रीतीरीवाज

Submitted by admin on 12 January, 2009 - 23:47

धार्मिक रीतीरीवांजाबद्दलचं हितगुज

या अगोदरचं हितगुज इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मैत्रेयी, इथे ग्रहण पाहू नका असे कुणीच लिहिलेले नाही. वरती घरात बसा असा सल्ला दिलेलं कुणी आहे का हे सांगाल का प्लीज?? तुमचे आईवडिल रामेश्वरला जाणे अ‍ॅफोर्ड करू शकतात. मी नाही!! काही वर्षापूर्वी रत्नागिरीत खग्रास की खंडग्रास सूर्यग्रहण होते ते मी पाहिले होते.

सूर्यग्रहण पाहण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते, हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. म्हणूनच असतील पण त्यासाठी आमच्या धर्मात काही रीतीरिवाज आहेत, ते इथल्या एखाद्या जाणकार व्यक्तीला विचारून मी खात्री करून घेतेय. तुम्हाला जर माहित असेल तर लिहा. नसेल माहित तर इथे (असे मजेदार पोस्ट) लिहिण्याचे कारण समजेल का???

(आणि हो, तुम्ही असाच काहीतरी प्रतिसाद द्याल म्हणून "त्या" व्यक्तीने लिंक दिलेली असेल)
तुम्हाला उद्देशून हे या विषयावरील माझे पहिले आणि शेवटचे पोस्ट. काही काही लोकांना नको तिथे स्वतःचा विषय नसताना काड्या करायची सवय असतेच. Happy

आता ग्रहणाविषयी. मला ग्रहणामधे किंवा नंतर हे दान देतात त्या विषयी माहिती (ज्याला माहिती आहे त्यानी दिल्यास) बरे होइल.

'काही काही' लोकांना नको तिथे स्वतःचा विषय नसताना काड्या करायची सवय असतेच. >>> हो हो हे मात्र १००% खरं. Proud आणि त्या फेमस 'काही काही' लोकांखेरीज हे कोण जास्त चांगलं जाणत असणार नाही का Lol

जाता जाता: माझे हे पोस्ट विषयाला धरून नाही त्याबद्दल दिलगीर आहे . (आधीचं मात्र विषयाला धरूनच होतं हे सांगणे न लगे!)

नुस्ताच TV पहायचा नाही असे नाही. गरुड पुराणात असे नमुद केले आहे की TV वर ग्रहणाच्या वेळी शाहरुख खानचे सिनेमे पाहु नये (काही पंथांप्रमाणे ते कधिही पाहु नयेत, पण तो भाग अलविदा).

TV वाले कमी कपडे घालुन येतात म्हणुन त्यांना कपडे दान करायचे? Happy

लोकहो, जागे व्हा. अमृतमंथना आधी जर चंद्र-सुर्य त्यांच्या सद्य कक्षेत असतील तर ग्रहणे पण होतच होती. Interestingly, समुद्रमंथनाच्या वेळी पृथ्विचा अक्ष बदलला व तेंव्हाच चंद्राची कक्षा बदलल्यामुळे ग्रहणे सुरु झाली अशी एक पौराणीक theory (interpretation) आहे. पण तसे जरी असले तरी त्यामुळे ग्रहणे अशुभ ठरत नाहीत (खरे तर काहीच शुभ-अशुभ नसते, पण तोही भाग वेगळा).

वर दिलेल्या FAQ ऐवजी विकिपेडीया किंवा तत्सम ठिकाणी माहिती वाचलीत तरे भले होईल. http://en.wikipedia.org/wiki/Eclipse

सूर्यग्रहण पाहण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते त्याचा धर्माशी काय संबंध ? सॉरी नंदिनी तुझा मुद्दा अजिबातच नाही झेपला.

असो, हे बघितलत का ?

अरे दिवसा ढवळ्या अंधार होतो, विशेष काळजी नको का घ्यायला? त्यात गरोदर बायकांना तर जास्तच घ्यायला हवी नाही का?

माझे ६०+ वर्षे वयाचे आईबाबा, त्यांचे मित्रमंडळ रामेश्वर ला गेलेत, आयुष्यात एखाद्या वेळेला मिळेल न मिळेल अशी कंकणाकृती सूर्यग्रहण पहाण्याची संधी सोडायची नाही म्हणून!
>> मस्तच!
अरे दिवसा ढवळ्या अंधार होतो, विशेष काळजी नको का घ्यायला? त्यात गरोदर बायकांना तर जास्तच घ्यायला हवी नाही का?
>> का हो वैद्यबुवा? खग्रास ग्रहण आहे का?
मला आजतागायत एकदाही प्रत्यक्ष डोळ्यांनी खग्रास बघायची संधी नाही मिळालेली Sad

TV वर ग्रहणाच्या वेळी शाहरुख खानचे सिनेमे पाहु नये (काही पंथांप्रमाणे ते कधिही पाहु नयेत, पण तो भाग अलविदा).
>> हे हे हे.. Too good!

ग्रहणाच्या वेळी गर्भवतीनं काही चिरू नये असं वगैरे ऐकलेलं - तसं तर नागपंचमीला पण चिरू नये म्हणतात. आणि तुम्ही नाही ऐकलत तर धमकी आहेच्चे "गर्भवतीच्या बाळाचा ओठ चिरतो", "नाग येऊन डसतो", "नाग शाप देतो."
धमक्यांची काय कमी आपल्या धर्मात! साधी सत्य नारायणाची, सोळा सोमवाराची, श्रावणातल्या प्रत्येक वाराच्या कथा बघा.. धमक्याच फक्त!
देव का इतका खालच्या पातळीवरचा आहे की तुमचं वाईटच करायला टपला असावा.. माझ्या आवडीचं नाय केलं ना - हाण त्याच्या टाळक्यात टपली..
'the religion should be a religion of love and never of fear or hatred' I feel.

अरे दिवसा ढवळ्या अंधार होतो, विशेष काळजी नको का घ्यायला?>>अ‍ॅसीमोवची एक गोष्ट आहे, ज्यात एका ग्रहावर जतरी) तीन सूर्य असल्यामुळे कधीच रात्र होत नाही (काहि हजार वर्षे तरी). पण काही ठराविक काळानंतर ग्रहणामूळे रात्र होते नि अचानक अंधार झाल्यामूळे लोकांवर मानसिक परीणाम होऊन वेडपिसे होतात व सगळे नष्ट करतात. हे चक्र बरेच वेळा होत असते नि तिथल्या धार्मिक ग्रंथांमधे ह्या प्रसंगाचा उल्लेख सांकेतिकरित्या येतो. ती आठवली वरचे पोस्ट वाचून.

असाम्या, अ‍ॅसीमोव कोण होता ते ही सांगुन टाक एकदा नाहितर ग्रहण लागलं की मानसिक परिणाम कसे होतात असं कोणी "अ‍ॅसीमोव" म्हणुन सांगुन गेलेत असं वाचायला/ ऐकायला मिळालं तर नवल नाही.

सूर्यग्रहण पाहण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते त्याचा धर्माशी काय संबंध ? सॉरी नंदिनी तुझा मुद्दा अजिबातच नाही झेपला. >>> सिंड्रेला. त्याचा धर्माशी डायरेक्ट संबंध नाही. पण पूर्वीच्या काळी नुसत्या डोळ्यानी सूर्यग्रहण पाहणे शक्य होते का?? नाही ना. म्हणून पूर्वजानी काही नियम घालून दिले असल्यास त्याची खिल्ली उडवणे मला तरी गैर वाटते. हेच नियम आजच्याकाळाशी सुसंगत करून घेणे गरजेचे आहे. आजही लहान मुलानी डायरेक्ट सूर्याकडे पाहू नये अशा सूचना द्याव्या लागत आहेत. मग आधीच्या लोकानी पोराना घराबाहेरच नाही सोडलं तर त्याचं काय चुकलं??

धमक्यांची काय कमी आपल्या धर्मात! साधी सत्य नारायणाची, सोळा सोमवाराची, श्रावणातल्या प्रत्येक वाराच्या कथा बघा.. धमक्याच फक्त!
देव का इतका खालच्या पातळीवरचा आहे की तुमचं वाईटच करायला टपला असावा.. माझ्या आवडीचं नाय केलं ना - हाण त्याच्या टाळक्यात टपली..>>> माफ करा, पण या धमक्या प्रत्येक धर्मात आहेत, फक्त आपल्याच धर्मात नाहीत, किमान आपल्या धर्मात हे नियम पाळले नाहीत तरी चालते. हेतरी किमान लक्षात घ्या.

अशिग, तुमची पोस्ट नेहमीप्रमाणेच कुत्सित आहे.. हे सांगायला नकोच!!!

हिंदु धर्मामधे ग्रहण अशुभ मानलेले नाही. उलट ग्रहण काळात देवाची पूजा करावी हे सांगितलेले आहेच. याकाळामधे दान करायला फार महत्व आहे.

माझ्यापुरतं बोलायचं झाल्यास, आमच्यात (म्हणजे देसायांत) ग्रहणाच्या दिवशी अन्नदान, कपडे दान, तसेच भूमिदान आणि सुवर्णदान केले जाते (जे काही झेपेल त्याप्रमाणे) दरवेळेला माझी आई व आजी सर्व करतात. माझी आजी कोमामधे आहे आणि आई हॉस्पिटलमधे अ‍ॅडमिट आहे. आज ग्रहण सुटल्यावर आमच्याकडे किमान पन्नास जणाचे जेवण आहे. काही गरोदर बायका इथे ग्रहण पाळण्यासाठी येणार आहेत, तसेच आमच्यापैकी काही मंडळी बसून राघवेंद्र स्तोत्र १०८ वेळा म्हणणार आहेत. तसेच इतरही जप जाप करणार आहेत.

आणि हो!! आम्ही ग्रहणसुद्धा पाहणार आहोत. सध्यातरी हवामान थोडे ढगाळ आहे, दुपारी स्पष्ट होइल ही अपेक्षा.

त्यामुळे त्याविषयी कुणाला माहित आहे का असा प्रश्न मी विचारलं आहे, तेही योग्य बीबीवर. पण नेहमीप्रमाणेच काही "विशिष्ट लोकानी" इथे टिंगल टवाळी चालू केली आहे.

अ‍ॅडमिन. माय्बोलीवर हे सतत चालू आहे. याकडे कृपया आपण लक्ष द्याल का? रीतीरिवाज हा बीबी धार्मिक रीतीबद्दलची चर्चा करण्यासाठी नसून त्याची खिल्ली उडवण्यासाठी असेल तर तसे कृपया स्पष्ट करा. म्हणजे इथे प्रश्न विचारण्याचे प्रयोजन उरणार नाही.

नंदिनी ग्रहणाच्या बाबतीत अनेक मताभेद आहेत. आपण आता म्हणतो की ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहु नये वगैरे. तसंच आधीच्या काळातही असेलच. पण लोकं ऐकावेत, त्यांनी भीती बसावी ह्या कारणाने बाहेरच पडु नये हा पर्याय समोर आला. पुर्वीच्या काळी ग्रहण लागायच्या आधी जेवणं करुन उरलेलं जेवण, पाणी टाकुन द्यायचे. ह्या मागे इतकाच हेतु की ग्रहण काळात सुर्य पुर्णपणे झाकला जातो, त्यामुळे हवामानात जंतु, जीवाणु मिसळुन अन्न खराब होण्याची शक्यता असते. आता राहीला प्रश्न गरोदर बायकांनी ग्रहण पाळायचा तर हे प्रत्येकाच्या मानण्यावर आहे. शक्यतो आपल्याकडे अशी मानसिकता दिसुन येते की जाऊ दे ना सांगितलंय थोरा मोठ्यांनी तर पाळुया. कोण कशाला विषाची परिक्षा घेईल. पहिल्या काळात आताइतकी डेव्हलप्ड टेक्नॉलॉजी जसे सोनोग्राफी वगैरे नव्हती. त्यामुळे मुलांमध्ये दोष असले तरी काही कळत नसे. पण तरीही मला वाटतं एकदा आपल्या डॉक्टरशी ह्या विषयावर बोलुन बघायला काहीच हरकत नाही. (तो मुर्खातच काढेल म्हणा. तरी आपल्या मनाचं समाधान म्हणुन. म्हणतात ना सोनाराने काने टोचले की.. तसंच.)

बघ हे पटलं तर ठिक. जे काही करावं त्याच्या मागचं शास्त्र, विज्ञान समजुन घेऊन करावं असं माझंतरी मत आहे. बाकी तुमच्यावर Happy

नंदिनी, दोघींची आणि स्वतःची काळजी घे (पर्सनली मला वाटतं त्या दोघी एवढ्या आजारी असताना एवढा जेवणाचा घाट उगाच घातलास, सगळं मॅनेज करणं कठीण असतं).

असो, नामस्मरण उत्तम गोष्ट Happy अत्री ऋषींची एक गोष्ट आहे त्यानुसार सर्व उचित गोष्टींचा मेळ होण्यासाठी (योग) व अनुचितावर (अयोग) मात करण्यासाठी "क्रीं" हे बीज असलेला "ॐ र्‍हीं क्रीं र्‍हीं असाध्यसाधकाय दत्तात्रेयाय नमः" (इथे दत्तात्रेय ऐवजी कुणाही सद्गुरुंचे नाम घालू शकतो, नुसते गुरु नाही) हा जप केला जातो. फक्त ग्रहणातच नव्हे तर कुठल्याही चांगल्या गोष्टी सुरु करताना सगळ्या उचितांचे पाठबळ मिळावे, चांगले योग घडावेत म्हणून. क्रीं बीज हे योग बीज आहे, त्या योगेश्वर श्रीकृष्णाचे बीज आहे, ज्याने चक्क युद्धभूमीवर मधेच उभं राहून शांतपणे कर्मयोग सांगितला. त्यालाच माहित होतं की युद्ध कधी सुरु होणार, युद्धात काय होणार आणि युद्ध कधी संपणार, कारण हे सर्व घडवणारा तोच होता. आणि वर सगळं करुन सवरुन नामानिराळा रहाणारा निष्काम कर्मयोगी.

ग्रहणात नियमीत गोष्टींपेक्षा वेगळी गोष्ट घडलेली असते ती म्हणजे ग्रहाच्या मधे येण्यामुळे पृथ्वीवर होणारा अंधार. अर्थात यात घाबरण्याजोगे काहीच नाही. तुम्ही सर्व तुमच्या सगुरुंचे नामस्मरण करणार आहात ही चांगलीच गोष्ट आहे जी, काही अशुभ स्पंदनं असल्यास त्यांच्यापासून रक्षण करु शकेल.

अस्चिग,सिन्डी आम्ही पण इथे कोस्ट वरून ग्रहण पाहणार आहोत. कंकणा क्रुती आहे. फक्त आवश्यक चश्मेघालून पाहावे इत्केच.

मला एक एम्ल्पोयी एकदम सोडून गेला त्याचे नाव सूर्या आहे. त्या मुळे त्या सूर्याला कायम ग्रहण लागावे असा वैट प्रायवेट जोक करत कर्त मी ते पाहणार आहे. सोरी वैयक्तिक्बाब इथे आण्ली. पण खरे सांगू
मला असे फिनोमीनोन ग्रहण वगैरे खूप आवडतात. हे खूप रेअर ग्रहण आहे. मिसू नका.

अ‍ॅडमिन. माय्बोलीवर हे सतत चालू आहे. याकडे कृपया आपण लक्ष द्याल का? रीतीरिवाज हा बीबी धार्मिक रीतीबद्दलची चर्चा करण्यासाठी नसून त्याची खिल्ली उडवण्यासाठी असेल तर तसे कृपया स्पष्ट करा. म्हणजे इथे प्रश्न विचारण्याचे प्रयोजन उरणार नाही.>>

नंदिनी याना पूर्ण अनूमोदन..

चश्मे मिळताहेत का ते? (इथे बांद्र्यात बेहरामपाड्याजवळ कसले मिळणार म्हणा !) मी लहानपणी बघितलं होतं तसला चश्मा लावून ग्रहण. एक मजेशिर गोष्ट केली होती मी तेव्हा. आजोबांनी सगळ्या पाण्याच्या पिंप, कळशीवर व अजून कुठे कुठे तुळशीपत्रं ठेवली होती ती उचलून खाल्ली होती ग्रहण संपल्यावर. वाडीत "दे दान सुटे गिराण" ओरडत येऊन गेल्यावर आम्ही सगळी पोरं वाडीभर ओरडत फिरलो होतो "दे दान सुटे गिराSSSण" ओरडत Uhoh (लहानपणचा बिनडोकपणा, दुसरं काय !)

ग्रहणं ही रेअर असल्यामुळे शक्य तेंव्हा पहायलाच हवीत. हे वीश्व भव्य आहे. त्यात सर्वदूर अनेक चमत्कृतीपुर्ण गोष्टी होत असतात. आपल्या परसात थोड्याबहुतच होतात. ग्रहण ही त्यातलीच एक. का होतात, कसे होतात, कशी पहायची हे समजुन घ्या आणि एन्जॉय करा. इतक्या नैसर्गीक, घडाळाप्रमाणे रेग्युलर घटनेकरता देवाला कशाला पाचारण करायचे? दैनंदीन व्यवहारात इतर लोकांमुळे किंवा हाताबाहेरील परिस्थितीमुळे येणार्या आगतीकतेपासुनच्या बचावाकरता नामस्मरण केले तर एकवेळ समजणे सोपे जाईल. पण ग्रहणाच्या वेळी घरात बसुन नामस्मरण? निदान ग्रहण पाहतापाहता तरी करा.

नंदिनी, तुमच्या आईला व आजीला लवकर बरे वाटो. माझ्या पोस्ट्स पर्सनली नका घेत जाऊ. अनेकदा मी स्मायलींची गरज असुन टाकत नाही. वाटल्यास प्रत्येक गोष्ट गमतेखातर लिहिली आहे असे समजुन सोडुन द्या (ही सोडुन).

नंदिनी, दोघींची आणि स्वतःची काळजी घे (पर्सनली मला वाटतं त्या दोघी एवढ्या आजारी असताना एवढा जेवणाचा घाट उगाच घातलास, सगळं मॅनेज करणं कठीण असतं).>> I fully agree with the other ashwini. It is a lot of work for you. Wishing them good health.

नंदिनी,

काही जणांचा उगाचच वाद निर्माण करायचा, मजा बघायची आणि नंतर दुसर्‍या बाफवर जाउन यथेच्छ कुचेष्टा करायची हा स्वभाव आहे. त्यावर इलाज नाही. दुर्लक्ष करणे उत्तम.

तुमच्या आई आणि आजीला लवकर बरे वाटो ही शुभेच्छा!

या बीबी वरच्या चर्चा पाहिल्यानन्तर त्या चर्चा विज्ञानयुगातील सुशिक्षित स्त्रियांच्या चर्चा वाटत नाहीत असे खेदाने म्हणावेसे वाटते...
रॉबिनहूड, उलट आहे. विज्ञानयुगातल्या सुशिक्षित स्त्रिया असल्यानेच त्या अशी चर्चा करू शकतात. कुठल्याहि गोष्टीबद्दल उत्सुकता, अधिक माहिती करून घेण्याची प्रवृत्ति हे सुशिक्षित नि विज्ञानयुगातील व्यक्तीचेच लक्षण आहे.

झक्की,
"कुठल्याहि गोष्टीबद्दल उत्सुकता, अधिक माहिती करून घेण्याची प्रवृत्ति हे सुशिक्षित नि विज्ञानयुगातील व्यक्तीचेच लक्षण आहे."
आपल्या विचारांशी सहमत आहे.
नंदिनी, तुमच्या आईची व आज्जीची तब्येत आता कशी आहे? तब्येतीत काही सुधारणा आहे का? त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

व्वा! ग्रहण सुटले वाटते!

अस्चिग नमस्कार!

>>>दैनंदीन व्यवहारात इतर लोकांमुळे किंवा हाताबाहेरील परिस्थितीमुळे येणार्या आगतीकतेपासुनच्या बचावाकरता नामस्मरण केले तर एकवेळ समजणे सोपे जाईल. पण ग्रहणाच्या वेळी घरात बसुन नामस्मरण? निदान ग्रहण पाहतापाहता तरी करा.


परिस्थिती कायमच हाताबाहेर-अगतिक असते! जन्म...बालपण..तारुण्य..वार्धक्य..जरा आणि मृत्यू काहीही हातात नाही! एका पाठोपाठ एक, हातात हात घालून, पिंगा घालतच येतात..१०-१५ वर्षाच्या फरकात!
काहींच्या हे 'जन्म-मृत्यू ग्रहण' लवकर लक्षात येत आणि तो मग ग्रहण सुटण्याची वाट न पहाता... आपण म्हणाल्याप्रमाणे, ग्रहण पहात-पहात 'नामस्मरण' करू लागतो. जसे ''ग्रहण" कसे पहावे याच 'आधुनिक-शास्त्र' आहे, तसेच 'हे नामस्मरण' कसे करायचे...यालाही 'शास्त्र' आहे.

नामस्मरण करायचे, ते आपल्याच घरात बसून. माणसाची वृत्ती ही कायम बाहेरख्याली असते, त्यामूळेच त्याचे विचार ही तसेच असतात. ह्या मूळवृत्तीत फरक पड्ल्याशिवाय, ती वृत्ती 'आन्तरख्याली' होणे अवघड,नव्हे-नव्हे, महाकठीणकर्म आहे.

'नामस्मरण करायचे ते आपल्याच घरात बसून'... यामध्ये 'घर' म्हणजे काय हे जर समजावून घेतल नाही..तर पुढचे सर्व म्हणजेच ,बाजू योग्य आणि अयोग्य-विरोधी म्हणणारे सर्व विचार अयोग्यच असतात.

मागे एकदा 'घररिघी' म्हणजे काय? असा प्रश्न 'mansmi18' यांनी श्रीज्ञानेश्वरांच्या बीबीवर विचारला होता. त्याचा अर्थ आहे 'घरात शिरणे' आणि नुसतेच 'शिरणे' नाही तर आत जावून 'स्थिर' होणे.

शास्त्र आणि संत यांच्यानुसार 'घर' म्हणजे प्रत्येकाच 'वैयक्तिक स्थूलादि शरीर'.

आता आपल्याला जन्मताच 'ग्रहण' लागल आहे हे कळल्यामूळे, आपल्याच शरिरात शिरायचे आणि ग्रहण चालू असतानाच, बाहेरख्याली असणार्‍या मन-वृत्तिंना स्थिर-आंतरख्याली करायचे 'शास्त्र', योग्य व्यक्तींच्या -श्रीसद्गुरुंच्या मार्गदर्शनाखालीच अवगत होऊ शकते आणि...

आपणच म्हणाल्याप्रमाणे 'ग्रहण' असतानाही परिस्थिती 'ग्रहण-सुटल्यासारखिच' होते. म्हणजेच आपले श्रीतुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे 'याची देही, याची डोळा 'माझच-गिराण' मी पाहीले आणि गिराण सुटल्यामूळे, ज्यामूळे सुटले..ज्याच्या मूळे सुटले त्याला ते म्हणतात , 'सुटे गिराण' आता दे हेची 'दान' की 'तुझा' विसर्... न व्हावा!

अन्यथा .... अशी अनेक ग्रहणे येऊनही, 'ते नवीन ग्रहण' पहाण्याची आपली 'हौस' काही फिटत नाही! आणि मग आपण म्हणतो..ग्रहणं ही रेअर असल्यामुळे शक्य तेंव्हा पहायलाच हवीत... पुनरपि ज..पुनरपि म..!

धन्यवाद!

मुलाला काळा ड्रेस. हलव्याचे दागिने घालायचे. गालिच्यावर बसवायचे. नाहीतर आइने घेऊन बसायचे.
बरोबर छोटी मुले बसवायची. मग मोअठ्यांनी त्याच्या वरून बोरे, गोळ्या, चाकलेटे, मुरमुरे उसाचे कांडे हलवा असा खाऊ पश्या पश्याने ओतायचा. नहाणच घालायचे. बाळाला ओवाळतात बहुतेक. बरोबर संक्रांतीचे हळदी कुंकू ठेवतात जनरली.

Pages