युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माफ करा... नंतरचं वाचुन लक्षात आलं की अजुनही तार चा त्रास होतो आहे ते,, चालु द्या लोकंहो! Happy

तार येणे, याचा अर्थ कल्चर बिघडलेय !

मी एका फ्रेंच कंपनीत काम करत होतो त्यावेळी फ्रान्समधून, दही आणि योगहर्ट ( मराठीत काय म्हणतात ?)
यांचे कल्चर पावडर रुपात येत असे. पण ते उत्पादन मी नंतर कधीच, कुठे बघितले नाही. भारतातही नाही.
त्या कल्चरने मात्र छान दही / योगहर्ट लागत असे. ( दोन्ही वेगळे )

खुप वर्षांपुर्वी भारतात कर्ड - ओ - मेटीक नावाचे एक वीजेवर चालणारे उपकरण मिळायचे. ते पण आता दिसत नाही.

बिनिवाले यांच्या लेखनात असे वाचले कि दही लावण्यासाठी वेगळे असे काही करावे लागत नाही, एका मडक्यात दूध साठवत गेले, कि त्याचे दही लागतेच. ( बहुदा त्यांच्या न्याहारी सदरात, कोमल चावल वरच्या लेखात हा उल्लेख होता. )

दक्षिणा, गायीच्या दूधाचे दही लावू नकोस. त्या दूधाचे घट्ट कवडीचे दही लागत नाही. पद्धत तीच ठेवून म्हशीच्या दूधाचे दही लावून पहा.

प्रामाणिकपणे मला असं वाटतं, ही स्पेसिक्फिक पदार्थावर चर्चा करण्यासाठी वेगळा बाफ असू द्यावा.

जुन्या मायबोलीवर असे बरेच यमकी बाफ होते;

चणे, दाणे, वाटाणे, फुटाणे, बकाणे
विचारा तुम्ही, सांगतो आम्ही
वाळवण, साठवण, आठवण

त्याची आठवण! Proud

मी जेव्हा बाजारात जाते, तेव्हा गहू,तांदूळ ईत्यादी किंवा भाज्या घेताना त्या कशा पारखून घ्याव्यात हे कळत नाही.म्हणजे तांदूळ कुठला (नवा/जुना, लांब/तुकडे,पांढरा/पिवळा) हे नीट समजत नाही. तर क्रुपया जाणकारांनी मदत करावी.
ह्या आधी चर्चा झाली असल्यास लिंक द्यावी.

हो मयुरी, दही म्हणजे कर्ड. ते जरा घट्ट असते तर योगहर्ट जरा प्रवाही असते. त्यांचे जिवाणू पण वेगवेगळे असतात.

कांचन, भाज्यांच्या पारखीबद्दल एक सविस्तर लेख मी लिहिला होता. धान्याबाबात खास नाही, पण अशी चर्चा झाली होती. लिंक सापडतेय का बघतो.

नाही सापडला, मलाच शीर्षक आठवत नाही आता. वर्षूचा एक लेख आहे आणि माझा भाजीबाजार असा एक लेख आहे, पण हि माहिती वेगळ्या ठिकाणी होती.

कुणाला सापडले तर बघा.

तांदळाबाबत काही टिप्स देतो.

१) बासमती / आंबेमोहोर या तांदळाना सुगंध यायला हवा, बाकीच्या तांदळाना पण चांगलाच वास येतो.

२) हातात घेऊन बघितल्यास, खडे आणि कण्या दिसायला नकोत.

३) हातात घेऊन, परत पोत्यात टाकल्यावर हातावर पावडरचा थर नको

४) एक दाणा तोंडात टाकून, दाताने चावल्यावर कटकन मोडला तर तांदूळ जूना, भुगा झाला तर नवा.

५) तांदळात जाळी / किडे नकोत. हातालाही तो ओलसर लागता कामा नये

६) शक्यतो ओळखीच्या दुकानदाराकडून / संस्थेकडून घ्यावा. महिनाभर लागतो, त्यापेक्षा जास्त घेऊ नये.
मोठ्या प्रमाणावर खरेदी करायच्या आधी, अर्धा किलो आणून त्याचा भात करावा, तो आवडला तरच मोठ्या
प्रमाणात घ्यावा.

दही आणि योगहर्ट ( मराठीत काय म्हणतात ?) >>> दिनेशदांनी जे उत्तर दिले त्याने मी बुचकळ्यात पडले Happy माझा असा समज होता की दही म्हणजेच योगहर्ट. भारतात योगहर्टलाच कर्ड असे म्हणतात. पण खरे तर इंग्लिशमध्ये 'कर्ड' म्हणजे दूध फाडल्यावर / नासल्यावर जो चोथा उरतो ( छेना ) तो, त्याचेच पनीर बनते आणि जे पाणी वेगळे होते त्याला 'व्हे' असे म्हणतात.

अगो, तुझं बरोबर आहे. दूध 'कर्डल' होऊन मिळतं ते कर्ड आणि योगर्ट म्हणजे दूध फरमेंट होऊन मिळणारं एंड प्रॉडक्ट.

इथे थोडी माहिती आहे...
http://www.ehow.com/about_5394971_difference-between-yogurt-curd.html

अरे! दिनेशजी माझ्याकडे ते लिखाण दिसतयं.पण काय करणार एवढी मोठे पान मी इथे लिहु शकत नाही. संचालकांकडे काही उपाय असेल तर ठीक.

हो ना, ते कॉपी पेस्ट पण नाही करता येत. शिवाजी फाँट जवळ ठेवणे, हाच उपाय आहे.
आशा आहे, कांचन ना ते दिसत असावे.

मला फ्लॉवरविषयी प्रश्न आहे (चुकीच्या जागी वाटल्यास कृपया योग्य धागा सांगा)
फ्लॉवर विकत आणलाय. खूप कोवळा आणि खूप निबर नाही, तर साधारण मध्यम पिकलेला(?) आहे.
त्याचे तुरे तर वापरतोच आपण. पण त्याची पाने ठेच्याला वापरता येतील का? मी ठेचा एकदम तिखट नको, म्हणून थोडंसं हिरवं (जसं की दोडक्याची साले) घालते.
शिवाय त्या पानांसोबत जे देठ असतात ते वाफवून पावभाजी किंवा मिक्स वेजमध्ये वापरता येतात का? म्हणजे त्याचा काही दुष्परिणाम नाही ना होत? तसाही पावभाजी किंवा मिक्स वेजकडून काय डोंबल सुपरिणाम अपेक्षित करावा.... Happy

शिवाय त्या पानांसोबत जे देठ असतात ते वाफवून पावभाजी किंवा मिक्स वेजमध्ये वापरता येतात का?>>> हो! त्या पांढर्‍या देठांवर (म्हणजे फ्लॉवरच्या तुर्‍याच्या खालचा जाडा भाग, हेच 'देठ' म्हणतेयस ना?) एक पातळ पांढरी साल असते, ती सुरीने काढून टाकून त्या देठाचे तुकडे करून हवे तिथे वापरता येतात.

पानांचा वापर करतही असतील. आम्ही फ्लॉवर विकत घेतो तेव्हा पानं गायब असतात, बाजूचे हिरवे जाडेभरडे देठ तेवढे असतात.

फ्लॉवरचे देठ भाजीत वापरता येतात. पानांच्या खालचा पांढरा देठाचा भाग पण आम्ही आलु गोबी मध्ये वापरतो. पंजाबीत दंडल म्हणतात त्या देठांना आणि त्याची /ते घालून केलेली भाजी खूप छान लागते. त्या दंडलचं लोणचं पण करतात साबा.

घरात दोघांकरीता अर्धा-पाव किलो (१२५ ग्रॅम) गवार पण जास्तीच होते अंमळ! मूठभर बाजुला काढून ठेवावी लागते. ह्या गवारीचं (निवडून तुकडे केलेली) काही वेगळं करता येण्याजोगं आहे का? भाजी सोडून अजून काही? मूळात घरात गवारीची भाजी अप्रिय. त्यातल्या त्यात दाण्याचे कूट घालून ओलसर केलेली भाजी खाल्ली जाते. त्यामुळे अर्धा-पाव किलो पेक्षा पण कमीच गवार एका वेळी लागते.

त्या दंडलचं लोणचं पण करतात साबा. >> अल्पना नुसत्या कल्पनेने तोंडाला पाणि सुटलं माझ्या.

गवार तेलात परतून चटणी करता येते. ( दोडक्याच्या सालीची करतो तशीच )
वाफवको, कुस्करून कोशिंबीर करता येते.
बटाटा / भोपळा / कडधान्य आदी भाज्यात ढकलून द्यायची. फ्रिजमधे ठेवून सुकत असेल तर तळून सांडग्यासारखी खाता येते.

Pages