रीतीरीवाज

Submitted by admin on 12 January, 2009 - 23:47

धार्मिक रीतीरीवांजाबद्दलचं हितगुज

या अगोदरचं हितगुज इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी लिंगायत आहे... त्यामुळे आमच्यात प्रेताला अग्नी देत नाहीत... ते शेतात पुरतात. आपलं माणूस मेल्यावरही आपल्या जवळ आहे ही भावना असते. बेळगावसारख्या काही ठिकाणी प्रेतयात्रा वाजतगाजत काढली जाते.. शिवाय आमच्याकडे तेरावं वगैरेही करत नाहीत. म्हंजे तिसर्‍या दिवशी हे सर्व करून सुतक संपतं... पिडदान नसतं... केवळ छोट्या पिंडीवर पाणी सोडून विषय संपतो...
आमच्या लग्नात अंतरपाट धरत नाहीत... अनेकदा लग्नाच्या बैठकीतच यादी पे शादी करतात... कमीत कमी खर्च करावा असं बसवेश्वरांनी सांगितलंय... हुंडा घेत नाहीत पण काही ठिकाणी स्त्रीधन म्हणून सोनं जास्त घेतलं जातं...

US mahdye ambyachya dahali kuthe milel mala sataynarayan Pujesathi ?
ani nasel milat tar kai thevayacha kalashawar ???

Please kunitari madat kara .

मैत्री,
तु अमेरिकेत कुठे राहतेस? आसपास पटेल बंधूंचे दुकान असेल तर आंब्याची पानं नक्की मिळतात. मी बघितलं आहे.

आंब्याची पाने नाही मिळाली कुठे तर भारतीय/चायनीज/कोरीयन दुकानात खायची-विड्याची पाने मिळतात ती ठेवा.

patel bandhu store nahiye ithe. mi San Diego madhye rahate .
vidyachi paan anali aahet.Ti thevin mag.. Thank you itakya patkan pratisaad dilyabaddal Happy

.

२०११ रोजीच्या गुढीपाडवाला माझ्या भाच्याचे जायावळ करण्याचे ठरविले आहे. परंतु त्याला अजून एक वर्ष हि पूर्ण झाले नाही. ०४.०४.२०११ (गुढीपाडवाला) त्याला १० महिने पूर्ण होत आहे. तर त्याचे जायावळ केले तर चालेल का?

माझ्या वडीलाचे दीनांक १२-०३-२००९ रोजी निधनं झाले. त्या दिवशी तुकाराम बीज हा दिवस होता आणि आमच्या भटजीनी सुद्धा हीच वडिलांची तिथी असल्याचे आम्हाला सांगितले. त्यानुसार आम्ही त्यांचे वर्ष-श्राद्ध २०१० रोजी तुकाराम बीज ह्या दिवशी गावी जावून केले. आमच्या भटजीनी असेहि सांगितले कि तुम्ही पुढील वर्षी घरगुतीहि वडिलांचे वर्ष श्राद्ध करू शकता. तरी आपण कृपया मला ते कसे करावे हे सांगू शकाल का?

माझाही १ प्रश्न, स्त्रियांनी, ऋतुकालात, स्तोत्र, नित्यपाठ म्हणावेत का? उदा.- हनुमान चालिसा, रामरक्षा इ. मी अंधश्रद्ध नाही. पण त्या मंत्रांतुन निर्माण होणारी उर्जा, आणि स्त्रियांचा "त्या" काळातिल harmonal imbalance यांचा काही परस्पर संबंध आहे का?

'the religion should be a religion of love and never of fear or hatred' I feel.

अगदी बरोबर आहे.

प्रतिसाद द्यायला फारच उशीर झालाय. पण मी हा धागा आजच वाचला
विज्ञान कथांचे जगद्विख्यात लेखक आयझॅक असिमॉव्ह यांच्या 'नाईटफॉल' (१९४१) ह्या प्रसिद्ध दीर्घकथेचा स्वैर अनुवाद तुम्ही येथे वाचू शकाल.
http://www.manogat.com/diwali/2009/node/49.html

नानबा व सावट यांस
मनन व चिंतनाच्या आधारे लिहिलेले आपण लिहिलेले स्फुट फारच अप्रतिम.

मला एक शन्का आहे, आम्हि रीसेल चा फ्लट घेत ला आहे.तिथे भडोत्री रहत होते आता रूम रीकामी झाली आहे आम्हला पूजा करायची पण अजुन तिथे देवाची मूर्ती किवा फोटो नाहि आहे. अश्या वेळी काय करावे? मोठी पूजा करणे सध्या शक्य नाही.

..........रुहि.

सुपारीचा गणपती ठेवा आणि गणेश पूजन करून राहायला सुरू करा.. वास्तूशांती होम/ पूजा वगैरे नंतर केतील तरी चालेल.. Happy

माझ्या शंकेचे कुणी जाणकार निरसन करतील का? की श्रीगुरुचरित्र स्त्रियांनी का वाचु नये? यामागचे कारण काय आहे? आणी घरातील एखाद्या पुरुष व्यक्तीने जर नवस केला असेल ( गुरुचरित्र वाचण्याचा म्हनजे पारायण करण्याचा ) आणी काही कारणाने तो फेडला गेला नसेल तर काय करावे.

कारण दुसर्‍याकडुन म्हणजे घरातील इतर पुरुष व्यक्ती किंवा पुजा सांगणारे ब्राम्हण वगैरे लोकांकडुन करवुन घेणे हे मनाला पटत नाही, कारण जो रोगी आहे त्यानेच औषध घेणे श्रेयस्कर ठरते ना? पण अर्थात तो नवस मी फेडणार नाहिये, पण जर स्त्रिया वाचु शकणार असतील तर मग मी एखादे पारायण करु शकते.

कृपया लिंबुजी, मास्तुरे अशा खर्‍या जाणकारांनीच माहिती द्यावी, इतर डयु आयडींनी उगाच चघळायला विषय मिळाला म्हणून कीबोर्ड बडवु नये. नाहीतर येतील फुकटचे दिवे घेवुन. ( तेल ओतणे हा दुसरा भाग असेलच )

कृपया लिंबुजी, मास्तुरे अशा खर्‍या जाणकारांनीच माहिती द्यावी, इतर डयु आयडींनी उगाच चघळायला विषय मिळाला म्हणून कीबोर्ड बडवु नये>>>>>>>>>>>>>>>>>>>>> त्यांच्या विपुत जाउन विचारा ना मग... कशाला इथे येउन किबोर्ड बडवतात ???? Happy

राडु चिखलात असल्याने डोळे पाणावलेलेच राहतील नाही का? आणी एकटे ( की दु़कटे ?) पुदिनहरा पोटदुखीवर चांगले असते घेऊन बघा, नाहीतर आयुर्वेदीक डॉ. ना गाठा. इथेच उलट्या करु नका. बरे नाही ते.

टुनटुन,

लक्ष नका देऊ. हे सगळे सवयीचे झाले आहे.

"सप्तशती गुरुचरित्र" विषयी माहिती आहे का? टेंबेस्वामींनी रचलेले आहे. त्याच्या पारायणाला गुरुचरित्रा एवढे कठिण नियम नाही आहेत.
टेंबेस्वामींची रचना आहे म्हणजे दत्तगुरुंचा प्रसादच आहे ते.

>>> माझ्या शंकेचे कुणी जाणकार निरसन करतील का? की श्रीगुरुचरित्र स्त्रियांनी का वाचु नये?

मी श्री गुरूचरित्र वाचलेले नाही. त्यामुळे असा काही नियम असल्याची मला माहिती नाही. पण याबाबतीत माझे मत वेगळे आहे. परमेश्वर भक्तीचा कोणताही मार्ग हा लिंगनिरपेक्ष आहे. नवविधा भक्तीमार्गातील कोणत्याही भक्तीमार्गाने स्त्री व पुरूष हे परमेश्वराची भक्ती करू शकतात. त्यातल्या कोणत्याही मार्गाला कोणत्याही प्रकारची आडकाठी नाही. श्रीगुरूचरित्र हे श्री नरसिंह सरस्वतींच्या जीवनावर आधारित आहे. श्री नरसिंह सरस्वतींच्या गाणगापूर, श्री नृसिंह वाडी, औंदुबर इ. पवित्र ठिकाणी स्त्रिया व पुरूष दर्शनास जाऊ शकतात. त्यामुळे श्री नरसिंह सरस्वतींच्या जीवनावर असलेला गुरूचरित्र हा ग्रंथ वाचण्यास कोणतीच आडकाठी नाही.

परंतु आपल्या मनात अजूनही शंका असल्यास प्रख्यात वेदांती श्री. लिम्बूटिंबू यांच्याकडून अधिक माहिती घ्यावी. तसेच इथल्या काही अज्ञानी पामरांना क्षमा करून त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करावे.

अक्षय तृतीयेला आम्ही गृह प्रवेश करणार आहोत . गुरुजी येणार आहेत. पण तरीही जाणकारांनी कृपया हे सांगावे की या पुजेत काय अपेक्षीत आहे ( ऊदा. हवन ई.) प्रसाद काय करतात? आम्हाला व्यवस्थीत पुजा करायची आहे आमच्या तर्फे काही बाकी ठेवायचे नाही.

गृहप्रवेशा साठी लागणार्‍या सर्व गोष्टींची माहिती गुरूजींनाच विचारा. त्यासाठी लागणार्‍या सर्व वस्तूंची यादी ते देतील. पुण्यात असाल तर मंडई पोलिस चौकीच्या शेजारी पूजेचे सामान विकायच्या दुकानांची एक मोठी रांग आहे. त्या सर्व दुकानदाराकंडे गृहप्रवेशाला लागणार्‍या सर्व वस्तूंची यादी असते.

मास्तुरे मनापासुन खूप खूप धन्यवाद. श्रीगुरुचरित्राचे पारायण करावयाचे असल्यास एकभुक्त राहुन थोडे सोवळ्यात पाळतात असे पाहिले आहे. स्त्रियांच्या अडचणींमुळे आणी श्री दत्तगुरु हे ब्रम्हचारी आहेत, म्हणून स्त्रियांनी वाचु नये असे ऐकले, म्हणून इथे विचारले.

श्रीनृसिंहवाडी म्हनजे नरसोबाची वाडीला मी लहानपणी गेले होते, फारच सुंदर अनुभव होता, कृष्णा नदीच्या रम्य परिसरातल्या या मंदिरात खूप मानसिक शांती अनुभवता येते.

श्री सप्तशती गुरुचरित्राविषयी मात्र खरेच माहिती नव्हती, आता आणेन. दुसरे असे की श्री टेंबेस्वामी हे श्री स्वामी समर्थांपेक्षाही तापट होते, आणी त्यांच्यात खूप तेज असल्याचे दिसते. त्यांचे श्री श्रीपादवल्लभ हे अष्टक अतीशय उपयुक्त आहे.

पुनश्च: धन्यवाद!

गुरुचरित्राच्या पुस्तकात पारायणाचे नियम आहेत.. स्वामीनी ते स्त्रियानी वाचू नये असे सांगितले आहे. पण पुस्तकात स्त्रीयानी वाचले तर चालते असा उल्लेख आहे. सप्तशती गुरुचरित्रही छान आहे.. त्यातील प्रत्येक ओळीतील तिसरे अक्षर वाचत गेले तर गीतेचा पूर्ण पंधरावा अध्याय तयार होतो. काही ओळी पहा...

datta 7_0.JPG

डॉ. धन्यवाद. स्तोत्र चांगलेच आहे, आणी तुम्ही शोध पण छान लावलात, काहीवेळा खरेच या गोष्टी नजरेआड होतात, कारण वेळेअभावी स्तोत्र, श्लोक, पारायण हे जणू घाईतच उरकले जाते. एका श्लोकातुन दुसरे वाचता येणे हेच अद्भूत आहे. परत धन्यवाद !

हा शोध माझा नाही.. आमच्याकडे जी प्रत आहे, त्यात तिसरे अक्षर ठळक करुनच दिलेले आहे.. कदाचित तुम्हालाही अशीच प्रत मिळेल.

गणपती विसर्जना विषयी थोडी माहीती हवी होती. माझ्या आई कडे दरवर्षी ५ दिवसाचा गण्पती असतो . या वर्षी माझी वहीनी pregnant आहे. वहीनी च्या आजी आई ला सांगीतल की तुम्ही या वर्षी गणपती विसर्जन करु नका. गणपती एका नवीन कपड्यात गुंडाळुन ठेवुन द्या. आई ला काही पटल नाही. यावर काही उपाय आहे का?

Pages