एअर रायफल शुटींग (माहिती हवी आहे)

Submitted by निवांत पाटील on 23 June, 2012 - 12:54

इथे कुणी एअर रायफल वापरतं का? अ‍ॅक्चुली हा प्रश्न मी मागच्या आठवड्यात विचारायला हवा होता. (गन विकत घ्यायच्या आधी) एनी वे. मला याबाबत मार्गदर्श्न हवयं. मी ०.२२ ची एअर रायफल घेतली आहे, टॉमी कंपनीची. आणि सराव भरपुर सुरु आहे (रोज साधारणपणे ७० ते ८० शॉट्स). पण मी जिथे नेम धरतो तेथे pellet न लागता दुसरीकडेच लागतो. सधारण पणे सेंतर वर नेम धरल्यास ५ वाजता जी पोझिशन अस्ते तेथे लागतो. दुकान्दाराचे म्हणणे असे आहे कि फायर करताना रायफल हलते त्यमुळे असे होते. पण १० शॉट पैकी १० (२० फुटावरुन) जर एकाच ठिकाणी लागत असतील तर मला वाटते कि काहितरी अ‍ॅ ड्जस्टमेंट चुकली आहे. दुकान्दाराचे म्हणणे असे कि नवीन रायफलला काही अ‍ॅडजस्ट्मेंट करावी लागत नाही. जाणकारांनी जरा मदत करावी. आणि कोणी एक्सपर्ट असेल तर थोडे फार शिकवावे. Happy धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इब्लिसराव नक्की. अ‍ॅम्को ला फोन लावला होता (बिस्वास) . त्याने आय एच पी घ्या म्हणुन सांगितले पण त्याच्या कडे स्कोप नव्हता.

आणि हो आम्हाला गुरु भेटला. Happy
मंगळवार पासुन रीतसर ट्रेनिंग सुरु होइल. Happy
जसज्शी माहिती मिळत जाइल तशी इथे टाकत जाइन.

लोक लिव लिव लिवतायत, भेटायला कोणीच तयार नाही....

असो. हा घ्या अभ्यास. खालील शब्दांचे एअरगनच्या संदर्भात अर्थ सांगा.

Butt Pad
BB
Cocking
Stock
Barrel
Muzzle
Front Sight
Trigger
Loading

आणि हा वरचा अभ्यास.... Happy
Ballistic Coefficient
Bead Sight
Caliber
Point Blank
Point Of Aim
Point Of Impact
Trigger Pull
Zero
Pistol
Revolver
Single Action
Action
Hair Trigger
Muzzle Loader
Plinking
Automatic

बापरे! खुप मागे पडलेय... हे बागुलबुवा तुम्ही दिलेला अभ्यास पाहुन समजल... आता तरी तुमच्या परिक्षेत काठावर पास Happy चला आता पुन्हा तयारीला लागायला हवं....

बट पॅड : रायफल खांद्याला लागते तिथे रबरी नरमसं पॅड असतं रिकॉईलने इजा होऊ नये म्हणून.
कॉकिंग : सिलिंडरमधे प्रेशर भरून फायर करायला तयार करणे.
BB : बिगर रायफलिंगच्या बंदुकीचा स्मूथ छरा. कॉपर प्लेटेड असू शकतो.
स्टॉक : दस्ता.(लाकडी पार्ट)
इ. इ. बाकी फुरसतीत.

झकासराव Wink
बाबु, Happy

आमचा दुकानदार फारच खोटारडा निघाला. Sad
कसा काय धंदा करणार देव जाणे.
रायफल घेताना म्हणाला स्कोप लावता येतो, पण लगेच लावु नका. थोडंफार प्रॅक्टीस करा मग लावा. आता नेटवर वाचुन माहिती कळाली कि त्यावर रेलिंग असावे लागते ते माझ्या रायफलला नाही आहे. आज त्याच्याकडे घेउन गेलो, तर म्हणतो कसा... यावर स्कोप बसवुन काही फायदा नसतो. उगाच पैसे खर्च होतात. शेवटी बसवुन देच Wink म्हणालो. मग नाही हो या कंपनीच्या रायफलला नसते तशी सोय.
मग विकताना कसे म्हणालात कि येते बसवता?
नाही नाही मी असा कसा म्हणेन?

जाने दो, आपलीच चुकी आहे. बिन अभ्यासांच गेल्यावर असच होणार Happy अक्कलखाती अजुन जरा जमा.

आता मात्र प्रॅक्टीस इंपोर्टेड रायफल वर आणि शुटींग रेंज वर :), अर्थात पुढच्या आठवड्यापासुन . Happy

अजुन एक गोष्ट, १० - १२ शॉट्स मारले की परत झीरो कराव लागतयं माझ्या रायफलला. काही उपाय आहे का त्यावर?

झिरो करताना नक्की काय अ‍ॅडजस्टमेन्ट्स करायला लागताहेत ?
किती डिस्टन्ससाठी करतोयस ?
एमिंग सिस्टीम लूज नाही ना झालीये ?

१० - १२ इज टू लेस.

३५ फुटासाठी करतोय. हळुहळु छरा उजवीकडे आणि खाली सरकतो... मग परत स्क्रु अ‍ॅडजस्ट करावे लागतात. तुम्ही म्हणताय तसे झाले असावे कदाचित. Happy

आता मात्र प्रॅक्टीस इंपोर्टेड रायफल वर आणि शुटींग रेंज वर >> कसं बरोबर बोललात. ती तुमची जुनी रायफल फेकून द्या. एकदा का विदेशीची सवय लागली, की हा देसी माल फारच टाकावू आहे कळते. आणि शुटीग रेंज मध्ये खरचं जाणार असाल तर पुढच्या नॅशनलला दोघे भेटू. Happy लेटस होप.

तिकडे स्कॅट वगैरे आहे का? नसेल तर त्या रेंज धारकाला म्हणाव महिन्यातून निदान दोनदा तरी स्कॅट साठी सगळ्यांना पुण्याच्या रेंज कडे घेऊन चल.

तर पुढच्या नॅशनलला दोघे भेटू.>>> समजा ती वेळ येणार असेल तर येताना माझ्यासाठी गन आणायच प्रॉमिस करा Happy ...

आज तेथे स्पर्धा होत्या. २ तास बसुन बघुन आलो. पण शेवटी शेवटी कंटाळा आला. आता बुधवार पासुन शिकवणी सुरु. Happy स्कॅट नाहीय तेथे..

IMG_1051.jpg

आज पहिल्यांदाच गॅस रायफल वर ५ शॉट्स मारले. Happy मजा आली. त्या अगोदर १.५ तास फक्त बघत बसलो होतो. हात अक्षरशः शिवशिवत होते. मग शेवटी वेपन हातात आल्यावर मात्र हात थरथरायला लागले. Happy

पेशन्स हा काय प्रकार आहे ते लक्षात येतय.

तिथल्या लहान मुलांची प्रतिक्रिया, टार्गेटवर तर लागल्या Wink

निवांतराव गोळ्या मारल्या बद्दल अभिनंदन पण एक अ‍ॅनेलिसिस - तुम्ही रायफल एका जागी धरत नाही आहात. त्यामुळे वेगवेगळ्या जागी गोळ्या लागल्या. एकाच जागी धरून एकाच ठिकाणी अनेक गोळ्या (अगदी टार्गेट बाहेर) लागल्या की मग हळू हळू तुम्ही परफॉर्मन्स सुधरवू शकता. पॅटर्न तयार व्हायला पाहिजे.

पेशन्स हा काय प्रकार आहे ते लक्षात येतय. >>> हो. आणि त्यासोबतच लोअर बॅक पेन, डाव्या हाताची तीन बोट आता लवकरच दुखायला लागतील. हँग इन देअर !

फोर साईट वर लक्ष केंद्रीत करा आणि टारगेट वर लक्ष देणे सोडा. फोरसाईट व्यवस्थित असेल तर टारगेटवर एकाच जागी गोळ्या लागायला सुरू होते.

केदार धन्यवाद... खुपच मोलाचा सल्ला.... Happy मार्च मह्द्ये ओपन कॉम्पिटीशन आहे असं कळालं... आता त्या दृष्टीने तयारी करतो... बघुया कुठपर्यंत गाडी जाते ते Happy

पण तुम्ही प्रॅक्टीस कोणत्या रायफलवर करत आहात? पिप साईट असणारी रायफल कॉम्पिटिशनला चालते. आपली भारतीय ज्यात ओपन साईट आहे, ती चालत नाही.

केदारः पिप साईट असलेलीच आहे. आज बरीच इंप्रुव्हमेंट झालीय. वेपन छानच आहे. (इंपोर्टेडच आहे)

2 day.jpg

पण एक दोन शंका आहेत. पहिली वेपन हातात घेतले कि हात थरथरतो. Happy त्यावर उपाय.

आणि दुसरी म्हणजे मला एकुन ३ सर्कल्स दिसतात. अगोदर मला वाटायचे की पिपमध्ये क्रॉस असेल आणि तो क्रॉस टार्गेटवर फिक्स करुन शुट करायचे. Happy
आता २ सर्कल्स दिसली तर अ‍ॅटलिस्ट ती मॅच तर करता येतील. सध्या जे करतोय ते अंदाजाने. बर्‍यापैकी कॉन्स्ट्रीक दिसली की शुट. इंस्ट्रक्टर म्हणाले की अजुन शिकवणे सुरु झाले नाही तोपर्यंत तुम्ही ३ र्‍या वर्षाचा प्रश्न विचारताय. Wink तर जरा माहीती द्यावी. सगळ्यांनाच ३ दिसतात / २ दिसायला पहिजेत ?

निवांतराव अभिनंदन. तुम्ही लै फास्ट लर्नर आहात. ब्राव्हो ! आणि पॅटर्न मध्ये. Happy आता हे पॅटर्न सोडू नका.बाकी आपोआप येतं

पहिली वेपन हातात घेतले कि हात थरथरतो >> तुम्ही वेपन धरता कसे. सध्या बसून प्रॅक्टीस करताय की उभे राहून?

तुम्ही हात थरथरतो म्हणत आहात. म्हणजे डाव्या हाताच्या बेचक्यात (चार बोटे आणि अंगठा) असे मला वाटते आहे. ते बरोबर आहे का?

नीट पद्धत : उभे राहून लोअर बॉडी - अँकल लॉ़क , नीज लॉक आणि अप्पर बॉडी बसवून डाव्या हाताच्या तीन बोटावर वेपनची बॉडी आणि तुमचा डावा हात तुमच्या कमरेवर आणि उजव्या खांद्यावर बटप्लेट अडकवल्यावर वेपनला उजवा हात (ट्रिगर हॅण्डल) लावला नाही तरी ते हलले नाही पाहिजे.

आणि दुसरी म्हणजे मला एकुन ३ सर्कल्स दिसतात >>.तीनच दिसायला पाहिजेत. पण मधले क्लिअर हवे. आणि टारगेट ब्लर. (म्हणजे अडिच म्ह्णा हवे तर Happy )

१. पिप होल.( अर्थात बॅकसाईट) हे सर्कल सर्वात मोठे. हे अलाईन टू फोरसाइट
२. फोरसाईट - मग हे जे बॅकसाईट सोबत अलाईन - मध्यम तुमची नजर ह्या सर्कलच्या कडांवरच हवी.
३. टारगेट. - हे सर्वात छोटे दिसायला पाहिजे. दिसताना जर ब्लर दिसले (आणि फोरसाईट फोकस मध्ये असली) की तुम्ही नेहमी बुल्ज आय मारणार ह्याची खात्री बाळगा.

सध्या बसून प्रॅक्टीस करताय की उभे राहून?>> उभे राहुन. पण वेपन खाली ठेवल्यानंतर पण हात बराच वेळ थरथरतात.

उजवा हात थरथरतो.

उभं रहायची ही पध्दत सोमवारी प्रॅक्टीस करुन बघतो.

बाकि तुमच्या या दोन दोन ओळींच्या माहितीचा मला फारच फायदा होत आहे. हे तीन पॉइंट आता माझ्याजवळ लिहुन ठेवेन. खुप खुप धन्यवाद Happy

वर दिलेले दोन फोटो म्हणजे आतापर्यंत शुट केलेल्या १० पॅलेट्स आहेत. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत फायर करायचे नाही असे ठरवले आहे. सगळं समजल्यावरच फायरींग्ची प्रॅक्टीस सुरु करेन.

अजुन बॅक पेन काही झाली नाही पण काल / परवा पासुन मान प्रचंड दुखते आहे. बहुतेक माझी गाल टेकवायची पोझिशन चुकते आहे असे वाटतेय.

मानेची काय पोझिशन असावी?

उजवा हात थरथरतो. >>> का बरं? कारण एक ट्रिगर सोडला आणि खांदा सोडला तर उजव्या हाताचे काम डाव्यापेक्षाही कमीच आहे. कदाचित रायफल पासून तुम्ही बहुदा ९० अंशाकडे तुमचा कोपरा येतो आहे का? किंवा घड्याळ्याच्या २:०० ते ३:०० मध्ये. तसे असेल ५:०० च्या आसपास आणा. बघा फायदा होऊ शकतो.

मानेची काय पोझिशन असावी >> उजव्या बाजूला थोडी झुकलेली. आणि गाल चिक प्लेट वर दाबलेला. कानाचा पाळी पर्यंत जेणे करून प्रेशर मिळेल.

वर वाचले वेपन खाली ठेवल्यावर थरथरतो, मग केवळ सवय झाल्यावर थांबेल असे वाटते.

मे द फोर्स बी विथ यू ! Happy

केदार धन्यवाद...
अजुन एक शंका... डॉमिनंट डोळा काय भानगड आहे. खरोखरच असे काही असते का? दुसरी गोष्ट रायटी (right handed) व्यक्तीला डावा डोळा वापरुन नेम धरता येउ शकतो? अर्थात हे नेटवर वाचले. Happy

डॉमिनंट डोळा काय भानगड आहे. खरोखरच असे काही असते का. >> हो असते. त्याची टेस्ट आहे. करून घ्या. फारच सोपी आहे. तो इन्स्ट्रक्टर टारगेटच्या साहाय्याने करून घेईन. उजवा डोळाच डॉमिनंट असण्याची शक्यता आहे.

सगळं समजल्यावरच फायरींग्ची प्रॅक्टीस सुरु करेन. >> +1 बुल्ज आय एक दोनदा कोणीही मारू शकतं. सतत नाही. आणि आपला एम सतत मारणे हा आहे. माझ्या ट्रेनरने मला सांगीतले होते की एकही गोळी न मारता केवळ साईट पिक्चर मेंदूत फिड करायचे व आपल्या बॉडीला रायफलची सवय लावायची. ते ५ किलो वजन बॉडीला न हलता बाळगता आले व श्वासाची गती जमली की रोजच बुल्ज आय. Happy

आणि मी जे डाव्या हाताच्या तीन बोट लिहिली, ती उलट्या साईडच्या तीन (रादर चार अर्धी करंगळी येते, अंगठा सुटतो) बोटांनी आहे. तळहाताच्या नाही. म्हणजे आपल्या हाताने नाग तयार करायचा व त्या नागाचा चेहरा आपल्या चेहर्‍याकडे करायचा. Happy

मस्त चर्चा चाललीय. इथली चर्चा वाचुनच काल मुद्दाम गन शॉपमध्ये गन पाहिल्या, कसल्या एक सो एक सेक्सी गन्स होत्या. मेड इन इटालीच्या त्यातल्या मस्त वाटल्या. नुसत्या उचलुन बघुनच हात दुखायला लागला . Biggrin

केदारः

काल एक खुप चांगली गोष्ट लक्षात आली. फोर पिप ला थिकनेस आहे. जर आपण स्ट्रेट बघत असु तरच ते पिप गोल दिसते. Happy मला बरेचदा ते लंबगोलाकार दिसायचे. काय बघायचे ते एक्झॅक्टली समलयं असे वाटतय... आता फक्त २ दिवस ट्रेनिंग सुरु आहे. नंतर १५ दिवस दिवाळीची सुट्टी आहे. आता नेटवर असलेली माहिती वाचतोय. तुम्ही दिलेली माहितीही अमुल्य आहे. धन्यवाद Happy

एक भा. प्र. : तुम्ही चर्चा करत असलेल्या बंदुका विकत घेऊन बाळगताना लायसन्स लागत नाही का?

गिरीश, आपल्या देशात लायसन्स हे फायर आर्म्सना लागते. अर्थात ज्यात दारूगोळा वापरला जातो त्या शस्त्रांना. एअरगन्समध्ये दारुगोळा वापरत नसल्याने त्यांना लायसन्स लागत नाही.

Pages