निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)
मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||
हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.
- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
वर्षू, कारण हि उत्क्रांती
वर्षू, कारण हि उत्क्रांती झाली ती आफ्रिकेच्या सव्हाना म्हणजेच गवताळ सपाट प्रदेशात. मग हेच लोक जगभर गेले.
इथे त्या काळात झाडे तुरळक होती, त्यामूळे पळण्याशिवाय गत्यंतर नव्हते, पळायचे दोन्ही कारणासाठी, शिकार
करण्यासाठी आणि आपला बचाव करण्यासाठी.
बहुतेक चतुष्पाद प्राण्यात, पुढच्या आणि मागच्या पायाच्या लांबीत फारसा फरक नसतो. आपल्या पायाच्या तुलनेत
हात मात्र आखुड आहेत. अजानुबाहू हि कविकल्पनाच आहे.
पण यामूळे एक मात्र झाले, आपले हात मोकळे झाले. आपण एका हातात वस्तू धरून खाऊ शकतो. (माकडे दोन हातात धरतात, बहुतेक वेळा) पण लहान बाळाला हे शिकवावे लागते.
हात मोकळे झाल्यानेच आपल्याला, हत्यारे करायला सुचले.
दिनेशदा, यावरून एक आठवले.
दिनेशदा, यावरून एक आठवले. कर्नाटकात चित्रदुर्ग किल्ल्यावर एक माणूस आहे. तो माकडांच्या पद्धतीने भिंती चढतो. यूट्यूबवर 'monkey man of Chitradurg' असा शोध घेतला, तर त्याचे अनेक व्हिडिओ सापडतील. माणसासारखं वजन असतांना माकडाप्रमाणे चढता येणं हे एक खरोखर आश्चर्य आहे.
***
दूधसागर धबधब्याजवळ मला ही ऑर्किड दिसली:
गंमत म्हणजे ही फक्त दगडातूनच आलेली होती - एकही ऑर्किड मातीत आलं नव्हतं.
गौरी, गगनबावडाचा जो मठ आहे
गौरी, गगनबावडाचा जो मठ आहे त्याच्या वाटेवर मी एक अख्खा कडा या फुलांनी भरलेला बघितलाय. स्टँड पासून चालत जायचे, चांगला रस्ता आहे. त्या रस्त्यावर अशी बरीच फुले दिसतात.
तो माणूस, बघायला पाहिजे.
उत्क्रांतीमधे असेच होते. एखादा बदल घडतो आणि तो जर उपयूक्त ठरला तर पुढच्या पिढ्यात तो बदल टिकून राहतो.
सध्या पावसाळ्यामुळे ही अगदी
सध्या पावसाळ्यामुळे ही अगदी इवलीशी (जवळजवळ भिंगातूनच पहावी लागतात) नाजुक सुंदर फुले जागोजाग दिसतातच, नाही का ......
Commelina paludosa - Swamp Dayflower किंवा केना
सुप्रभात. माझ्या घरासमोर पण
सुप्रभात.
माझ्या घरासमोर पण खुप रानफुले फुलली आहेत. पण सध्या बाहेर पडायला मला चान्सच नाही. घरातल्या माझ्या दोन फुलांभोवतीच मी फिरत असते. :स्मितः
जागु, किती गोड!!! शशांक..
जागु, किती गोड!!!
शशांक.. वॉव कस्लंं सुबक फूल आहे..रंग पण सुर्रेख..
माझ्याकरता तेरड्याच्या फुलांचा फोटो कोण टाकणार होतं बरं???
दिनेशदा मस्त माहित. शशांकजी,
दिनेशदा मस्त माहित.



शशांकजी, कित्ती नाजूक छान आहेत ही फुले.
जागुटले, आलीस. प्राजक्ताच्या झाडावर, जाई-जुई फुललेय ना?
कशी आहेस? तुला इथे बघून आनंद झाला. आता तुला वेळ मिळणे कठीण आहे, पण जमेल तेव्हा तू डोकावणारच.
माझ्याकरता तेरड्याच्या
माझ्याकरता तेरड्याच्या फुलांचा फोटो कोण टाकणार होतं बरं???>>>>>>>>>माझ्यासाठी पण कुणीतरी, कोकणातला गुलाबी रंगाचा जो तलम पाकळ्या असलेला तेरडा असतो, त्याचा फोटो टाका ना.
वर्षूदी, शोभा मी टाकतो
वर्षूदी, शोभा मी टाकतो तेरड्याचे फोटो उद्या.

वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज आहेत.
शशांक, तुम्हाला माझा झब्बू!
शशांक, तुम्हाला माझा झब्बू!
मी आत्ता गोव्याच्या रानफुलांचे फोटोच टाकायला आले होते - त्यात तुमचंही फूल आहे.
१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

इथे अजून फोटो आहेत : https://picasaweb.google.com/114312740079059994228/GoaWildFlowers?authke...
यातल्या कोणत्याच झाडाचं नाव मला माहित नाही.
वर्षूदी, शोभा मी टाकतो
वर्षूदी, शोभा मी टाकतो तेरड्याचे फोटो उद्या. स्मित>>>>>>>>धन्यवाद! तुमाखमि.

गौरी, सुंदर आहेत फ़ोटो. अगदी कोकणात असल्याचा भास झाला.
हे काय चाल्ले आहे . हि इत्कि
हे काय चाल्ले आहे . हि इत्कि सुन्देर लेख् माळा आहे . सगले लेख हिरेवेगर अणी महितिपर् . काय अणी किति वाचु असे झाले आहे अगदि सुर्वातिपासुन . सग्ल्यना अगदि मनपासुन थन्क्स .मला हि खुप आवड आहे झाडा चि पन पुरेशि जागा नाहि त्यामुले काहिच करु श् कत नाहि. हह्या लेख्माले मुले तेव्धाच दिलासा अन्द भर्पुर आनन्द . जम् ले तर साव् लि त वाड् होन्य र्य झाडा चि महिति मिलेल काय.
मनापासुन भर्पुर धन्यवअद
मेघ
जिप्स्या धन्यु रे!!
जिप्स्या धन्यु रे!!
लहानपणी पाहिली होती ही काही
लहानपणी पाहिली होती ही काही पिवळी,पांढरी ,लांबुडक्या देठाची फुलं.. देठाच्या खाली मणीसदृष्य झाकण असे. हा मणी हलकेच ओढून काढला कि तोंडात मधाचा टपकन एक थेंब पडे..
काही केल्या फुलाचं नाव आठवत नाहीये.. ' हनीसकल' तर नाही??
If you pull out the stem, (hold the green on the bottom of the flower and pull) on the stem is a small drop of sweet honey.
गौरी सुंदर फोटो. पहिला पांढरा
गौरी सुंदर फोटो. पहिला पांढरा कुडा वाटतोय पण पाने वेगळी आहेत. फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री मधे नावे सापडतील.
------------------------------
शशांकच्या दंतकथेत माझी पण थोडी भर....
आपल्या दातांत पुढचे पटाशीचे दात, मग सुळे, मग उपदाढा आणि मग दाढा हे प्रकार
आपल्याला माहित आहेतच. त्यापुढच्या अक्कलदाढा मात्र, भवति न भवति अशा विचारात
दिसतात. अनेकजणांना त्या येताना त्रास झालेला आपण ऐकलाच असेल, खुपदा त्या
काढूनही टाकाव्या लागतात. मला मात्र त्यांनी कधी येतो येतो, अशी हूलही दिली
नाही, म्हणजे कधी आल्याच नाहीत. आता यायची काही शक्यताही नाही. (अक्कल हो.)
या दाढा किंवा दंतपक्ती पण हळू हळू उत्क्रांत झाल्या आहेत. अगदी पुर्वी या दाढा बऱ्याच
रुंद होत्या. त्या आदीमानवाला नटक्रॅकर असे टोपण नाव दिले आहे. अर्थातच तो कठीण
नट्स खात होता.
त्या काळात पूर्व आफ़्रिकेत, सध्या प्रमाणेच हॅझल नट्स होत असतील का ? ते सोडल्यास
बाकी कुठले नट्स तिथे होत नाहीत. हे नट्स अजूनही दातानी तोडायला कठीणच असतात.
काजू होतात, पण ते खुप नंतर आले आणि काजूच्या बिया, दातानी तोडणे, आजही अशक्य
आहे. नटसपेक्षा हाडे तोडून आतला मगज खाण्यासाठी या दाढांचा उपयोग होत असावा.
पण पुढे मात्र, या दाढा आणि आपला जबडाही लहान लहान होत गेला ( का ते लिहितोच.)
अजानूबाहू ( जसे तिरुपतीला आहेत ) आकर्णनयन ( जसे नाथद्वारा मधल्या कृष्णाला आहेत.)
तसे मोठा जबडा, हा आपला सौंदर्याचा निकष कधीच नव्हता, नाही का ?
आता तूम्ही सुंदर दंतपंक्ती असणाऱ्या किती व्यक्ती तूम्हाला माहीत आहेत, ते आठवून बघा.
( अगदी पटकन आठवले ते २ मायबोलीकर, सेनापती आणि गिरीराज.. स्माईल प्लीज,
दोस्तांनो. )
आकार प्रमाणात असलेले, दात असणारे पण कमीच जण असतात. (सश्याप्रमाणे ) पुढचे दोन
दात मोठे असणारे आणि खास करुन, पुढच्या दोन दातात फ़ट असणारे, लोक तूम्हाला जास्त
आठवतील. ( असे लोक म्हणे, लोकप्रिय असतात. एक पुलं आणि दुसरा ---- जौ द्या !!!!! )
सुळे टोकदार असावेत, तरच ते नाव सार्थ करतील. पण चारही सुळे टोकदार असणारे, किती
जण तूमच्या बघण्यात आहेत ? बहुतेकांचे सुळे झिझून बोथटच झालेले असतात.
पटाशीच्या दाताने अन्नाचे तूकडे करावेत, सुळ्यांनी ते फ़ाडावे, उपदाढांनी त्याचे बारीक तूकडे
करावेत आणि दाढांनी बारीक चूर्ण करावे अशी योजना आहे. पण आपण याचा किती उपयोग
करतो ?
मी, शशांक, शांकली अशांसारखे शाकाहारी प्राणी घेतले किंवा वर्षू, साधना, मामी, जागू सारखे
मांसाहारी प्राणी घेतले, तरी आपण पटाशीच्या दाताचा कधी उपयोग करतो बघू.
शेवग्याच्या शेंगा, ( किंवा आर्टीचोकची पाने ) आंब्याची फ़ोड असे काही मोजकेच पदार्थ खायला
आपल्याला पटाशीचे दात लागतात. पेरूची फ़ोड, सफ़रचंदाची फ़ोड चावायला पण आपल्याला
हे दात लागतात. चपातीचे, भाकरीचे तूकडे करायचे काम आपण हातानी करतो, आणि एकावेळी
चावता येईल, एवढाच घास येतो. मांसाहारी प्रकारात पण एखादा मोठ्या काट्याचा मासा असेल,
तरच हे दात लागतात.
( आणखी पदार्थ आठवताहेत का, बघा.)
कुत्रा, मांजर, वाघ सिंह अशा प्राण्यांच्या जबड्यात अर्थातच पटाशीचे दात नसतात, पण त्यांचे
सुळे मात्र खुपच मोठे आणि टोकदार असते. जिवंत भक्ष्याच्या मांसात किंवा मानेत रुतवून,
त्याचे रक्त काढण्यासाठी त्यांना ते आवश्यक आहेत. ( आपल्याला त्याची गरज आहे का ?)
आपल्याला तसे सुळे म्हणजे अत्यंत अनैसर्गिक वाटतात. आपण ते ड्रॅकूला, व्हॅम्पायर अशा
(काल्पनिक) प्राण्यांना बहाल करुन टाकलेत.
त्यामूळे जरा चावायला लागेल, असा पदार्थ आपण थेट दाढांच्याखालीच घालतो. शाकाहारी
पदार्थात जर्दाळूच्या बिया, आक्रोड, सालासकट बदाम वगैरे खाताना आपण दाढा वापरतो.
पिस्ता आपण एवढा सुधारून ठेवलाय कि तो बिचारा निसर्गातच उकलतो, आणि भुईमूगाच्या
शेंगांचे नाक दाबले, कि त्या बिचाऱ्या तोंड उघडतात.
मांसाहारी पदार्थात मटणातली नळी फ़ोडण्यासाठी पुर्वी दाढा लागत. सध्या नळीच्या आतला
मगज काढण्यासाठी चमचा मिळतो, किंवा तो ताटात आपटून मगज काढतात. खेकड्याचा
पाय वगैरे मोडण्यासाठी पण दाढा लागतात, पण त्याही मोडायला आता एक खास हातोडा
मिळतो.
हे असं का झालं माहिती आहे ? कारण आपण अन्न शिजवायला शिकलो. शिजवलेले अन्न
चा्वायला कमी श्रम पडतात हे तर आहेच, पण त्यातले घटक पचायलाही सोयीस्कर होतात.
अन्न पूर्णपणे शिजवून खाणे, हि खास भारतीय उपखंडाची खासियत आहे. आजचा ब्रम्हदेश
ते आजचा इराण, या पट्ट्यातच हि प्रथा आहे. त्याच्या पुढे, दोन्ही दिशेला, अन्न पूर्ण
शिजवायची प्रथा नाही.
पण आज आपल्याला अन्न शिजवण्यावाचून गत्यंतरच नाही. आपली उर्जेची गरज भागवायला
आपल्याला जास्त उष्मांक घ्यावे लागतात आणि त्यासाठी आपल्याकडे वेळ फ़ार थोडा
असतो. एक उदाहरण बघा. गाजरे शिजवून त्यातले घटक नष्ट होत नाहीत, हे सत्य आहे.
आता पाव किलो गाजरे कच्ची खायला, आणि तेवढीच गाजरे किसून ( त्यात तूप, दूध
घालून ) शिजवून केलेला गाजरहलवा, गट्टम करायला तूम्हाला किती वेळ लागेल ?
जर आपण अन्न शिजवले नाही, तर दिवसातल्या २४ तासांतला निम्मा वेळ आपल्याला
अन्न शोधण्यासाठी आणि निम्मा वेळ ते चावून पचवण्यासाठी द्यावा लागेल.
मग झोपायचे कधी आणि मायबोलीवर यायचे कधी ?
अन्नाच्या बाबतीत आपले मापदंड बघा. मऊसूत (पोळ्या), मऊ गुरगुट्या (भात) खुसखुशीत
(शंकरपाळ्या) क्रीमी ( कॉफ़ी ) सॉफ्टी ( आईसक्रीम ) कुरकुरीत ( वेफ़र्स) अलवार, तोंडात
टाकल्याबरोबर विरघळणारा, ओठानीच खावा असा.... मग कशाला हवेत दात ?
म्हणून ते लहानलहान होत गेले आणि अर्थातच जबडाही लहान होत गेला.
बहुतेक पक्ष्यांना दात नसतात. त्यावाचून त्यांचे काही अडत नाही. त्यावर त्यांनी पर्याय
शोधलेत ते असे, कोंबडी, कबूतर, किवी सारखे पक्षी दाण्यांबरोबर छोटे छोटे खडेही गिळतात.
पोटात दाणे आणि हे खडे, रगडून दाण्यांचे पिठ होते. हे खडे मात्र त्यांच्या पोटात कायम
असतात. शिकारी पक्षी, हाडासकट शिकार गिळतात. त्यांच्या पोटातील विकर, एवढे तीव्र
असतात, कि ते शिकार सहज पचवतात. (आपण कुठला मार्ग निवडणार आहोत ?)
शेपटीवाल्या प्राण्यांची पुर्वी भरली सभा, हे गाणे जर आणखी काही लाख वर्षांनी परत
लिहिले, तर त्याचा शेवट असा असेल..
आपापल्या दातांचा उपयोग करा,
नाहीतर काय होईल ?
दोन पायाच्या माणसागत
आपले दात झडून जातील !!
जर आपण अन्न शिजवले नाही, तर
जर आपण अन्न शिजवले नाही, तर दिवसातल्या २४ तासांतला निम्मा वेळ आपल्याला
अन्न शोधण्यासाठी आणि निम्मा वेळ ते चावून पचवण्यासाठी द्यावा लागेल.
मग झोपायचे कधी आणि मायबोलीवर यायचे कधी ? >>>>> हा हा हा हा... मस्तच...
दंतपुराणातून सहजपणे (का नैसर्गिकपणे ?) खाद्यपुराण....... हे सगळे वाचून सर्व नि प्रेमी आपापल्या घरी खूप कठीण कठीण फळे, पदार्थ (?) खात बसलेत असे माझ्या मनःचक्षूंसमोर आले.....
आता तूम्ही सुंदर दंतपंक्ती
आता तूम्ही सुंदर दंतपंक्ती असणाऱ्या किती व्यक्ती तूम्हाला माहीत आहेत, ते आठवून बघा.
( अगदी पटकन आठवले ते २ मायबोलीकर, सेनापती आणि गिरीराज.. स्माईल प्लीज,
दोस्तांनो. )
माझे नाव नाहि....मी रागावलेय तुमच्यावर्...
मेघ तुमचे स्वागत.. येत जा इथे नेहमी.
वरच्या फोटोतला फोटो नो. ७ मधले झाड आंबोलीला आहे, ह्याच्या मुळांची पावडर उटण्यात वापरतात. माझ्या मावशीचा बचतगट जी उटणी बनवतो त्यात ह्याची पावडर असते. नाव मावशीने मला सांगितलेले, पण मी विसरले
बाकीचे फोटोही सुंदर..
जम् ले तर साव् लि त वाड्
जम् ले तर साव् लि त वाड् होन्य र्य झाडा चि महिति मिलेल काय.
मोथी झाडे सावलीत वाढणार नाहीत. काही शोभेची झाडे सावलीत छान होतात. कुठल्याही नर्सरीत जाऊन इंडोअर प्लांट दाखवा विचारले तर देतात ते लोक लगेच. नर्सरीत इंडोअर झाडांना जास्त मागणी असते
साधना थन्क्स . माय्बोलिवर
साधना थन्क्स . माय्बोलिवर नेह् मि याय्च्चा जरुर प्रयत्न्य करिन . मुम्बैत रोज ऑफीस ला जाताना जमेल तसे निस्स्र्गा चि वेग वेगलि रुपे पाह्ते वेग वेगल्या मोसमात .महिति बद्द्ल ध्न्यवाद
साधना, माझ्यावर दात धरणार का
साधना, माझ्यावर दात धरणार का ?
ते ७ नंबरवाले गोव्यात देवळाच्या जवळ खुपदा दिसते. तिथे त्याला दिपमाळ असा शब्द ऐकला होता.
दिनेश दा.. खूप्पच
दिनेश दा..

खूप्पच इन्टरेस्टिंग झालंय दंतपुराण...
साधना चं नाव अॅडून टाका लगोलग... फोटो सकट.. काय साधना, ठीकैना????
आणी प्लीज वरती विचारलेल्या माझ्या परश्नाचं ही उत्तर एऊन टाका बरं.. तो हनीसिकल वाला प्रश्न!!
ते ७ नंबरवाले गोव्यात
ते ७ नंबरवाले गोव्यात देवळाच्या जवळ खुपदा दिसते. तिथे त्याला दिपमाळ असा शब्द ऐकला होता. >>> पॅगोडा फ्लॉवर आहे का ? Clerodendrum paniculatum
आता पोळी भाकरी मऊ झाली नाही,
आता पोळी भाकरी मऊ झाली नाही, पदार्थ नीट शिजला नाही, म्हणजे "हे दातांच्या आरोग्यासाठी मुद्दाम केलंय" म्हणायला हरकत नाही.
दिनेशदा, कुडाचं फूल एकेकटं येतं ना? गुच्छ होते हे. आणि मस्त सुगंध होता त्यांना. ही फुलं मी लहानपणी भुसावळला रेल्वे कॉलनीमध्ये बघितली आहेत. आम्ही तेंव्हा ही रातराणी समजायचो. नंतर कळलं, की रातराणी वेगळी असते. हे झाड बरंचसं एक्झोरासारखं दिसतं.
शशांक, ते पॅगोडा फ्लॉवरच वाटतंय. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही झाडं होती, त्यांना काहीतरी देशी नाव असायला हवं ना? मी सद्ध्या त्यांचं "दीपमाळ" म्हणून बारसं केलंय. त्याला खरंच दीपमाळ म्हणत असतील, तर मोठ्ठा योगायोग आहे!
५ नंबरच्या पांढर्या फुलांच्याही अश्याच दीपमाळा होत्या. पानंही त्याच प्रकारची. पण पांढर्या फुलांना सुवास होता, लाल फुलांना नाही.
आणि ८ नंबर अगदी किनार्यावर, वाळूमध्ये होतं. त्या पूर्ण झाडाचा फोटो लिंकवर आहे.
"हे दातांच्या आरोग्यासाठी
"हे दातांच्या आरोग्यासाठी मुद्दाम केलंय" म्हणायला हरकत नाही.
गौरी!!!!
एक पुलं आणि दुसरा ---- जौ
एक पुलं आणि दुसरा ---- जौ द्या !!!!! >>>
आमी वळकलं गं.......
दंतपुराण मस्त.
वर्षूदी, शोभा मी टाकतो
वर्षूदी, शोभा मी टाकतो तेरड्याचे फोटो उद्या.
वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज आहेत. >>>>>> जिप्सी SSSSSS, फोटो काढायला गेलास का ?
कुडाचे गुच्छच असतात. आता
कुडाचे गुच्छच असतात. आता त्याच्या शेंगा तयार झाल्या असतील. त्याची ( आणि फुलांची पण ) भाजी करतात.
माझी बोटंपण कधीकधी हिर्वी
माझी बोटंपण कधीकधी हिर्वी होतात

आपल्यापैकी अनेकांच्या मनात
आपल्यापैकी अनेकांच्या मनात आ़जी खास करुन आईची आई हा एक खास हळवा कोपरा असतो. खुपदा तर
आईपेक्षा तिच्याशीच आपली लहानपणी जवळीक असायची. आणि हे नाते पण उत्क्रांतीमधूनच दृढ झालेय.
उत्क्रांतीमधे माणसारखेच आणखी काही जीव ( किमान इतर ५ तरी ) निर्माण झाले होते, पण सध्या आपण
म्हणजे होमो सेपियन्स सोडले तर बाकिचे जीव तग धरू शकले नाहीत.
उत्क्रांती होताना सर्वात प्रबळ जीव तग धरू शकतो हे खरे असले तरी, त्या जीवाची प्रजा वाढणे पण गरजेचे असते.
ती प्रजा जर वाढली तरच, एका पिढीत झालेले बदल, पुढच्या पिढीत उतरतील.
मानवी अपत्यांच्या बाबतीत अनेक प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. एकतर आपण फार विचार करतो ( ?! ) त्यामूळे आपला मेंदू खुप मोठा झाला आहे आणि अर्थातच, तो ज्या कवटीत असतो ती कवटीदेखील. हि कवटी, मातेच्या पोटातून बाहेर येताना, मातेला प्रचंड त्रास आणि वेदना होतातच. एक हत्तींचा अपवाद सोडला, तर अपत्यजन्मासाठी दुसर्या व्यक्तीची मदत लागणारा, माणूस हा एकमेव प्राणी आहे. हत्तींच्या बाबतीत, कळपातील इतर हत्तीणी प्रत्यक्ष मदत करत नसल्या तरी, सोबत राहून, धीर देण्याचे काम करतात.
शिवाय मानवी मातेला, पोटातील गर्भाचे वजन दोन पायावर तोलावे लागते आणि तेही जरा अवघडल्यासारखेच
असते. हे दोन प्रश्न मानवी शरीर उत्क्रांतीमधून कसे सोडवतेय, हे येणारा काळच ठरवेल.
पण मानवाच्या बाबतीत नुसता जन्म देऊन चालत नाही, तर त्या अपत्याची देखभाल अनेक वर्षे करावी लागते.
सध्याच्या काळात तर किमान १५/२० वर्षे. जर इतकी वर्षे माता एका बालकाच्या संगोपनासाठी देत राहिली,
तर तिला दुसर्या अपत्याला जन्म देणे, शक्यच नव्हते.
आणि या साठी, तिची आई पुढे आले. इतर प्राण्यांच्या बाबतीत, ३ पिढ्या एकत्र क्वचितच राहतात. (काही माकडे
आणि हत्ती, अपवाद ) पण मानवाच्या इतिहासात, हे घडत आले.
स्तनपान देणे सोडले, तर संरक्षण, अन्नपुरवठा आणि जीवनशिक्षण ता जबाबदार्या आ़जीने सहज आणि आनंदाने
उचलल्या. आपल्या आठवणीतल्या आजीने सांगितलेल्या गोष्टी, तिने भरवलेले घास, हे सगळे याच प्रथेचे रुप
आहे.
आणि आजचा मानव जिथे उत्क्रांत झाला, तिथे म्हणजेच पूर्व आफ्रिकेत, खास करुन टांझानियामधे हिच प्रथा
आहे. पुरुषांनी शिकार करुन आणणे आणि स्त्रियांनी कंदमूळे गोळा करुन आणणे ( रामाच्या वनवासात पण
हिच प्रथा होती, नाही का ?) अशी श्रमविभागणी असते.
पुरुषांच्या शिकारीच्या मोहीमा ३ ते ४ टक्केच यशस्वी होतात आणि रोजच्या जेवणाची भ्रांत सुटते ती स्त्रियांनी
गोळा केलेल्या कंदमूळांमूळेच. या मोहिमा, अर्थातच खुप कष्टाच्या असतात. ज्यावेळी स्त्रिया अशा अन्नाच्या
शोधात बाहेर पडतात, त्यावेळी एखादे तान्हे मूलच पाठीला बांधून नेतात, पण जरा मोठी मूले मात्र, आजीच्या
ताब्यात असतात. आईला यायला उशीर झाला, तर पर्यायी अन्नाची व्यवस्था हि आजीच करते.
( मी दरवेळी प्रत्यक्ष उल्लेख करत नसलो तरी माझ्या लिखाणाला, कणभर का होईना, बीबीसीच्या माहितीपटांचा आधार असतो.)
वर्षू, याचेच ना वांग्याचे
वर्षू, याचेच ना वांग्याचे भरीत केले होते !
पण मस्तच आलेत मोड. मनीचे आभार मानायला हवेत.
Pages