रीतीरीवाज

Submitted by admin on 12 January, 2009 - 23:47

धार्मिक रीतीरीवांजाबद्दलचं हितगुज

या अगोदरचं हितगुज इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रामुख्याने देशावर अनेक घरात अशी पद्धत आहे की घरात गरोदर स्री असेल तर गणपतीचे विसर्जन नाही करत. कोकणात मात्र अशी रुढी आढळत नाही.
दाते पंचांगात दिले आहे की अशा परिस्थितीत गणेश विसर्जन करावे.
या रुढीला काही शास्त्राधार नाही.

वहिनींच्या आजीला? काऽऽही उपाय नाही. Light 1
'आमच्याकडे अशी पद्धत नाही' असं सांगणं हाच एक उपाय. Happy
ते माणूस पाहून त्यानुसार ठणकावून किंवा खुबीने सांगावं लागेल इतकंच.

निलम,

तुम्ही सांगितलेल्या परिस्थितीत गणपती विसर्जन करायचा नसतो इ. प्रथमच ऐकत आहे. यावर दोन पर्याय आहेत.

१.त्या आजी सांगतात त्याप्रमाणे करणे कारण समजा तसे केले नाही आणि काही प्रतिकुल परिस्थिती निर्माण झाली तर उगाच मनात रुखरुख राहुन जाईल. आपण काही चांगले झाले तर देवाचे आभार मानायच्या भानगडीत पडत नाही पण काही वाईट झाले तर देवाचा कोप झाला म्हणुन त्याला दूषण देण्यात पहिले असतो.
किंवा
२.त्या आजींच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करुन नेहमी जसे करता तसे करणे. पण मग देवाला ब्लेम करायचा पर्याय उपलब्ध असणार नाही.

टुनटुन,

श्रीगुरुचरित्राचे पारायण स्त्रियांनी करू नये असे श्री. टेंबे स्वामींनी सांगितले आहे. का करू नये? ह्या प्रश्नाला आजच्या काळात पटेल असे उत्तर मिळणे कठीण आहे. मी काही तज्ञ नाही तरीही काही पर्याय सुचवू इच्छितो,

१. अनेक स्त्रियांनी अशी पारायणे केली आहेत व कुणाचे वाईट झाल्याचे ऐकिवात नाही, तसेच आपणही करावे. इथे मनाने खंबीर असणे गरजेचे आहे.

२. श्री. टेंबे स्वामीं रचित सप्तशती गुरुचरित्र आपण पारायण म्हणून करू शकता. हे ११ दिवसाचे करावे. इतर पथ्ये गुरुचरित्रामध्ये दिलेलीच पाळावीत. मुळ गुरुचरित्राच्या ७४०० ओव्या ७०० ओव्यात गुंफल्या आहेत. तसेच प्रत्येक ओवीतील ३ रे अक्षर एकत्र केल्यास गीतेतील १५ वा आध्याय होतो. सप्तशती गुरुचरित्र पारायणाचे आणि मुळ गुरुचरित्र पारायणाचे फळ सारखेच आहे. तुम्ही पुण्यात राहत असल्यास कर्वे रोडवर वासुदेवनिवासात ही प्रत मिळेल.

३. श्रीपादश्रीवल्लभ व श्री स्वामी समर्थ ह्यांचे ही सारामृत उपलब्ध आहे ते ही पूर्ण दत्तावतार असल्याने त्या पारायणाचे फळ गुरुचरित्रासारखेच मिळते. ( माझ्या आईने व बायकोनेही हे केलेले आहे )

पारायण करताना बऱ्याचदा इतर पथ्ये पाळली जातात पण जेवाणाची पथ्ये कडक वाटतात. त्यावर मला सांगितलेला उपाय म्हणजे कांदा,लसुण विरहीत भाजी पोळी , भात - वरण, दुध, फळे खावीत. उपाशी राहून मन खाण्यात गुंतवण्यापेक्षा दत्तगुरुंवर मन एकाग्र करून पारायण केल्यास मनःशांती मिळते, फायदा होतो. हा माझा ३ वर्षाचा अनुभव आहे.

<<<< कारण दुसर्‍याकडुन म्हणजे घरातील इतर पुरुष व्यक्ती किंवा पुजा सांगणारे ब्राम्हण वगैरे लोकांकडुन करवुन घेणे हे मनाला पटत नाही, कारण जो रोगी आहे त्यानेच औषध घेणे श्रेयस्कर ठरते ना? >>>>>

वरील उपाय मान्य नसतील तर पूजा सांगणाऱ्या भटजींकडून वाचून घेता येते व आपण ऐकावे. तसा संकल्प करून सायंदेवकृत गुरुचरित्राचे पारायण करता येते. औषध रोग्यानेच घ्याचे असले तरी ते वैद्याकडून घ्यायला हरकत नाही. पण तरीही पर्याय १ ते ३ प्रमाणे आपले आपण वाचले तर जास्त मानसिक समाधान मिळते. वेळ लागला तरी चालेल पण मन आणि वातावरण शांत ठेवून पूर्ण श्रद्धेने, अर्थ समजावून घेवून वाचावे.

**** सिद्ध आणि अधिकारी व्यक्ती कडून मिळालेली माहिती सांगितली आहे शंका घेवू नये. ****

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा । दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा । दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।। श्री गुरुदेव दत्त ।। श्री स्वामी समर्थ।।

वास्तूशांती केल्यावर घरात वास्तूप्रतिमा पुरावीच लागते का?

काहीजण म्हणतात की एका कोपर्‍यातली टाईल काढून त्याजागी पूरा. पण मग घरात सोवळे पाळावे लागते.
कोणी म्हणते की दुसर्‍या मजल्यावर घर आहे मग नका पूरु. वास्तुपुरुष जमिनीच्या खाली असावा. ग्राउंड फ्लोरवाले, बैठ्या घरात पूरु शकतात. बाकी नाही. Uhoh
कोणी म्हणते, पूजेला ठेवा. पण वास्तूप्रतिमा पूजेत ठेऊ नये असे वाचले होते कुठेतरी.
कोणी म्हणते, वास्तूप्रतिमा विसर्जन केली तरी चालते.

याबाबतीत अनेक मते ऐकल्याने गोंधळ झालाय. नक्की काय करावे?

तुम्हाला जे पटते ते करा. तुमची श्रद्धा आणी विश्वास महत्त्वाचा.

आम्हाला सांगितल्यानुसार (आमचे घर दुमजली असल्याने वास्तुशांतीला भटजी म्हणाले होते की) वास्तूप्रतिमा ही जमिनीत पुरावी लागते. फ्लॅट असल्यास अशी प्रतिमा पुरणे चुकीचे आहे कारण वास्तुपुरूष अधांतरी राहतो. वास्तुपुरूषाच्या कथेनुसार त्याला जमिनीत गाडणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला ते शक्य नसेल तर पुरू नका. पूजेच्या वेळचा वास्तुपुरूष विसर्जन करा अथवा बिल्डिंगच्या कोपर्‍यामधे पुरा.

समजा घरातच पुरलात, तरी काही फरक पडत नाही. कारण, वास्तुपुरूषाचे सोवळे म्हणजे घरामधे वाईट विचार करू नयेत. कुणाचा मत्सर करू नये, कुणाचे वाईट चिंतू नये आणि घरामधे कर्कश भांडणे अथवा मारहाण इत्यादि करू नये. यापलिकडे काहीही पाळावे लागत नाही.

धन्स नंदिनी,

फ्लॅट असल्याने परत मोडतोड करुन वास्तु पुरणे कठीणच वाटत होते.
विसर्जन करण्याचा पर्यायच उत्तम वाटतो.

गणेशचतुर्थीच्या दरम्यान सुतक असल्यास गणपति बसवावा का? की सुतक संपल्यानंतर जेव्हढे दिवस मिळतील तेव्हढेच दिवस बसवुन अनंतचतुर्द्शीला नेहमीप्रमाणे विसर्जन करावे?
धर्मशास्त्रात अशा परिस्थितीत काय उपाय दिले आहेत?

गणेशाची स्थापना चतुर्थीलाच करावी. जर काही अडचण असेल तर नंतर गणपती आणून जेव्हढे दिवस मिळतील तेव्हढेच दिवस बसवुन अनंतचतुर्दशीला विसर्जन करणे योग्य नाही. त्यावर्षापुरता गणेश स्थापनेचा लोप झाला तरी चालेल असे दाते पंचांगात दिले आहे.

आमच्या गावी सुतक असल्यास दुसर्‍यांकडून गणपती बसवतात. त्याची पूजा, नैवेद्य, आरती शेजारचे करतात. नंतर सुतक गेल्यावर घर शुद्ध करुन मग यजमान पूजा-अर्चा, नैवेद्य आदि करतात. एकावर्षी आमच्या बाबतीत असे झाले होते, तेव्हा गावाला शेजारच्यांनी (ते भावकीत नव्हते, त्यामुळे त्यांना सुतक नव्हते), जवळ जवळ ७-८ गणपतींची अशी सेवा केली होती. ३ दिवसांनी सुतक गेल्यावर मग आम्हीच पूजा करणे सुरु केले.

हे गावच्या ठिकाणी शक्य झाले, पण शहरांत जमणे कठीण आहे. जर मनात गणपती न आणल्याबद्दल रुखरुख वाटते असेल तर भाद्रपद संकष्टीला(साखर चवथ) किंवा माघी विनायकीला गणपती आणावा.

जन्म-मरण हा जर विश्वनियंत्याच्या खेळाचाच एक भाग आहे तर सुहेर सुतकाच्या निमित्ताने त्यालाच दूर का ठेवायचे? Happy उलट घरातले दु:खी वातावरण, मनातले दु:ख हलके व्हायला मदत नाही का होणार? पाहुणे नका बोलावू मूड नसल्याने. पण गणपतीबाप्पाला आणा, साधीशी पूजा, आरती नैवेद्य करा. गणपती आपल्या आजोळी आलेला असतो, त्याच भावनेने त्याच्यात रमलात तर दु:ख थोडं हलकंच होईल.

रोज घरातल्या देवांची पूजा करत असाल तरी तीही थांबवू नका.

नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांती करणे आहे. अंधेरीच्या जवळ पास चांगला गुरूजी हवा आहे, कृपया कोणास माहीत असल्यास कळवा.

१. पाण्यातल्या आसरा म्हणजे नक्की कोण? त्यान्च्यामुले infertility / abortion असे problems येतात अस म्हणतात. यावर उपाय काय//?

२> माझ्या सासरी मुन्ज्याचे दैवत असल्यामुळे काळे कपडे घातलेले चालत नाही. जर कोणी तस केल तर कहितरी अपाय होतो असे म्हणतात. खरच यात किती तथ्थ्यआहे/? खुप इच्छा असुनही विषाची परिक्षा बघायला नको म्हनुन मी काळे कपडे वापर णे टाळते.

pl. मार्गदर्शन करावे

>> त्यान्च्यामुले infertility / abortion असे problems येतात अस म्हणतात. यावर उपाय काय//?
असं म्हणणार्‍यांवर काहीही उपाय चालत नाही. ते निगरगट्ट असतात. Proud
जोक्स अपार्ट, असलं काही नसतं. देवदैवतं काय हिशोबाची वही घेऊन बसलेली नसतात तुम्ही रोज काय घातलं किंवा खाल्लंप्यायलं ते बघायला.

आमच्या जुन्या वाड्याजवळ एक विहीर होती. मोठी माणसे त्या विहीरीत आसरा आहेत अशी भिती आम्हाला लहानपणी घालायची. कारण हेच असेल की नकळत खेळता खेळता कुणी मुल त्या विहीरीत जाऊन न पडो. त्यामुळे या आसरान्च्या काल्पनीक भीतीमुळे आम्ही तिकडे डोकावत पण नव्हतो.

मला अजुन एक विचरय्चे आहे,कि मन्ग्लगौरिच्या पूजेल पहिल्य वर्शि जि अन्नपूर्न वापरतात तिच पुधे चार वर्श वप्रय्चि का?का नविन घेतलि तरि चलते?

माधवी,
देवाची प्राणप्रतिष्ठा म्हणजे मूर्तीत प्राण आणणे/ तशी धारणा ठेवणे.
प्राणप्रतिष्ठेचे जे मंत्र आहेत त्यानुसार-
प्राणप्रतिष्ठेचे बीजमंत्र ३ वेळा म्हटले जातात.
पहिल्यावेळी- मूर्तीत प्राणांचे आवाहन केले जाते.
दुसर्‍या वेळी- मूर्तीत जीवाचे आवाहन केले जाते (प्राण आणि जीव यात नक्की फरक काय- माहिती नाही)
तिसर्‍या वेळी- वाचा, मन, त्वचा, डोळे, कान, जीभ, नाक, हात, पाय, गुह्यावयव अशा सर्व इंद्रियांचे आवाहन करतात.

त्यानंतर- आपण माणसावर जे १६ संस्कार करतो त्यापैकी १ (म्हणजे अंत्यसंस्कार) सोडून बाकीचे १५ संस्कार व्हावेत या उद्देशाने १५ वेळा ॐकाराचा जप केला जातो.

आणि त्यानंतर- सूर्याची प्रार्थना करून मूर्तीच्या डोळ्यांना तूप लावले जाते (सूर्य तेजोदेवता असल्याने, देवाच्या डोळ्यात तेज येऊ दे, जेणेकरून देव डोळे उघडेल, जणू सजीवच होईल अशी कल्पना असते.)

मला अजुन एक विचरय्चे आहे,कि मन्ग्लगौरिच्या पूजेल पहिल्य वर्शि जि अन्नपूर्न वापरतात तिच पुधे चार वर्श वप्रय्चि का?का नविन घेतलि तरि चलते?>>> ती लग्नात दिलेली चांदीची अन्नपूर्णा ना? तीच वापरायची अस्ते. तीच मूर्ती रोजच्या पूजेमध्ये देखील ठेवायची असते. दरवर्षी नवीन घ्यायची गरज नाही.

चैतन्य दीक्षित धन्यावाद्,खर सान्गाय्च तर प्राणप्रतिष्ठा घरच्या घरि कराय्चि होति म्हनुन विचारले पन ते काहि जम्नार नाहि म्हनुन शेवति गुरुजिना बोलावुनच करुन घेतलि

नंदिनी धन्यावाद्,
ती लग्नात दिलेली चांदीची अन्नपूर्णा ना? तीच वापरायची अस्ते. तीच मूर्ती रोजच्या पूजेमध्ये देखील ठेवायची असते. दरवर्षी नवीन घ्यायची गरज नाही>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> हो बरोबर आहे पन ह्या वर्षी मला नवीन घ्या वि लागलि काहि कार ना मुले, लग्नात दिलेली चांदीची अन्नपूर्णा नाहि मिलालि पूजे ला मनात खुप शन्का येत होत्या,पन पूज तर करय्चि होति आनि लग्नात दिलेली अन्नपूर्णा मिलने श्यक्या न्हवते म्हनुन मग नविन घेतलि,शेवति विचार केला,मन शुध्ह आहे ना मग बास झाल आनि केलि पूजा,आता पुधे नविन घेतलेलि आहे ना तिच वापरेल

लिंबूभाऊ किंवा अतृप्त सारख्या आयडींनी जरा खालील गोष्टींवर लिहावे ही विनंती.

आपल्या देव्हार्‍यात एक गणपती, एक अन्नपुर्णा, एक शंकराची पिंडी (किंवा शाळुंका व अडणी), एक बाळकृष्ण, एक शंख आणि अडणी, एक घंटा, एक गंगेचा गडू व अजून एखाद दुसरी तसबीर असते. माझ्याकडे दत्तमुर्तीही आहे. तर, ह्या सगळ्याची मांडणी देव्हार्‍यात कशी करायची असते?

मला फार पुर्वी आमच्याकडे सत्यनारायण सांगायला आलेल्या एका गुरुजींनी स्त्री देवतांच्या मुर्ती गणपतीच्या एका बाजूला व पुरुष देवतांच्या दुसर्‍या बाजूला (डावी की उजवी ते आठवत नाही) ठेवायच्या असे सांगितले होते. स्त्री देवतांच्या मुर्तींमध्ये घरातल्या सुनांच्या अन्नपुर्णा असतात आणि पुरुष देवतांमध्ये बाळकृष्ण, शंकराची पिंडी व अजून दत्तमुर्ती वगैरे असल्यास असतात.

देवांना स्नान घालताना सुरुवातीला शंखातले आदल्या दिवशी भरुन ठेवलेले पाणी ताम्हनातल्या देवांवर घालतात. शंख ताम्हनात धुवून परत अडणीवर ठेवताना त्यात थोडे पाणी भरुन ठेवतात व बाकीच्या देवांबरोबर घंटा व शंखाचीही पूजा करतात. ही कासवाकृती अडणी व त्यावरील शंख कसा ठेवायचा असतो? कासवाचं मुख आपल्या दिशेने असते पण वरचा शंख कसा ठेवायचा? माझे बाबा कासवाला परपेंडिक्युलर ठेवायचे तर काल आत्याने शंखाची निमुळती बाजू आपल्या विरुद्ध दिशेला म्हणजे कासवाच्या शेपटीकडे(?) करायची असे सांगून कन्फ्यूज केलं आहे.

मी रोज व्यवस्थित पूजा करते, फक्त अश्या एक दोन बाबतीतच कन्फ्यूजन आहे. मनापासून पूजा करत असल्याने चुका होत असतील तरी मनाला डाचत नाहिये. तरी म्हटलं एकदा विचारुनच घ्यावं.

एकंदर नित्याची देवपूजा कशी करायची हे तुम्हा दोघांपैकी किंवा अजून कुणी सविस्तर सांगावे म्हणजे ज्यांना हवे त्यांना उपयोग होईल.

Pages