बागकाम (अमेरिका) सीझन २०१२

Submitted by सीमा on 19 March, 2012 - 10:58

यावेळी आपल्याकडे स्प्रिंग खुपच लवकर आलाय. तापमान छान उबदार व्हायला लागल आहे. तुम्ही बागकामाला सुरुवात केली असेलच. इथे आपण बीया कुठल्या रुजवल्या आहेत , फळझाडे, फुलझाडे कुठली लावली आहेत त्यांची चर्चा ,अपडेट्स करुया का? पोस्ट्स मध्ये झोन लिहिला तर तुमच्या आसपासच्या मायबोलीकरांना पण त्याचा उपयोग होईल. तसेच बीया,झाडे आणण्यासाठी लोकल दुकाने, वेबसाईट्स लिहिल्या तर व्यवस्थित डाटाबेस तयार व्हायला मदत होईल. शीर्षकात 'अमेरिका' लिहिल असलं तरी इतरत्र रहाणार्‍या मायबोलीकरांनीही लिहायला हरकत नाही.

अमेरिकेत कडिपत्ता लावण्याची माहिती अंजलीने इथे लिहिली आहे.
http://www.maayboli.com/node/18243

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे आजचे उत्पादन:

IMG_1890_resize.jpg

या शिवाय तीन-चार हर्ब्ज आहेत आणि काकडी पण आहे, पण अजून काकड्या लागल्या नाहीत. झोन ६अ.

व्वा... मस्तच वाटतंय, माझ्याकडे अळू नुस्ता फोफावलाय त्याचे कंद आता भराभर वाढतायत त्याचबरोबर गवती चहा आणि मिरच्यापण येतायत. समुद्र्मेथी बनवून झाली­...झाडं वाढताना पाहून खुप प्रसन्न वाटते.

मस्त भाज्या! सप्रि, वांगी मस्तच आहेत.

हे मध्यंतरी आलेले आणि आजचे पीक- झोन ६-बी.

cuc.jpgveg2.jpg

काही बनाना पेपर्स लाल-केशरी झाल्या
veggies.jpg

नुकतेच yard असलेल्या घरात आलो अहोत. समर सम्पल्यात जमा आहे. तर आता काहि लावायच असेल तर काय लावता येइल? कुन्ड्यामध्ये सध्या फुलझाडे आहेत. त्यतिल rain lily, acidenthera जमिनित लावले. त्यामुळे १ विन्डोबोक्स मोकळा झाला आहे. त्यातहि कहितरि लावायचे आहे. raised bed भाजिसाठि करवे का हे हि ठरवयचे आहे. झोन ६अ आहे पण माझ्यामते ७ म्हणायला हरकत नाहि. वेळ फारसा देता येणार नाहि आत्ता त्यामुळे नक्कि कश्यात वेळ घातलेला सर्वात किफायत्शिर ठरेल हे सुचवाल तर फार मदत होइल.

लोला, झोनची माहिति पाहिली आहे. परन्तु, अनुभवातुन सुचवु शकणारे लोक इथे आहेत म्हणुन प्रश्न विचारला. सीझन सम्पत आला, शिवाय वेळ फारसा नाहि ह्या constraints लक्शात घेउन कोणी काहि सुचवेल असे वाटले.

झोन ६ किंवा ७ असेल तर अजूनही लेट्युसचे प्रकार लावू शकता. कॅबेज सुद्धा फॉल प्लांटिंगलाचालू शकेल पण मी कधी केलं नाहीये.

त्या मी मारल्या Lol
चार बाटल्यात उगवल्या असत्या त्या एकाच बोल मध्ये टाकल्या आणि जरासे उन दाखवले मेथीला... मेल्या बिचार्‍या.. Uhoh

इथे कोणी रातराणी लावली आहे का? इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कुठे मिळेल?
यंदा पुन्हा काहितरी बागेत खुडबुड करीन म्हणते.
पुदीना मेल्याचं ऐकून एक मित्र म्हणाला की यू हॅव टु बी टॅलेंटेड टु डु दॅट Sad

नाइट ब्लूमिंग जॅस्मिन. अ‍ॅमेझॉनवरसुद्धा मिळेल.

>> पुदीना मेल्याचं ऐकून एक मित्र म्हणाला
मैत्रीण ना? Proud

हे मैक्तिक कालच एका मित्राचं Sad
आता चॅलेंज घेवून काहितरी जगवून दाखवावच अशी सुर्सुरी/खुमखुमी आली आहे.

नाइट ब्लूमिंग जॅस्मिन.>> हे बघते आता. पण खरच देशी रातराणीसारखा वास असतो का?

हो.

मला यावर्षी मम्स ऑर्डर करायची भयंकर इच्छा आहे. पण झाडं घरात आणायची म्हटल्यावर जिथे तिथे कुंड्याच होतील म्हणून विचार करतेय. परवा आदित्यने 'घरात ५० कुंड्या असल्या तरी चालायला जागा मिळते' असं म्हणून हौसला अफजाई केली आहे Proud

>> घरात ५० कुंड्या असल्या तरी चालायला जागा मिळते
आम्ही हल्ली शेजार्‍यांकडे जातो चालायचं झालं की. Proud

पण झाडं घरात आणायची म्हटल्यावर जिथे तिथे कुंड्याच होतील म्हणून विचार करतेय. >> मम्स घरात का लावतेस ? बाहेर लावली कि दर वर्षी येतच राहतात कि.

थंडीत घरात आणाव्या नाही लागणार कुंड्या? >> मम्स परत येतात. पूण मेलेली कधी पाहिली नाहित जशी annuals जातात तशी. त्यांच्या बिया रुजून पण अधिक वाढली. तेंव्हा कुंड्या बाहेर ठेवल्या तरी नक्की चालतील. माझ्याकडचे कुंडीत आहेत नि जमिनीत पण आहेत. low maintenance असल्यामूळे मी दर वेळी वाढवत नेलेली आहेत.

बे एरिया कॅलिफोर्नियात तुळस कशी लावता आणि जगवता येईल?
धन्यवाद Happy

>>>सुंदर व्हरायटी आहे मी मागवलेल्या कॅटलॉगात
सायो, लिंक देता येईल का?

Pages