एअर रायफल शुटींग (माहिती हवी आहे)

Submitted by निवांत पाटील on 23 June, 2012 - 12:54

इथे कुणी एअर रायफल वापरतं का? अ‍ॅक्चुली हा प्रश्न मी मागच्या आठवड्यात विचारायला हवा होता. (गन विकत घ्यायच्या आधी) एनी वे. मला याबाबत मार्गदर्श्न हवयं. मी ०.२२ ची एअर रायफल घेतली आहे, टॉमी कंपनीची. आणि सराव भरपुर सुरु आहे (रोज साधारणपणे ७० ते ८० शॉट्स). पण मी जिथे नेम धरतो तेथे pellet न लागता दुसरीकडेच लागतो. सधारण पणे सेंतर वर नेम धरल्यास ५ वाजता जी पोझिशन अस्ते तेथे लागतो. दुकान्दाराचे म्हणणे असे आहे कि फायर करताना रायफल हलते त्यमुळे असे होते. पण १० शॉट पैकी १० (२० फुटावरुन) जर एकाच ठिकाणी लागत असतील तर मला वाटते कि काहितरी अ‍ॅ ड्जस्टमेंट चुकली आहे. दुकान्दाराचे म्हणणे असे कि नवीन रायफलला काही अ‍ॅडजस्ट्मेंट करावी लागत नाही. जाणकारांनी जरा मदत करावी. आणि कोणी एक्सपर्ट असेल तर थोडे फार शिकवावे. Happy धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अम्या, अरे कास्ट केलेल्या पार्टचे तुकडे पडलेत, त्यामुळे रिपेअर अवघड आहे.

बाकी वर म्हटल्याप्रमाणे एअर पिस्टल्सच्या बॅरल्सना ग्रूव्हिंग नसतं, त्यामुळे रायफल अ‍ॅक्शन येत नाही. माझ्या डायना गन ला सुद्धा नव्हतं...

एअर रिवॉल्वर्स मधे ट्रिगर अ‍ॅक्शननी पुढची गोळी समोर येते अन सीओटू सिलिंडरनी झाडली जाते.

ब्लॅका ची वेब साईट
आता ३३०० रुपयांना मिळतिये, सोबत व्हिडिओ पण आहे.
इच्छुकांनी लाभ घ्यावा.

gun_0.jpg

ही आमची IHP National .22
( IHP national model 35 in calibre 5.5 (break barrel) Length 1115mm weight 3.5kg barrel length 450mm Range 35mtrs (approx) Manufacturer: IHP )

रेंज ३५ मीटर लिहिलेली असली तरी १५०-२०० फुटावरही व्यवस्थीत काम करते. अ‍ॅटलिस्ट कुत्री हाकलण्याचे Wink

लिंबाजीराव, ती ब्लँका पिस्तूल वेबसाईटवर ३३०० ची आहे.
माझी रायफल सुमारे ५.५-६ हजारांना.

ही दोन्ही खेळणी आहेत. नेमबाजीच्या बंदुका महाग आहेत. ६०-७० ह. सुद्धा लागू शकतील मग त्यान्ना. मला खरंच त्याबद्दल कल्पना नाहीये.

लिंबाजीराव, ती ब्लँका पिस्तूल वेबसाईटवर ३३०० ची आहे.
माझी रायफल सुमारे ५.५-६ हजारांना.>>

हायला स्वस्तच म्हणायच्या तशा.
पुढच्या वर्षी घ्यावी... Happy

तुम्ही घेतली ती एअर गन आहे कि एअर रायफल आहे? (गन चं बोर रायफल्ड नसेल तर ती एअर गन आणि रायफल्ड असेल तर एअर रायफल )
एअर गन ने अचूक लक्ष्यभेद करता येत नाही, गन च्या बोर चं राय्फलिंग झालं असेल तर अचूकता जास्त असते.
अचूक नेमबाजीसाठी घ्यायची असेल तर तुम्ही आय एच पी ची रायफल घ्यायला हवी होती.भारतीय बनावटीमध्ये तीच त्यातल्या त्यात बरी आहे.
.२२ श्रेणीमध्ये हि एम्को किंवा न्यू लाईट आर्ट वर्क्स,जोधपुर च्या गन्स जास्त चांगल्या. एखादी चांगली रायफल अकॅडेमी जॉईन केलीत तर आधुनिक आणि परदेशी बनावटीच्या रायफल हाताळायला मिळतील.

मालोजीराव,
माझी रायफल आहे, अन १००-१२५ फुटाच्या आसपास मस्त अ‍ॅक्युरेट आहे. तितक्या अंतरावरची शेवग्याची शेंग पाडता येते छर्रा मारून. आय एच पी चीच आहे. (इंडियन ह्यूम पाईप कं)

दस्ता आवडला. सेक्षी दिसतोय. ब्यारलवर लिव्लं असेल. the name of manufacturer and serial number are etched on the barrel. वेल मेण्टेण्ड दिसते आहे. तेलपाणी वेळेवारी करत जा.
माझ्या बंदूकीचा दस्ता मोडला होता. मोठ्या कष्टाने रिपेयर केला..

अ‍ॅन्क्या, मोडलेला पार्ट बनवता येत नाही का ? Happy

रीपेयरर कडे शेम टू शेम मिळाला तर ?

मालोजीरावांचा फंडा चूकीचा वाटतोय...

माझी आय एच पी ही ६५००/- ला घेतलेली. Happy

एअर गन ने अचूक लक्ष्यभेद करता येत नाही, गन च्या बोर चं राय्फलिंग झालं असेल तर अचूकता जास्त असते.
>>>
रायफलिंगनी अचूकता जास्त असते हे बरोबर आहे.
पण याचा अर्थ रायफलिंग नसेल तर अचूकता नसतेच असा नाही.
रायफलिंग नसेलेल्या बंदूकीतून मारलेला छरा हा रायफलिंगवाल्या बंदूकीपेक्षा कमी अंतर सरळ रेषेत जातो, त्या अंतरापर्यंत दोहोंची अचूकता समानच, पण रायफलिंगवाला छरा हा अधिक अंतर सरळ रेषेत जात असल्यानी या पुढच्या रेंज मधल्या टार्गेट्स साठी रायफलिंगवाली बंदूक जास्ती अचूक ठरते.
दोन्ही बंदूकी आपापल्या रेंजमधे अचूकच.

इब्लिस, तेथे UTA Mod 95 लिहले आहे, गुगलुन बघितल्यावर ती कलकत्याची कं आहे असे कळते. एका फोरम वर सेम मॉडेल किंमत २८५० रु दिली आहे. अर्थात त्याने ती वेस्ट बेंगॉल मध्ये घेतली आहे. तरी पण इतका फरक? अल्मोस्ट तिप्पट.
http://indiansforguns.com/viewtopic.php?t=13806&f=2

ही त्या फोरम्ची लिंक. काही माहिती अतिशय छान आहे. बंदुक विकत घ्यायच्या अगोदर काहिच गृहपाठ केला नव्हता. एनिवे, आता दुसरी बंदुक घ्यायच्या वेळी चांगला करु.

सि ओ टु सिलींडर वाल्या रायफलींची किंमत साधारण पणे कुठुन सुरु होते, काही कल्पना आहे का?

केदार राव, पुढच्या ट्रीप मध्ये एखादी ढांसु बंदुक घेउन येताय काय आमच्यासाठी? Wink

अजुन एक, फोरमवर वाचल्यावर लक्षात आलं, छरा घालुन बंद करताना छर्याचे एक बाजु चिमटली जाते. म्हणजे परत ओपन केल्यावर छर्याचा बेस गोल दिसत नाही. किंचित ओपेन दिसतो एका साईडने. हा प्रॉब्लेम सॉल्व करता येवु शकतो का? संध्याकाळी फोटो टाकतो नेमका काय प्रॉब्लेम आहे त्याचा.

केदार राव, पुढच्या ट्रीप मध्ये एखादी ढांसु बंदुक घेउन येताय काय आमच्यासाठी? <<< हो हो का नाही?

माझी ड्रीम रायफल !
आणि
ड्रीम पिस्तोल

दोन्ही चालविल्या आहेत. मलई हे एकच नाव!

@अँकी नं.१ , काही अर्थी तुमचे म्हणणे योग्य आहे,पण ओपन साईट आणि इनडोर स्पर्धांसाठी रायफलच वापरतात.
पण माझ्याकडेही एअर गन आहे रायफल नाही Wink

नेमबाजी पेक्षा जास्त पॉवर ची गन हवी होती म्हणून मी हि गन घेतली, न्यू लाईट आर्ट वर्क्स,जोधपुर .२२ श्रेणीमध्ये सर्वात शक्तिशाली गन आहे...रीकोईल पण जास्त आहे

@निवांत पाटील पुढील वेळी गन घेताना थेट उत्पादकाशी संपर्क साधा माझ्याकडे पत्ते आणि नंबर आहेत देईन तुम्हाला.कमी किमतीत आणि पार्सल खर्च ३०० ते ४०० येतो तरीही काही हजार वाचतील तुमचे.

केदार.. तुझ्या लाडक्या दोन्ही यंदाच्या ऑलिम्पिक्स मध्ये बर्‍याच स्पर्धकांच्या होत्या.. त्या कॅम्प्रियानीची तर बहुतेक निळ्याच रंगाची रायफल होती..

प्रेमसिंग भाटी - मोबा . ०९८२९०२६५२०
न्यू लाईट आर्ट वर्क्स,जोधपुर
.२२ ची उत्कृष्ठ गन चे उत्पादक ८० मीटर पर्यंत इफेक्टिव रेंज आहे.तसेच कोणत्याही बनावटीच्या तलवारी बनवून देतात.
या कंपनीच्या शॉटगन प्रसिद्ध आहेत .सुमारे ६०-७० वर्षांपासून या व्यवसायात आहेत.
कुरियर ने गन मागवू शकता .

जॉय बिस्वास
ऐम्को एन्टरप्रायसेस ,कोलकाता
दूरध्वनी ३३-२२२८३१४६
आय एच पी च्या गन जर संपूर्ण भारतात सर्वात स्वस्त कुठे मिळत असतील तर हे ते ठिकाण .यांच्या स्वताच्या M 250,M 300 या गन हि उत्कृष्ठ आहेत .कुरियर ने गन मागवू शकता .

नारायण स्पोर्ट्स उदयपुर
info@narayansports.com
मोबा - ०९८२९२३१६६३
यांच्याकडेही सर्व प्रकारच्या एअर रायफल उपलब्ध आहेत तसेच हे जुन्या पद्धतीच्या पिस्तुलांचे (संग्रहकांसाठी ) उत्पादन करतात .
फ्लींटलॉक, डॉगलॉक ,नेपोलियनलॉक इत्यादी.
कुरियर ने गन मागवू शकता .

प्रकाश सिम्सन
सिम्सन गन हाउस -मेंगलोर ,कर्नाटक
०८२४-२२५४४९१ /०८२४-२२५४४९२ मोबा - ०९८४५००९५७३
यांच्याकडे सर्व भारतीय आणि परदेशी बनावटीच्या एअर आणि फायर प्रकारच्या बंदुकी उपलब्ध आहेत
यांच्याकडील ब्लांक फायर गन विशेष आवडल्या .CO2 गन्स सुद्धा पिस्तुल आणि रायफल प्रकारात उपलब्ध आहेत .
कुरियर ने गन मागवू शकता .

केझार हुसैन बंदुकवाला
बंदूक भांडार ,इंदूर -मध्य प्रदेश
०७३१-२५३०६४६
१०० पेक्षाही जास्त वर्षे या व्यवसायात आहेत,सर्व प्रकारच्या एअर गन्स वाजवी दारात उपलब्ध करून देतात .पूर्वी यांची स्वताची उत्पादने होती .
कुरियर ने गन मागवू शकता .

लिंबूदा, फन्डा बरोबर न वाटण्याची कारणे.

१. रायफलींग जर पिस्तूलाला केलेलं असेल तर त्यालाही रायफलच म्हणणार का ?
२. गन मध्ये पिस्तूल, रीव्हॉल्व्हर, हॅन्डगन, बीबी गन, सॉफ्ट गन, पेन्टगन, रायफल्स, एअर गन, मशीन गन अश्या बर्‍याच व्हरायतीज येतात.
३. रायफलींग साठी छरर्‍यावरतीही नॉचेस हव्यात.

मालोजीराव, नाव आणि पत्ते द्या इथेच बघू. पॉवर किती आहे तुमच्या गनची ?

केदार, जळवू नकोस. Happy

निवांता, छर्‍याची क्वालीटी बघ जर हे प्रत्येक वेळी होत नसेल तर.

न्यू आर्ट वर्क्सच्या वेबसाईटवर काही दिसत नाहीये एअर गन्स विषयी.

भोपाळमधे हमीदिया रोडच्या पलिकडे खूप सारे बंदुका बनवणारे अन रिपेअर करणारे लोक आहेत, पण ते पार्सल करत नाहीत / २००८ मधे नव्हते. हे लोक बंदूक डिसमँटल करून पेटीत घालून देतात, सोबत असेंब्ली कशी करायची ते ही शिकवतात. रेल्वे नी प्रवास करणार असाल तर आणता येईल, विमानातून शक्य नव्हते.

अरे व्वा, खूप छान माहिती मिळाली, अन ते वाचताना हात देखिल शिवशिवताहेत!
सगळ्यान्ना धन्यवाद.

वरच्या फोटुला नावं द्यायची राहून गेली

१.न्यू लाईट .२२ जोधपुर --- ५१०० रुपये कुरियर खर्चासह (गन प्रकार- अंडर लिव्हर )
२.ऐम्को M ३०० ,कोलकाता --- ५५०० रुपये कुरियर खर्चासह (ऑट ऑफ प्रोडक्शन आहे सध्या ) (गन प्रकार- अंडर लिव्हर )
३.नेपोलियन फ्लींटलॉक --- सुमारे १५००० कुरियर खर्चासह (प्रतिकृती )
४.ब्लँक फायर गन --- सुमारे ९००० पासून पुढे कुरियर खर्चासह

@इब्लिस ब्लँक फायर गन च्या किमती सुमारे ९००० पासून आहेत (कुरियर खर्चासह)

@अँकी नं.१ मी गन मागवली तेव्हा तीही डिसमँटल केलेली पेटी आली होती...पण स्क्रू ची व्यवस्थित जोडाजोड केली कि गन तयार होते १५-२० मिनिटात

कामाची माहिती मालोजीराव. डीटेल्स काय गन्सचे ? पॉवर किती ? टेलिस्कोप साईट दिसत्येय एका फोटोत. मिळते का ती एव्हढ्या किमतीत ? स्टॉक (दस्ता) कसला आहे ?

५००० खूप कमी वाटताहेत फोटो बघून

एफ एक्स चा रीव्ह्यू.... जिम चॅपमॅनकडून.

http://www.americanairgunhunter.com/fxRoyale.html

मालोजीराव जरा संपर्कातुन नं मिळेल का? मला स्कोप घ्यायचाय. इथला डीलर ७००० पासुन पुढे म्हणतो. या आठवड्यात वर दिलेल्या माहितीवरुन सगळी कडे कॉल करुन बघतो. Happy

निवांत,
ते मेंगलोरवाले सिम्प्सन यांचेशी बोलणे झाले तर मला नक्की कळवाल का? (विपु करा/इथे लिहा)
आभारी आहे.

Pages