गर्लफ्रेंड असावी पुणेरी आणि बायको मराठवाड्यातील !!

Submitted by सारंग पात्रुडकर on 14 October, 2012 - 09:17

!!गर्लफ्रेंड असावी पुणेरी आणि बायको मराठवाड्यातील !!

पु. लं. ना स्मरून...
तसा स्फोटक विषय आहे पण ललित गद्य समजून "रस" ग्रहण करावे.
कुठलाही भेदभाव करणे तसे चांगले नाहीच पण इथे मी फक्त स्वभाव वैशिष्टे मांडत आहे.
खरतर स्त्रीस्वभाव विश्वात सगळीकडे सारखा पण फरक लग्न-आधी आणि नंतरचा आहे.

लग्नआधी मुलींचा अपेक्षा खुपदा माफक असतात फार तर कॉफी, सिनेमा अश्या मागण्या.
त्या मागायला पुणेरी मुलगी बिनधास्तपणे
पुढे सरसावते पुणे-इतर मुली पदार्थांचे/तिकिटाचे भाव वैगेरे अश्या गोष्टी मध्ये गुंतून जातात, रोमान्स कशाशी खातो असा काही विचार तेंव्हा डोक्यात तरळतो.
जीन्स-टॉप घालणारा पुणेरी बिनधास्तपणा आणि रोखठोकपणा त्या दिवसांमध्ये(लग्नाआधी) खूप छान वाटतो.
हातात हात गुंफून फिरणे (अगदी गळ्यात गळे म्हणायला हरकत नाही), बाईक वर हुंदडणे वैगेरे.
मराठवाड्यातील मुली इथे कमी पडतात नेहमी वेताळ मानेवर बसल्या सारखे त्यांचे वागणे असते जसे काही US ने सोडलेले satellite यांचे थेट प्रक्षेपण त्यांच्या बापाला LIVE दाखवणार आहे, असे.
पुण्यातील मुली या विषयात अगदी पारंगत आहेत, आधीच्या काळात घुंघट असायचा त्याचा आधुनिक अवतार चेहऱ्या भोवती गुंडाळण्याचा स्कार्फ चा शोध पुण्यात लागला असं म्हणायला हरकत नाही.
बाईकवर बसण्याचे एटीकेटस शिकावे ते पुणेरी मुलींकडून!!

मुख्य फरक लग्नानंतर जाणवायला चालू होतो पुणेरी मुलीना अंग झाडून जाउदे पण अंग हलवून काम करणे म्हणजे काय हे देखील माहित नसते.
याबाबतीत मराठवाड्यातल्या मुली वाघीणी. देवी अंगात संचार करते तसे काम दिसलं की यांचं होतं.
अगदी २५ लोक जेऊन दमतील पण या तेवढा स्वयापंक करून दमत नाहीत आणि सासू-नणणदे वर खुन्नस खाऊन नंतर ची आवर आवर आणि भांडे पण धुवून टाकतील.
पण पुणेरी मुली मात्र याबातीत अतीव मागास.
२५ लोक असतील तर किती ग्लास पाणी हे देखील google करतील एवढ्द्या सुगरण!!

अगदी मधुचंद्राला कोठे जायचे, हॉटेल कोणतं, ब्रेकफास्ट ला पास्ता, बेडवर फुलं कोणती या सगळ्या गोष्टी मधे पुणेरींचा चोखंदळपणा तसा रोमांटीक वाटतो पण नंतर बिल पाहून दिल तुटतं.

लग्नानंतर पुरूषाला खरेदी म्हटलं कि घाम फुटतो इथेपण मराठवाडी मुलगी किमती वैगेरे पाहून थोडं आवरत घेण्याची भाषा तरी कमीत कमी करतात पण जर बायको पुणेरी असेल तर त्यांचं लग्नाआधीचा या बाबतील कौशल्य आता संकट वाटायला लागत.

सासू आणि सासर कडचे लोक या शत्रू पक्षा वरील मता मधे पण दोन्ही मुलींमध्ये प्रादेशिक फरक स्पष्ट जाणवतो. पुणेरी मुलीचे सुरुवाती पासूनच या विषयावर ठाम न-कारात्मक विचार असतात.
मराठवाड्या मधील मुली सुरुवातीला खूप सासू उपासक वाटतात हळू हळू कडव्या उपहासात्मक बनतात.

अजून काही प्रमाणात तरी नवऱ्याचा मान मराठवाड्यातील मुली "सुरुवातीला" ठेवतात. कमीत कमी त्याच्या कडून काम वैगेरे तरी अपेक्षा ठेवत नाहीत. पुणेरी मुलींचे नवऱ्याकडुन कसे काम करून घ्यावे हे कौशल्य वादातीत वर तेही आवाज वैगेरे न करता. कदाचित नवऱ्या मधे जगण्या साठी च्या वृत्ती मधून झालेली उत्क्रांती असे शालेय भाषेत उदाहरणा दाखल म्हणता येईल.

ड्रेस स्टाईल पासून ते लाईफ स्टाईल पर्यंत चे पाश्यात्य पुणेरी विचार हा लग्नाआधीचा कौतुकास्पद विचार नंतर रावणाच्या अंगावर पडलेल्या शीव धनुष्या प्रमाणे वाटू लागतो पण तोपर्यंत बाण(खरे तर बाणा ) सुटलेला असतो. नंतर मात्र 10 महिने (वर्ष नव्हे) एक साडी वापरणारी मराठवाडी मुलगी गुणी पतिव्रता वाटायला लागते.. फेशनेबल पुणेरी मूली समोर !!

या सर्व गोष्टींचा काथ्याकूट केल्यानंतर तरी त्यातल्या त्यात गर्लफ्रेंड पुणेरी आणि बायको
मराठवाडी असावी असा एक मौलिक मध्यममार्ग मध्यमवर्गीयांनी स्वीकारावा अस तात्पर्य!!

--सारंग पात्रुडकर

विशेष सूचना: (हे माझे फक्त ललित विचार आहेत मी अजूनही पूर्ण अविवाहित आहे म्हणूनच माझ्या पूर्ण प्रतिभाशक्तीने हे विचार मांडू शकलो आहे माझ्या वास्तविक जीवनाशी याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न कोणीहि करू नये.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नायक असो वा खलनायक रंगभूमीवर असताना तो नेहमी स्वतःचेच विचार मांडेल अस नाही.<< तुम्ही ही काल्पनिक कथा म्हणून लिहिलेले नाही, त्यामुळे ही सूट तुम्हाला मिळत नाही. त्याउलट
कुठलाही भेदभाव करणे तसे चांगले नाहीच पण इथे मी फक्त स्वभाव वैशिष्टे मांडत आहे. या वाक्यातून तुम्ही स्वतःचेच विचर मांडत आहात हे प्रतिध्वनित होतय.

या सर्व गोष्टींचा काथ्याकूट केल्यानंतर तरी त्यातल्या त्यात गर्लफ्रेंड पुणेरी आणि बायको
मराठवाडी असावी असा एक मौलिक मध्यममार्ग मध्यमवर्गीयांनी स्वीकारावा अस तात्पर्य!!
का बरे? मधमवर्गीय काय पुणे आनि मराठवाड्यातूनच रहतो? आणि कोकणी माणसाने का म्हणून मराठवाडी बायको करावी?

मुख्य फरक लग्नानंतर जाणवायला चालू होतो पुणेरी मुलीना अंग झाडून जाउदे पण अंग हलवून काम करणे म्हणजे काय हे देखील माहित नसते.
याबाबतीत मराठवाड्यातल्या मुली वाघीणी. देवी अंगात संचार करते तसे काम दिसलं की यांचं होतं.
बायको कशासाठी हवीये? घरकामाला नोकराणी म्हणून का?

अजून काही प्रमाणात तरी नवऱ्याचा मान मराठवाड्यातील मुली सुरुवातीला ठेवतात. कमीत कमी त्याच्या कडून काम वैगेरे तरी अपेक्षा ठेवत नाहीत. पुणेरी मुलींचे नवऱ्याला पट्टा न बांधता कसे काम करून घ्यावे हे कौशल्य वादातीत वर तेही आवाज वैगेरे न करता.

का बुवा? पुण्यामधले नवरालोक स्वतःहून घरकामामधे मदत करतील कशावरून? त्यांच्याकडून काम करवून घेण्याची गरजच पडत नसेल. त्यांच्या आयांनी त्यांना लहानपणापासून घरातली कामे शिकवली असतील तर? ते स्वतःहून बायकोला घरात मदत करत असतील तर लगेच तुम्ही "पट्टा न बांधता" वगैरे भाषा बोलणार का?

मी पुण्यातली नाही आणि मराठवाड्याचीदेखील नाही. पण हे असले विचार वाचून आता हसू येत नाही आणि रागही येत नाही. कीव येते फक्त.

पुणेरी मुलगी फसली असं मी आजपर्यंत सकाळ, संध्याकाळ अथवा पुण्यनगरी मधेही वाचले नाही. >> आत्ता ग बाय माझी... दृष्ट काढायची तुमची का पुण्याच्या मुलींची. मामी तर पोपकोर्ण घेऊन बसल्या...

पुणेकर पुणे-इतर मंडळींना कमी लेखतात.>>>>>>>>>>>>>

हे कुठल्या बखरीच्या कितव्या पानावर सुवर्णाक्षरात लिहिले आहे ते एकदा मला माझ्या स्वतःच्या डोळ्याखालून घालायचेच आहे, कोणी मोडीतज्ज्ञ असेल तर सांगा. अहो मराठवाडकर, हे म्हणजे कसे झाले सांगू का, एखादा मनुष्य तलावाच्या काठावर बसला आहे आणि उगाच चाळा म्हणून पाण्यात दगड फेकत बसला आहे, वेळ घालवायला हा.... तर नंतर जर तो ओरडत फिरायला लागला की, काठावर नुसतं बसलं तरी पाण्यावर तरंगांवर तरंग येतच राहतात तर त्याला काय अर्थ आहे का?

रच्याकने, मराठवाडी बायको केल्यावर पुण्याच्या गर्लफ्रेंडला कसं काय मॅनेज करणार आहात तुम्ही त्याविषयी काही विचार करून ठेवला आहे का? नाही, नंतर एकदम पुणेरी गर्लफ्रेंडवर ताशेरे ओढत फिराल मराठवाडी पंचेस कळत नाहीत म्हणून.

आणि मराठवाडी बायकोला कसं अंधारात ठेवणार आहात पुणेरी गर्लफ्रेंडबद्दल ह्याचाही जरा विचार करून ठेवलेला बरा.

पुणेरी मुलगी फसली असं मी आजपर्यंत सकाळ, संध्याकाळ अथवा पुण्यनगरी मधेही वाचले नाही. <<<
तुम्ही वाचले नाहीत हा पुणेरीमुलींचा प्रॉब्लेम कसा काय बा?

खरोखरच पुणेरी मुली फसत नाहीत असं असतं तर मला तरी अभिमानच वाटला असता. पण दुर्दैवाने भरपूर केसेस पाह्यलेल्या आहेत त्यामुळे इतकं घाऊक विधान नाही करता येत.

उदंड प्रतीसाद पाहुन लेखकुचा उत्साह वाढला असेल्.:फिदी:

पण वर नीधप यांनी म्हंटले आहे तसे खरोखरच हास्यास्पद लिखाण आहे, विनोद कुठेही दृष्टीस पडत नाही. सारंग लिहायचे तर काही दर्जेदार लिहा. उगीच पु. लं चे नाव घेऊन उपहासाला पात्र होऊ नका.

लेखकांच्या एकेक एकवाक्यीय सुरनळीवर पब्लिक भान सोडून प्रतिसाद ओतत आहे. लेखक पाच पंचवीस प्रतिसादांनंतर डोकावत आहे.

यावरून आपली मते ठासण्यासाठी अश्या धाग्यांचा जमेल तितका उपयोग करण्याची इच्छा दिसते. सोडून द्या राव ? कश्श्शाला प्रतिसाद देताय?

सारंग पात्रुडकर,

ग्राम्य शब्दांत वर्णन करून सांगायचं झालं तर आपला लेख 'फिरवायला #टीण आणि #पायला #टीण' याकडे झुकतो आहे. असं वाचकांचं मत झालेलं दिसतंय बरंका. माझं नाही. मी आपला एकच बरी या मार्गातला आहे.

"तुम्हाला कोण पाहिजे आहे गर्लफ्रेंड, बायको की मोलकरीण?" असा एक लेख लिहा! Proud आणि त्यात नेमके भौगोलिक उल्लेख टाळून मोघमपणे ग्रामीण, शहरी असं विभाजन करा. मग बघा काय मज्जा येते ते! Biggrin

आ.न.,
-गा.पै.

अहो पात्रुडकर

तुमच्या या लेखाची एचपी फोटोक्वालिटी पेपरवर लेझर प्रिंट घेऊन फ्रेम करून ठेवा. अजून दहा पंधरा वर्षांनी (डिपेन्ड्स) तुमच्या होणा-या जावयाला भेट देण्यासाठी योग्य गिफ्ट राहील ते. खूप मान देईल तो तुम्हाला. आणि लेखाखालच्या प्रतिक्रिया साध्याच कागदावर प्रिंट काढून ठेवा. लग्नानंतर सावकाश भेट देण्यासाठी Wink

हार्दीक शुभेच्छा !

(क्लिकारपी वाढला असेल नै पात्रुडकरांमुळे ?)

बार्शीच अपडाऊन होते पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात. Wink
प्रशासन प.महाराष्ट्राचे मेंटॅलिटी (संस्कृती)मराठवाडी!

नंदिनी
>>तुम्ही ही काल्पनिक कथा म्हणून लिहिलेले नाही, त्यामुळे ही सूट तुम्हाला मिळत नाही....

पण मी इथे आत्मचरित्रही लिहित नाहिए.

>>....या वाक्यातून तुम्ही स्वतःचेच विचर मांडत आहात हे प्रतिध्वनित होतय.

हे तर माणिकचंदच्या गुट्ख्यावर 'पानमसाल्याने कर्करोग होउ शकतो' वाचुन
'माणिकचंद गुट्खा खातो वा त्याला कर्करोग झाला आहे' असा निष्कर्श काढण्यासारखे आहे.

बेफ़िकीर
>>यावरून आपली मते ठासण्यासाठी अश्या धाग्यांचा जमेल तितका उपयोग करण्याची इच्छा दिसते.

गैरसमज नसावा पण प्रतिसाद वाचुन लगेच घाईघाईने प्रतिक्रिया देणे इष्ट नाही.
नाहीतर ते खालील उक्तीप्रमाणे होईलः
"आपण अर्धे एकतो , एक चर्तुर्थांश समजतो, शुन्य विचार करतो आणि दुप्पट प्रतिक्रिया देतो."

बहुतेक प्रतिक्रिंयानमधुन खुप जणंना जे म्हणण आहे ते खाली बागुलबुवांनी मांडल आहे

बागुलबुवा
>>विनोद ही तारतम्याच्या तारेवरची कसरत आहे. सर्वांना खुश करणे अशक्य असते पण बहुसंख्यांना राग येत असेल तर >>विचार करणे श्रेयस्कर.

या विचारांशी सहमत आहे.

>>>>विनोद ही तारतम्याच्या तारेवरची कसरत आहे. सर्वांना खुश करणे अशक्य असते पण बहुसंख्यांना राग येत असेल तर >>विचार करणे श्रेयस्कर.

या विचारांशी सहमत आहे>>>>>>> यावर खरोखरच विचार करणार असाल तर आधी ती पुलंबद्दल ची ओळ काढा. फार खटकते आहे ती ओळ.
आता लेखनाबद्दल - प्रयत्न म्हणून ठीक आहे, शैली पण बरी आहे पण विनोदी नाही वाटला (मी पुणेरी नाही आणि मराठवाड्याची पण नाही Happy )

पण मी इथे आत्मचरित्रही लिहित नाहिए.>> जे काही लिहिलय ते अतिच हास्यास्पद आहे. तुमचे विचार तुम्हालाच लखलाभ.

अवांतर: आपण बार्शीचे आहात का? बार्शी माझे आजोळ आहे.

तर माणिकचंदच्या गुट्ख्यावर 'पानमसाल्याने कर्करोग होउ शकतो' वाचुन
'माणिकचंद गुट्खा खातो वा त्याला कर्करोग झाला आहे' असा निष्कर्श काढण्यासारखे आहे.
>>>>>>>> हे भारी आहे. Lol

गैरसमज नसावा पण प्रतिसाद वाचुन लगेच घाईघाईने प्रतिक्रिया देणे इष्ट नाही.
नाहीतर ते खालील उक्तीप्रमाणे होईलः
"आपण अर्धे एकतो , एक चर्तुर्थांश समजतो, शुन्य विचार करतो आणि दुप्पट प्रतिक्रिया देतो."<<<

पात्रुडकर, कोणत्या गावच्या मुली कश्या असतात हे तुम्ही मला सांगताय? मी गेले दोन दिवस तुमचा लेख आणि प्रतिसाद वाचल्यानंतर माझा प्रतिसाद् दिला होता. असो. तुमच्या संशोधनांस शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

विशेष सूचना: (हे माझे फक्त ललित विचार आहेत <<<
हे तुमच्या लेखातल्या तळटिपेत आढळले. ललित विचार म्हणजे स्वत:चे विचार नसतात का? दुसर्‍या कोणाचे असतात का?

Pages