बागकाम (अमेरिका) सीझन २०१२

Submitted by सीमा on 19 March, 2012 - 10:58

यावेळी आपल्याकडे स्प्रिंग खुपच लवकर आलाय. तापमान छान उबदार व्हायला लागल आहे. तुम्ही बागकामाला सुरुवात केली असेलच. इथे आपण बीया कुठल्या रुजवल्या आहेत , फळझाडे, फुलझाडे कुठली लावली आहेत त्यांची चर्चा ,अपडेट्स करुया का? पोस्ट्स मध्ये झोन लिहिला तर तुमच्या आसपासच्या मायबोलीकरांना पण त्याचा उपयोग होईल. तसेच बीया,झाडे आणण्यासाठी लोकल दुकाने, वेबसाईट्स लिहिल्या तर व्यवस्थित डाटाबेस तयार व्हायला मदत होईल. शीर्षकात 'अमेरिका' लिहिल असलं तरी इतरत्र रहाणार्‍या मायबोलीकरांनीही लिहायला हरकत नाही.

अमेरिकेत कडिपत्ता लावण्याची माहिती अंजलीने इथे लिहिली आहे.
http://www.maayboli.com/node/18243

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Colacasia /Taro leaf roots हे अळू.

Elephant leaf roots : ही (बहुतेक) ब्रह्मराक्षसाच्या झुडपाची मुळं.

मेधा आभार मला शेजारणीने एक वेगळी पद्धत सांगितली आह. I will write in details if I see the output...
So far nothing in soil sagali potting pots madhe aahe ..trying violet kolhraabi (naval kol) first time.....just cause I had the seeds....

मृण्मयी आणि लोलादि आभारी आहे मी तुम्हा दोघींची.

माझा खूप मोठा गैरसमज दूर केलात तुम्ही दोघींनी. आत्ता Taro leaf roots किवा अळकुडी शोधेन इन्डियन ग्रोसरीच्या दुकानात. माझ्या इथे मिळण्याची शक्यता जरा धूसरच आहे. मी Online search करून पाहत होते की कुठे खरेदी करता येईल का......Amazon वर आहेत पण खूप जास्त संख्येत खरेदी करावे लागतील. आत्ता शेवटचा मार्ग म्हणजे इन्डियन ग्रोसरी. मिळाले तर नक्की परत येऊन सांगेन तुम्हा दोघींना.

पुन्हा एकदा धन्यवाद!!!

सशांनी यावेळी अक्षरशः धुमाकुळ घातलाय त्यामुळ यावेळी फारस काही हाती लागेल अस वाटत नाही आहे. Sad
गेल्या वर्षीचा दुष्काळ कारणीभुत म्हणे.यावेळी रोझमेरी,लव्हेंडरच जंगल काढुन टाकल. बरीच जागा झाली आहे त्यामुळ.
५० ग्लायडेलिया लावलेले. सगळे उगवून पण आले. झिनियाची तर जवळ जवळ ७०/८० रोपे आलेली. सशाने खावून टाकली.
वैतागून आता झेंडु लावलाय मालकांनी. ससा खात नाही . गुलबक्षी (4'o clock) पण सुटली आहे तडाख्यातुन. एकुणच ससा न खाणारी झाडे लावणार यापुढे.
दुधी , टोमॅटो , मिरची,वांगी,झुकिनी,ढबू,अळु चांगले येत आहेत. घरच्यापुरते वाटाणे आले.
घोळीची भाजी उगवून आली नाही.
फोटो टाकते w/e ला.

गेल्या आठवड्यात मैत्रिणीने स्वतःच्या बागेतनं उगवलेल्या भाज्यांचं सॅलड आणलं होतं. अप्रतिम होतं चवीला. ड्रेसिंगही तिनेच बनवलेलं घरी. एकदम अहाहा!!!

लोला, ईथे वाचून वीकेंड ला होम डेपो मधे कारल्याची रोपे आणली, थँक्स !

बाकी या वेळी प्रथमच हरभरा लावलेला, मस्त आलाय, घाटे पण छान टपोरे झाले आहेत Happy
मटार, बीट, गाजर,मुळा, चार्ड पण मस्त तयार झाले आहेत.

आता टोमॅटो, दुधी, कलींगड, मका, भेंडी, बीन्स,मिरची, सिमला मिरची, अळू रोपं जोमाने वाढत आहेत.

सीमा, बहुतेक मागच्या वर्षी तु दिलेल्या आंबट चुक्याच्या बिया , मला पण मिनोतीकडून थोड्या मिळाल्या, आणि आता तो चुका चांगलाच फोफावलाय, धन्यवाद Happy

माझ्याकडे कुंडीमध्ये लाल जास्वंद आहे.गेल्या काही दिवसांपासून पाने पिवळी होऊन गळत आहेत.आता तर लाल रंगाची फुले न येता गुलाबी फुले येत आहेत.पॅटियोमध्ये दुपारी ऊन भरपूर असते.पाणी मी रोज घालते.काय प्रॉब्लेम असेल?

पूर्वा, कुंडी, माती पुरेशी मोठी आहे ना? पाणी रोज न घालता एक दिवसाआड घाल. खत दिलं आहेस का? नसेल तर महिन्यातून एकदा दे.

अंजली,खत घातलं आहे काही दिवसांपूर्वी.ह्म्म बहुतेक कुंडी जरा मोठी आणायला हवी आहे असे वाटते.थँक्स Happy मोठ्या कुंडीत ट्रांस्फर करुन बघते.

मागे रूनीने विचारलं होतं तसं यंदा माझं होतंय. मोगरा मस्त वाढतो आहे, पण फुलं येत नाहीयेत. असं का होत असेल?

मी काही दिवसा पुर्वी झेंडू, बेसील, आणि एक लाल फुलाच्या झाडाच्या प्रत्येकी ६ बिया लावल्या होत्या. सगळी रोपं बरोबर लागली, छान वाढतही होती अचानक एक एक करुन मरायला लागली. आता फक्त झेंडुची ३ रोप उरली आहेत आणि ती पण हळुहळु सुकत चालली आहेत Sad
मी पाणी व्यवस्थित घालते, ऊन कमी येतं माझ्याकडे पण दिवसाचे ४ तास ऊन मिळत त्यांना. माझं काय चुकतं?

लाल रंगाची फुले न येता गुलाबी फुले येत आहेत.>>>>
पुर्वा, जास्वंदीचे कलर बदलण कॉमन आहे बहुदा. आमच्याकडे जे झाड आहे ते सुरुवातीला डार्क लाल रंगाची फुले द्यायच. आता केशरी देते.
मीपु Happy फोटो टाक हरभर्‍याचा.
ढबु मिरच्या चांगल्या आल्या आहेत. pinterest वर वाचल याला , फुल येताना epsom salt स्प्रे करा म्हणुन. खरचं वर्क होते ती टिप.
Optimized-IMAG0994.jpg

बाई, फॉलमध्ये कट(pruning) केले होते का? आत्ता केले तरी चालेल बहुतेक. फुलं यायला ह्युमिडिटी लागते असंही वाचलं.

स्वाती, अगं मोगरा जून एण्ड, जुलै-ऑगस्टमधे येईल. एखादा बहर आला की पुन्हा काही दिवस शांत. मग काही दिवसांनी दुसरा बहर येतो. मी इकडे एप्रिलमधे सगळी पानं काढून टाकते. मग नवीन पानं येताना पानागणिक फुलं येतात.

ताजा, टपटपीत पुदिना आणि अल्ट्राफ्रेश सिमला मिर्च्या! कसलं सुंदर दिस्तंय!

यंदा फ्लोरिडातल्या सगळ्या कढीलिंबाच्या झाडांना भरभरून फुलं आलीत. फळं पडून-बिया रुजून रोपं मिळतील का?

लोला, अंजली, धन्यवाद. प्रून करते.
(शेजारणीचा मोगरा ऑलरेडी फुलला म्हणून पोटात दुखतंय. :P)

सूड म्हणून काल शॉपराइटमधून 'पोएट्स जॅस्मिन' (Jasmine officinale) आणलंय. अगदी नाजुक गुलबट फुलं आहेत आणि वास घमघमतो आहे घरभर!

कडिपत्त्याच्या बिया माझ्याकडे कधी रूजल्या नाहीत. मोठ्या झाडाला भरपूर पिल्लं यायची मात्र. बिया रूजल्या तर त्यातलं एक झाड मला दे :).

अगदी देईन अंजली! भारतात घरी जे जंगल झालंय ते बियांपासून असावं असं वाटायचं.

रोपं हवी असतील तर कळवा. इथे एका मैत्रिणीकडे उपटून फेकावी लागतात इतकं रान माजलंय.

स्वाती Jasmine officinale म्हणजे आपल्या जाईचा प्रकार. सुरेख वास असतो. आपल्याकडे श्रावणात फुलतो. त्याच्या बरोबरीने जुईची नाजूक फुलं असतील तर मस्त वास येतो.
अशी आहेत का फुलं?

हो का सीमा?जास्वंदीचा रंग बदलतो? मग ठीक आहे.कारण कळ्या भरपूर येत आहेत.म्हणजे झाडाची प्रकृती ठीक असावी Happy

बीया आणुन कडिपत्ता mostly रुजत नाहीत. झाडाखाली पडलेल्या बिया तिथल्या तिथ रुजुन रोप मिळु शकतात. रोप येवुदेत तिथेच. मग आण.
मृ ईंग्रोत झाड मिळताहेत ती आण कि. बिया लावून झाड येवून कधी पडायचा तो कडिपत्ता फोडणीत. Proud

बाई , आमच्या शेजार्‍याच जाईच झाड फुलांनी भरुन गेलय. त्यांच्याकडे बागकाम करायला मेक्सिकन माणूस येतो. त्यान सांगितलेल, टोमॅटोसाठी जे फर्टीलायझर असत ते घालायच जास्मिनच्या झाडांना . मी आणुन घातलय. बघु काय होत ते.

Pages