कैरी-भोपळा सूप

Submitted by लोला on 17 May, 2012 - 15:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप तांबड्या भोपळ्याच्या फोडी
१ कप कैरीच्या फोडी
१ लाल सुकी मिरची
१ चमचा मोहरी-जिरे
थोडा हिंग
साखर (ऐच्छिक)
मीठ
कडिपत्ता
कोथिंबीर
१ चमचा तेल
पाणी

क्रमवार पाककृती: 

- भोपळा आणि कैरी कुकरच्या डब्यात ठेवून त्या बुडतील इतके पाणी डब्यात घालावे.
- कुकरमध्ये ठेवून एक शिटी होऊ द्यावी.
- वाफ गेल्यावर बाहेर काढून त्यातल्या सर्व कैरीच्या फोडी आणि थोड्या भोपळ्याच्या फोडी त्यातलेच पाणी वापरुन ब्लेन्डरमध्ये वाटाव्या. मिश्रण स्मूथ करावे.
- उरलेले पाणी आणि भोपळ्याच्या फोडी या मिश्रणात घालाव्यात. गरज वाटल्यास अजून थोडे पाणी घालावे.
- चवीपुरते मीठ (गरज पडल्यास साखर) घालावे.
- तेलाची हिंग, जिरे, मोहरी, सुकी मिरची, कडिपत्ता घालून फोडणी करावी आणि सूपवर ओतावी.
- एक उकळी आणावी.
- वरुन कोथिंबीर घालून गरम सर्व्ह करावे.
- सूप म्हणून प्यायचे असल्यास क्रीम, सावर क्रीम आवडीनुसार घालू शकता.

kbsoup.jpgkbsoup2.jpg

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांना पुरेल
अधिक टिपा: 

हे सूप म्हणून नुसतेच पिता येईल किंवा भातावर कढीसारखे घेता येईल.

माहितीचा स्रोत: 
मी. सखुबत्ता व तत्सम लोणच्यासाठी नापास झालेली मऊ कैरी आणि उरलेला भोपळा.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो कसा काढावा याची पण सविस्तर कृती लिही प्लीज. नॅचरल लाइट मध्ये की फ्लॅश वापरून की आणखी कसे?
मस्त दिसतय सूप

हे नॅचरल लाईटमध्ये काढलेत. मी काढलेले पदार्थांचे फोटो नॅचरल लाईटमध्येच बरे आलेत. पूर्वी काही फ्लॅशमध्ये काढले असतील. पदार्थावर चमक आली की मला आवडत नाही. इथल्या फोटोग्राफर्सना क्लास घ्यायला सांगूया. फूड फोटोग्राफी. Happy

अरे वा छान आहे .. एकदम सोपी कमी कटकटीची रेसिपी .. मी करून बघेन .. फोटो छान आले आहेत ..

ह्यात रस्सम पावडर घालून बघेन थोडी ..

छानै Happy थंडी झल्लिचे सुरु आमच्याकडे.... पण कैरी नाही मिळायची आता Sad

रस्सम पावडर ची आयडीया आवडली....

एक गोडसर आणि दुसरं आंबट चवीचं पाहिजे. आगळ घाल असेल तर. नाहीतर चिंचेचा कोळ, पायनॅपल,ऑरेंज ज्यूस Proud
रस्सम पावडर चालेल. आलं, रोस्टेड गार्लिक, पुदिना, बडिशेप, मिरी, इटालियन स्पायसेस असं एकेक किंवा वेगवेगळ्या सुटेबल काँबिनेशनमध्ये चालेल. हे बेसिक आहे. (याला प्रसरणशील रेसिपी म्हणता येईल काय?)

धन्यवाद.
कैरी आंबट असेल तर कमी घ्या किंवा चालणार असेल तर आंबट चवीनुसार साखर/गूळ घाला. भोपळ्याचे काही तुकडे तसेच न ठेवता सगळंच ब्लेन्ड केलं तरी आंबट चव कमी होईल.

महेश, सॉरी हो. Sad तुम्हाला नाव वाचून कसेतरी झाले. 'ग्रीन मँगो - पम्पकिन सूप' चालले असते का? जुन्या मायबोलीत इथे एक रेसिपी आहे - सूप. नाव छान आहे ना? करुन पहा आवडेल. Happy

>> पण करणार कोण ?

पेपरमधे जाहिरात देता येऊ शकेल.
उदा.
'हवी आहे : कैरी भोपळा सूप करणारी व्यक्ती. वय, लिंग, धर्म, जात, कळप पाहिला जाणार नाही. इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा. चवीनुसार मोबदला दिला जाईल. घटक पदार्थ सोबत आणल्यास त्याचे शुल्क निराळे दिले जाईल. चव न आवडल्यास सूपच मोबदल्यात मिळेल.'

इथे लिहिलेली प्रत्येक पाककृती प्रत्येकाला आवडेलच असे नाही.. कुणाला आवडेल तर कुणाला बिलकुल नाही पण म्हणुन पदार्थाला 'यक्क' म्हणणे हे नाही पटले/आवडले Sad

लोला, पाककृती व फोटो (नेहमीप्रमाणे) छान Happy

फोटो मस्त आलेत. सूपची कन्सिस्टन्सीही छान दिसतेय. तू थोडे भोपळ्याचे तुकडे तसेच घातलेस का? फोटोवरुन वाटलं.
माधुरी, सहमत.

एक गोडसर आणि दुसरं आंबट चवीचं पाहिजे. आगळ घाल असेल तर. नाहीतर चिंचेचा कोळ, पायनॅपल,ऑरेंज ज्यूस >>> छान रेसिपी ! या आधी नुसत्या तांबड्या भोपळ्याचे सुप केले होते पण चव फारशी आवडली नव्हती, यापदध्तीने करुन पहाणार.

कुणाला आवडेल तर कुणाला बिलकुल नाही पण म्हणुन पदार्थाला 'यक्क' म्हणणे हे नाही पटले/आवडले >>> +१

स्वाती Proud

लोला आवडलीये रेसिपी, करून बघेन

रेसिपी चांगली आहे. करुन बघेन की नाही माहीत नाही. दाट सूप्स आवडतात पण हे 'सार' च्या कॅटेगरीतले वाटते Happy
हे नॅचरल लाईटमध्ये काढलेत. मी काढलेले पदार्थांचे फोटो नॅचरल लाईटमध्येच बरे आलेत. पूर्वी काही फ्लॅशमध्ये काढले असतील. पदार्थावर चमक आली की मला आवडत नाही. >>> आत्तापर्यंतच्या कुठल्याच घरात नैसर्गिक प्रकाशात फोटो काढायची फारशी संधीच मिळालेली नाही. पण असेच फोटो जास्त चांगले दिसतात हे मात्र खरे.