अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२

Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता: 
*****************************

चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.

*****************************

माहितीचा स्रोत: 
हॅ!
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> तु माझ्या कडुन मागुन घे बर का पुढच्या वेळी
मागून कशाला? चांगले पुढून राजरोस द्या की! कोणाची भीती आहे?! Proud

भाई, बाकी फोटो मेल करा की.
Vताईंनीही काढले होते ना?

एवेएठि नेहमीप्रमाणेच धमाल (आणि 'माहितीपूर्ण' :P)!

नीती यांचा आवाज भारी आहे. त्यांच्या गाण्यांनी मजा आली. Happy

रीया, नाही. आम्ही लोकांचे फोटो इथे बीबीवर टाकत नाही. गटगला नसलेल्या मंडळींना मेन्यूतच आनंद मानावा लागेल.

तरी एक दोन विषयांवर शाळा राहिली आणि एका खास विषयाचा अभ्यासक्रम (बेडेकर काकांमुळे) अपूर्ण राहिला Wink

बेडेकर काकाच नव्हेत, तू ही लवकर निघालीस. पुढच्या वेळेस बाराच्या रथात आलीस तर आणखीन बरंच काही बोलून होईल. Wink

बिया, लोणची , पुस्तकांवरून माबो बार्टर सिस्टिम आता झाडांवर आली आहे हे माझं ह्यावेळचं छोटसं निरिक्षण. पुस्तकं टाळा झाडं वाचवा!
मी पुढच्यावेळी गटगला (कल्लोळ असेल तेव्हाच खरं तर) एक स्टॉल लावायच्या विचारात आहे.
तिथे प्रकाशचित्र, कविता आणि गझला (थोडक्यात माबोअवर खपतं ते सगळं सोडून) सोडून कशाचंही बार्टर करता येईल.
ब्लॅकसप्टेंबरला लायनीत ऊभं राहून घाऊकमध्ये बाटल्या विकत घेणार मग भारतातून (स्वस्तात....मिळाली तर फुकटातंच हवी आहे खरतंर...) एक मेथीची गोणी मागवणार (कोणी जातंय का भारतात?) आणि दोन्-चार डझन बाटल्यांमध्ये बाटली मेथी ऊगवून ती कल्लोळामध्ये स्टॉल लाऊन बार्टर करणार.

चमन , फ्रीसायकल वर मेसन जार मिळतील सहज. लैनीत उभं राह्यची गरज नाही. एक ड्झन मेसन जारच्या किमतीत तुम्हाला पाहिजे तितकी मेथी पटेल ब्रदर्स / कॅशॅण्ड्कॅरी मधे मिळेल

च्यायला! काय हे? मेथी काय, समुद्रमेथी काय, आंबटचुका काय, शेपू काय?

सरळ पालेभाजी म्हणावे नि सोडून द्यावे. जेवणाचा बेत कसा सोप्पा पाहिजे - भात, पोळी,फळभाजी, पातळभाजी, चट्णी-कोशोंबीर नि गोडाचे! फारतर मांसाहारी पदार्थ नि माश्याचे पदार्थ. नि याहून जास्त किचकटपणा करून मग उगाच मांचुरिअन स्टाईल पातळभाजी, रुआंडा बुरुंडि स्टाईल पोळ्या नि पॅराग्वे स्टाईल फळभाजी असले काहीतरी करायचे.
त्यात आणखी फाटे फोडून कंपू, फळ्या तयार करायच्या, भाजप, काँग्रेस, भारत, अमेरिका असे करून भांडणे चालू करायची!

नि ऐन ए. वे. ए. ठि. ला, रिलीज, बायकोच्या कंपनीत रिलीज असली काहीतरी कारणे सांगून यायचे नाही!!

मी पहा! काहीहि कामधाम नाही तरी बायकोने केलेल्या पोळ्या, पातळभाजी, फळभाजी किंवा पालेभाजी खातो शांतपणे जेवतो, औषध घेतो नि झोपतो. उरलेल्या वेळात गीता वाचतो नाहीतर हटकेश्वर, हटकेश्वर म्हणत बसतो!
Light 1 Light 1 Happy

>> रुआंडा बुरुंडि स्टाईल पोळ्या नि पॅराग्वे स्टाईल फळभाजी
Lol

शोनू, 'ओतून' राहिलं तरी. Proud

Pages