!!गर्लफ्रेंड असावी पुणेरी आणि बायको मराठवाड्यातील !!
पु. लं. ना स्मरून...
तसा स्फोटक विषय आहे पण ललित गद्य समजून "रस" ग्रहण करावे.
कुठलाही भेदभाव करणे तसे चांगले नाहीच पण इथे मी फक्त स्वभाव वैशिष्टे मांडत आहे.
खरतर स्त्रीस्वभाव विश्वात सगळीकडे सारखा पण फरक लग्न-आधी आणि नंतरचा आहे.
लग्नआधी मुलींचा अपेक्षा खुपदा माफक असतात फार तर कॉफी, सिनेमा अश्या मागण्या.
त्या मागायला पुणेरी मुलगी बिनधास्तपणे
पुढे सरसावते पुणे-इतर मुली पदार्थांचे/तिकिटाचे भाव वैगेरे अश्या गोष्टी मध्ये गुंतून जातात, रोमान्स कशाशी खातो असा काही विचार तेंव्हा डोक्यात तरळतो.
जीन्स-टॉप घालणारा पुणेरी बिनधास्तपणा आणि रोखठोकपणा त्या दिवसांमध्ये(लग्नाआधी) खूप छान वाटतो.
हातात हात गुंफून फिरणे (अगदी गळ्यात गळे म्हणायला हरकत नाही), बाईक वर हुंदडणे वैगेरे.
मराठवाड्यातील मुली इथे कमी पडतात नेहमी वेताळ मानेवर बसल्या सारखे त्यांचे वागणे असते जसे काही US ने सोडलेले satellite यांचे थेट प्रक्षेपण त्यांच्या बापाला LIVE दाखवणार आहे, असे.
पुण्यातील मुली या विषयात अगदी पारंगत आहेत, आधीच्या काळात घुंघट असायचा त्याचा आधुनिक अवतार चेहऱ्या भोवती गुंडाळण्याचा स्कार्फ चा शोध पुण्यात लागला असं म्हणायला हरकत नाही.
बाईकवर बसण्याचे एटीकेटस शिकावे ते पुणेरी मुलींकडून!!
मुख्य फरक लग्नानंतर जाणवायला चालू होतो पुणेरी मुलीना अंग झाडून जाउदे पण अंग हलवून काम करणे म्हणजे काय हे देखील माहित नसते.
याबाबतीत मराठवाड्यातल्या मुली वाघीणी. देवी अंगात संचार करते तसे काम दिसलं की यांचं होतं.
अगदी २५ लोक जेऊन दमतील पण या तेवढा स्वयापंक करून दमत नाहीत आणि सासू-नणणदे वर खुन्नस खाऊन नंतर ची आवर आवर आणि भांडे पण धुवून टाकतील.
पण पुणेरी मुली मात्र याबातीत अतीव मागास.
२५ लोक असतील तर किती ग्लास पाणी हे देखील google करतील एवढ्द्या सुगरण!!
अगदी मधुचंद्राला कोठे जायचे, हॉटेल कोणतं, ब्रेकफास्ट ला पास्ता, बेडवर फुलं कोणती या सगळ्या गोष्टी मधे पुणेरींचा चोखंदळपणा तसा रोमांटीक वाटतो पण नंतर बिल पाहून दिल तुटतं.
लग्नानंतर पुरूषाला खरेदी म्हटलं कि घाम फुटतो इथेपण मराठवाडी मुलगी किमती वैगेरे पाहून थोडं आवरत घेण्याची भाषा तरी कमीत कमी करतात पण जर बायको पुणेरी असेल तर त्यांचं लग्नाआधीचा या बाबतील कौशल्य आता संकट वाटायला लागत.
सासू आणि सासर कडचे लोक या शत्रू पक्षा वरील मता मधे पण दोन्ही मुलींमध्ये प्रादेशिक फरक स्पष्ट जाणवतो. पुणेरी मुलीचे सुरुवाती पासूनच या विषयावर ठाम न-कारात्मक विचार असतात.
मराठवाड्या मधील मुली सुरुवातीला खूप सासू उपासक वाटतात हळू हळू कडव्या उपहासात्मक बनतात.
अजून काही प्रमाणात तरी नवऱ्याचा मान मराठवाड्यातील मुली "सुरुवातीला" ठेवतात. कमीत कमी त्याच्या कडून काम वैगेरे तरी अपेक्षा ठेवत नाहीत. पुणेरी मुलींचे नवऱ्याकडुन कसे काम करून घ्यावे हे कौशल्य वादातीत वर तेही आवाज वैगेरे न करता. कदाचित नवऱ्या मधे जगण्या साठी च्या वृत्ती मधून झालेली उत्क्रांती असे शालेय भाषेत उदाहरणा दाखल म्हणता येईल.
ड्रेस स्टाईल पासून ते लाईफ स्टाईल पर्यंत चे पाश्यात्य पुणेरी विचार हा लग्नाआधीचा कौतुकास्पद विचार नंतर रावणाच्या अंगावर पडलेल्या शीव धनुष्या प्रमाणे वाटू लागतो पण तोपर्यंत बाण(खरे तर बाणा ) सुटलेला असतो. नंतर मात्र 10 महिने (वर्ष नव्हे) एक साडी वापरणारी मराठवाडी मुलगी गुणी पतिव्रता वाटायला लागते.. फेशनेबल पुणेरी मूली समोर !!
या सर्व गोष्टींचा काथ्याकूट केल्यानंतर तरी त्यातल्या त्यात गर्लफ्रेंड पुणेरी आणि बायको
मराठवाडी असावी असा एक मौलिक मध्यममार्ग मध्यमवर्गीयांनी स्वीकारावा अस तात्पर्य!!
--सारंग पात्रुडकर
विशेष सूचना: (हे माझे फक्त ललित विचार आहेत मी अजूनही पूर्ण अविवाहित आहे म्हणूनच माझ्या पूर्ण प्रतिभाशक्तीने हे विचार मांडू शकलो आहे माझ्या वास्तविक जीवनाशी याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न कोणीहि करू नये.)
हे तुमच्या लेखातल्या तळटिपेत
हे तुमच्या लेखातल्या तळटिपेत आढळले. ललित विचार म्हणजे स्वत:चे विचार नसतात का? दुसर्या कोणाचे असतात का?<<<
ललित विचार म्हणजे वयाने बालकावस्थेत असतानाचे विचार नीधप
हॉं?
हॉं?
मी जतिन - ललित मधल्या
मी जतिन - ललित मधल्या ...ललित चे विचार आहेत हे समजत होतो
मी अजूनही पूर्ण अविवाहित आहे
मी अजूनही पूर्ण अविवाहित आहे >> अरे साखरपुडा झालयवर पुर्ण कसे म्हणता? रच्याक्याने होणारी बायको छान आहे.. पण एक सांगा ना ती पुण्याची की मराठवाड्याची.. की आणकी कुठली
कारण पुण्यातल्या कट्यावरचे
कारण पुण्यातल्या कट्यावरचे चिमटे/टोमणे समजायला जन्म तिथलाच हवा तसच यामधील पंचेस समजायला
जातीचा मराठवाडीच हवा.
>>>म्हणजे लेख समजला नाही तर तो वाचकांचा दोष.
लेखक महोदय असे प्रकार सर्वत
लेखक महोदय असे प्रकार सर्वत आहेत.
मुले काय आणि मुली काय. अगदी स्वच्छंदी जिवन जगताना आढळतात. तुम्ही कुठलीही कराना नशिबात जे असेल तसे होईल. उद्या तीच तुमच्या मागे जिन्स घालुन गाडीवर बसेल. तीला बदलण्याची तुमची तयारी ठेवा !
>>> तीला बदलण्याची तुमची
>>> तीला बदलण्याची तुमची तयारी ठेवा ! <<< वाक्य सुधरवा हो! हे वाक्य अगदी फटके पडण्यालायक आहे!
) तयारी ठेवा ! <<< अस काहीस म्हणायच आहेका तुम्हाला?
>> तीला [मराठवाडी बायकोला?] (आधुनिकरित्या जीन्स वगैरे परिधान करायला लावून) "बदलवण्याची" तुमची (मानसिक अन आर्थिक
कोणत्या गावच्या मुली कश्या
कोणत्या गावच्या मुली कश्या असतात हे तुम्ही मला सांगताय?
लिंबुभाऊ तेच म्हणायचे होते हो
लिंबुभाऊ तेच म्हणायचे होते हो , थोडक्यात सांगितले !
<कोणत्या गावच्या मुली कश्या
<कोणत्या गावच्या मुली कश्या असतात हे तुम्ही मला सांगताय<> पहटहलेहे.........
बेफि, त्यांचा अभ्यास कमी आहे.... असो.
बेफिकीर
बेफिकीर
सग्ळे वाचले. >> या विचारांशी
सग्ळे वाचले.
>>
या विचारांशी सहमत आहे>>>>>>> यावर खरोखरच विचार करणार असाल तर आधी ती पुलंबद्दल ची ओळ काढा. फार खटकते आहे ती ओळ.
<<
हे का होतंय नक्की? याआधीपण २-३दा हेच सेण्टीमेण्ट्स आहेत वर आलेले.
कुणी ||बाबा इब्लिसराम यांना स्मरून|| असे लिहून सुरु केले तर?
त्यांचे आराध्य दैवत असतील पुलं, त्यांना स्मरून लिहीत आहेत. तुमची हरकत असण्याचा काय संबंध? का आता हिथे पण 'भावना दुखावल्या'चा बिनडोक खेळ सुरू करायचाय?
उगा बिचार्याच्या पाठी लागलेत सगळे. विनोदी लेख म्हणून लिहिलंय त्याने ते. नसेल समजत तर सोडून द्या.
ह्म्म्म मलाही इकडे विरोध
ह्म्म्म मलाही इकडे विरोध करणार्या अनेकांचा मुद्दा कळत नाहीये. जर कोणी नविनच लिहिण्याचा प्रयत्न करत असेल तर पहिल्या फटक्यात तो / ती एकदम छान सर्वांग सुंदर लेख कसा लिहू शकेल ?
राजहंसाचे चालणे | जगी झालेया शहाणे | म्हणुनी काय कोणे | चालू नये ||
(पु.लं.चा उल्लेख खटकणे आणि तो काढला जाणे बरोबर आहे.)
पु. लं. ना स्मरून... >> यात
पु. लं. ना स्मरून...
>> यात काही वाईट नाही आहे. स्मरण केले म्हणजे की काय त्या लेखकात ते संचारले आणि आणि या लेखकाकडुन वदवुन घेतले असे तर नाही ना.
कोणी अजुन कोणाचे लिहीले असते तर एवढा आक्षेप झाला नसताच मुळी
आता कौतुकाचा/कैवार घेण्याचा
आता कौतुकाचा/कैवार घेण्याचा तास सुरू झालाय का इथे?
इब्लिसा, लेख वाचल्यावर
इब्लिसा, लेख वाचल्यावर वाचकाला पुलंचं स्मरण झालं तर ती उत्तम पावती असेल, पण लेखकानेच पहिल्या वाक्यात असे जाहिर केल्यावर लेखाबद्दलच्या अपेक्षा वाढतात आणि त्याच्या जवळपासही ही बकवास पोहोचत नाही, त्यामुळे वैताग.
लेखक नवीन(लेखनावरून तसे वाटत
लेखक नवीन(लेखनावरून तसे वाटत आहे) असल्याने त्याला सर्वांनी समजून घ्यावे अशी विनंती.
पात्रुडकर, आपणही चिडचिड न करता रसिकांचे म्हणणे ऐकून घेऊन पुढील लेखनात सर्वांची अपेक्षापूर्ती होईल (साहीत्यीक मूल्यांच्या गुणात्मकतेच्या दृष्टीकोनातून) असे पहावे. इथे अनेक दिग्गज लेखक आहेत विशेषतः विनोदी लिहीणारे त्यांचे मार्गदर्शन विपूतून घ्यावे. जमेल तुम्हालाही विनोदी लिहीणे.....
लोकांना हसवणे ही सगळ्यात अवघड गोष्ट असते हे लक्षात राहू द्या.
माझ्या मते 'पु. लं. ना
माझ्या मते 'पु. लं. ना स्मरून'
हे
"श्री गजानन प्रसन्न"
अशा धरतीवर लेखकाकडून लिहील्या गेले असावे.
@इब्लिस, विजय दिनकर पाटील,
@इब्लिस, विजय दिनकर पाटील,
>>"श्री गजानन प्रसन्न"
अगदी बरोबर.
मी ७५+ वयाचा अत्यंत वृद्ध
मी ७५+ वयाचा अत्यंत वृद्ध गृहस्थ आहे. माझ्या खोकण्याला आणि आजारांना कंटाळून माझी बायको पुण्याला माहेरी गेली. मग मी मराठवाड्यातलीच दुसरी बायको केली. तिने आजपर्यंत साथ दिली. तिने माझ्या खोकण्याचा, आजाराचा कध्धी कध्धी कंटाळा केला नाही कि आजाराची टिंगल केली नाही म्हणूनच ती आजही धडधाकट आहे.
आपला नम्र
खोखो पैलवान
आणि पुण्याच्या बायकोचे काय
आणि पुण्याच्या बायकोचे काय झाले मग?
ती टाळ वाजवते
ती टाळ वाजवते
शिवाय दमा असतानाही तुम्ही
शिवाय दमा असतानाही तुम्ही दुसरे लग्न केलेत? कमेंडेबल आहे हां
ती हल्लीच अॅडमिट होती
ती हल्लीच अॅडमिट होती कुठेतरी. वाचली.
खोकणे आणि दमा यात अंतर आहे.
खोकणे आणि दमा यात अंतर आहे. गझलेसारखे सविस्तर प्रतिसाद द्यावेत का ?
चालू द्या. तुम्ही ऑफिसात, आम्ही हातावरचे पोट. भेटूच
किरण्या
किरण्या

अरे काय चालवलय?
अरे काय चालवलय?
(No subject)
काय म्हटलंय ह्यापेक्षा ते
काय म्हटलंय ह्यापेक्षा ते कुणी म्हटलंय हे जास्त महत्त्वाचे....असा संदेश पुलंच देऊन गेलेत....
तस्मात,पात्रुडकरच्याऐवजी कुणी पुलं,गाडगीळ,दमा असे नाव ह्याच लेखाखाली असते तर...वेगळ्याच प्रतिक्रिया आल्या असत्या.
तेव्हा पात्रुडकर, आधी मोठे व्हा आणि मग असे विषय हाताळा....पाहा,हीच मंडळी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील.
सारंग, 'फरक स्पष्ट करा' - या
सारंग,
'फरक स्पष्ट करा' - या स्वरुपात लिहिले असते तर अजुन छान.
पटेश टाईप चा लेख आहे.
"झोम्बला" नसता तरच नवल.
Pages