Submitted by निवांत पाटील on 23 June, 2012 - 12:54
इथे कुणी एअर रायफल वापरतं का? अॅक्चुली हा प्रश्न मी मागच्या आठवड्यात विचारायला हवा होता. (गन विकत घ्यायच्या आधी) एनी वे. मला याबाबत मार्गदर्श्न हवयं. मी ०.२२ ची एअर रायफल घेतली आहे, टॉमी कंपनीची. आणि सराव भरपुर सुरु आहे (रोज साधारणपणे ७० ते ८० शॉट्स). पण मी जिथे नेम धरतो तेथे pellet न लागता दुसरीकडेच लागतो. सधारण पणे सेंतर वर नेम धरल्यास ५ वाजता जी पोझिशन अस्ते तेथे लागतो. दुकान्दाराचे म्हणणे असे आहे कि फायर करताना रायफल हलते त्यमुळे असे होते. पण १० शॉट पैकी १० (२० फुटावरुन) जर एकाच ठिकाणी लागत असतील तर मला वाटते कि काहितरी अॅ ड्जस्टमेंट चुकली आहे. दुकान्दाराचे म्हणणे असे कि नवीन रायफलला काही अॅडजस्ट्मेंट करावी लागत नाही. जाणकारांनी जरा मदत करावी. आणि कोणी एक्सपर्ट असेल तर थोडे फार शिकवावे. धन्यवाद
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी कंप्लीट हौशी आहे. कोणत्या
मी कंप्लीट हौशी आहे.
कोणत्या दुकानातून घेतली? जनरल स्पोर्ट्स शॉप मधे घेतली असल्यास त्या दुकानदाराला त्यातले ज्ञान असण्याची शक्यता कमीच. बंदुकीची वेगळी दुकाने असतात, ते लोक छान गाईड करतात, किंवा प्रोफेशनल कोचेस. तरीही नव्या बंदुकीस सहसा साईट सेट करावी लागत नाही. इतर कुणी त्याच गन ने नीट शॉट मारतो आहे काय? तसे असेल तर तुमचे तंत्र चुकले.
ट्रिगर अतिशय प्रेमाने स्क्वीझ करायचा असतो. ठ्ठॉ करून गोळी झाडण्याची अॅक्शन पिक्चर मधेच दाखवतात. बंदुक हलली की गोळी सुटली अशी ती अॅक्टींग असते
इतर कुणालाही नेम नीट मारता येत नसेल, किंवा तुमची नेहेमी एक्झॅक्ट तितकीच चूक होत असेल तर साईट सेट करून घेणे, असे सोल्युशन वाटते आहे. अप डाऊन व साईडटू साईड सेटिंगचे स्क्रू असतात. फिरवून पहा. कोणता स्क्रू किती फिरवलात ते नोंदवून ठेवा म्हणजे 'अनडू' करणे सोपे असते.
हॅपी शूटिंग!
ता.क.
एक टार्गेट ब्लाईंडनेस नावाचा प्रकार असतो. नेम धरताना आपलीच पेरिफेरल व्हिजन आपणच इग्नोर करतो. तेव्हा शूटिंग करताहात तिथे मधेच कुणी लहान मूल वै येणार नाही याची खात्री करून मगच सराव करा. शक्यतो कोणत्याच पक्ष्यास मारू नका. ते पाखरू पटकन खाली पडतं.. अन मग फार वाईट वाटते. कुत्री, डुकरे यांना १० फुटापेक्षा जास्त अंतरावरून मारल्यास काही होत नाही, जोरात केकाटतात फक्त. त्यापेक्षा कमी अंतरावर .२२ची पेलेट धोकादायक आहे.
अरे वा धन्यवाद. मी गन च्या
अरे वा धन्यवाद.
मी गन च्या दुकानातुनच घेतली आहे.
इतर कुणालाही नेम नीट मारता येत नसेल>> असा कुणी सापडत नाहेय
तुमची नेहेमी एक्झॅक्ट तितकीच चूक होत असेल>>> होय. तितकिच चुक प्रत्येक वेळी होतेय. अगदी एकाच ठिकाणी.
दुकाण्दाराचा सल्ला आहे कि नविन गन असताना
असे होते. आता जवळ्पास ५०० शॉट्स झाले. तो म्हणतो कि हे सगळॅ काँप्युटर सेटींग असते
त्याला हलवु नका.
मग क्या करणेका? बर ते एतके ऑफ सेंटर आहे कि रेफरन्स्ला काही वावच नाहेय.
मी फक्त आणि फक्त टारगेट
मी फक्त आणि फक्त टारगेट प्रॅक्टीस करतो. एका कर्टन मध्ये आंब्याच्या पेटीतील गवत पॅक करुन भरले आहे. त्याच्या पुठे आणि मागे रद्दी भरली आहे. त्या मागे एक प्ल्यायवुड ठेवले आहे. यातुन छरा बाहेर येत नाही.
ते सेटींग कोण लोक करुन देतील ते प्लिज सांगाल का?
एक प्लायवुड घ्या.. त्याला
एक प्लायवुड घ्या.. त्याला गोळी मारा... मग भोक पडेल तिथे सेंटर असे कल्पून मग कडेने वर्तुळे पेंट करा.. झाली नेमबाजी.
(No subject)
बंदुक सध्या तुमच्या मालकीची
बंदुक सध्या तुमच्या मालकीची आहे, तेव्हा सेटिंग हलवायला प्रॉब्लेम नसावा. काँम्पुटर च्या नावाखाली काहीही खपवतात. थोडे थांबा, इथे अजून कुण्या जाणकाराचे प्रतिसाद येऊ द्या. नाही तर माझा सेटिंगचा ठोकताळा सांगतो
एलदूगोच्या धाग्यावर विचारा हा
एलदूगोच्या धाग्यावर विचारा हा प्रश्न
काही दिवसातच राजवाडे अबीरच्या तोंडून उत्तर देतील
अवांतर बद्दल क्षमस्व
एलदूगोच्या धाग्यावर विचारा हा
एलदूगोच्या धाग्यावर विचारा हा प्रश्न>> हे काही उमगलं नाही बॉ आपल्याला
चलो, भेटला समशौकी. नेम
चलो, भेटला समशौकी.
नेम धरायच्या व्ही नॉचला हॉरीझॉन्टल आणि व्हर्टीकल सेटीन्ग्ज असतात. ती हलवावी लागतील. आधी टार्गेट कीती फुटावर आहे ते बघा. नॉर्मल एअरगन्स १०० फुटावर जात नाहीत (रेन्ज) म्हणजेच एव्हढ्या अंतरापर्यंत गोळी सरळ जाते. त्यानंतर वजनामुळे खाली पडते.
टार्गेट ५० फुटावर ठेवा. बंदूक स्थिर आधारावर ठेवा. देन फायर
आता बंदूक जरी तुमच्याकडून हलली तरी गोळी टार्गेटच्या हॉरीझॉन्टली आसपास लागायला हवी. तसे न झाल्यास व्हर्टीकल सेटींग हलवावे लागेल.
कॉम्प्युटराईज्ड सेटींग वगैरे सगळे थोतांड आहे.
धन्यवाद बागुलबोवा. आता करुन
धन्यवाद बागुलबोवा. आता करुन बघतो. कोल्हापुरात एक मेस्त्री आहेत असे कळाले आजच(आंदुरकर) . ते बरोबर सेटींग करुन देतात म्हणे. उद्या त्यांच्या कडे जाउन बघतो. ते डिस्ट्र्ब करायचे जिवावर येतय. पण जर कोणी मिळाला नाही तर मात्र आर एन्ड डी कारायला लागेल. होप्फुली एब्लिस आणि तुम्ही मदत कराल
बाय द वे, गन ऑइल चा काय फंडा आहे. त्याने ९० रु ला ९० एमएल ची बाटली दिली आहे.
पण नेट वर मोटर ऑइल (हेवी) चांगले असे दिले आहे. तुम्ही कोणते वापरता ?
अजुन एक. तुम्ही सराव कोठे व कसा करता?
हायला, हा शौक पुर्ण करता येतो
हायला,
हा शौक पुर्ण करता येतो कायदेशीररित्या?
मला वाटलं फारच कटकटी असतील.
मी अज्ञानी असल्याने वाचतोय फक्त.
पाटीलबुवा सराव घराच्या
पाटीलबुवा
सराव घराच्या गच्चीवर करायचो आधी. आता कधीमधी हात टेस्ट करतो फार्मवर.
तेल कुठलही वापरा, सायकलवाल्याकडचं वापरलं तरी चालेल. फक्त वंगण म्हणून तर वापरायचय.. फक्त स्वच्छ तेल असू द्या. वापरलेल्या ट्रान्सफॉर्मर ऑईलमध्ये कचरा असतो.
सेटीन्ग हलवू नये वगैरे सगळ्या थापा आहेत. फक्त एक लक्षात ठेवायचं. जर्रासं हलवलेल सेटीन्ग हे गोळीचा पाथ खूप बदलू शकतं. नक्की किती हे बंदूक आणि टार्गेट यामधल्या अंतरावर अवलंबून आहे.
शक्यतो तुमचं तूम्हीच करा सेटीन्ग.
बागुलबुवांना पूर्ण
बागुलबुवांना पूर्ण अनुमोदन.
निवांतराव, साईट वर जे स्क्रू असतात ना, त्याला वर आकडे असतात, आपण कोणता स्क्रू किती फिरवला, क्लॉकवाईज की अँटिक्लॉकवाईज ते सेटिंग करताना कागदावर लिहून ठेवा. म्हणजे ओरिजिनल पोझिशन परत आणता येते.
झकासराव,
त्यामुळे फक्त तेवढ्यासाठी एक एयरपिस्तुलही माझ्याकडे आहे
एयरगन साठी लायसन लागत नाही. रूटीन वापरायची बंदूक फार महागही नसते. स्पोर्ट्स शॉपमधेही मिळतात. फक्त जपून वापरायचं पथ्य पाळलं पाहिजे.
काही गन्स ला समोर सायलेन्सर असावा तशी एक जाळी मिळते, त्यात दिवाळीतल्या टिकलीची दारू भरलेलं 'कॉर्क'चं बूच बसवून छरा मारला, तर अगदी खरी बंदूक उडवल्यासारखा आवाज अन धूर येतो. शेतावर असे बार अधुनमधून काढले, तर मालकाकडे हत्यार आहे, इथे रिकाम्या उचापत्या कामाच्या नाहीत असा मेसेज आपोआप पसरतो
मालकाकडे हत्यार आहे, इथे
मालकाकडे हत्यार आहे, इथे रिकाम्या उचापत्या कामाच्या नाहीत असा मेसेज आपोआप पसरतो>>
बाकि एकदा सुरु केल्यावर हात दुखले तरी गन खाली ठेवाविशी वाटत नाही 
धन्यवाद बागुलबुवा. काल डबल हेडेड पेलेट्स आणले. नेट वर वाचुन प्रॅक्टीस सुरु आहे.
झकासराव, पार्वती टॉकिज जवळ पवारांच दुकान आहे तेथे मिळतात. ७००० ते १०००० रुपये रेंज आहे ०.२२ ची. पेलेट्स ४० रु ल १०० मिळतात. मी पण कुतुहल म्हणुन विकत घेतल्यावरच बाकिची माहिती मिळत गेली. आता कोणितरी गुरु शोधतोय
पाटील.. कोल्हापूरात मिळतील की
पाटील.. कोल्हापूरात मिळतील की तुम्हाला कोणीतरी गुरु... कोल्हापूरमधल्या मुली भारताचे प्रतिनिधित्व करतात रायफल शूटींगमध्ये..
नाहीतर नाना पाटेकरला शोधा... तो सांगेल कोणीतरी गुरु...
बाकि एकदा सुरु केल्यावर हात
बाकि एकदा सुरु केल्यावर हात दुखले तरी गन खाली ठेवाविशी वाटत नाही >>> couldnt' agree more!
माझ्या कडे पण डेझर्ट इगल आहे. माझी आवडती.
मी अमेरिकेत रेंज मध्ये नेहमी जायचो. तिथे सराव तर व्हायचाच, आणि तो पण खर्या बंदूकींसोबत! लै मजा यायची. स्वस्त अन मस्त. खूप खर्या बंदूका हाताळल्या. शॉटगन सहित.
एअर मात्र घरी आणून ठेवली होती. आधी माझ्याकडे मॅगनम होती. १२५० FPSची पण नंतर कंटाळा आल्यामुळे पिस्तोल घेतली. १२५० असल्यामुळे माझ्या घराच्या भिंतीला बरेच छिद्र पडले, त्यामुळे गृह स्वामिनीने घ्ररात कुठेही एखादी पॅलेट मारायला बंदी केली होती.
पिस्तोलला स्कोप नसल्यामुळे सेटिंगची फारशी भानगड नाही. पण स्कोप असतानाही मला कधी फारशी गरज नाही भासली चेंज करण्याची.
सरावासाठी गच्ची किंवा मोकळे मैदान बरे पडावे.
पाटील किती FPS? इथूनच का नाही नेली? मी घेऊन गेलो देशात इथून.
मालकाकडे हत्यार आहे, इथे रिकाम्या उचापत्या कामाच्या नाहीत असा मेसेज आपोआप पसरतो >>
इब्लिस त्यासाठी सोपा उपाय म्हणजे स्प्रिंगची न घेता C02 ची घ्यावी. त्यातून पॅलेट फायर केली तरी खर्या गोळीसारखा आवाज येतो. पण ते सिओ २ सिलेंडर नेहमी बदलावे लागते.
केदार, बरोबर. पण खेड्यातल्या
केदार,
बरोबर.
पण खेड्यातल्या शेतावर ते सिलिंडर ने आण कोण करेल? स्प्रिंगचा पण आवाज बर्यापैकी येतो.
मालकाकडे हत्यार आहे, इथे
मालकाकडे हत्यार आहे, इथे रिकाम्या उचापत्या कामाच्या नाहीत असा मेसेज आपोआप पसरतो>>
पार्वती टॉकिज जवळ पवारांच दुकान आहे तेथे मिळतात. ७००० ते १०००० रुपये रेंज आहे ०.२२ ची. पेलेट्स ४० रु ल १०० मिळतात>> माहितीबद्दल धन्यवाद.
असली छर्याची बंदुक एक आणली होती माझ्या काकानी.
ते आर्मीत होते.
गावाकडे माकडं त्रास द्यायची फार. आंब्यांच खुप नुकसान व्हायच म्हणुन.
गावाकदे कुणी फारशी संभाळुन वापरले नसल्याने दोन तीन वर्षात बरीच खराब झाली होती.
मग आम्ही पोरं कुथुन कुथुन ती बंदुक घेवुन नेमबाजीच्या प्रॅक्टिस केल्याचा आव आणायचो.
निवांताचा हात बसला वाट्ट
निवांताचा हात बसला वाट्ट बंदूकीवर.
केदार, बहुतेक भारतीय बंदूक उत्पादक पॉवर डिक्लेअर करत नाहीत. विचारुन घ्यावी लागते. १२५० म्हणजे बेफाम. इथे ९६० च्या वरची सहज उपलब्ध असेल असं वाटत नाही.
ईच्छूकांनी संपर्कातून कॉन्टॅक्ट नंबर मेल करा. एअर रायफलवरची बरीच माहिती संकलीत केलेली आहे.
इथे डकवा की हो बागुलबुवा.
इथे डकवा की हो बागुलबुवा. आमच्यासारख्या हौश्या नवश्या गवश्यांनाही उपयोग होईल.
इन्ग्रजी पीडीएफ आहेत ईब्लीस.
इन्ग्रजी पीडीएफ आहेत ईब्लीस. शिवाय कसं आहे, रायफल घेण्याची प्रत्येकाची कारणं वेगळी. कोणी टार्गेट शूटींग्साठी घेतो, कोणी उंदीर घूशींच्या त्रासासाठी, कोणी रीतसर शिकारीसाठी. सगळ्यांना उपयोगी असेल असं एकच डॉक्यूमेन्ट मिळणं कठीण आहे....
एअर रायफलचं सर्व्हिसिंग मॅन्युअलही आहे मॉडेलनुसार....
बागुलबुवा, तो तुमचाच धागा आहे
बागुलबुवा, तो तुमचाच धागा आहे ना? फिशटँकचा? एकदम बेस्ट आहे. तसं काहीतरी करा ना?
नेमबाजीत आपल्याला पदकं वगैरे मिळू लागल्यापासून यात इन्टरेस्ट वाढतोय लोकांचा. दुकानात रायफल / पिस्तूल घ्यायला गेलं तर त्या सेल्समनलाही काहीच माहिती नस्ते त्याबद्दल.
इथे बेसिक माहिती तर द्या.
लहान मुलांनी नेमबाजी शिकायची तर काय शिकायची.
का शिकायची?
कॉन्सन्ट्रेशन खूप वाढतं नेमबाजीने, अन भरपूर स्ट्रेस रिलीज होतो असा माझातरी अनुभव आहे. अगदी 'ध्यान' करण्यासारखं आहे, अन तेही कुठेही केव्हाही चटकन साधू शकतं मग. गोंधळ गर्दी असली तरी हव्या त्या ठिकाणी चित्त केंद्रित करून काम करता येतं.
भरपूर आहे याबद्दल लिहिण्यासारखं. तुम्ही सुरू करा. तुमच्याजवळ 'एक्स्पर्टीज' आहे हे आम्हाला ठाऊक आहे.
बाबु हात बसलाय असे वाटतेय.
बाबु हात बसलाय असे वाटतेय. इब्लिस एकदम अनुमोदन.
हा गेम फक्त माइंडचाच आहे. डोके शांत , तर बुलेट सेंटर वर.
आता गुरुच्या शोधात आहे. मामाजी (अशोक मामा) आम्हाला गुरु गाठुन देणार आहेत.
नवागताने विचारले बंदुक कशाला आणलीय तर सांगतो, पुढच्या ऑलंपिकला चाल्लोय म्हणुन
कूल... (म्हणजेच निवांत)
कूल... (म्हणजेच निवांत)
आर्मीचं शूटींग मॅन्युअल वाचत होतो परवा. त्यात त्यांनी दिलय. तीन श्वासोछ्वास करून, मग ऊच्छ्वास सोडलेला असताना श्वास रोकून गोळी चालवावी. श्वास रोखलेला असतानाचा कालावधी १० सेकंदापेक्षा अधिक असू नये.
शूटींग रेन्ज आहे का कोल्हापूरात ? तिथे मिळेल गुरु..... नायतर बना एकलव्य अकॅडमीचे शिष्य आमच्या बरोबर.....
बघा, एकलव्य एअर रायफल शूटिंग
बघा,

एकलव्य एअर रायफल शूटिंग अॅकॅडमी
नावही किती समर्पक आहे धाग्यासाठी
चला बाबु, पहिला धडा टंकूनच टाका आज. शनिवार आहे, वेळ आहे निवांत
बाबु माझ्याकडे देखि;ल
बाबु माझ्याकडे देखि;ल बर्यापैकि मटेरिअल आहे गोळा केलेले. आपण सगळीच देव घेव करु.
बय द वे कुल पण मस्त नाव आहे.
बहुतेक भारतीय बंदूक उत्पादक
बहुतेक भारतीय बंदूक उत्पादक पॉवर डिक्लेअर करत नाहीत. >> भारतीय उत्पादकांच्या बंदूकी अजिबात घेऊ नयेत. (नो हार्म इंटेडेड) पण त्या टाकावू असतात.
श्वास रोखलेला असतानाचा कालावधी १० सेकंदापेक्षा अधिक असू नये. >>.बाबु अरे १० सेकंद श्वास थांबवला तर गोळी भलतीकडेच लागेल.
आणि बंदूक धरलेला हात थरथर कापेल.
माझ्या ट्रेनरने सांगितलेले सांगतो.
गोळी मारायच्या आधी संथ लयीत श्वासोच्छ्वास करायचा. साईट* दिसली की मग श्वास सोडताना आता मारायची ही तयारी करून, श्वास संपला की गोळी मारायची. तिथे संपले नाही. तर पुढचा श्वास गोळी मारलेल्या अवस्थेतच घ्यायचा. (फालोथ्रू) तरच गोळी व्यवस्थित निशान्यावर लागेल.
बरेच शुटर्स सुरूवातीला साईट दिसल्याबरोबर गोळी डागतात, त्याने एखादवेळेस निशाना लागतो, पण तो उत्कृष्ट शुटर नाही होऊ शकत.
ह्या गेम मध्ये कॉन्स्ट्रेशन भरपूर लागते व ते आपोआप डेव्हलप होते. रोजच्या इंटरनेटमय वातावरणातून बाहेर पडायला हा गेम उत्कृष्ट. अन ऑफकोर्स सायकल
एखाद दिवशी सर्व माबो पिस्तूल धारकांनी भेटायचे का? रायफल- पिस्तूल गटग !
निंवातराव येतील कोल्हापूर वरून , तू ये आणि इब्लिसराव तर कुठे भेटायचे असेच विचारत आहेत.
त्यामुळे ते तयारीत असतील, फक्त बंदूक सुद्धा आणावी लागेल 
त्याच गटग मध्ये आपण चार्टिंग उरकून घेऊ निवांतराव. काय म्हणता ! परत एकदा बैल धावताना दिसतोय.
बाबु , इब्लिस , कुलपाटील खरचं
बाबु , इब्लिस , कुलपाटील खरचं माहीती लिहा . वाट बघतोय तुमच्या लिखाणाची.
केदारा, गुरुमुखातून विद्या
केदारा, गुरुमुखातून विद्या घेण्याचा हाच तर फायदा...... मी लिहिलय ते आर्मी ट्रेनिंग मॅन्युअलमधलं वाचून.....
बादवे १० सेकंद श्वास थांबवून तसं काही होत नाही. मी तपासून पाहिलं, तूम्हीही चेक करुन पहा. ब्रिस्क वॉक आणि प्राणायामाने हे आणखीन चांगल्याप्रकारे करता येते. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण आणि त्यामुळे शरीरांतर्गत प्रक्रीयांवर होणारे परीणाम याच्याशी हे निगडीत असावे. जसे वातावरणात ऑक्सिजन कमी असला तर माणसास त्रास होतो त्याप्रमाणेच.
जमल्यास मॅन्युअल मधला उताराच टाकेन ईथे.
टार्गेट शूटींगमध्ये माझा खास ईन्ट्रेस्ट नाही. मी त्यापेक्षा शिकार आणि बंदूकीचा परफॉर्मन्स यात जास्त ईन्ट्रेस्टेड आहे. पण गटगला मी तयार आहे. माझ्याकडे ०.२२ एअर रायफल आणि एअर पिस्तूल आहे. अजून एखादी रायफलही मी अॅरेन्ज करु शकेन. बाकीचं फोनाफोनीतून ठरवता येईलच. (९८६७१३६९२०)
बाकी ईन्डीयन मॅन्युफॅक्चररबद्दल सहमत, पण माझा दोन ईन्डीयन रायफल्सचा अनुभव चांगलाच आहे. (ईम्पोर्टेड वापरलीच नाही कधी) शेवटी ईम्पोर्टेड रायफल आणण्याच्या कटकटी आणि कस्टम्स ड्यूटी यांचा त्रास असतोच. (तूम्ही शूटींग क्लबचे सदस्य असाल तर ड्यूटी कमी लागते म्हणे)
त्यात ५० / ६० हजाराची एअर रायफल घेण्यापेक्षा माणूस ७०/७५ हजारात ईन्डीयन रायफल (फायर आर्म) घेईल की.
शेवटी हे सगळं तूम्ही गन नक्की कशाकरता वापरता आणि त्यात किती पुढे जाउ ईच्छिता यावर सगळं अवलंबून आहे.
Breathing Due to the movement
Breathing
Due to the movement created by breathing it is impossible to release an accurate shot without
holding the breath. However as soon as breathing is suspended the body’s functions begin to
deteriorate as hypoxia (oxygen starvation) sets in. The eyes ability to function is the first to go
followed by the muscles, which begin to contract erratically. Not least there is a feeling that ‘I
must breathe, I must breathe….’ as the body tries to protect itself. All of which are not conducive
to firing a controlled shot. These ill effects can be avoided if breathing is suspended for only a
short period of time. This is around 10 seconds on an exhalation, slightly more on inhalation.
When breathing in, the chest muscles become tense, relaxing as you breath out. As we desire
to reduce tension in a shooting position it is therefore desirable to suspend breathing on
exhalation. The following diagram shows a typical breathing pattern.
V0 – is the bottom of a normal breath. It is possible to breath out more but not completely empty the lungs.
V1 – is the top of a normal breath. It is possible to breath in more (hyperventilate).
It can be seen that the breathing is generally within the rhythm of a normal breath.
In this case the shooter takes 3 normal breaths and towards the bottom of an exhalation the
breathing is suspended for around 10 seconds whilst the shot is released and follow through
takes place. The actual point of the pause, the number and depth of the breaths etc. is quite
individual and depends upon the physiology of the shooter. What is important is that the pause
in breathing is not extended beyond the 10 seconds. It is preferable to release the shot and
follow through in considerably less than that, around 4 to 6 seconds. This may be possible in
good conditions however it may be necessary to use more time in bad weather. In any case if
the shot is not fired in the time that is normal for you discipline yourself to bring down the rifle,
take a few breaths to reoxygenate the blood and repeat the process.
Pages