गर्लफ्रेंड असावी पुणेरी आणि बायको मराठवाड्यातील !!

Submitted by सारंग पात्रुडकर on 14 October, 2012 - 09:17

!!गर्लफ्रेंड असावी पुणेरी आणि बायको मराठवाड्यातील !!

पु. लं. ना स्मरून...
तसा स्फोटक विषय आहे पण ललित गद्य समजून "रस" ग्रहण करावे.
कुठलाही भेदभाव करणे तसे चांगले नाहीच पण इथे मी फक्त स्वभाव वैशिष्टे मांडत आहे.
खरतर स्त्रीस्वभाव विश्वात सगळीकडे सारखा पण फरक लग्न-आधी आणि नंतरचा आहे.

लग्नआधी मुलींचा अपेक्षा खुपदा माफक असतात फार तर कॉफी, सिनेमा अश्या मागण्या.
त्या मागायला पुणेरी मुलगी बिनधास्तपणे
पुढे सरसावते पुणे-इतर मुली पदार्थांचे/तिकिटाचे भाव वैगेरे अश्या गोष्टी मध्ये गुंतून जातात, रोमान्स कशाशी खातो असा काही विचार तेंव्हा डोक्यात तरळतो.
जीन्स-टॉप घालणारा पुणेरी बिनधास्तपणा आणि रोखठोकपणा त्या दिवसांमध्ये(लग्नाआधी) खूप छान वाटतो.
हातात हात गुंफून फिरणे (अगदी गळ्यात गळे म्हणायला हरकत नाही), बाईक वर हुंदडणे वैगेरे.
मराठवाड्यातील मुली इथे कमी पडतात नेहमी वेताळ मानेवर बसल्या सारखे त्यांचे वागणे असते जसे काही US ने सोडलेले satellite यांचे थेट प्रक्षेपण त्यांच्या बापाला LIVE दाखवणार आहे, असे.
पुण्यातील मुली या विषयात अगदी पारंगत आहेत, आधीच्या काळात घुंघट असायचा त्याचा आधुनिक अवतार चेहऱ्या भोवती गुंडाळण्याचा स्कार्फ चा शोध पुण्यात लागला असं म्हणायला हरकत नाही.
बाईकवर बसण्याचे एटीकेटस शिकावे ते पुणेरी मुलींकडून!!

मुख्य फरक लग्नानंतर जाणवायला चालू होतो पुणेरी मुलीना अंग झाडून जाउदे पण अंग हलवून काम करणे म्हणजे काय हे देखील माहित नसते.
याबाबतीत मराठवाड्यातल्या मुली वाघीणी. देवी अंगात संचार करते तसे काम दिसलं की यांचं होतं.
अगदी २५ लोक जेऊन दमतील पण या तेवढा स्वयापंक करून दमत नाहीत आणि सासू-नणणदे वर खुन्नस खाऊन नंतर ची आवर आवर आणि भांडे पण धुवून टाकतील.
पण पुणेरी मुली मात्र याबातीत अतीव मागास.
२५ लोक असतील तर किती ग्लास पाणी हे देखील google करतील एवढ्द्या सुगरण!!

अगदी मधुचंद्राला कोठे जायचे, हॉटेल कोणतं, ब्रेकफास्ट ला पास्ता, बेडवर फुलं कोणती या सगळ्या गोष्टी मधे पुणेरींचा चोखंदळपणा तसा रोमांटीक वाटतो पण नंतर बिल पाहून दिल तुटतं.

लग्नानंतर पुरूषाला खरेदी म्हटलं कि घाम फुटतो इथेपण मराठवाडी मुलगी किमती वैगेरे पाहून थोडं आवरत घेण्याची भाषा तरी कमीत कमी करतात पण जर बायको पुणेरी असेल तर त्यांचं लग्नाआधीचा या बाबतील कौशल्य आता संकट वाटायला लागत.

सासू आणि सासर कडचे लोक या शत्रू पक्षा वरील मता मधे पण दोन्ही मुलींमध्ये प्रादेशिक फरक स्पष्ट जाणवतो. पुणेरी मुलीचे सुरुवाती पासूनच या विषयावर ठाम न-कारात्मक विचार असतात.
मराठवाड्या मधील मुली सुरुवातीला खूप सासू उपासक वाटतात हळू हळू कडव्या उपहासात्मक बनतात.

अजून काही प्रमाणात तरी नवऱ्याचा मान मराठवाड्यातील मुली "सुरुवातीला" ठेवतात. कमीत कमी त्याच्या कडून काम वैगेरे तरी अपेक्षा ठेवत नाहीत. पुणेरी मुलींचे नवऱ्याकडुन कसे काम करून घ्यावे हे कौशल्य वादातीत वर तेही आवाज वैगेरे न करता. कदाचित नवऱ्या मधे जगण्या साठी च्या वृत्ती मधून झालेली उत्क्रांती असे शालेय भाषेत उदाहरणा दाखल म्हणता येईल.

ड्रेस स्टाईल पासून ते लाईफ स्टाईल पर्यंत चे पाश्यात्य पुणेरी विचार हा लग्नाआधीचा कौतुकास्पद विचार नंतर रावणाच्या अंगावर पडलेल्या शीव धनुष्या प्रमाणे वाटू लागतो पण तोपर्यंत बाण(खरे तर बाणा ) सुटलेला असतो. नंतर मात्र 10 महिने (वर्ष नव्हे) एक साडी वापरणारी मराठवाडी मुलगी गुणी पतिव्रता वाटायला लागते.. फेशनेबल पुणेरी मूली समोर !!

या सर्व गोष्टींचा काथ्याकूट केल्यानंतर तरी त्यातल्या त्यात गर्लफ्रेंड पुणेरी आणि बायको
मराठवाडी असावी असा एक मौलिक मध्यममार्ग मध्यमवर्गीयांनी स्वीकारावा अस तात्पर्य!!

--सारंग पात्रुडकर

विशेष सूचना: (हे माझे फक्त ललित विचार आहेत मी अजूनही पूर्ण अविवाहित आहे म्हणूनच माझ्या पूर्ण प्रतिभाशक्तीने हे विचार मांडू शकलो आहे माझ्या वास्तविक जीवनाशी याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न कोणीहि करू नये.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद वाचकहो!!
एवढ्या मोठ्या संखेने प्रतिसाद मिळेल अपेक्षा नव्हती.
काहीजणांना जरी हे लिखाण विनोदी वाटत नसेल तरी हे गंभीरपणाने मांडलेले विचार निशितच नाहीत.
पुनःश्च आभारी आहे. Happy

limbutimbu,

>> तुमच्या "स्पेशल आवडीच्या" बायकोच्या शोधात पार आफ्रिकेपर्यन्त वगैरे जावे लागेल

इथे इंग्लंडमध्ये अगदी अश्शीच परिस्थिती आहे. लोक सयामला (थायलंड) जाऊन तिथल्या स्थानिक स्त्रीशी लग्न करतात. अशा बायकोला मेल ऑर्डर ब्राईड म्हणतात.

अधिक माहितीसाठी : http://www.ehow.com/info_7949533_pros-cons-mail-order-brides.html
वरील दुवा सर्वसाधारण माहितीसाठी आहे. मी कुठलाही धंदा उघडलेला नाही! Lol Biggrin Proud

आ.न.,
-गा.पै.

गामाजी, Lol ग्यानबाची मेख तिथेच आहे हो, तिकडल्या त्या इंग्रजान्ना निदान राजरोस थायलण्डला जाता येते.
यान्ची मजल मराठवाडा ते पुणे, अन पुण्यात तर कुठेच काही डाळ शिजत नाही! मग "पुण्यातल पेलवत नाही, अन मराठवाड्यातल धरवत नाही" अशी हालत होते बिचार्‍यांची! पण करवादण्याशिवाय करुच काय शकतात!

अरे, पण अजूनही मला या लेखात विनोदी काय आहे ते कळत नाहीये. म्हणजे फिरवायला एक मुलगी आणि लग्न मात्र दुसरीशीच हे इतकं राजरोसपणे मान्य आहे लोकांना? पुण्याच्या मुलीला 'प्रेम आहे' वगैरे सांगूनच गर्लफ्रेंड बनवणार ना? आणि मग काय सोडून देणार? हा विनोद आहे?

लेखकाला उपरोध कळलाच नाहिये, उलट प्रतिसाद वाढल्याने त्याचा हुरूपही वाढलाय Uhoh
कसले पॉपकॉर्न आणि कसल्या खुर्च्या??????

सागर साहेब.. पुलंचे केवळ स्मरण करुन विनोदी लेख लिहिता आले असते तर कोणीही ऐरे गैरे विनोदी लेखक झाले असते.
वर rmd यानी लिहिल्याप्रमाणे हा लेखाचा विषय विनोदी तर नाहीच पण समजा क्षणभर विषयाकडे अतिशयोक्ती म्हणुन दुर्लक्ष केले तरी एकही पंच, एकही संदर्भ विनोदी वाटला नाही. पुलंनीच आपल्या एका भाषणात म्हटले आहे "न जमलेला विनोद यासारखी करुण गोष्ट दुसरी नाही" तसे हा लेख अतिशय करुण वाटतो.

मला तरी वाटते की तुम्हाला विनोदी साहित्याचा व्यासंग वाढवायची गरज आहे. आधी वाचा.. खुप काही वाचा.

हा घ्या एक फटाका : (पॉपकॉर्न आणि कसल्या खुर्च्या वाल्यांसाठी) मराठ वाड्याची मुलगी जाळून मारेपर्यंत घर सोडून जाणार नाही, काडीमोड घेणार नाही की पोलिस स्टेशनची वारी घडवणार नाही
पुण्याची मुलगी अंगावर हात टाकायचा अवकाश वकीलाची नोटीस आणि पोलिस स्टेशनची वारी दोन्ही घडवून आणेल.

डेलिया, फटाका चांगला आहे गं. पण हे तू लेखनाला सपोर्टीव्ह लिहितेयस असे काही बुद्धिवान मंडळींचे गैरसमज होऊ शकतातच Happy

अहो काका, पुण्याच्या मुलीशी लग्न करायची लाख इच्छा असते हो लोकांची, पण पुण्याच्या मुली भाव देत नाहीत बघा. अन मग अस्लं काही बाही सुचतं की. Wink

पुण्याची मुलगी अंगावर हात टाकायचा अवकाश >> अंगावर हात? नुसते डोळे वर करून पाह्यलं तरी कढी पातळ करून ठेवतील समोरच्याची.

मवा >> मस्त पोस्ट Lol आणि अनुमोदन

ऑन सिरीयस नोट.... डेलिया, दक्षे.. काश हे खरं असतं.
पुण्यातच जन्मलेल्या वाढलेल्या अनेकजणी सुद्धा दुर्दैवाने वाट्टेल तो छळ सोसत संसार धकवतायत. आपण सहन करतोय यात काहीतरी मोठा त्याग आहे अशी त्यांची मूर्ख समजूत करून दिलेलीही आहे.
तर ते असो..
ब्याक टू पॉपकॉर्न आणि खुर्च्या !!

आर एम डी , योग्य असले तरी का एवढे प्रश्न विचारताय?!! Happy आता सांगितलं ना त्यांनी हे गंभीर विचार नाहीयेत...:) तसेच आताच गुगलने २६वा हा आला तर २६वा ग्लास न वापरता कावडीने पाणी द्या असे सर्वाना सांगितले आहे. Wink Happy

पु. लं. ना स्मरून...>> आधी पु लं चे नाव काढून टाका.
इतका बिभत्स लेख लिहून वर पु लं चे नाव टाकायला काहीच कसे वाटत नाही लोकांना.

इतक्या पाणचट धाग्यावरही काहींचा पेठीय अभिमान बोल्ड टायपात उफाळून आलेला पाहून 'लेखापेक्षा प्रतिसाद विनोदी' हे वेगळ्या अर्थाने पटले. Wink

अनेक कोंबडेमंडळींना आपल्या आरवण्यामुळेच सूर्य उगवतो असे वाटत असते.
असो.

असे काहिच नाहि , तुमचा सर्वे जरा चुकलय . पुन्याच्या मुलि नक्किच एतक्या tukar nastat बर zala kharach sutlya punyachya muli ,tumchyasathi marathwada yogya .

>>> इतक्या पाणचट धाग्यावरही काहींचा पेठीय अभिमान बोल्ड टायपात उफाळून आलेला पाहून 'लेखापेक्षा प्रतिसाद विनोदी' हे वेगळ्या अर्थाने पटले. <<<<
हो हो, नक्कीच पटले असेल, जळल्या धुराचा वास आला की मला इथवर! Proud
कायेना की परभणीच्या एका जाहिर भाषणात कुमारराव केतकरान्नीच्च आमचा पेठी अभिमान रोखठोक शब्दात (पण घटनाक्रम उलटापालटा करुन) जागा करुन ठेवला आहे, अन आम्ही तो नाकारतही नाही.
सूर्य उगवायचे राहूद्या बाजुला, अपेक्षाही नाही, पण आमच्या आरवण्याने चार पेठी वाचक सुस्तीतून थोडे चाळवले जरी तरी भागले! त्यातदेखिल आम्हाला समाधान आहे. [अन पेठी जर का "जागते झाले" तर सूर्य उगवल्यासमानच अस्ते बर्का]
उगा "पुणेरी गर्लफ्रेण्ड अन मराठवाडी बायको" अस्ली उच्च ध्येये आम्हाला मानवत नाहीत. असल्या दुहेरी ध्येयांकरता कोकणात एक झकास म्हण आहे, "गांडित नाही गू अन कावळा करतोय कुक रे कुक". Wink
तर मान ना मान, मै तेरा मेहमान - कशाला उगा पेठी अभिमान चाखू पहाताय? Proud

रस्त्यातून जाताना कुणी मदिरालयासमीप सोमरस प्राशन करून जिव्हेवर सरस्वती नाचवताना दिसला म्हणून कुणी त्याच्या शेजारी बसून आपल्या पांडीत्याचे प्रदर्शन करत नाही. अर्थात अपवाद सर्वत्र असतातच.

हायला! किरणराव,

कोणत्या पेठेतल्या मदिरालयातत सोमरस मिळतो हो?
जिव्हेवर सरस्वती सोडा, मनातल्या मनात कल्पनेतली गर्लफ्रेण्ड जरी नाचणार असेल, तरी आपण १-२ गल्लास वर्जिनल सोमरस प्यायला/ढोसायला/झोकायला तैयार हाओत! Wink

-(हातभट्टीही न चाखलेला, नर्तनदर्शनातूर) इब्लिस

या बाफच्या लेखकाला महिलावर्गाने झोडणे स्वाभाविक आहे. त्यांना संपूर्ण अनुमोदन. इतरांनी योग्य तो बोध घ्यावा.

पुणेरी मुलगी फसली असं मी आजपर्यंत सकाळ, संध्याकाळ अथवा पुण्यनगरी मधेही वाचले नाही. Happy

टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. Wink

पुण्यामधे बाईकवर बसून फिरणार्‍या सगळयाच मुली पुणेरी असतात असं नाही.
बिनधास्त अन मॉडर्नपणाही मराठवाड्या मधे पण आहे.
पुण्यातही गृह़कृतदक्ष गृहिणि आहेतच की...
वस्तुस्थिति आहे सगळ्यांना माहिती आहेत या गोष्टी.

नायक असो वा खलनायक रंगभूमीवर असताना तो नेहमी स्वतःचेच विचार मांडेल अस नाही.

या लेखामधे असलेले पुणे - पुणे-इतर, पुरुषी मानसिकता याविषांवर समस्त माबो करांचे मतं अलबत
वेगवेगळी असणारच.

मराठवाड्यामधे बायकांना दुय्यम लेखतात, खेदाने म्हणाव लागतय पण महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात हीच
परिस्थिती आहे; तर पुणेकर पुणे-इतर मंडळींना कमी लेखतात.
महाराष्ट्रा मधे बिहारींची टर उडवतात, प्रगत राष्ट्रे भारतीयांना तिसर्‍या जगातील संबोधतात.
उच्च-नीच पणा असणे मानवी स्वभाव आहे.

एक चुक खुलेपणाने मान्य करायला हरकत नाही लेख कट्टर पुणेकरांच्या कट्यावर आला... Happy
कारण पुण्यातल्या कट्यावरचे चिमटे/टोमणे समजायला जन्म तिथलाच हवा तसच यामधील पंचेस समजायला
जातीचा मराठवाडीच हवा.

खुप काही खटकणार आणि म्हणून बोचर्‍या प्रतिक्रिया उमटणार.

अधिक काय लिहावे वाचक सुज्ञ आहेतच.

सारंग, लिखाणाची स्टाईल चांगली आहे. शुद्धलेखनावर लक्ष दे. विनोद ही तारतम्याच्या तारेवरची कसरत आहे. सर्वांना खुश करणे अशक्य असते पण बहुसंख्यांना राग येत असेल तर विचार करणे श्रेयस्कर.

अहो पात्रुडकर, तुम्हाला विनोदी लिखाण आणि हास्यास्पद लिखाणातला फरक समजतो का?
कारण तुमचे लिखाण विनोदी नसून हास्यास्पद आहे.

बाकी तुमच्या मराठवाडी ड्रीम गर्ल ने पण फिरवायला अमुक एक आणि लग्नाला अमुक एक असा स्टान्स घेतलेला असेल तर तुमची हरकत नसेलच. असताच कामा नये.

बाकी तुमच्या मराठवाडी ड्रीम गर्ल ने पण फिरवायला अमुक एक आणि लग्नाला अमुक एक असा स्टान्स घेतलेला असेल तर तुमची हरकत नसेलच. असताच कामा नये. >> फुल टू फटॅक!
आता बोला हो लेखक महाशय..

Pages