एअर रायफल शुटींग (माहिती हवी आहे)

Submitted by निवांत पाटील on 23 June, 2012 - 12:54

इथे कुणी एअर रायफल वापरतं का? अ‍ॅक्चुली हा प्रश्न मी मागच्या आठवड्यात विचारायला हवा होता. (गन विकत घ्यायच्या आधी) एनी वे. मला याबाबत मार्गदर्श्न हवयं. मी ०.२२ ची एअर रायफल घेतली आहे, टॉमी कंपनीची. आणि सराव भरपुर सुरु आहे (रोज साधारणपणे ७० ते ८० शॉट्स). पण मी जिथे नेम धरतो तेथे pellet न लागता दुसरीकडेच लागतो. सधारण पणे सेंतर वर नेम धरल्यास ५ वाजता जी पोझिशन अस्ते तेथे लागतो. दुकान्दाराचे म्हणणे असे आहे कि फायर करताना रायफल हलते त्यमुळे असे होते. पण १० शॉट पैकी १० (२० फुटावरुन) जर एकाच ठिकाणी लागत असतील तर मला वाटते कि काहितरी अ‍ॅ ड्जस्टमेंट चुकली आहे. दुकान्दाराचे म्हणणे असे कि नवीन रायफलला काही अ‍ॅडजस्ट्मेंट करावी लागत नाही. जाणकारांनी जरा मदत करावी. आणि कोणी एक्सपर्ट असेल तर थोडे फार शिकवावे. Happy धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदारराव... चलो हो जाय एक बार ... माझी पण घेउन येतो. आज दुधाळी वर चाल्लोय. बघतो काय जुगाड होतोय काय ते.
बैलाने आमचे एल एन टी, मारुती आणि आय्डीएफसी भलतेच वर आणलेत Wink भेल तेवधा कधी वाढतो समजत नाहीय.

तो करो प्लान और मिलते है Happy

आज कुछ जम्या नही.
बाबु,
पहिल्यांदा ट्रीगर ओढायची प्रॅक्टीस केली.
http://www.n-ssa.org/NORTHWEST/Flinching%20and%20Jerking.htm

आणि हे बहुतेक याच साईट वरुन घेतले आहे.
http://www.fuzilogik.com/Sports-Library/Shooting/Shooting-Rules.html

टारगेट सुध्हा प्रिंट करुन घेता येतात नेटवरुन.

गोळी मारायच्या आधी संथ लयीत श्वासोच्छ्वास करायचा. साईट* दिसली की मग श्वास सोडताना आता मारायची ही तयारी करून, श्वास संपला की गोळी मारायची. तिथे संपले नाही. तर पुढचा श्वास गोळी मारलेल्या अवस्थेतच घ्यायचा. (फालोथ्रू) तरच गोळी व्यवस्थित निशान्यावर लागेल.>>> यावर अजुन काही विअचार केलेला नाहिय. कारण अशी एखादी सवय लावुन घेतली कि नंतर काढुन टाकायला अवघड जाते. हां आता एकदा गुरु भेटला की मग त्याप्रमाणे सवय लावुन घ्यायला प्रॉब्लेम नाही.

आपल्या आपण प्रॅक्टीस करताना गोष्ट वेगळी असते. पण कोणतरी बघत असेल तर मात्र मोठा प्रोब्लेम होतो. Happy म्हणुन म्हटले माईंडगेम आहे हा.

एकदा सर्कस्मध्ये करतात तसे छोटा आरसा घेउन आरश्यात बघुन प्रॅक्तीस केले. अलमोस्ट प्रत्येक गोळी निशाण्यावर लागत होती. एकदा असेच काका आले होते म्हटले त्यांना पण दाखवुया. एक गोळी लागेल तर शपथ!!! Wink
सारांश, घरात प्रॅक्टीस करणे आणि बाहेर प्रॅक्टीस करणे यात बराच फरक आहे असे वाटते.

मागच्या आठवड्यात तेजस्विनी सावंत कोल्हापुरात अ‍ॅकेडमी सुरु करणार असे समजले (सकाळ मध्ये बातमी आली होती) . तेथे बहुतेक मी जॉइन होइन. ती परदेशी बंदुक भाड्याने मिळते. २५०० रु/ महिना भाडे आहे. आणि ३०० रु ३ महिण्यासाठी रेंजचे भाडे आहे. (कंप्लिट एकिव माहिती, या आठवड्यात कन्फर्म करेन)

सावंत बाई लै भारी निशाणेबाज हैत. होऊन जाउ द्या.

कोणी पाहिल्या न पाहिल्याने काय फरक पडतो ? पण मला हा अनुभव ड्रायव्हिंगच्या वेळी आला होता. Happy

डॉक्यूमेन्ट मेल करतो सगळे. ईमेल आयडी टाका इथेच.

पण एक गोष्ट लक्षात ठेवा. टेक्निक हे फक्त पर्फॉर्मन्स उंचावण्यासाठी. बेसिक म्हणजे तूम्ही बंदूक आणि टार्गेट.

अरे व्वा... मस्त बाफ...

माझी गोळीबार करायची सुरुवात लहानपणीच झाली. बाबांची डायना ची ०.१७७ बोअर लाईट एअरगन होती त्यानी ते दर रविवारी व्हरांड्यात प्रॅक्टिस करायचे, तिसरी-चौथीत असताना मी पण जॉईन झालो. हळू हळू चांगला नेम बसायला लागला.
मग एकदा शिवाजी मंदिरवर झालेल्या काँपिटिशनमधे भाग घेतला. लोकांच्या सीओटू रायफल्स च्या तुलनेत माझी डायना फारच कमजोर ठरली. तिथेच भेटलेला गनमार्क आर्मरीवाला मला म्हणाला की सर्व्हिसिंग आणि स्प्रिंग चेंज करून देतो, मस्त फायर करेल.
सुमारे वर्षभर गन त्याच्याकडे होती. स्प्रिंग मिळाली नाही, अमकीकडे पाठवलिये वगरे करत त्यानी भरपूर वेळ खाल्ला अन शेवटी नाही जमत म्हणून गन परत दिली. त्यात त्याची नेम धरायची व्ही नॉच हरवली अन स्प्रिंग ची आणखीन वाट लाऊन ठेवली.

पुढे मी ब्लँका ची एक ०.१७७ बोअर पिस्टल घेतली (वजन अन शेपवर भाळून).
gun.jpg

त्यात ८ बॉलबेअरिंग्स किंवा एक छरा बसायचा. यानी गच्चीवर भरपूर गोळीबार केला. गेल्याच महिन्यात त्याची लॉकिंग पिन तुटली. संपूर्ण गन कास्ट केलेली असल्यानी रिपेअर होणं अवघड आहे.

आता परत नवी गन्/पिस्टल घ्यायचं मनात आहे, पण ते बंगलोरातून कायमचा पुण्याला येईन तेंव्हाच.

एअर रिव्हॉल्वर वापरलं आहे का कुणी? काही अनुभव?

कॅम्पात वंडरलँड मधे एक आर्मरी आहे, तिथून १७००ला घेतली होती (२००६ मधे).

शेप, वजन, लोडिंग मेकॅनिझम, सेफ्टी लॉक वगैरे एकदम खर्‍याखुर्‍या पिस्टल सारखं आहे...

एकदम तोंपासू आहे. नेक्ष्ट टाईम तिथे गेलो की नक्की घेणार!
धन्यवाद. @ अँकी

आंग्रे साहेब, धन्यवाद, पण ते फिरंगी पान आहे. आम्हा घाटी लोकांच्या कामाचे नाही Sad
(तुम्ही येणार का घेउन नेक्ष्ट टाईम येताना?)

निवान्त पाटिल, रायफल चा नेम सेन्टर च्या थोडा खाली धरा. आणि त्रिगर दाबा. जर्क बसुन नेमक सेन्टर ला नेम लागतो. प्रयत्न करुन पाहा.फक्त हाताचे कम्पन होउ देउ नका.

एकदम तोंपासू आहे.
>>>>
हेच... अगदी हेच्च झालं होतं मला... (आणि हेच्च होणं अपेक्षित होतं फोटो टाकला तेंव्हा...)
म्हणून तर हजार-बाराशेला असलेली ७००-७५०फु/से वाली साधी एअर पिस्टल्स न घेता ही ४५० फु/से वाली घेतली...

बॉल आणि छरा यात नेम बसायला काही फरक पडतो का? ते ८ बॉल बसणार पिस्टल आणावच म्हणतोय. कसल भारी फील येइल ... Happy लगेच ००७ Wink

बर्‍याचजणान्नी महत्वाचे सान्गितले आहेच, मी पण काहि मोजके सान्गू पहातो
१. माझ्याकडे १९८८ मधे ईन्डियन ह्युम पाईप कम्पनीची एअर गन होती. (म्हणजे अजुनही आहे पण बिघडलेल्या/गन्जलेल्या अवस्थेत Sad )
२. गन मधे खराबी खास करुन आऊटलेट पाशी असेल, तर तुम्ही म्हणता तसा प्रोब्लेम येऊ शकेल, मात्र ते सुनिश्चित करण्यासाठी बागुलबुवाने सान्गितल्याप्रमाणे गन पक्क्या आधारावर ठेऊन (फिक्स करुन) शॉट्स मारुन बघुन मग ठरवावे लागेल, नॉर्मली असा डिफेक्ट असणे लाखात एखादवेळेसही अशक्य असते. हाताचे कंपन व हात हलणे, दोन्ही बाबी स्वतःस जाणवल्या नाहीत तरी होत असतात व नेम चूकतो.
३. श्वास नियन्त्रण अतिशय महत्वाचे, मात्र यास एक असा नियम नाही, कारण व्यक्तिव्यक्ति नुसार, किती श्वास किती वेळाकरता रोखून धरला तर थरथर थाम्बेल, वा वाढेल याचे गणित बदलत असते.
४. प्रत्येक गनची "सरळ रेषेतील" मारक क्षमतेचे अन्तर ठरलेले असते, व साधारणतः २५ फूटांपर्यन्त सरळ रेषेत फरक पडत नाही. मात्र त्यापुढे, दर फूट अन्तरागणीक टारगेट पर्यन्त पोचेस्तोवर छर्रा सूक्ष्म पणे पण निश्चितच गुरुत्वाकर्षणात सापडून खालच्या दिशेस वळतो. सबब, माशी अलिकडील व्ह्यु सेट करताना विशिष्ट भान बाळगावे लागते (ते भान इथे शब्दात सान्गणे अवघड होतय) तरी बघतो प्रयत्न करुन, पॉईण्ट (आय व्ह्यु) ए पाशी तुमचा डोळा, बी म्हणजे माशी, टी म्हणजे टारगेट हे तिन बिन्दु एका रेषेत आले तर नेम अचूक लागेल पण टारगेट मारक क्षमतेच्या अन्तरात असले पाहिजे, जस जसे टारगेट मारक क्षमतेपेक्षा दर फुटागणीक जास्त अन्तरावर राहिल त्याप्रमाणे माशी तर बदलता येत नाही, पण डोळ्यापासच्या आयव्ह्यु चे सेटीन्ग असे केले जाते की जेणेकरुन वरील तिन्ही बाबी एका रेषेत दिसतील तर खर्‍या, पण प्रत्यक्षात ब्यारल काही अंश वर उचललेले असेल, जेणेकरुन गोळी सुटताना टारगेट पेक्षा वरील दिशेस सुटेल, अन्तरातील प्रवासादरम्यान गुरुत्वाकर्षणामुळे थोडी खाली येऊन नेमकी टारगेटला लागेल (व्हेलोसिटी की असाच कायसासा शब्द त्याला आहे.). स्थिर आधारावर गन ठेऊन याचे टेस्टीन्ग व सराव केल्यावर अचूक अन्दाज येऊ लागतो.
५. हाताची थरथर थाम्बविण्यासाठी मन एकाग्र करता येणे अत्यावश्यक आहे, मनातील सूक्ष्म विचारही रक्ताभिसरण वाढवुन थरथर निर्माण करतात ज्याचा विपरित परिणाम नेम साधण्यावर होतो.
६. शेवटच्या क्षणी ट्रिगर / खटका दाबताना नवशिक्याची बन्दुक हमखास हलते व ती डावीउजवीवरखाली अशी कुठेही असू शकते. याकरता, डाव्या हाताने गन खान्द्याच्या खोबणीत रोवुन चेपुन धरलेली असणे आवश्यक असते, मात्र इतकाच जोर लावलेला असावा की खटका दाबण्याच्या दाबामुळे गन हलू नये, हे प्रेशर सातत्याने ठेवुन चालत नाही, हात हलका करुन ऐनवेळी दाबून धरुन मिनिटासेकन्दाच्या काही भागात नेम धरुन खटका दाबणे हे समजुन उमजुन केलेल्या सरावानेच जमते.
आपणांस शुभेच्छा! Happy
कोणे एके काळी मी ४५ फूटांवरुन एखाद इन्च व्यासाचा आपटबार फोडू शकायचो.

लिंबु चांगली माहीती. अजुन १ गोष्ट. जर नेम धरल्यानंतर ठरवेक काळात फायर केले नाही तर हात चक्क हलायला लागतो (थरथर च्या पुढची पापायरी त्यामुळे परत बंदुक खाली करुन पहिल्या प्रमाणे नेम धरावा लागतो.
कदाचित रायफल खुपच जड असल्यामुळे होत असेल. पण अगदी कंपवाताप्रमाणे हात हलतात.

अ‍ॅन्की बरेच दिवसानी.
एवढे पिक्चरं बघुन तुला नेमबाजी करायला वेळ मिळत होता होय Happy

पिस्तुल मस्त आहे.

इब्लिसरावबी लयीच शौकी माणुस हैत की.
सायेब भेटा पुण्यात आलात की.. Happy

लिम्बुची हातभर मोठी पोस्ट (नेहमीप्रमाणे) पण माहितीपुर्ण. Happy

निवान्त, त्याकरताच हे वाक्य दिले आहे >>>>> हे प्रेशर सातत्याने ठेवुन चालत नाही, हात हलका करुन ऐनवेळी दाबून धरुन मिनिटासेकन्दाच्या काही भागात नेम धरुन खटका दाबणे हे समजुन उमजुन केलेल्या सरावानेच जमते. <<<
माझ्या पद्धतीत मी डाव्या हातात गन ब्यालन्स करुन धरायचो. ब्यालन्स केल्यानेही फरक पडतो.
तुम्ही जी बाब म्हणता आहात ती न होण्यासाठी नियमित व्यायाम व शॉट न मारताही बन्दुक एका हातात पेलुन हात सावकाश वर खाली करण्याचा व्यायाम उपयोगी पडतो.
दाबुन धरताना मसल्सवर ताण येऊन तसेच वाढीव रक्तपुरवठ्यामुळे थरथर वाढते. तरुण वयात हा प्रश्न तितकासा जाणवत नाही, पण वाढलेल्या वयात नक्कीच जाणवतो. सबब त्या त्या "पोझिशनचा" सराव हाच उपाय.

तुम्ही जी बाब म्हणता आहात ती न होण्यासाठी नियमित व्यायाम व शॉट न मारताही बन्दुक एका हातात पेलुन हात सावकाश वर खाली करण्याचा व्यायाम उपयोगी पडतो.>> अगदी हेच करायचो मी १० १० मिनटे. बंदुक धरुन उभे राहणे.

>>> अगदी हेच करायचो मी १० १० मिनटे. बंदुक धरुन उभे राहणे. <<<<
पण बघा बोवा, लोकं वेड्यात काढतात की बघा हा माणूस बन्दुक नुस्तीच हातात घेऊन उभारलाहे, लोकान्ना सिनेमातल्यासारखे ढिश्क्यान्व ढिश्न्क्याव अपेक्षित अस्ते! Proud

बॉल आणि छरा यात नेम बसायला काही फरक पडतो का?

ऑफकोर्स पडतो.
छरा जास्त नीट जाईल, बॉल नाही.

रायफल हा शब्द नळीच्या आतून असलेल्या 'आट्यां'साठी आहे. पाईपच्या जॉईंटला आतून आटे पाडलेले असतात, तसे रायफलिंग म्हणजे बंदुकीच्या नळीला आतून केलेले असते.
यामुळे तो छरा (बाहेरून रेघा असतात बघा त्यावर, त्या रायफलिंग सोबत फिरतात) स्वत:भोवती फिरत मग उडतो. यामुळे it flies true. म्हणजे जास्त सरळ रेषेत प्रवास करतो.

बॉलवाल्या पिस्तुलीला आतून रायफलिंग नसणार. (बहुतेक पिस्तुलिंना नसतेच)

लिंबुजी वाक्य भुतकाळात आहे. Wink
इब्लिस, पिस्टलमध्ये छरा आणि बॉल यात काही फरक पडतो का असे विचारायचे आहे.

अ‍ॅन्क्या, बघू का ट्राय करुन तूझं पिस्तूल रीपेयर करता येतं का ते ? दिसतय बाकी लपलप. Happy

एअर रीव्हॉल्वर्स ? इथे कुठे मिळतात ? रीव्हॉल्व्हर ला रीव्हॉल्व्हींग चेंबर असतो ना ? मग एअर पिस्तूलात जर तसं असलं तर सीओटू वर ऑपरेट करावी लागेल, किंवा प्रत्येक वेळी सेप्रेट लोड करावी लागेल. रीव्हॉल्व्हरमध्ये नवीन गोळी जागेवर येण्यासाठी ट्रीगरची रीटर्न अ‍ॅक्शन वापरली जाते. ऑटोमॅटीकमध्ये हेच काम गोळीतल्या दारुच्या स्फोटाने केले जाते.

निवांता, अजिबात फसला नाहीयेस. डोन्टच वरी. बादवे ट्रीगर लूज करुन मिळतो कारागीराकडून पण सांभाळून हाताळावी लागते मग गन.

इब्लीस ते ठासणीच्या बंदूकींच्या बाबतीत. मराठीत छर्‍र्याला पेलेटस् म्हणतात Wink

लिंबूदा, तुमची पोस्ट वाचूनच दमलो. त्यावेळी हातात बंदूक घेतली असती तर वजन पेलायची प्रॅक्टीस झाली असती. Happy

बर्‍याच दिवसांनी माशी, घोडा आणि कुत्रा आठवले Happy

Pages