Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Dahi Lavane

Hitguj » Cuisine and Recipies » विविधा » Dahi Lavane « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 17, 200720 01-17-07  2:20 pm

Prr
Thursday, February 07, 2008 - 8:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

@दिनेशदा ...... कोमट दुधात लाल मिरची उघडुन, बिया काढुन टाकली तरी पाच सहा तासात विरजण लागते.
....म्हणजे मुळ विरजण नसेल तर अशा प्रकारे विरजण तयार करता येते का?

Dineshvs
Friday, February 08, 2008 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो असे विरजण लावता येते. मिरचीतील उष्णतेमुळे विरजण लागते, पण जर यु एच टी, ने ट्रीट केलेले दूध असेल तर त्याचे विरजण लवकर लागत नाही.
साधे दूध तापवून कोमट करुन, असा प्रयोग करता येतो. आधी याला थोडा मिरचीचा वास येतो, पण हे दहि वापरून परत विरजण लावले तर त्याला असा वास येत नाही.


Prr
Friday, February 08, 2008 - 10:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

UHT(Ultra-high temperature processing /ultra-heat treatment)...अच्छा! ... पण विरजण तर तयार होते ना मग ठीक आहे.
Thanks दिनेशदा!

Akhi
Saturday, February 09, 2008 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दही लावताना त्यात १ मिरची उभी चिरुन त्यात बिया काढून घेउन घातली तर दही १ २ तासामधे लागते. मिरची च्या प्रकारानुसार तिच्यात १००० ते ३०००० एकक उष्णता असल्याने त्यामुळे सुक्ष्म जीवाणुंची वाढ भराभर होउन दही लवकर लागते. पण दुधाचे ताप्मान न वाढल्याने चोथापाणी होत नाही.

Prr
Monday, February 11, 2008 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Akhi!
फारच चांगली माहिती दिलीस. मिरची टाकल्याने नक्की काय process होउन दही लागते हे कळले.

Alpana
Tuesday, March 25, 2008 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिष्टी दही कसे लावतात कुणाला माहित आहे का?

Dineshvs
Tuesday, March 25, 2008 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बंगालमधे एक प्रकारचा ताडाचा गूळ मिळतो. तो वापरुन हे दहि लावतात. आपला साधा गूळ वापरुन चालत नाही, त्यामूळे विरजणाचे चोथापाणी होते.
काळा गूळ, गोव्यात आणि काहि ठिकाणी मुंबईत मिळु शकतो. एक लिटर दूध थोडेसे आटवुन घ्यावे. कोमट झाले कि यात साधारण एक कप गुळ विरघळवुन घ्यावा. मग या दुधाला कपभर घट्ट दह्याचे विरजण लावावे. शक्य असल्यास विरजणातून तुरटी फ़िरवावी. आठ दहा तासानी विरजण लागले, कि ते फ़्रीजमधे ठेवावे.
हे विरजण लावण्यासाठी जर मातीचे भांडे मिळाले तर उत्तम.

मिष्टी दॉई नंतर भप्पा दॉई पण आठवणारच.

त्यासाठी एक टिन कंडेन्स्ड मिल्क, दोन कप दुध आणि एक कप घट्ट दहि घुसळुन घ्यावे. त्यात पावाच्या तीन चार स्लाईस कुस्करून घ्याव्यात. एका मोल्डला तुपाचा हात लावुन त्यात हे मिश्रण ओतावे. गरज लागणार नाही पण हवी तर साखर घालावी.
मग याला घट्ट झाकण लावुन खरवसाप्रमाणे उकडून घ्यावे. थंड झाले कि मोल्ड डिशमधे उपडा करावा. हवा तर वरुन सुका मेवा घालावा.


Alpana
Tuesday, March 25, 2008 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेशदा, इथे दिल्लीत तर मिळते सहजासहजी मिष्टी दही... आई- बाबांना आवडले होते...म्हणुन म्हटले कसे करतात कळाले तर आईला कळवेन.. पण औरंगाबादला हा गुळ मिळेल की नाही कोण जाणे... बघते इथेच मिळाला दिल्लीत तर घेवुन जाईन..
भप्पा दही कधी खाल्ले नव्हते... आता लावुन बघेन


Wel123
Thursday, April 10, 2008 - 6:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mi dahi lawale pan te sticky zale koni sangu shakel ka ki ase ka zale asawe,me whole milk use kele hote.

Prr
Monday, May 12, 2008 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेशदा, अक्खी..... दुधात लाल मिरची टाकुन मस्त घरच्या घरीच विरजण लागले. थोडा वेळ जास्त लागला पण जमले. :-)
विकतचे दही आणायाचा त्रास वाचला.


Seema_
Wednesday, April 15, 2009 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दही लावण्याची माझी हमखास method
दुध मायक्रोवेव्ह मध्ये तापवुन घ्यायच. (उकळुन नाही. वरती सायीसारखा लेयर आला कि बास)
ओव्हन १८० डिग्रीला सेट करायचा.
दुध थोडावेळ गार होवु द्याव. साधारन ५/६ मिनिटानंतर दुध बोटाला सोसवण्याइतपत (कोमट नाही. )
उबदार झाल कि दही घालाव. बीटर ने किंवा रवीने चांगले घुसळुन घ्यावे. झाकण लावावे.
ओव्हन १८० डिग्री ला सेट झाला असेल तर बंद करावा. आणि भांड ओव्हन मध्ये ठेवावे.
३/४ तासात मस्त दही तयार होते.
दुध कोमट अजिबात होवु द्यायच नाही. थोड warm on hotter side अस पाहिजे .:-)
हे जमल नाही तर crockpot मध्ये अगदी मस्त दही होते. ते करुन बघा.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators