बागकाम (अमेरिका) सीझन २०१२

Submitted by सीमा on 19 March, 2012 - 10:58

यावेळी आपल्याकडे स्प्रिंग खुपच लवकर आलाय. तापमान छान उबदार व्हायला लागल आहे. तुम्ही बागकामाला सुरुवात केली असेलच. इथे आपण बीया कुठल्या रुजवल्या आहेत , फळझाडे, फुलझाडे कुठली लावली आहेत त्यांची चर्चा ,अपडेट्स करुया का? पोस्ट्स मध्ये झोन लिहिला तर तुमच्या आसपासच्या मायबोलीकरांना पण त्याचा उपयोग होईल. तसेच बीया,झाडे आणण्यासाठी लोकल दुकाने, वेबसाईट्स लिहिल्या तर व्यवस्थित डाटाबेस तयार व्हायला मदत होईल. शीर्षकात 'अमेरिका' लिहिल असलं तरी इतरत्र रहाणार्‍या मायबोलीकरांनीही लिहायला हरकत नाही.

अमेरिकेत कडिपत्ता लावण्याची माहिती अंजलीने इथे लिहिली आहे.
http://www.maayboli.com/node/18243

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असामी, झरबेरा नव्हे, मी Anastasia green chrysanthemum च्या बिया शोधतेय. कुठेही दिसत नाहीयेत. प्रचंड आवडलंय ते फूल.

हे कुठे विचारु कळतं नाहिये,म्हणून ईथे लिहित आहे.
आता बागेत गेले तेव्हा अंजीराच्या झाडावर मधमाशांच पोळं दिसलं Sad
कोणाला काही त्यावर उपाय माहिती आहे का?
मी गुगलून बघतेच पण जर कोणाला उपाय माहिती असेल तर प्लीज सांगा.

सीमा, वॉव कसल्या ताज्या भाज्या आहेत Happy घरच्या भाज्या खाण्याचा आनंद काही औरच ना !!
तुझ्या बागेचा पण एक फोटो टाक ना प्लिज

बाकीच्यानी फोटो टाका आता. मी नेक्स्ट टाईम , दुधी,दोडका, अंबाडी टाकीन . Happy

सायो, mums चे बाकीचे कलर अगदी सहजा सहजी लोज्/होम डिपो मध्ये मिळतात. समर संपत आला कि रोप मिळतात तयार. ग्रीन कलर मात्र कधी दिसला नाहीये. मला पण फार आवडतात ती फुल. फॉल म्हटल कि पंपकिन्स नंतर तेच आठवतात.

सीमा, मम्सची बाकीची व्हरायटी सहज मिळेल पण मला अनास्टासिया ग्रीन आणि नवीन भर म्हणजे रेड रिगल मिस्ट हवे आहेत. नेटवर खूप शोधलं पण मिळत नाहीये. यूकेत सहज उपलब्ध आहेत असं दिसलंय Uhoh

मझ्याकडे भेन्डी, कार्ली यायला लागली. दुधी एकपण आला नाही, नुसती पानचपान. cherry tomatoes छान येतात पण मोठे tomatoes फक्त २ अले. वान्ग (Italian beauty) फुल drop करतय.

तुम्ही fertilizers कोणत वापरता आणि किती वेळा ?

भीत्या पाठी भ्रम्हराशस. बागेत साप निघाला. लेकीने patioच्या कचेच्या दारातन बघितला. "snake snake go away" करत होती. मी आधी ignore केल. हीने कधी Diego सोडुन साप बघितला! सहज बघितल तर समोर @ १.५ मि. लाम्बीचा साप. माझी ईतकी फट्टुश की पहीला call 911, animal control की नवरा हेच कळेना. पण ती वेळ आलीच नाही, सापाच्या बाजुला पक्शी खेळ्त होते का टोचत होते देव जाणे पण तिकडन तो माझ्या herbs patchमधे गेला आणि मग कुम्पणाच्य खालन बाहेर निघुन गेला. गुगलून बघितल्यावर तो जगातल्या सगळ्या विशारी सापनसारखा भासायला लागला Happy दुसर्या दिवशी office मधे काही जाणकार लोकान्नी सान्गीतल "If it was poisonous, none of the birds would be around it!" तेव्हा कुठे जीव भान्ड्यात पडला. Happy

सायो, इकडून पाठवू का? Happy

(अमरिका सीझनात नसलेले अवांतर : माझ्या ऑफिसातल्या टॉमेटोचे ३, ४ टॉमेटो पिकून लालबुंद झाले आहेत. येताजाता कौतुकाचे शब्द ऐकायल मिळतायत.)

मृदुला, मम्सचे कटींग्ज पाठवतात ग बिया नव्हेत. त्यामुळे तिथून पाठवता येण्याची सोय नाही/नसावी. माझी एक मैत्रिण युकेत जातेय ऑगस्टमध्ये. तिला आणायला सांगावं असं खूप मनात येतंय पण कस्टम्समध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात.

विचारल्याबद्दल थॅन्क्स. मला आवडलेले हे दोन टाईप्स अमेरिकेत नाहीयेत.

काकड्या अजून लहान आहेत, पण बर्‍याच आल्यात. ही एक पानावर बसलेली.

kakdi.jpg

हे रेड बेल पेप्पर, कुंडीतच ३-४ एवढ्या ढबाल्या झाल्यात. पण त्या लाल कधी होणार? Proud लहानही बर्‍याच लागल्यात. या काढाव्यात असं वाटतंय..

bellp.jpg

बनाना पेप्पर्स-

bp.jpg

कारले-

karle.jpg

मस्तच लोला...
माझी मिरचीची झाडं जमीन्/कुंडी कुठेच वाढत नाहीत ...काय प्रॉब्लेम आहे काय माहीत....यावेळ्ची दोन पण लावली त्यापेक्शा अर्धा हातच वर आलीत पण मिरची येईल्स वाट्न नाही

मस्तच लोला.

आमच्याकडे या वर्षी झुकिनी, काकड्या, लाल मुळा, चार्ड, हालपिनो, बनाना पेपर्स आणि ढब्बू मिरच्या मस्त आल्यात. चेरी आणि बिइफ स्टेक टोमॅटो अजून हिरवे आहेत. काल मस्त हालपिनो पॉपर्स केल्या. लेक आता फ्राईड गीन टोमॅटोची वाट बघतोय.

एका मित्राच्या बागेतलं हे दोडकं!! गेले २-३ आठवडे त्यांच्याकडली मंडळी गावाबाहेर म्हणून आम्हाला ते तोडून वापरून टाकायला सांगितलं. डोक्यातून पार निघून गेलं. काल ते तोडलं. अजस्त्र, सव्वाफूट लांब आणि जून झालंय. कापायला पावर टूल्स लागतील.

kulakarnyankadala-ajastra-doDaka.jpg

गेल्या आठवड्यात लेकीला तिच्या शाळेतल्या बागेची काळजी घ्यायची ड्युटी होती. लेटस, भरपूर बेसील, गाजरं आणि ४,५ जम्बो झुकिनी आम्हांला मिळाली. सुपरमार्केटात मिळणार्‍या झुकिनीच्या दुप्पट आकाराची १ झुकिनी होती. शेवटी १ मला ठेवून बाकीच्या शेजारी वाटून टाकल्या.

माझ्याकडेही वांगी, झुकीन्या आणि टोमॅटो लागले आहेत. जरा तयार झाले की फोटू टाकीन Happy

मृ, दोडक्याला शिरा कशा नाहीत?

Pages