निसर्गाच्या गप्पा (भाग १०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 July, 2012 - 14:54

निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)

मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||

हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.

- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा जागू अभिनंदन. शनिवारी तुझी आठवण येत होती. फोनायला हवे होते म्हणजे Happy
शशांक मस्त मस्त गोड गोड कविता.
जिप्स्या छानच फोटो रे. असेच भरपुर फोटो काढ व पोस्ट आमच्यासाठी Happy
बी Happy आपण लावलेल्या झाडावर असा बहर पाहिला की प्रसन्न वाटते.
मामी तिकडुन येताना रस्त्यात वाटत जा ते भोपळे Happy (माझे घर ऑन द वे आहेच Wink )
दिनेशदा तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल ..... जाउद्या काहि लिहिणारच नाही सारखे सारखे काय बरे लिहायचे तुमच्या अगाध ज्ञानाबद्दल Happy

बी:
वहाळ म्हणजे ओहळ म्हणायचे आहे का? >>> हो. २५-३० फूट रूंद होता, पोटरयांपर्यंत पाणी होते. वॉकच्या दुसरया टप्प्यात ओलांडून जावे लागले.
दहिसर नदीचे नाव आहे का? >>> हो. नॅशनल पार्कच्या डोंगरात हीचे उगमस्थान आहे. नदीवरून गावाचे नाव दहिसर.

शशांक, गेली ५ वर्ष "सिटि वॉक" चा उपक्रम राबवला जातो. मी प्रथमच गेले. एकूणच निसर्गाबद्दल ओढ असलेले लोक येतात. त्या निमित्ताने चांगले विचार मिळतात. आपल्याला मिळालेली माहिती दुसरयांना सांगून निसर्ग वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातात. हा हेतू.

मधु, खरच तज्ञ लोकांबरोबर नॅशनल पार्कची सैर म्हणजे.. अगदी मेजवानीच.
जिप्स्या, मस्त फोटो. ते पॅशनफ्रुटच आहे. पण अजून जरा मोठे व्हायला पाहिजे.
कोल्हापूर भागात, घरोघरी कौलावर वेल दिसायचे भोपळ्याचे. आणि तो देठासकट काढून ठेवला (पुर्ण जून झालेला ) तर सहज ६ महिने टिकतो.
पूर्वाचल भागात लाल भोपळा म्हणजे स्वीट डिश मानतात, एरवी काहिही गोडधोड ते हात नाहीत.

जिप्स्या तुला लय उशीराने वाढदिवसाच्या शुभेच्छा.

जागू अभिनंदन (का अभिनंदना म्हणू? Happy ) पिल्लाला निसर्गाचे वेड लागो ह्या शुभेच्छा !!

मध्यंतरी डेंटिस्टकडे जाणे झाले - त्याच्याकडून १-२ गमतीशीर गोष्टी कळल्या - ब-याचजणांना त्या माहिती असतील, मला नव्यानेच कळल्या...
रूट कॅनलिंग करता गट्टा परचा भरतात ते Palaquium या झाडापासून मिळालेले असते. त्या आधी चांदी भरत असत पण नंतर संशोधकांच्या लक्षात आले की गट्टा परचा हेच जास्त सुयोग्य आहे - ते आजूबाजूच्या जागेत जाऊन सर्व छिद्रे जास्त चांगल्याप्रकारे सील करते.

दातदुखी आपल्यापैकी सर्वांनीच कधी ना कधी अनुभवली असेलच - एकदा का ते दु:ख सुरु झाले की नको जीव करुन टाकते... पण दातदुखी ही "दुखणे" (पेन्स /pains) याप्रकारात २ नंबरवर आहे....... १ नंबरवर कोण असेल ???? - "लेबरपेन्स"...... हे ऐकल्यावर माझा सर्व मातांप्रति असलेला आदर शत, सहस्त्र, लक्षगुणी झाला - या कळा आईच सहन करु जाणे.....

|| मातृदेवो भव || उपनिषदांमधेही पहिले नमन आईलाच का आहे ते लक्षात आले..... देव देवता वगैरे सर्व नंतर....

हो शशांक, असह्य डोकेदुखी साडेतीन युनिट तर प्रसुतीवेणा, साडेदहा युनिट्स असतात.
माझे रुट कॅनाल झालेय, पण आत कुठलेतरी फायबर्स भरलेत. ५ वर्षे झाली, अजिबात त्रास नाही नंतर झाला.
तसेही करायागम ( म्हणजे भूताच्या झाडाचा गोंद) गोळ्यांमधे वापरतातच.

०००००

यू ट्यूबवर बॉटनी ऑफ डिझायर नावाचा एक छान माहितीपट आहे. (मामी आणि गिरीराज कडे आहे तो.)
जरा मोठा म्हणजे २ तासांचा आहे तो.

त्यात सफरचंद, ट्यूलिप्स, मारीवाना आणि बटाटा या चार पिकांचा रंजक इतिहास आहे. मॅक्डोनाल्डने या
माहितीपटात सहभागी व्हायला नकार दिला होता ( का, ते बघाच ) मला वेळ मिळाला, कि सविस्तर लिहितो, या
चित्रपटाबद्दल.

शशांक ... Lol
मस्त माहिती सांगितलीस..
अक्कलदाढ काढणे ,फिलिंग इ.इ. सगळे सोपस्कार झालेत पण हायला.. आत काय भरतात ते विचारलं सुद्धा नाही रे कधी.. किती ते अज्ञान!!! Uhoh

जिप्स्या वाढदिवसाच्या (३२ जि.बी. मेमरी कार्ड भरुन) शुभेच्छा Happy ( उशीरा बददल हमका माफी दै दो :डोमा:)
जागुताई अभिनंदन. Happy

गावाकडे पाहिलं आहे ,कळलावी च्या वेली पडवळाच्या मांडवावर सोडतात, समजुत अशी की त्या फुलांना घाबरुन घारी किंवा गरुड पडवळांपासुन दुर रहातील व फुलांमुळे घारी किंवा गरुड साप समजुन पडवळ पळवणार नाहीत Happy

सापांच्या डोक्यात पण हि आयडीया आली तर ! >>> साप कळलावीची फुले डोक्यात माळुन फिरताना दिसतील Lol

सापाचा मेंदू अजून विकसित व्हायचाय. पण सापाची कात चावून, आपल्या अंगाला चोळायची आणि त्याद्वारे
इतराना घाबरवायची युक्ती, खारीला माहीत असते.

मागे डिस्कव्हरी वर एक लघुपट पाहीला होता, अफ्रिकेत शेपटीला खुळखुळा असलेला अत्यंत विषारी साप ( दिनेशदांना कदाचित त्याचे नाव माहीत असावे) आणि खारु यांचे द्वंद्व बर्‍याच काळापासुन चालु आहे, हे साप खारीची पिल्ले खातात पण आता या भित्र्या खारींनी आपल्या शरीरात सापाच्या विषा विरुदध लढण्याची जैविक क्षमता र्निमाण केली आहे, त्यामुळे सापाच्या विषाचा प्रभाव त्यांच्यावर तितक्याश्या प्रमाणात होत नाही आणि खारी आपल्या पिल्लांना वाचवण्या साठी सरळ त्या सापांशी लढाई करताहेत आणि महत्वाचे त्यात सापाला माघार घ्यावी लागते.

येस्स.... रॅटल स्नेक Happy कधीपासुन नाव आठवतोय, आता बदाम खायला सुरवात करावी लागणार बहुतेक Sad

जागूकडील नव्या बाळाला.........

इटुकलं मिटुकलं
बाळ कसं पिटुकलं

मऊ मऊ दुपट्यात
छानसं गुंडाळलं

टुळुटुळु (टुकुटुकु) बघतंय
गोडुलं छोटुलं

आईच्या कुशीत
मुठी चोखत विसावलं

Pages