गर्लफ्रेंड असावी पुणेरी आणि बायको मराठवाड्यातील !!

Submitted by सारंग पात्रुडकर on 14 October, 2012 - 09:17

!!गर्लफ्रेंड असावी पुणेरी आणि बायको मराठवाड्यातील !!

पु. लं. ना स्मरून...
तसा स्फोटक विषय आहे पण ललित गद्य समजून "रस" ग्रहण करावे.
कुठलाही भेदभाव करणे तसे चांगले नाहीच पण इथे मी फक्त स्वभाव वैशिष्टे मांडत आहे.
खरतर स्त्रीस्वभाव विश्वात सगळीकडे सारखा पण फरक लग्न-आधी आणि नंतरचा आहे.

लग्नआधी मुलींचा अपेक्षा खुपदा माफक असतात फार तर कॉफी, सिनेमा अश्या मागण्या.
त्या मागायला पुणेरी मुलगी बिनधास्तपणे
पुढे सरसावते पुणे-इतर मुली पदार्थांचे/तिकिटाचे भाव वैगेरे अश्या गोष्टी मध्ये गुंतून जातात, रोमान्स कशाशी खातो असा काही विचार तेंव्हा डोक्यात तरळतो.
जीन्स-टॉप घालणारा पुणेरी बिनधास्तपणा आणि रोखठोकपणा त्या दिवसांमध्ये(लग्नाआधी) खूप छान वाटतो.
हातात हात गुंफून फिरणे (अगदी गळ्यात गळे म्हणायला हरकत नाही), बाईक वर हुंदडणे वैगेरे.
मराठवाड्यातील मुली इथे कमी पडतात नेहमी वेताळ मानेवर बसल्या सारखे त्यांचे वागणे असते जसे काही US ने सोडलेले satellite यांचे थेट प्रक्षेपण त्यांच्या बापाला LIVE दाखवणार आहे, असे.
पुण्यातील मुली या विषयात अगदी पारंगत आहेत, आधीच्या काळात घुंघट असायचा त्याचा आधुनिक अवतार चेहऱ्या भोवती गुंडाळण्याचा स्कार्फ चा शोध पुण्यात लागला असं म्हणायला हरकत नाही.
बाईकवर बसण्याचे एटीकेटस शिकावे ते पुणेरी मुलींकडून!!

मुख्य फरक लग्नानंतर जाणवायला चालू होतो पुणेरी मुलीना अंग झाडून जाउदे पण अंग हलवून काम करणे म्हणजे काय हे देखील माहित नसते.
याबाबतीत मराठवाड्यातल्या मुली वाघीणी. देवी अंगात संचार करते तसे काम दिसलं की यांचं होतं.
अगदी २५ लोक जेऊन दमतील पण या तेवढा स्वयापंक करून दमत नाहीत आणि सासू-नणणदे वर खुन्नस खाऊन नंतर ची आवर आवर आणि भांडे पण धुवून टाकतील.
पण पुणेरी मुली मात्र याबातीत अतीव मागास.
२५ लोक असतील तर किती ग्लास पाणी हे देखील google करतील एवढ्द्या सुगरण!!

अगदी मधुचंद्राला कोठे जायचे, हॉटेल कोणतं, ब्रेकफास्ट ला पास्ता, बेडवर फुलं कोणती या सगळ्या गोष्टी मधे पुणेरींचा चोखंदळपणा तसा रोमांटीक वाटतो पण नंतर बिल पाहून दिल तुटतं.

लग्नानंतर पुरूषाला खरेदी म्हटलं कि घाम फुटतो इथेपण मराठवाडी मुलगी किमती वैगेरे पाहून थोडं आवरत घेण्याची भाषा तरी कमीत कमी करतात पण जर बायको पुणेरी असेल तर त्यांचं लग्नाआधीचा या बाबतील कौशल्य आता संकट वाटायला लागत.

सासू आणि सासर कडचे लोक या शत्रू पक्षा वरील मता मधे पण दोन्ही मुलींमध्ये प्रादेशिक फरक स्पष्ट जाणवतो. पुणेरी मुलीचे सुरुवाती पासूनच या विषयावर ठाम न-कारात्मक विचार असतात.
मराठवाड्या मधील मुली सुरुवातीला खूप सासू उपासक वाटतात हळू हळू कडव्या उपहासात्मक बनतात.

अजून काही प्रमाणात तरी नवऱ्याचा मान मराठवाड्यातील मुली "सुरुवातीला" ठेवतात. कमीत कमी त्याच्या कडून काम वैगेरे तरी अपेक्षा ठेवत नाहीत. पुणेरी मुलींचे नवऱ्याकडुन कसे काम करून घ्यावे हे कौशल्य वादातीत वर तेही आवाज वैगेरे न करता. कदाचित नवऱ्या मधे जगण्या साठी च्या वृत्ती मधून झालेली उत्क्रांती असे शालेय भाषेत उदाहरणा दाखल म्हणता येईल.

ड्रेस स्टाईल पासून ते लाईफ स्टाईल पर्यंत चे पाश्यात्य पुणेरी विचार हा लग्नाआधीचा कौतुकास्पद विचार नंतर रावणाच्या अंगावर पडलेल्या शीव धनुष्या प्रमाणे वाटू लागतो पण तोपर्यंत बाण(खरे तर बाणा ) सुटलेला असतो. नंतर मात्र 10 महिने (वर्ष नव्हे) एक साडी वापरणारी मराठवाडी मुलगी गुणी पतिव्रता वाटायला लागते.. फेशनेबल पुणेरी मूली समोर !!

या सर्व गोष्टींचा काथ्याकूट केल्यानंतर तरी त्यातल्या त्यात गर्लफ्रेंड पुणेरी आणि बायको
मराठवाडी असावी असा एक मौलिक मध्यममार्ग मध्यमवर्गीयांनी स्वीकारावा अस तात्पर्य!!

--सारंग पात्रुडकर

विशेष सूचना: (हे माझे फक्त ललित विचार आहेत मी अजूनही पूर्ण अविवाहित आहे म्हणूनच माझ्या पूर्ण प्रतिभाशक्तीने हे विचार मांडू शकलो आहे माझ्या वास्तविक जीवनाशी याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न कोणीहि करू नये.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अजूनही पूर्ण अविवाहित आहे म्हणूनच माझ्या पूर्ण प्रतिभाशक्तीने हे विचार मांडू शकलो आहे >> कॉज आणि इफेक्त मध्ये जाम गल्लत करता भाऊ!!! पूर्ण प्रतिभाशक्ती वापरूनही हे असले विचार मांडता म्हणूनच अजूनही अंशत हि विवाहित नाही झालात ...

नीधप - हाहाहाहाहाहा
आर एम डी - अत्यंत योग्य प्रश्न.... Happy

पतिव्रता शब्द काढला का तोंदातून ?
आता पत्निव्रता च्या प्रशनांना द्या जवाब

लिखाणात अजिबातच विनोद दिसला नाही. ओढुन ताणुन काही ठिकाणी प्रयत्न केला आहे पण जम्या नही. Happy

<<<<मी अजूनही पूर्ण अविवाहित आहे म्हणूनच माझ्या पूर्ण प्रतिभाशक्तीने हे विचार मांडू शकलो आहे >>> असले विचार असतील तर ..............गुड गॉड, वाचल्या बिचार्‍या पुण्याच्या मुली. इतक्या उथळ विचारांचा साथीदार असण्यापेक्षा बिचार्‍या एकट्याच बर्‍या.

<<२५ लोक असतील तर किती ग्लास पाणी हे देखील google करतील एवढ्द्या सुगरण >>

काही पुण्यवान पानांची आठवण झाली Proud

ए काय हे ... विषय वाचुनच मी पॉपकॉर्न घेउन आले होते.
पण सगळच ओम फस..
खरं तर पुलंना स्मरुन विनोदी विभागातलं पुर्ण प्रतिभाशक्ती वापरुन लिहिलेलं ललित किती चर्चाधीन व्हायला हवं होतं .
मी पक्की पुण्याची माझी आकलन शक्ती जरा कमीच.. पण...
जाऊ दे. उभा महाराष्ट्र एका चांगल्या परिसंवादाला मुकतोय एवढं खरं

माऊ +१

फक्त पुणे नाही उर्वरीत सर्व महाराष्ट वाचला
आता ह्यांना मराठवाड्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही लग्न करायला Wink

>>>> गर्लफ्रेंड असावी पुणेरी <<<
ती तरी कशाला पुणेरी?? करा की मराठवाड्यातलीच, (अर्थात हिम्मत असेल तर Proud )
बाकी विनाशकाले विपरित बुद्धी असे म्हणतात ते काय खोटे नाही! नैतर आहेच आपलं ते, की जब गिधड की मौत आती है तो वो शहर की तरफ भागता है.... Wink

>>>> आणि बायको मराठवाड्यातील <<< ती तरी कशाला? पुण्यामुम्बईतल्या टीचभर फ्लॅटमधे धुणीभाण्डीकेरवारा अन पाचपन्चवीस माणसान्च जेवण करायला हक्काची नोकर म्हणून? Wink
मग तेही विसरा, नुकतच एक कायद्याचे प्रपोझल आले आहे की नवर्‍याच्या कमाईतील १०% हिश्श्यावर बायकोचा थेट अधिकार स्थापित होणार आहे. तसे झाले की कस्चे पुणे अन कस्चा मराठवाडा! (बाकी पुणेरी गर्लफ्रेण्ड करा वा बायको, तुमच्या कमाईच्या १००% हिश्श्यावर त्या बिनबोभाट हक्क प्रस्थापित करतातच्च! तेव्हा मूळात काहीही करण्याआधी दहादा विचार करा बोवा Light 1 )

खर तर अस सान्गायच आहे की घी देखा मगर बडगा नही देखा या चालीवर पुणेरी पोरीन्च्या पेठी आईबापान्नी दिलेल्या गेल्या शेसव्वाशे वर्षातील स्वातंत्र्यामुळेच त्यांचे झालेले शिक्षण व त्यान्ची जीन्स टॉप इत्यादी वेशभुषा बघताना बरी वाटते, पण त्यान्नी घेतलेल्या शिक्षणामुळे जी स्वतंत्र वृत्ती त्यांचेत निर्माण झालेली अस्ते ती "बायको" या नात्यात गुलामगिरीची अपेक्षा करणार्‍यान्ना कधीच झेपणारी नाही, अन मग बायको करता मराठवाडा वगैरे मागास भागातच जावे लागेल असे वरकरणी हसत हसत तरी कबुल करण्याची वेळ येते, अन तसे करताना कोल्ह्याला द्राक्षे आम्बट या न्यायाने पुणेरी पोरींवर थोड्या शाब्दिक दुगाण्या झाडल्या गेल्या तर त्याचे कुणी विशेष वाटून घ्यायला नकोच, मनुष्य, त्यातुन पुरषीमनुष्य स्वभाव आहे तो! नै का? Wink
पण तस असेल तर लौकर उरकुन टाका, कारण अजुन काही वर्षातच तुम्हाला मराठवाडा वगैरेच काय, तुमच्या "स्पेशल आवडीच्या" बायकोच्या शोधात पार आफ्रिकेपर्यन्त वगैरे जावे लागेल Proud आख्खा महाराष्ट्रच सुधारतोय, पुण्याच्याच वाटेवर चालतोय!)

जब गिधड की मौत आती है तो वो शहर की तरफ भागता है....>>>>>>> लिंबुभाउ ......बदला जरा...
जब लडके को शादी करनी होती है तो मराठवाडे की तरफ भागता है ......असे पाहीजे Biggrin

नै नै उदयन, तेच बरोबर आहे. लेखकूला सुन्दर सुन्दर छान छान कपड्यातल्या पोरी गर्लफ्रेण्ड म्हणुन हव्यात अन त्याकरता तो मराठवाड्यातुन पुण्यात येतोय...... मग क्काय होणार ते सान्गायला मजसारख्या ज्योतिषाची थोडिच गरज आहे? Wink

बाकी तुम्ही म्हणता ते कुठे चालेल? जिथे "लग्न करणे हाच पुरुषाच्या गळ्यातील धोन्डा" वगैरे धर्तीचे धागे उघडतील त्यावर!

खूप पूर्वी कीनै, म्हण्जे जेव्हा आम्ही शाळकरि होतो तेव्हा चाळिसएक वर्षान्पूर्वी सामाईक शिक्षण व्यवस्था नसायचीच. तर तेव्हान्चे षोडशवर्षीय विद्यार्थी पोरीन्च्या राखिव शाळेबाहेर गोन्डा घोळत केव्हा एकदा कुणी नजरेस पडते ते बघायला घोटाळत असत. अन नन्तर कॉलेजमधे सामायिक शिक्षणाची संधी मिळाली की सुरवातीची दोनतिन वर्षे केवळ निरिक्षण अन परिक्षणात घालवुन कॉलेजमधिल मुक्काम वाढवित असते. परिक्षण म्हण्जे तेच ते, वरल्या लेखात केलय तसा नि:ष्कर्ष काढुन शेवटी गाडी मूळपदावर यायची! Wink
त्याच सुमारासचे अजुन एक होते, पुण्यातुन रोजच्या रोज बसेस भरभरुन लोक पिम्परिचिन्चवड भोसरीकडे कामाला जायचे, तर अशा मोठमोठ्या कम्पन्यान्च्या बसगाड्या सन्ध्याकाळी माणसे परतवत पुण्यातुन जायच्या तेव्हाचे दृष्य बघण्यासारखे असायचे. दिवसभर दहा/बारा तास काम करुन खपलेल्या त्या दु:खी जीवान्ना मग बसच्या खिडकीतुन दिसणारे एखाद दुसरे सौंदर्य हाच काय तो सुखाचा ठेवा असायचा व अशा बस मधील यच्चयावत लोकं खिडकीतुन बाहेर आशाळभूतासारखे टक लावुन बघत असलेली दिसायची (खर तर दमल्यामुळे झोपायला हवीत, पण वाकडेवाडी पार झाली की ही टाळकी बरोब्बर जागी व्हायची Proud ). यांच्याकडे बघितले तर हे अन कुठल्या खेडेगावातील प्राथमिक विद्यार्थ्यान्च्या आलेल्या सहलीतील विद्यार्थी जसे टका मका खिडकीतुन बाहेर बघत रहातात यात काहीच फरक वाटायचा नाही. बिच्चारे!
याची पुढची पायरी म्हणजे येवढे पुण्यात येऊनही "नुस्ते बघायचे"? हक्काचे काहीच मिळणार नाही? मग आहेच की विद्रोह वगैरे..... Proud
समजुन घ्या राव, थोडक्यात काय? त्यान्ना पण आपले म्हणा! Wink

त्यान्ना पण आपले म्हणा>>>

ह.ह.पु.वा.....

काय लेख आहे... धन्य तुमची..... पु.ल. काय विनोदी काय.... सगळीच मज्जा... की फज्जा?

स्पेशल आवडीच्या" बायकोच्या शोधात पार आफ्रिकेपर्यन्त वगैरे जावे लागेल फिदीफिदी आख्खा महाराष्ट्रच सुधारतोय, पुण्याच्याच वाटेवर चालतोय!)> +१०००००००
सांरग
गेट वेल सुन Happy

Pages