व्हाइट बोर्ड

Submitted by घबाड on 20 June, 2012 - 11:54

मला ५ बाय ४ फूट असा व्हाइट बोर्ड हवा आहे. शाळा कॉलेजात असतोतसा.. ज्यावर ड्राय एरेजर पेनने लिहिता येईल. मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे कुठे मिळेल. बोर्ड फक्त लिहिण्यासाठी हवा आहे म्हणजे नॉन मॅग्नेटिक हवा.

साधारण किंमत किती असेल?

भिंतीला लावायला हूक असतात का? की स्टँडही येते त्याच्या बरोबर?

साधारण आकार ५ बाय ४ किंवा ३ फूट
१५० बाय १२० किंवा ९० सेमी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्लायवुड / हार्डवेअर च्या दुकानात 'लॅमिनेटेड पार्टिकल बोर्ड' मिळतो. पांढर्‍या रंगाचा मागावा. स्क्वेअरफुटावर भाव असतो. एकाद्या सुताराकडून त्याला बॉर्डर (अ‍ॅल्युमिनियम किंवा घरीच करीत असाल तर सरळ 'डक्ट टेप'ची) बनवून भिंतीत बसवून घेणे.
पांढरा रंग थोडा मळकट येईल. पण बाजारात मिळणार्‍या व्हाईटबोर्ड पेक्षा १/४ किमतीत काम होईल.
_tp.jpg

जवळच्या स्टेशनरी दुकानात महाग मिळते, तेही जवळचे म्हणजे जिल्ह्याच्या गावातले, आमच्या गावात मिळत नाहि. साधारण १८० ते २०० रुपये प्रति चौरस फूट, असा दर आहे.

१८० ते २०० रुपये प्रति चौरस फूट कसला दर आहे?
लॅमिनेटेड पार्टिकल बोर्ड खूप स्वस्त आहे हो. ३०-४० रुपये प्रति चौरस फूट जास्तीत जास्त. दोन्ही बाजू पांढर्‍या पण मिळतात. मी हाच प्रकार गेली २ वर्षे वापरतो आहे. उत्तम प्रकारे चालू आहे.

हा व्हाइट बोर्डचा दर आहे. मी डायरेक्ट कंपनीत चौकशी केली.. त्यानी त्याचाही दर ५० च्या आसपासच सांगितला आहे. तुम्ही सांगितलेल्या बोर्ड इतकाच हाही स्वस्त मिळू शकतो.