एअर रायफल शुटींग (माहिती हवी आहे)

Submitted by निवांत पाटील on 23 June, 2012 - 12:54

इथे कुणी एअर रायफल वापरतं का? अ‍ॅक्चुली हा प्रश्न मी मागच्या आठवड्यात विचारायला हवा होता. (गन विकत घ्यायच्या आधी) एनी वे. मला याबाबत मार्गदर्श्न हवयं. मी ०.२२ ची एअर रायफल घेतली आहे, टॉमी कंपनीची. आणि सराव भरपुर सुरु आहे (रोज साधारणपणे ७० ते ८० शॉट्स). पण मी जिथे नेम धरतो तेथे pellet न लागता दुसरीकडेच लागतो. सधारण पणे सेंतर वर नेम धरल्यास ५ वाजता जी पोझिशन अस्ते तेथे लागतो. दुकान्दाराचे म्हणणे असे आहे कि फायर करताना रायफल हलते त्यमुळे असे होते. पण १० शॉट पैकी १० (२० फुटावरुन) जर एकाच ठिकाणी लागत असतील तर मला वाटते कि काहितरी अ‍ॅ ड्जस्टमेंट चुकली आहे. दुकान्दाराचे म्हणणे असे कि नवीन रायफलला काही अ‍ॅडजस्ट्मेंट करावी लागत नाही. जाणकारांनी जरा मदत करावी. आणि कोणी एक्सपर्ट असेल तर थोडे फार शिकवावे. Happy धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एनिटाईम गिरीश.

उलट येथे अशा विषयावर चर्चा होईल आणि काही नवीन लोक ह्या खेळासाठी प्रवृत्त होतील / झाले तर ते ह्या बाफचे यशच म्हणावे लागेल. Happy

केदार, मस्तच जमल आज. Happy

अगोदर तासभर फक्त पोझिशन घेउन उभा राहिलो. डाव्या हाताची ४ बोटे तुम्ही सांगितल्या प्रमाणे दुमडुन ठेवली. ५ मिनिटांत त्यांना रग लागली. मग हँडग्लोव्ह्स घातले. मग काही प्रॉब्लेम आला नाही. फक्त ५ शॉट्स मारले. एकदम मस्त पॅटर्न. ३ शॉट्स एकत्रच लागले होते. ७ नं सर्कलला. सेंटरच्या डाव्या बाजुला. २ त्याच्याच अजुबाजुला. Happy

कसलं भारी वाटलं. आहाहा.... Happy

आता ते हँडग्लोव्हज तेवढे आणले पाहिजेत.

एक गोष्ट मात्र नक्कि . एखाद्या गोष्टीबद्दल पॅशन असले म्हणजे ती खुपच सोपी होते, हे प्रॅक्टीकली खरे आहे Happy (मला पण वाटले नव्हते एवढ्या लवकर जमेल असे. )

धन्यवाद.

मला सुद्धा बंदुकंची आवड आहे. मला एक एअर गन घ्यायची आहे साधारण २५ ते ३५ मी. च्या रेंज मधली. co2 गॅस वाली चांगली की स्प्रिंग वाली ? खर तर मी एक एअर पिस्तुल बघत होतो पण दुकानदार म्ह्णाला त्या लवकर खराब होतात हे कितपत खर आहे? .२२ आणि .१७७ ह्यात कोणती जास्त पावरफुल असतात? pllllllzzzzz माझ्या शंकांच निरासन करा. आणि मला एक चांगला सल्ला द्या

.२२ आणि .१७७ मध्ये .२२ जात पॉवरफूल ईम्पॅ़क्टच्या दृष्टीने. लांबवर मारा .१७७ ने जास्त होईल.

आधीची पानं पहा. बरीच मॉडेल्स सापडतील तुम्हाला सूट होणारी.

मी आधी ची पानं वाचली आहेत पण जरा ते स्प्रिंग वाली आणि co2 गॅस वाली मधे जरा confusion आहे आणि समजा co2 वाली घेतली तर तिचा गॅस कुठे आणि कसा भरता येईल

Co2 जास्त पॉवरफुल असते स्प्रिंग पेक्षा आणि राय्फल्ड बारेल असेल तर अचूक सुद्धा, .२२ जास्त पॉवरफुल असते co2 गन इम्पोर्ट करण्यात बर्याच अडचणी आहेत करू नका,शक्यतो भारतात विकत घ्या. सर्वात शक्तिशाली भारतीय बनावटीची ऐम्को कंपनीची M300 रीलॉंच झाली आहे

लय भारी, मला पण एअर रायफल शूटिंग मध्ये इंटरेस्ट आहे. तुमच्या सगळ्यात मी एकदमच अडाणी आहे म्हणजे फक्त स्वप्ने पाहणारी.

मुंबई आहे का कुठे एअर रायफल शूटिंगची केंद्र ??? पुण्यात अंजली भागवत यांची अकॅडेमी आहे, असे नवरा सांगत होता . कोणाला माहिती असेल तर टाकावे.

लहान मुलांनी नेमबाजी शिकायची तर काय शिकायची का शिकायची? >>> असे करूनच आमची फक्त इच्छा राहिली आहे Sad
कॉन्सन्ट्रेशन खूप वाढतं नेमबाजीने, अन भरपूर स्ट्रेस रिलीज होतो असा माझातरी अनुभव आहे. अगदी 'ध्यान' करण्यासारखं आहे, अन तेही कुठेही केव्हाही चटकन साधू शकतं मग. गोंधळ गर्दी असली तरी हव्या त्या ठिकाणी चित्त केंद्रित करून काम करता येतं.>>> +१०० अनुमोदन.

असले भारी वाटत आहे, हा धागा वाचून Happy

बाबु, गेल्या वर्षी अगदी रेंजपासुन २०० मी. वर घर घेतले होते. रोज प्रॅक्टीस करायची म्हणुन. तेथे मस्त गन ची पण सोय झाली होती. पण कर्म धर्म संयोगाने आमचा बिस्तरा लवकरच हलला. त्यामुळे सध्या तरी नो प्रॅक्टीस. पण लवकरच परत रेंज जवळ जाण्याचे योग आलेत. पाहु कसे होते ते. Happy
गटग करायला हरकत नाही. मला वाटतय इब्लिस भाउंची आयडीया होती, गटगची.

हे झकास आहे राव! म्हैसुरला mdra (Mysore District Rifle Association) मध्ये खूप प्रॅक्टिस केली, पण पुण्यात आल्यापासून पूर्ण बंद आहे.. मी पिंपळे सौदागरच्या आसपास कुठे range आहे का? घरून आमच्या या छंदास बऱ्यापैकी विरोध असल्याने बंदूक घेता येणार नाही इतक्यात..

IMG_20180603_143637.jpg

IMG_20180603_160621.jpg

आमची नेमबाजी.. लै जुनी! प्रॅक्टिस सुटली आता.. लवकरात लवकर पुन्हा सुरू करावी लागणार.

जो कोणी रायफल शुटिंग खेळाचा जाणकार आहे त्यांनी कृपया 7588601782 नंबर वर संपर्क करा.माहिती हवी आहे पण मिळत नाही,आपला नंबर sms केला तरी चालेल

@श्रीकांत ढगे
शुटींगसाठी 2 प्रकारच्या रायफल वापरतात
0.22 रायफल. यात दारू भरलेल्या गोळ्या वापरतात. या मिळवणं कठीण.
दुसरा प्रकार 0.177 एअरगन. या स्प्रिंगच्या दबावावर चालतात. यांना परवाना लागू होत नाही.

कोणत्या प्रकारची नेमबाजी करायची आहे त्यानुसार टार्गेट आणि अंतर ठरतं.

Precihole NX 100 मॉडेलचा अनुभव चांगला आहे. १४,००० च्या आसपास किंमत आहे. याच्या पेलेट्स साधारणपणे ४७० रुपयांना ५०० मिळतात.
व्यावसायिक शूटिंग करणार असाल तर मग एखाद्या लाखापर्यंत एअर गन मिळते.

हौस म्हणून सुरुवात असेल तर Precihole NX 100 पासून सुरू करायला हरकत नाही.

१२ बोअर बंदूक मिळते पण त्याला परवाना लागतो. त्याचं फायरिंग रेंजवरच करावं लागेल.

बाकी रायफल्स प्रतिबंधित (prohibited bores) आहेत. या रायफल सामान्य नागरिकांना मिळत नाहीत.

@श्रीकांत ढगे,
तुम्ही अजून सुरुवात केली नसेल तर आधी एखादी एअर रायफल शूटिंग रेंज जॉईन करा. १० मीटरच्या इनडोअर रेंज पुण्यात बऱ्याच आहेत. इतरही अनेक शहरात आहेत. गुंतवणूक करण्याआधी शिकून घ्या. रेंजकडून स्पर्धा सुद्धा होतात, त्यातून स्पर्धात्मक दृष्टीने तयारी पण करून घेतात.

Pages