बागकाम (अमेरिका) सीझन २०१२

Submitted by सीमा on 19 March, 2012 - 10:58

यावेळी आपल्याकडे स्प्रिंग खुपच लवकर आलाय. तापमान छान उबदार व्हायला लागल आहे. तुम्ही बागकामाला सुरुवात केली असेलच. इथे आपण बीया कुठल्या रुजवल्या आहेत , फळझाडे, फुलझाडे कुठली लावली आहेत त्यांची चर्चा ,अपडेट्स करुया का? पोस्ट्स मध्ये झोन लिहिला तर तुमच्या आसपासच्या मायबोलीकरांना पण त्याचा उपयोग होईल. तसेच बीया,झाडे आणण्यासाठी लोकल दुकाने, वेबसाईट्स लिहिल्या तर व्यवस्थित डाटाबेस तयार व्हायला मदत होईल. शीर्षकात 'अमेरिका' लिहिल असलं तरी इतरत्र रहाणार्‍या मायबोलीकरांनीही लिहायला हरकत नाही.

अमेरिकेत कडिपत्ता लावण्याची माहिती अंजलीने इथे लिहिली आहे.
http://www.maayboli.com/node/18243

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृ ईंग्रोत झाड मिळताहेत ती आण कि. बिया लावून झाड येवून कधी पडायचा तो कडिपत्ता फोडणीत. >> मी हेच लिहिणार होतो.

peony ला काहि केल्या फुले येत नाहित. गूगलवरचे सगळे प्रकार करुन झाले. नुसती ताडमाड झाडे वाढतात पण एक फूल नाहि Sad

इकडे झाडंबिडं मिळणं तर सोडाच, पण आपल्या पिशवीत कढीलिंबाच्या चार दांडक्या टाकाण्यापूर्वी काउंटरमागची बेन आपलं बिल तपासते!

>>>सगळी भिस्त माबोकरणींवर आहे
भिस्त लिंगनिरपेक्ष असू द्या, रोपं मिळण्याची शक्यता वाढवा! Proud रोपं मिळतील.. वाट बघा!

मृण Proud

मला कोणीतरी मोगर्‍याची काळजी कशी घ्यायची सांगेल का? मी सियाटलला रहाते, झोन ८. हिवाळ्यात टेम्प्स अति कमी नसतात, पण २५-३० पर्यन्त खाली जातात, २-३ वेळेस स्नो होतो. तर मोगरा कुंडीत राहु देऊ की जमिनीत लाऊ? अजुन काय काळजी घेऊ? णकारांनी कृपया मदत करा!

काल घरच्या अरुगुलाचे सॅलड खाल्ले.
वीकेंडला मुळ्याच्या पानांची कोशिंबीर करणार .
चार्डची रोपेमात्र घरातून अंगणात लावल्यावर सुकून गेली- आता परत बिया लावल्या आहेत अंगणात. बघू केंव्हा येतील .

नमस्कार, मी सोनुली, सीॅट्ल मधे झोन ८ मधे राहते. बागकामाची आवड २-३ वर्षा पासून आहे. छोट्या यार्ड मधे भरपूर भाज्या उगवणे हा मझा छंद. सीॅट्ल प्यूजेट साउंड भागामधे भाज्या उगवणे हे जरा कठीण आहे कारण उन्हाळा कडकनसतो आणि स्प्रिंग व उन्हाळ्यात पाउस पडतो. २०१२ मधे मेथी , चुका, बीट, शेपू, नवालकोल, फारसबी अशा भाज्या पेरल्या आहेत, बघुया. गेल्या ३-४ वर्षाच्या अनुभवाने लिस्ट तयार केली आहे की ह्या सीॅट्ल मधे केव्हा कोणाच्या भाज्या पेराव्या ते. सविस्तर लिहीन एकदा. पुर्वी मी ब्लॉग लिहीत असे, आता कामा मुळे वेळ मिळत नाही. कोणाला तपासून बघायचा असेल तर एकडे बघा: http://fenugreeklove.wordpress.com/

मेथी दाणे कुंडीत लावल्यावर ३-४ दिवसातच कोंब फुटले आणि ७-८ दिवसात इंचभर वाढली. पण आता मान टाकत आहेत Uhoh
अजून जास्ती वाढली तर नाहीतच पण पहिल्या आठवड्यात जेवढी होती तेवढीच आहेत. मेथी लावल्यापासून ती खुडता येण्याइतपत होण्यास किती अवधी लागतो? उन किती तास लागतं? पाणी रोज घालावं लागतं का? एकदा तरी घरच्या मेथीची भाजी खायची इच्छा आहे.

शूम्पी, ऊन खूप असेल तर पाणी रोज घालावे लागेल. मी डेकवर ठेवते विंडो बॉक्स. दुपारी जरा सावली मिळाली की छान वाढते.

ओक्के मी आता कुंडीची जागा बदलते म्हणजे सकाले उन मिळेल आणि दुपारी जरा सावली. मग बघू काय होतं ते. थॅन्क्यू.

मेथी हे कूल वेदर क्रॉप आहे, जर खूप उन्हाळा असेल तर फार वाढत नाही. साधारणपणे मेथी पेरल्यापासून २० दिवसात १ बॉटभर उंच होते. ग्रोसरी स्टोर मधून बिया पेरल्या असतील तर १५-२० दिवसा नंतर तयार होईल.

शुम्पी , आत्ता आपल्याकडे मेथी येणं जरा कठिण आहे. उद्यापासून १०० फॅ आहे. तरीपण सावलीत ठेवून बघ पॉट. बेझिल वापरत असशील तर बेझिल वगैरे हर्ब्ज लाव आत्ता. एकदम जास्त सावलीत अळु लावता येईल अजुनही.
जॅस्मिन जमिनीत लाव. व्यवस्थित येते एकदम.
हे आमच्याकडचे उत्पादन :

Optimized-IMG_0081.JPGOptimized-IMG_0189.JPG

या गुलाबाला खुपच फुलं आलेली त्यामुळ झाड एकदम भरुन गेलेल वेल गुलाबासारख. स्वतंत्र फुल इतक छान नाही आहे. rose.JPG

सीमा,ताज्या भाज्या खूप छान दिसताहेत. त्या काकड्यांना आपल्याकडे मावळी काकडी म्हणतात ना ? खिर्‍यांपेक्षा या काकड्यांची चव मला जास्त आवडते. तुझ्या व्हेज गार्ड्नचा फोटो पण बघायला आवडेल.

मला आमच्या फार्मर्स मार्केटमध्ये मोगर्‍याचं रोप मिळालंय. आठवडाभर त्याला मस्त एक दोन फुलं येतायत रोज. काल मी जरा मोठी कुंडी आणून त्यात रोप ट्रान्सफर केलंय. काल होम डिपोतून झरबेराही आणलाय.
नेटवर सर्च करताना काल हे फूल नजरेला पडलंय. प्रचंड आवडलं पण ह्याच्या बिया कुठेही दिसल्या नाहीत. कुणाला माहिती आहे का ह्याबद्दल? माझ्याकडे बॅकयार्ड नाही तेव्हा जे काही लावायचं ते कुंडीत लावून पॅटिओत ठेवावं लागणार.

Pages