेच्छा!

भोळासांब, माझ्या मनातलं खुप काही बोलुन गेलात.
स्पष्ट, सु-संस्कृत, नेमक्या प्रतिसादाबद्द्ल, सुचना आणि शुभेच्छांसाठी आभारि आहे.

पात्रुडकर चांगलेच फेमस झाले की पहिल्याच झटक्यात बोअर लेख लिहूनही!
वर कैवारी पण सापडले त्यांना! जन्म झाल्या झाल्या कैवार!

मजा आहे!!

पात्रुडकरांच्या होणार्‍या मराठवाडी बायकोलाही पुण्यातलीच मुलं आवडली असतील का बॉयफ्रेंड म्हणून?

सारंग :- हे आधी का नाही लिहिले ? मी पुण्यातल्या मुलीशी लग्न केले आहे पण तुमच्या या लेख मुळे मी काडीमोड घेणार आहे , आणि दुसरे लग्न मराठवाड्यातल्या मुलीशी करणार आहे !!

@सारंग पु ल चे नाव काढण्याचे काहीही कारण नाही. आता पु ल चाही कॉपीराइट घेतला काय पेठेकरान्नी.
लेख आवडला आहेच. और आंदो.

प्र का टा आ = प्रतिसाद काढून टाकला आहे.
टंकलेला प्रतिसाद उगा नको असं वाटलं म्हणून स्वतःच काढला, तर तसे लिहिण्याचा प्रघात आहे @ टुनटुन

पण तो काढण्याआधीच प्रसन्न अ यांनी वाचून त्याला +१ म्हटलेले होते, ते तसेच आहे. तुम्हाला मी प्रकाटाआ म्हटले अन त्यांनी +१ दिला म्हणजे काय भानगड? असे वाटले असावे बहुतेक Happy

अरे भल्या माणसा...
पुलंना स्मरुन वगैरे प्रस्तावना वाचून अपेक्षा उंचावतात रे.... असो.... पण मुलींच्या बाबतीत असे स्टिअरोटायपिंग करण्याचा अवसानघातकीपणा करु नये!

गर्लफ्रेंड पुणेरी बायको मराठवाड्यातील Lol

लेख नंतर वाचतो पण शीर्षक Rofl

पण हा लेख कसाही का असेना, विनोदी मध्ये का टाकला Lol

मुख्य फरक लग्नानंतर जाणवायला चालू होतो पुणेरी मुलीना अंग झाडून जाउदे पण अंग हलवून काम करणे म्हणजे काय हे देखील माहित नसते.
याबाबतीत मराठवाड्यातल्या मुली वाघीणी. देवी अंगात संचार करते तसे काम दिसलं की यांचं होतं.
अगदी २५ लोक जेऊन दमतील पण या तेवढा स्वयापंक करून दमत नाहीत आणि सासू-नणणदे वर खुन्नस खाऊन नंतर ची आवर आवर आणि भांडे पण धुवून टाकतील.
पण पुणेरी मुली मात्र याबातीत अतीव मागास.
२५ लोक असतील तर किती ग्लास पाणी हे देखील google करतील एवढ्द्या सुगरण!!..
.>>>>>>>>>>>>>> प्रचंड अनुमोदन : Lol Lol Lol

लेख छानच लिहिला आहोस सारंग...अजून लेख येऊ देत...

barshi marathwadyat ahe?? Ka lekhaak up down karat hota marathwadyat?

>>>>>>>बार्शी हे मराठवाडयाचे प्रवेशदवार म्हणून प्रसिद्ध आहे.....

मी अजूनही पूर्ण अविवाहित आहे >> अरे साखरपुडा झालयवर पुर्ण कसे म्हणता? रच्याक्याने होणारी बायको छान आहे.. पण एक सांगा ना ती पुण्याची की मराठवाड्याची.. की आणकी कुठली अ ओ, आता काय करायचं

>>>>>>>लेखकाच्या खासगी जीवना बद्दल जाहिररित्या चर्चा करणे हे सभ्यतेला धरून नाही असे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो

हौस फिटली का - "विनोदी" लिहिण्याची!!!

लिखाणात अजिबातच विनोद दिसला नाही.त

<<<<मी अजूनही पूर्ण अविवाहित आहे म्हणूनच माझ्या पूर्ण प्रतिभाशक्तीने हे विचार मांडू शकलो आहे >>> असले विचार असतील तर .............

.गुड गॉड, वाचल्या बिचार्‍या पुण्याच्या मुली. इतक्या उथळ विचारांचा साथीदार असण्यापेक्षा बिचार्‍या एकट्याच बर्‍या. + १००

काका, तुमचा काही गैरसमज झाअलाय खास - तुम्हाला पुण्याच्या वाटल्या त्या तर खरोखरिच्या तुमच्या गावाच्या निघाल्या कि हो... तिकडे "पूज्य पिताजींच्या" भितीने सलवार कमीझ घालत होत्या म्हणून तुम्ही ओळखलं नाही...

Pages