पुराणातील कथा

Submitted by नंदिनी on 16 November, 2012 - 06:21

इथे तुम्हाला माहित असलेल्या वेगवेगळ्या रोचक पुराणकथा लिहा. हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम, ख्रिस्ती, ग्रीक, रोमन आणि इतर धर्मांतील व देशांतील कथा माहित असतील तर इथे लिहा. हा बाफ अशा कथांच्या संकलनाकरता आहे. त्या कथांची सत्यासत्यता तपासण्यासाठी अथवा वैज्ञानिक कसोट्या लावण्यासाठी नाही.

इथे टिंगलटवाळी करणारे, एखाद्या धर्माला उद्देशून चेष्टा-मस्करी करणारे लिखाण करू नये ही विनंती.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुकतंच टीव्हीवरच्या महादेव सीरीयलमधे शंकर आणि पार्वती यांना अशोकसुंदरी नावाची एक कन्या असल्याचे दाखवले.

आधी याबद्दल कधीच कुठे वाचले नव्हते. अशोकसुंदरीचे कुठे देऊळ वगैरे पण पाहिले नाही. गूगल केलं तरी व्यवस्थित माहिती मिळाली नाही. कुणी सांगू शकेल का याबद्दल अधिक?

हे अशोक सुंदरी विषयी पहिल्यांदाच वाचतेय, कारण शिवलीलामृतात पण याचा अजीबात उल्लेख नाहीये. मला स्वत:ला पौराणिक कथांची खूप आवड आहे. लहानपणापासुन बरेच वाचन तसे झालेय, पण आतापर्यंतच्या वाचनात कधीही मी या कन्येविषयी वाचले नाही. इवन धीरजकुमारची जी जुनी मालिका होती ओम नमःशिवाय नावाची, त्याच्यात पण या कन्येविषयी काही दिसले नाही.

आणी पार्वतीची कन्या म्हणजे साक्षात जगदंबेची कन्या, पण देवी सप्तशतीत पण याचा उल्लेख नाही.

हे मालिकावाले मालिका लांबण्याकरता अशा कथा त्यात घालतात की काय देव जाणे.:अओ:

नुकतंच टीव्हीवरच्या महादेव सीरीयलमधे शंकर आणि पार्वती यांना अशोकसुंदरी नावाची एक कन्या असल्याचे दाखवले. >> +१
त्या समुद्रमंथन एपिसोड मध्येच ना ?
कल्पव्रुक्ष मातीच्या पुतळ्याला मुलगी बनवतो तो ?
मलाही हे नवीनच होते .

अशोक सुंदरी व हुंडासुर नावाच्या राक्षसाचा वध असा काहीतरी उल्लेख बहुदा दत्त चरित्रात आहे, असे वाटते. ती हीच का?

गुगलल्यावर विकि मध्ये सापडले
सगळे सिरियल मधुनच अपडेट केलेय Happy

Ashok sundari is a Hindu goddess, the daughter of Shiva and Parvati. She is very rarely known because she is not mentioned in any of the Puranas or Vedas. She is mainly known in Gujarati folktales and is created when Parvati makes Ganesha. Its said that when Lord Shiva kills human Ganesha, Ashok sundari hides behind a bag of salt because she is frightened by her father. when mother Parvati finds out that her son is dead, she curses Ashok Sundari to melt in the salt. However, after cooling down, Parvati blesses sundari to be reborn in a rich family[1] [2].

Her name can be split: Ashok means "without sorrow"[3] (Parvati created Ganesha and Sundari to get rid of her sorrow of missing Lord Shiva) and Sundari means "beautiful girl".[4] Devon Ke Dev...Mahadev revealed Ashok Sundari to people.

नंदिनी....

"पुराणकथा" हा फार मोठ्या आवाक्याचा विषय असून अगदी छोट्यातील छोटी गोष्ट जरी लिहून [टंकून म्हणतो इथे] सांगायची झाली तरी दहा-वीस पानेही कमी पडतील असा अनुभव येईल....सांगणार्‍याला तसेच वाचणार्‍यालाही. "उपकथानक....उपउपकथानकांची' रेलचेल आहे आपल्या पुराणसमुद्रात.....आपल्याच नव्हे तर अगदी अन्यधर्मीयांच्याही.

त्यामुळे तुम्ही वर उल्लेख केलेल्या 'अशोकसुंदरी' सदृष्य कथांतूनच पुराणातील अगदी कमी माहितीच्या कथांवरच ह्या धाग्याचे लक्ष केन्द्रीत करणे जरूरीचे आहे [असे मला व्यक्तीशः वाटते].

"अशोकसुंदरी" नामक मुलीचा आणि 'कल्पतरु' वृक्षाचा संबंध आहे. शंकर आणि पार्वती कैलास पर्वतांच्या राशीतून फिरत असताना पार्वतीला एका डोंगर उतरणीवर खूप चमचमाट करणार्‍या झाडांचा थवाच दिसला. उत्सुकतेने पार्वती त्या झाडांच्या रांगातून फिरू लागली आणि मग शंकराला तिने विचारले, "या सर्व राशीतील सर्वात सुंदर झाड कोणते आहे ते मला दाखवा...." यावर शंकराने स्मित करून सांगितले, "तू या क्षणी ज्या झाडाखाली उभी आहेस तेच झाड सर्वात सुंदर आणि विविध गुणाने नटलेले आहे. त्या झाडाला स्पर्शून तू जे काही मागशील ते हे झाड तुला प्रदान करेल." हे झाड म्हणजेच 'कल्पतरु' होते. पार्वतीने 'मला या झाडासारखीच सुंदर अशी एक मुलगी मिळावी...' अशी डोळे मिटून प्रार्थना केली आणि कल्पतरूला नमस्कार केला. डोळे उघडले त्यावेळी तिच्यासमोर एक सुंदर मुलगी प्रसन्न हास्य करीत पाहात होती. 'कल्पतरू' ला 'अशोक' नावानेही ओळखले जाते म्हणून त्या झाडापासून झालेली ही सुंदर कन्या म्हणजेच 'अशोकसुंदरी'.

दुसरेही एक कथानक आहेच, जे वर डॅफोडिल्स यानी उल्लेखिलेले आहे.

मंदिराबाबत.....

पार्वती पुत्र 'गणपती' हे नाव आणि कर्तृत्व जसे दस दिशाला पसरले गेले आणि त्या मूर्तीला स्वतंत्र 'देवत्व' प्राप्त झाले तसे या मानसकन्येच्याबाबतीत घडले गेल्याचा दाखला कुठे सापडत नाही. गुजराथी लोककथेत अशोकसुंदरीचे जरूर उल्लेख येतात पण तिचे पुढे 'देवी' त रुपांतर झाल्याचे आढळत नाही. कर्नाटक-केरळ सीमारेषेवर असलेल्या भागात शैव समाजातील काही शिवदेवालयात "शंकर-पार्वती-गणेश-कार्तिकेयन" यांच्या एकत्रित मूर्त्या वसविल्याचे दिसते, त्यातील काही ठिकाणी पार्वतीच्या पायाजवळ छोटीशी पाचवी मूर्ती खोदल्याची चिन्हे आहेत, ही पाचवी [कदाचित] 'अशोकसुंदरी' ची असावी. तिथे विचारणा जरी केली तरी ठामपणे ती मूर्ती पार्वती कन्येचीच असेल असेही कुणी सांगेल असे वाटत नाही.

अशोक पाटील

पाटील सर, नेहेमीप्रमाणे अभ्यासपूर्ण तसेच माहीतीपूर्ण प्रतिसाद.

अशाच सहसा आपल्याकडे प्रचलित नाहीत अशा बर्‍याच कथा जास्तकरून दक्षिणेत आहेत. उदा. मारूतीचे लग्न झालेले होते.
मला वाटतं आधी माबोवर मी याबद्दल दिले होते. सुवर्चला असे तिचे नाव होते. सूर्याने व्याकरणाचा एक भाग शिकण्यासाठी आधी लग्न झालेले असणे गरजेचे अशी अट घातल्याने सूर्याच्याच मुलीशी त्याचं लग्न लागलेलं आहे. बाकी तरीही तो बालब्रह्मचारी कसा याचं कॉम्प्लिकेटेड स्पष्टिकरणही वाचल्याचं आठवतं.

हनुमंताचीच अधिक एक कथा आठवते. या विवाहा व्यतिरिक्त लंकेत सीतेस शोधण्यासाठी जाताना समुद्रात भेटलेल्या त्या राक्षसीने त्याला गिळले, तेव्हा सूक्ष्मरूपाने तिच्या नाकातून तो बाहेर आला, अन त्याच्या घामाच्या थेंबापासून त्याला मुलगाही झाला अशीही कथा वाचल्याचे आठवते आहे. त्या राक्षसीचे नांव आठवत नाही.अन कथाही चुकीची आठवत असू शकते. जाणकारांनी टंकावे.

थेंबापासून त्याला मुलगाही झाला अशीही कथा वाचल्याचे आठवते आहे >>> मकरध्वज

जी सुरसा नागमाता हनुमंतांना गिळायला निघाली होती तीचा आणि मकरध्वजाचा काहीही संबंध नाही.

डॉक्टर.....हनुमान-पुत्राविषयीची अशीही माहिती आहे की, लंकादहनानंतरही हनुमानाच्या शेपटीचे ज्वलन संपुष्टात न आल्याने परतीच्या प्रवासात त्याने ती शेपूट समुद्रात खोलवर बुडविली. श्रमामुळे तोही काही काळ पाण्यातच पहुडला. त्या प्रसंगी त्याच्या देहातून ओघळलेल्या घामामधूनच एका मगरीला गर्भप्राप्ती झाली आणि तिला झालेल्या अपत्याचे नाव 'मकरध्वज' असे पडले.

काही ठिकाणी ह्या मगरीचा राक्षसी म्हणून तर काही ठिकाणी मासा असाही उल्लेख आढळेल. मात्र हनुमानपुत्र 'मकरध्वज' याबद्दल एकमत दिसत्ये. पाताळप्रमुखाने याच मकरध्वजाला आपल्या साम्राज्यात द्वाररक्षकाचे काम सोपविल्याचा उल्लेख आहे.

मात्र प्रत्यक्ष पितापुत्राची कधी समोरसमोर गाठभेट झाल्याचे वाचनात आलेले नाही.

अशोक पाटील

धन्यवाद, अशोकजी, अश्विनी.

सप्त चिरंजीवांविषयी लिहा कुणीतरी.

चिरंजीवी होणे हा शापच आहे असे मला वाटते. अश्वत्थामा, हनुमंत हे दोघे चटकन आठवतात. बाकी ५ कोण? यांना हा शाप का मिळाला असावा?

सप्त चिरंजीव >> अश्वथामा, बळी, व्यास, हनुमान, बिभिषण, क्रुप, परशुराम. तुम्हाला संस्क्रुत मधे गोडी आहे असे आत्तच कुठेतरी वाचले तेंव्हा ह्यासंबंधी श्लोक आहे तो घ्या

अश्वथामा बलिर्व्यासो हनुमानश्च बिभिषणः |
क्रुपः परशुरामश्च सप्तैते:(तै: ?) चिरजिवीनः ||

ह्यात सगळ्यांना शाप नसून वरदान मिळालेले आहे असे वाचल्याचे आठवते.

बाकीचे ५
१. परशुराम
२. व्यास
३. बलि
४. विभिषण
५. कृप

कृप हे महाभारतातील कृपाचार्य आहेत. त्यांना कोणी वरदान दिले? काही कथा आहे का यामागे?

तुमचे सगळे सखे सोबती सवंगडी परिचित प्रेयसी पत्नी मुले या जगातून निघून गेल्यानंतर. जगणे जगून झाल्यानंतर, थोडक्यात म्हणजे 'नॉर्मल ह्यूमन लाईफस्पॅन' संपल्यानंतर जगणे, जगावे लागणे... नवे सांगाती किती शोधणार? किती पिढ्या निघून जाणार समोरून?
हा निरंतर एकटेपणाचा शाप आहे की वरदान?
सांगा पाहू असामी?

human being is selfish in nature. तेंव्हा तुम्हाला जे शाप वाटू शकते ते कोणासाठी वरदानही असू शकते. मुद्दा तुम्हाला किंवा मला काय वाटते हा नसून, चिरंजिवीत्वाचा उल्लेख नेहमी वरदान ह्या स्वरुपामधे केला गेलेला आहे हा आहे.

be careful of what you wish for. u might get it.. असंही म्हणतात. हौशीनं मागून घेतला तो वरच असतो असं नाही ना? असो.
हे 'वरदान' कुणि दिलेले असावे?
अश्वत्थाम्याला हा शाप होता हे मात्र नक्की. मस्तकावरचा मणि काढून घेऊन मस्तकावरच्या भळभळ्णार्‍या जखमेसाठी अनंतकाळापर्यंत तेल मागत फिरण्याचा तो शाप होता. पांडवांची लहान मुलं मारली म्हणून बहुतेक त्याला तो दिला गेला होता, असे आठवते.

हे 'वरदान' कुणि दिलेले असावे? >> बळीला वामनाने दिलेले असे वाचलेले आठवतेय, क्रुपाचार्यांची कथा नक्की महाभारतामधे आहे. काय ते आठवत नाही.

अश्वथाम्याच्या शापामधे चिरंजिवीत्व होते कि ते आधीच होते हे आठवत नाही, फक्त त्याचा मणी काढून ती जखम कलीयुगाच्या अंतापर्यंत भळभळती राहिल हा उल्लेख आठवतो.

अश्वत्थामा हा आधीच चिरंजीवी होता, फक्त त्याचा मणि काढून घेऊन तिथे ती जखम भळभळती ठेवण्याचा शाप आहे. कितीही तेल लावलं तरी ती जखम भरून येत नाही असे म्हणतात.
या सप्तचिरंजीवींपैकी "शापासारखे जिणे" अश्वत्थाम्याला आले आहे. तो अद्याप पृथ्वीवरच आहे. हनुमान भक्तांना संकटामधे मदत करण्यासाठी पृथ्वीवर येतो, परशुराम तपश्चर्येला बसला आहे, बळी पाताळावर राज्य करत आहे (बलिप्रतिपदेला त्याचे राज्य एका दिवसाकरता पृथ्वीवर असते) इतके माहित आहे. बाकीच्या तीन चिरंजीवींबद्दल माहित नाही.

"पुराण" बिषयावर चर्चा/माहिती आदानप्रदान करताना करणार्‍यांनी तसेच वाचणार्‍यांनीही हे लक्षात ठेवणे फार जरूरीचे आहे की अशा कथानकांचे अनेकविध पैलू असतात. हजारो वर्षापूर्वी ज्या साधुसंतांनी त्या बाबत सविस्तर लिहून ठेवले आहे त्याची अधिकृतता कोणत्या निकषावर तपासून पाहिली पाहिजे हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा तसेच क्षमतेचा प्रश्न आहे. त्यामुळे अमुक एकाने 'सप्तचिरंजीवां' विषयी सांगितले म्हणजे तेच अंतिम सत्य असे पुराणकथाबाबत घडू शकत नाही. एकवाक्यता फक्त मुख्य मुद्द्याबाबत घडू शकते....म्हणजे 'चिरंजीव ७ मानले गेले आहेत' यावर... मात्र त्याच्याविषयीच्या शलाकांचे कंगोरे अनेकविध असल्याने त्याविषयी माहिती जसजशी आणि जितकी येत जाईल त्याचे फक्त वाचन करीत राहाणे इतपतच आपल्या हाती शिल्लक असते.

असो.

तर या सात चिरंजीवांविषयी माझ्याकडून थोडीशी भर :

वराह मिहिराच्या बृहद संहितेत 'मार्कन्डेय' हा आणखीन एक म्हणजे आठवा चिरंजीव उल्लेखिलेला आहे. पण पुराणाच्या अन्य पाती मार्कन्डेयाला चिरंजीव मानत नसल्याने सर्वमान्य ७ व्यक्तीविषयीच चर्चा करणे सुयोग्य ठरेल.

मानवी जडणघडण आणि प्रवृत्तीचे सात लक्षण म्हणजे हे सात चिरंजीव आहेत. सत्य युग, त्रेता युग, द्वापार युग आणि कलीयुग या कालखंडात मानवी रक्तात 'गुण' रुपाने हे सात चिरंजीव राहतील असे मानले गेले आहे.

१. बळी ~ उदारता आणि सामर्थ्य यांचे प्रतीक
२. परशुराम ~ शस्त्र आणि शास्त्र यांचे अध्ययन करण्याची गरज दर्शविणारा.
३. बिभिषण ~ कोणत्याही स्थितीत वा नातेसंबंधात फक्त न्यायाची बाजू घेणार्‍या व्यक्तीचे प्रतीक.
४. हनुमान ~ धैर्य, इमानदारपणा, शक्ती यांचे प्रतीक
५. व्यास ~ शहाणपणा आणि विद्वता यांचे प्रतीक
६. कृप ~ शिक्षकाचे महत्व पटवून देण्यासाठी.
७. अश्वत्थामा ~ माता आणि पिता यांच्याविषयीच्या आदराचे प्रतीक, परंतु आदर अनाठायी दाखविला जाऊ नये म्हणून याच्याकडून बदल्याबाबत घडलेल्या प्रमादासाठी याच्या चिरंजिवीपणाला मिळालेला निद्रानाशाचा आणि भटकंतीचा शाप देखील एकप्रकारे प्रतीक आहे मानवासाठी. अश्वत्थाम्याचा चिरंजीवीपणा हा 'शाप की वरदान?" असा नित्यनेमाचा वादाचा विषय घडतो तो यामुळेच. पण म्हणून तो अन्य सहांच्याबाबतीत लागू होत नाही.

: सात चिरंजीवांचे 'भविष्य' :

~ वरील सातांपैकी अश्वत्थामा, कृप, परशुराम आणि व्यास हे चौघे कलीयुगाच्या समाप्तीनंतर आकाशात 'सप्तर्षी' तार्‍यांत मिसळले जातील, तर बळी हा स्वर्गात इंद्राची जागा घेईल. बिभिषणाला रामाचा आशीर्वाद होता, मात्र त्याचे चिरंजीवित्व फक्त त्रेता युगाच्या अखेरीपर्यंतच मर्यादित राहिले होते. कलियुगात बिभिषणाचे अस्तित्व नाही.

फक्त हनुमान हा एकमेव असा 'चिरंजीव' आहे की ज्याचा अंत 'ब्रह्मा' सोबतच होईल. दुसर्‍या शब्दात हा विश्वाचा पसारा जोपर्यंत टिकून राहिल तो पर्यंत केवळ हनुमान हाच एकमेव चिरंजीव म्हणून मानवासोबत राहील.

अशोक पाटील

१. बळी ~ उदारता आणि सामर्थ्य यांचे प्रतीक>>>> मग बळीराजाला वामन अवतार घेऊन पाताळात का लोटले???

आणि
कुणीतरी सप्तकन्यांविषयीही लिहा.

नंदिनी, हा बीबी काढल्याबद्दल शतशः धन्यवाद! मस्त माहिती मिळतेय. महादेव सिरियलमध्ये ह्या अशोकसुंदरीचा वर कोणी 'नाहुष' म्हणून आहे असा उल्लेख आहे.

नर्मदा परिक्रमेवरचं पुस्तक वाचताना शूलपाणीच्या जंगलात लोकांना अश्वत्थामा दिसल्याचा उल्लेख वाचलाय. खरे खोटे देव जाणे!

बर्‍याचदा शब्दकोड्यांमध्ये 'जलदेवता' ह्या क्लूला 'आसरा' असं उत्तर असतं. ह्यांबद्दल पुराणात काही उल्लेख आहे का? तसंच ही एकूण किती पुराणं आहेत? त्यांचं मराठीमध्ये भाषांतर आहे का? कुठे विकत मिळेल?

कलियुगात बिभिषणाचे अस्तित्व नाही.>>> बिभीषण म्हणजेच जीवात्मा. हा मानवाच्या कंठकूप चक्रात म्हणजेच विशुद्ध चक्रात वास करुन असतो. विशुद्ध चक्र अशुद्ध असते तेव्हा ती रावणाची लंका असते. जेव्हा शुद्ध होत जाते तस तसा तिचा बिभिषणासारखा प्रवास असतो आणि राम्ररुपी परमात्मा त्या लंकेचे राज्य बिभिषणाला देऊन टाकतो. एका अर्थी ते रामाचेच राज्य असते.

हनुमंत मानवा सोबत महाप्राण बनून सुषुम्ना नाडीत असतात. कुंडलिनी ही महाप्राणाची माता अंजना आहे. महाप्राणाचा प्रवास उर्ध्व दिशेने म्हणजेच मुलाधारापासून सद्गुरुंचे स्थान असणार्‍या सहस्रारापर्यंत असतो. सर्व इंद्रियांना आवश्यक असणारी ऊर्जा ही या महाप्राणाच्या अधिपत्याखाली असते. म्हणूनच जितेन्दियं बुद्धिमतां वरिष्ठम.

शब्दकोड्यांमध्ये 'जलदेवता' ह्या क्लूला 'आसरा' असं उत्तर असतं. >> माझी आजी पण पाण्यात 'आसरा' असतात असे म्हणायची.

"आसरा" संबंधी ~

"अप्सरा" ह्या नामाचे 'आसरा' हे ग्राम्य रूप.

इन्द्राच्या दरबारात ज्या अप्सरांना स्थान मिळाले होते त्यात मेनका, रंभा, तिलोत्तमा, उर्वशी, मनोरमा, चित्रलेखा आणि सौदामिनी या सातजणींना प्रमुख आणि विशेष स्थान होते. यांच्याशिवाय निखळ मनोरंजनाकरीता असिता, शुचिका, मरिची, रक्षिती, अंबिका, अल्मविशा, पूर्वचित्ती अशा नावाच्या आणखीन् २० अप्सरा होत्या. यांच्याशिवाय ज्याना 'अप्सरा' चा दर्जा तर आहे, पण स्वर्गात स्थान नाही त्यांची इन्द्राने 'वन' आणि 'जल' या ठिकाणी सोय केली होती. हिंदू पुराणाप्रमाणेच ग्रीक पुराणातही अशा 'जलदेवतां' चा 'निम्फ', 'सायरेन' म्हणून उल्लेख सापडतील.

'जला'त राहून या अप्सरांनी ज्या विशेष विद्या प्राप्त केल्या होत्या, त्यामध्ये नृत्य-संगीताबरोबरीनेच मादक स्वरांनी ते तळ्याच्या, नदीच्या काठाने प्रवासास निघालेल्या वाटसरूचे, घोडेस्वाराचे, शिकार्‍याचे लक्ष आपल्याकडे वेधीत असत आणि त्याना आपल्या सौंदर्याने घायाळ करून वश करीत आणि जलात खेचून घेत असत. वनकन्या आणि जलकन्या यातील जलातील ह्या अप्सरा घातक मानल्या गेल्या. सप्त चिरंजीवी, सप्त ऋषी यांच्याप्रमाणेच अशा सात अप्सरा असल्याने त्याना मग लोकजीवनात 'सात आसरा' असे नामाधिमान प्राप्त झाले आणि गावात दिवेलागणीच्या वेळी आपल्या नातवाला त्यांची गोष्ट सांगताना आजी ह्या मोहमयी अप्सरांचा 'साती आसरा' असा उल्लेख करीत 'बाळा, तू कधीही नदीच्या जवळून जाऊ नकोस, आणि गेलास तर त्यांच्या गाण्यांकडे लक्ष देऊ नकोस....' अशी चेतावणी देई.

"अप्सरा" या विषयाची व्याप्ती तशी खूप मोठी आहेच.

अशोक पाटील

अशोक जी ,
साती आसरा हा शब्दप्रयोग मी लहानपणी आजीच्या गावी बर्याचदा ऐकलाय . माझ्या चुलताअजीच्या अंगात यायच्या त्या .

बीबी मात्र खरोखर खूप छान चाललाय . हनुमान आणी अश्वत्थाम्याखेरीज इतर चिरंजीव माहित नव्हते .

कुणीतरी सप्तकन्यांविषयीही लिहा. >> सप्तकन्या माहित नाही, पंचकन्या ऐकले आहे. त्यांची नावे ह्या श्लोकामधे येतात.

अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा |
पंचकन्या स्मरे:नित्य महापातकनाशनम् ||

"पुराण" बिषयावर चर्चा/माहिती आदानप्रदान करताना करणार्‍यांनी तसेच वाचणार्‍यांनीही हे लक्षात ठेवणे फार जरूरीचे आहे की अशा कथानकांचे अनेकविध पैलू असतात. हजारो वर्षापूर्वी ज्या साधुसंतांनी त्या बाबत सविस्तर लिहून ठेवले आहे त्याची अधिकृतता कोणत्या निकषावर तपासून पाहिली पाहिजे हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा तसेच क्षमतेचा प्रश्न आहे. त्यामुळे अमुक एकाने 'सप्तचिरंजीवां' विषयी सांगितले म्हणजे तेच अंतिम सत्य असे पुराणकथाबाबत घडू शकत नाही. >> अशोकजी मी हे थोडे पुढे वाढवून म्हणेन. मूळात कधी काळी घडून गेलेल्या घटनांवर तत्कालीन समजांवर, रुढींवर, विचारसरणीवर आधारीत ज्या गोष्टी/प्रवाद्/समज्/प्रथा रुढ झाल्या, त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसारच बघितल्या पाहिजेत. बदललेल्या काळाचा चष्मा लावून बघणार्‍यांना त्या गोष्टींचा बरा-वाईट परीणाम दिसत असल्यामूळे त्याबाबत 'हे कसे चुकले नि ते कसे करायला हवे होते' हे बोलणे अतिशय सोपे असते. (इति : युगांत)

Pages