गर्लफ्रेंड असावी पुणेरी आणि बायको मराठवाड्यातील !!

Submitted by सारंग पात्रुडकर on 14 October, 2012 - 09:17

!!गर्लफ्रेंड असावी पुणेरी आणि बायको मराठवाड्यातील !!

पु. लं. ना स्मरून...
तसा स्फोटक विषय आहे पण ललित गद्य समजून "रस" ग्रहण करावे.
कुठलाही भेदभाव करणे तसे चांगले नाहीच पण इथे मी फक्त स्वभाव वैशिष्टे मांडत आहे.
खरतर स्त्रीस्वभाव विश्वात सगळीकडे सारखा पण फरक लग्न-आधी आणि नंतरचा आहे.

लग्नआधी मुलींचा अपेक्षा खुपदा माफक असतात फार तर कॉफी, सिनेमा अश्या मागण्या.
त्या मागायला पुणेरी मुलगी बिनधास्तपणे
पुढे सरसावते पुणे-इतर मुली पदार्थांचे/तिकिटाचे भाव वैगेरे अश्या गोष्टी मध्ये गुंतून जातात, रोमान्स कशाशी खातो असा काही विचार तेंव्हा डोक्यात तरळतो.
जीन्स-टॉप घालणारा पुणेरी बिनधास्तपणा आणि रोखठोकपणा त्या दिवसांमध्ये(लग्नाआधी) खूप छान वाटतो.
हातात हात गुंफून फिरणे (अगदी गळ्यात गळे म्हणायला हरकत नाही), बाईक वर हुंदडणे वैगेरे.
मराठवाड्यातील मुली इथे कमी पडतात नेहमी वेताळ मानेवर बसल्या सारखे त्यांचे वागणे असते जसे काही US ने सोडलेले satellite यांचे थेट प्रक्षेपण त्यांच्या बापाला LIVE दाखवणार आहे, असे.
पुण्यातील मुली या विषयात अगदी पारंगत आहेत, आधीच्या काळात घुंघट असायचा त्याचा आधुनिक अवतार चेहऱ्या भोवती गुंडाळण्याचा स्कार्फ चा शोध पुण्यात लागला असं म्हणायला हरकत नाही.
बाईकवर बसण्याचे एटीकेटस शिकावे ते पुणेरी मुलींकडून!!

मुख्य फरक लग्नानंतर जाणवायला चालू होतो पुणेरी मुलीना अंग झाडून जाउदे पण अंग हलवून काम करणे म्हणजे काय हे देखील माहित नसते.
याबाबतीत मराठवाड्यातल्या मुली वाघीणी. देवी अंगात संचार करते तसे काम दिसलं की यांचं होतं.
अगदी २५ लोक जेऊन दमतील पण या तेवढा स्वयापंक करून दमत नाहीत आणि सासू-नणणदे वर खुन्नस खाऊन नंतर ची आवर आवर आणि भांडे पण धुवून टाकतील.
पण पुणेरी मुली मात्र याबातीत अतीव मागास.
२५ लोक असतील तर किती ग्लास पाणी हे देखील google करतील एवढ्द्या सुगरण!!

अगदी मधुचंद्राला कोठे जायचे, हॉटेल कोणतं, ब्रेकफास्ट ला पास्ता, बेडवर फुलं कोणती या सगळ्या गोष्टी मधे पुणेरींचा चोखंदळपणा तसा रोमांटीक वाटतो पण नंतर बिल पाहून दिल तुटतं.

लग्नानंतर पुरूषाला खरेदी म्हटलं कि घाम फुटतो इथेपण मराठवाडी मुलगी किमती वैगेरे पाहून थोडं आवरत घेण्याची भाषा तरी कमीत कमी करतात पण जर बायको पुणेरी असेल तर त्यांचं लग्नाआधीचा या बाबतील कौशल्य आता संकट वाटायला लागत.

सासू आणि सासर कडचे लोक या शत्रू पक्षा वरील मता मधे पण दोन्ही मुलींमध्ये प्रादेशिक फरक स्पष्ट जाणवतो. पुणेरी मुलीचे सुरुवाती पासूनच या विषयावर ठाम न-कारात्मक विचार असतात.
मराठवाड्या मधील मुली सुरुवातीला खूप सासू उपासक वाटतात हळू हळू कडव्या उपहासात्मक बनतात.

अजून काही प्रमाणात तरी नवऱ्याचा मान मराठवाड्यातील मुली "सुरुवातीला" ठेवतात. कमीत कमी त्याच्या कडून काम वैगेरे तरी अपेक्षा ठेवत नाहीत. पुणेरी मुलींचे नवऱ्याकडुन कसे काम करून घ्यावे हे कौशल्य वादातीत वर तेही आवाज वैगेरे न करता. कदाचित नवऱ्या मधे जगण्या साठी च्या वृत्ती मधून झालेली उत्क्रांती असे शालेय भाषेत उदाहरणा दाखल म्हणता येईल.

ड्रेस स्टाईल पासून ते लाईफ स्टाईल पर्यंत चे पाश्यात्य पुणेरी विचार हा लग्नाआधीचा कौतुकास्पद विचार नंतर रावणाच्या अंगावर पडलेल्या शीव धनुष्या प्रमाणे वाटू लागतो पण तोपर्यंत बाण(खरे तर बाणा ) सुटलेला असतो. नंतर मात्र 10 महिने (वर्ष नव्हे) एक साडी वापरणारी मराठवाडी मुलगी गुणी पतिव्रता वाटायला लागते.. फेशनेबल पुणेरी मूली समोर !!

या सर्व गोष्टींचा काथ्याकूट केल्यानंतर तरी त्यातल्या त्यात गर्लफ्रेंड पुणेरी आणि बायको
मराठवाडी असावी असा एक मौलिक मध्यममार्ग मध्यमवर्गीयांनी स्वीकारावा अस तात्पर्य!!

--सारंग पात्रुडकर

विशेष सूचना: (हे माझे फक्त ललित विचार आहेत मी अजूनही पूर्ण अविवाहित आहे म्हणूनच माझ्या पूर्ण प्रतिभाशक्तीने हे विचार मांडू शकलो आहे माझ्या वास्तविक जीवनाशी याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न कोणीहि करू नये.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते जसे काही US ने सोडलेले satellite यांचे थेट प्रक्षेपण त्यांच्या बापाला LIVE दाखवणार आहे, असे.>>>>ओढुन ताणुन केलेला टुकार विनोद....
पुणेरी मुली जीन्सघालुन मित्राच्या बाईकवर पाठीमागे बसुन पुढे झुकतात तेव्हा पाठीमागे काय 'घडते ' याचा विचार करत नसाव्यात... Proud Proud

आता उर्वरित महाराष्ट्राचाही सर्वे करा. कधीतरी तुम्हाला हवं ते काँबो मिळेलच. मुंबईकडे मात्र फिरकूही नका...तुमच्या कुठल्याही अपेक्षांमध्ये अज्जिबात बसणार नाहीत त्या Proud

राव , आमच्या सांगली-कोल्हापूरकड बी बगा की जरा Happy

पण पुणेरी मुली मात्र याबातीत अतीव मागास.
२५ लोक असतील तर किती ग्लास पाणी हे देखील google करतील एवढ्द्या सुगरण!!

खिदिक फिदिक! खी खी खी खीऽ

अरे, स्टेज वर उभे राहु इच्छिणारे बरेच आहेत.........
बाकी लेखकाने अवघ्या २ तासात बरेच सिक्स मारलेले दिसतात.....

पहिले मानकरी स्टेज चे...................भाउ नमसकर.............अभिनंदन भाउ......... .
..
ए........तो खाली स्टुल वर ठेवलेला पुष्पगुच्छ घेउन ये वर.......वर येताना आधी धागा बांध... ४-६ फुल देखील टाक...पाणी मार ताजी दिसायला हवीत....... हा......आता घेउन ये ...बस झाल रंगरंगोटी ...भाउ आपलेच आहेत......
.
.
हे घ्या भाउ खास तुमच्या साठी

अजुन ऑफिस मधेच आहे......म्हणुन थोडी मॅनेजमेंट बघतोय...... Wink

मध्यम मार्ग ठीक आहे, पण लग्नानन्तर फक्त मराठवाडीच मेन्टेन करा म्हणजे झालं. ड्युअल-सिम फोन सोयीचे वाटतात, पण बॅटरी लवकर संपते, लक्षात असावे. Happy

<< महाराष्ट्र खुप मोठा आहे >> शिवाय, ह्या विषयासाठी तरी बेळगांव, कारवारही महाराष्ट्रातच धरता येतील !!! Wink

Pages