"सत्यमेव जयते" भाग ४ - (Does Healthcare Need Healing?)

Submitted by आनंदयात्री on 26 May, 2012 - 14:46

आज २७ मे च्या चौथ्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue04/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक इन्स्टंट लॉ का नाही काढत सरकार?
कोणताही वैद्यकिय हलगर्जीपणा दिसला की लग्गेच त्या लॉच्या अंडर केस घालायची डॉक्टरवर.

आहे की कायदा... मेडिकल निग्लिजन्स... कोर्टात सिद्ध झाले तर शिक्षा मिळते.

कन्जुमर प्रोटेक्शन अ‍ॅक्टखाली ग्राहक न्यायालयातही दाद मागता येते. तिथे लवकर न्याय मिळतो.

दक्षिणा, अशाने डॉक्टर लोक इलाजच करणार नाहीत. जनजागृतीच महत्वाची.
डॉक्टरांच्या सल्ल्याने विचलीत न होता, दुसर्‍या डॉक्टरकडून सल्ला घेणे, आणखी काहीजणांशी सल्ला मसलत
करणे, हे महत्वाचे. एकदा आपण मनाने खंबीर झालो, तर आपल्या मानसिकतेचा फायदा, कूणी घेऊ शकत
नाही.

डॉक्टर जेव्हा बाहेरची औषधं लिहून न देता स्वत:कडची देतात तेव्हा ती कोणती असतात? जेनेरिक असावीत असा माझा अंदाज आहे... डॉक्टर जामोप्या जरा ह्यावर प्रकाश टाका ना!

दक्षिणा यांना डॉक्टर करावे, थोडी प्रॅक्टीस करू द्यावी , जावे त्याच्या वंशा च्या चालीवर, मग कळेल.

generic औषधे अन bombay market काय असते हे कुणाला ठाऊक आहे काय?

समजा तुमचे १० हजार रुपयाचे बिल एका उदा. रूबी हॉल हॉस्पिटलात आले, समजा हर्नियाचे ऑपरेशन डॉ. ढ यांनी केले. यात डॉ. ढ यांना किती पैसे मिळाले हे कुणी सांगू शकते काय?

उठसूट धर डॉक्टर अन दे शिव्या हे फार सोपे असते. Doc bashing असे म्हणतात याला.

शासनाने म्हणजेच तुम्ही सर्वांनी मिळून दवाखान्याला शॉप अ‍ॅक्ट लागू केलेला आहे.
डॉक्टरला कन्झ्यूमर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट खाली जबाबदार धरले आहे.
म्हणजेच,
आज तुम्ही गिर्‍हाईक अन तो दुकानदार आहे.
मग डॉक्टर व्यवसाय न करता 'धंदा' करतात अशी फुकट बोंब ठोकण्यात काय अर्थ आहे?

लिहिण्यासारखे बरेच आहे, पण बाकी चालू द्या.

@ देव काका

स्वतःकडची २ प्रकारची.
१. होलसेलने विकत आणलेली. जिपी लोक देतात.
२. सँपलची.

generic औषधे अन bombay market काय असते हे कुणाला ठाऊक आहे काय?>>>>> generic औषधे माहित आहे, पण bombay market नाही.

लिहिण्यासारखे बरेच आहे,>>>>>>> लिहाच ही विनंती.. त्याशिवाय कसं कळणार आम्हाला. प्रत्येकाला जी बाजु माहित आहे ती त्याने समोर आणावी. म्हणजे सर्वांनाच सर्व बाजु कळतील आणि त्यावर काही विचार करता येइल.

इब्लिस, लिहीण्यासारखे बरेच असेल तर नक्की लिहा. ज्ञान वाटल्याने वाढते. बायदवे, तुम्ही प्रतिसाद वाचलेत तर तुम्हाला नक्की लक्षात येईल की चांगल्या डॉक्टरांचे इथे नाव पत्ते दिले जात आहे. मुद्दा आहे तो हलगर्जीपणा करणार्‍या डॉक्टरांचा. जे चूक आहे ते चूकच त्यासाठी त्यांच्या वंशी जायलाच हवे असे नाही. Happy

यात डॉ. ढ यांना किती पैसे मिळाले हे कुणी सांगू शकते काय?>> इब्लीस, अराउंड ३०%. ते सुद्धा डॉक्टर आणी रुग्णालय यांच्यात जसा करार आहे तसे. म्हणजे डॉक्टर किती वेलनोन आहे वगैरे. हे कंसल्ट्ट बद्दल. जे इनहाउस असतात त्यांना खूपच कमी मिळते. बरोबर?
ईंश्युरंसमुळे रुग्णालयांना त्रासही होतो.

चिमुरी, छान माहिती.
जामोप्या तुम्ही हि छान explain केलेत. ऑफिसमध्ये lunch time मध्ये हाच विषय चालू होता पण बहुतेकांना जेनेरिक औषधांबद्दल नक्की माहिती न्हवती. तुमच्या पोस्ट मधील मजकूर त्यांना सांगितल्यावर त्या सर्वांनी समजून घेतला . ofcourse credit goes to u.

इब्लिस,होलसेलने विकत आणलेली..हे मान्य..पण तीच औषधं ब्रॅंडेड असतात का जेनेरिक असं मला विचारायचंय....सॅंपल असतील तर ती वेष्टनासहित देतात डॉक्टर्स...ज्यावर कंपनीचे ,औषधाचे नाव वगैरे असते...पण डॉक्टर्स स्वत:कडची जी औषध(गोळ्या) देतात ती रंगीबेरंगी असतात..त्यावर कोणतेही वेष्टन नसते...आणि बहुधा गोळ्याच(पिल्स) असतात...कॅप्सुल्स नसतात...कॅप्सुल्सची गरज वाटली तर चिठ्ठी लिहून देतात..बाजारातून विकत घेण्यासाठी.

कौतुक,
डॉक्टर जी ट्रीटमेंट करतो, ते एक्झॅक्ट कधीच नसते.

उदा. स्कूटीचा स्पार्क प्लग खराब झाला म्हणजे नेमक्या त्याच 'स्पेक्स' चा नवा लावता येतो. तो कोणत्याही स्कूटीला चालू शकतो. असे प्रत्येक शरीराचे नसते.
तोच प्लग रिप्लेस न करता साफ करून बसवायचा ही प्रयत्न करता येतो. कधीकधी प्लग उघडताना तुटतो.
तुमचे बिघडलेले शरीर दुरुस्त करण्याचा डॉक्टर प्रयत्न करीत असतो. प्रॉब्लेम असा असतो, की इंजीन सुरू असताना रिपेअर करावे लागते, अन स्पेअर्स मिळत नाहीत.

पहा बरं जावे त्याच्या वंशा म्हणजे काय ते लक्षात येतंय का?

देव काका,
बॉम्बे मार्केट भानगडीमुळे तुम्हाला दिलेली औषधे ब्रँडेडच असतात बहुतेकदा, फक्त ती होलसेल मुळे स्वस्त पडलेली असतात. अन जी.पी. तुम्हाला सेल्फ ट्रीटमेंट करता येऊ नये म्हणून वेष्टन काढून देतात. कधी कधी जनेरिक असतात, जर चांगल्या कंपनीची असतील तर.

डॉ. नेने. (हे बहुदा माधुरीचे दीर आहेत) यांनी माझ्या मेहुण्यांना उत्तम सल्ला दिला होता.
मेहुण्यांची बाय पास सर्जरी झालेली आहे. मध्यंतरी त्यांना पाठदुखी जडली आणि पूर्ण बेडरेस्ट चा सल्ला देण्यात
आला. त्यांनी कशीबशी १ महिना ती घेतली. त्यांना बघायला येणारे बहुतेक जण, अहो आपले ते हे आहेत ना, त्यांना पण असाच त्रास होता... पण काही इलाज झाला नाही, अशा गप्पा मारत बसत.

मग त्यांना कुणीतरी डॉ. नेने यांचे नाव सुचवले. डॉक्टरांनी फक्त एकच सांगितले, तुम्हाला काहिही झालेले नाही,
फक्त आपल्यापेक्षा तरुण असणार्‍या मंडळींच्या संगतीत रहा.

त्यानंतर त्यांची तब्येत उत्तम आहे.

@ स्वाती.
तुमचे बरोबर आहे.
अगदी ३० पेक्षाही कमी मिळतात. तेही before tax. १० ह. पैकी ५ औषधे असतात. उरलेल्या ५ चे ३०% असा तो हिशोब आहे.
लोक शिव्या फक्त डॉक्टरला देतात.

बॉम्बे मार्केट = कमी दर्जाची, ज्यात औषधाचे प्रमाण चुकीचे / खूप कमी आहे, अशी नकली औषधे. कित्येक होलसेल केमिस्ट कडे असतात.

बॉम्बे मार्केट = कमी दर्जाची, ज्यात औषधाचे प्रमाण चुकीचे / खूप कमी आहे, अशी नकली औषधे.>>>>>> पण ही म्हणजे जेनेरिक औषधे नव्हेत ना...

जेनेरिक औषधे नामांकित कं. बनवतात. उदा. रोश कं. चे अ जीवन सत्व. सुमारे ७ रू. ला १० गोळ्या आहेत.
पूर्वी हेच औषध अरुविट अशा नावाने तीच कं. बनवत असे. ते महाग होते.
बॉम्बे मार्केट च्या कंपन्याच शंकास्पद असतात.
बाकी सविस्तर नंतर....

पुण्यात डेक्कनला आमच्या फॅमिली डॉक्टरांचे क्लिनिक आहे. (खाली क्लिनिक-वर घर अशी टिपीकल जुनी रचना आहे) रास्ता पेठ आणि डेक्कन अश्या दोन ठिकाणी त्यांचे छोटं क्लिनिक आहे. सध्या वय झाल्यामुळे त्यांनी रास्ता पेठेतील प्रॅक्टिस बंद केली आहे आणि डेक्कनला सुध्दा फक्त सकाळी की संध्याकाळी...एकाच वेळेला आता क्लिनिक चालू असतं असं समजलं. त्यांच्याकडेही वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये भरलेल्या रंगीबेरंगी गोळ्या असायच्या आणि त्यांची फी होती रु.१०/-.... हल्लीहल्लीच त्यांनी ती वाढवून रु.३०/- केली होती...औषधांसकट! कालचा एपिसोड पाहून समजलं की ते द्यायचे ती बहुधा जनेरिक मेडीसीन्सच असणार.

चांगल्या डॉक्टरांचा विषय निघाला म्हणून त्यांचा उल्लेख करावासा वाटला.

चांगल्या डॉक्टरांचा विषय निघाला म्हणून त्यांचा उल्लेख करावासा वाटला. >>>> यात आमच्या डोंबिवलीचे नवरे डॉक्टरसुद्धा आहेत. रू. १०- ३० च्या मधे फी, परफेक्ट निदान, स्वतःच बरेचदा औषधे देतात. १-२ दिवसांत खडखडीत बरे! छान बोलतात, नीट समजावतात अगदी सगळ्यांनाच.

हा भागही अप्रतिम होता.
सुरुवातीला लिव्हर ट्रान्स्प्लांटच्या भागाचा शेवट अतिशय दु:खदायक होता. तो संपल्यावर लोकांनी (अनवधानानेच असणार) टाळ्या वाजवल्या तेथे मला तरी जरा खटकले. इतरत्र वाजवलेल्या टाळ्या मात्र योग्य कारणाने होत्या.
एवढ्या महत्वाच्या विषयाला अजून खूप कांही घेता येण्याजोगे असले तरी उपलब्ध वेळाचा त्याने चांगला उपयोग केला.
या निमित्त येथे चाललेली चर्चाही सर्व बाजू मांडणारी झाली आहे. एका डॉक्टरांनी मेडिकल शिक्षणासाठीच्या फियांचे आकडे ऐकल्यावर आता 'हा 'व्हायेबल प्रोफेशन' राहाणार नाही' असा फार चांगला अभिप्राय दिला होता.
बाजारात चांगल्या कंपन्यांची जेनेरिक औषधे सहजगत्या मिळतात?

कालच्या एपिसोड मधे औषधे बनवायला लागणारा खर्च व ती गरिबांना कोणत्या किमतीत मिळावी हा मुद्दा हे दोन्ही मिक्स केल्यासारखे वाटले.

त्या डॉ गुलांटींनी सांगितले की ती औषधे बनवायला प्रत्यक्षात खूप कमी (म्हणजे जेनेरिक्स एवढाच) खर्च येतो. पण तो "कच्च्या मालापासून त्या गोळ्या बनवण्याचा" खर्च असावा. ज्या कंपन्यांकडे त्याचे पेटंट असते त्यांना ते प्रयोग करून ते औषध विकसीत करायला येणारा खर्च यात धरला होता का ते स्पष्ट झाले नाही. माझ्या माहितीप्रमाणे पेटंट ची मुदत संपली की तो फॉर्म्युला घेउन इतर कंपन्यांनाही ते औषध बनवता येते. या "इतर" कंपन्यांना तो संशोधनाचा खर्च झालेला नसल्याने त्या फक्त "उत्पादन खर्च व जो काय नफा घ्यायचा तो" एवढ्या किमतीत औषधे देऊ शकतात - असे असावे. ती दुसरी बाजू नीट मांडली आहे असे वाटले नाही. यात काही गडबड असेल तर सांगा.

अजून एक मुद्दा म्हणजे कोणत्याही वेळेस मागच्या ४-५ वर्षांत मान्यता/पेटंट मिळालेली औषधे फक्त एकाच कंपनीची मिळत असणार व जेनेरिक्स मधे उपलब्धच नसणार. हे ही खरे आहे का?

मात्र एखाद्या गरीब व्यक्तीला ४०० रू चे औषध न घेता आल्याने व दुसरे पर्याय उपलब्ध असताना त्याची माहिती न मिळाल्याने जीव गमवावा लागणे किंवा इतर काही नुकसान होणे हे फारच वाईट आहे.

पुण्यात लोंढे म्हणुन डॉक्टर होते चित्रशाळेजवळ आता दुर्देवाने नाहित. त्यांना धन्वंतरीच म्हणले जायचे. उपचार झाल्यावर ते कधीहि फि मागत नसत. कोणी आपणहुन दिली तरच घेणार. नुसती नाडिपरिक्षा करुन आजार ओळखणार!

मस्त होता भाग.
आवडला.
सगळेच मुद्दे कव्हर करणे शक्य नव्हते तरिही अमिरने जमेल तितका मस्तच उहापोह केला.
सगळ्यात आवडलेला मुद्दा देवी शेट्टी यांचा 'एथिकल प्रॅक्टिस केल्याने तुम्ही उपाशी राहणार नाही, तरिही चांगलेच कमवाल.
अगदी हाच अनुभव सध्या घेत आहे.

इब्लिस Happy
उठसूट केस झाल्यास डॉक्टर फक्त न्यायालयाच्या चकराच मारत बसतील.

जेनेरिक औषधांच्या बाबतीत - मी स्वत; तरी कधीच लिहिणार नाही. बाँबे मार्केटबद्दल अनुमोदन.
त्यापेक्षा नेहमीच्या ब्रँडेड औषधांच्या किंमती आटोक्यात ठेवणे शक्य असताना सरकार का ठेवत नाही असा विचार करते.

या काही लिंका-
१.मेडिकल रिप्रेझेंटेटिव आणि कोंकणचो डॉक्टर

माझे जुने काही लेख-
१. मेडिकल शिक्षणाचा खेळखंडोबा-साम्राज्य

२. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. - प्रायोजित साती.

साती,
जेनेरिक औषधांचा तुम्हाला काही वाइट अनुभव आलेला आहे का?
आम्हाला सुधा m.sc. शिकताना औषधांच्या डोस बद्दल आणि अर्धी गोळी घेणे यबद्दल फार घाबरवून सोडले होते.
याबाबतीत खरेच आण्खी लिहा.

सिंहगड रोडला डॉ मानकर हे प्रसिद्ध बालरोगतज्ञ आहेत. मला मेडीकल सायन्स खूपसं समजत नाही. माझ्या मित्राच्या मुलीला दर जून महिन्यात ताप यायचा. कुणीतरी सुचवल्यावरून डॉ मानकरांकडे नेलं. त्यांनी नाडी, टॉर्च आणि तपासण्या केल्या. जीभ पाहिली, डोळे पाहिले. त्यांनी एका व्हायरल इन्फेक्शन बद्दल सांगितले. त्याचे नावही लिहून दिले आणि काळजीचं कारण नाही म्हणून सांगितलं. फीज फक्त १५ रूपये ( सात वर्षांपूर्वी ).

मित्राला इतक्या जुजबी तपासणीवर विश्वास बसला नाही. त्याने दुस-या एका पंचतारांकित बालरोगतज्ञाकडे नेलं. फीज दीडशे रूपये. लॅबमधे दहा एक टेस्टस करायला लावल्या. शेवटी जे डॉ मानकरांनी लिहून दिलं होतं तेच इन्फेक्शन निघालं. याचं कारण असं कि त्या परिसरातले सगळे लोक डॉ मानकरांकडे प्रथम जातात. नंबर लागला नाही तरच दुसरीकडे ( सकाळी सात वाजता फोन लागला तर नंबर लागतो हल्ली. इमर्जन्सीला अपवाद. दीडशे नंबर सहजच असतात). त्यामुळे त्या भागातला डेटा त्यांच्याकडे उपलब्ध असतो. अर्थात हे सेवाभावी वृत्तीतून आलेलं आहे. त्या वृत्तीचं हे फळ आहे. कित्येक गरीबांच्या मुलांवर डॉक्टर मोफत इलाज करतात. औषधांचे पैसे ते स्वतः देतात.

ज्या कारणासाठी ट्रीटमेंट सुरू आहे त्या कारणासाठी एकदाच फीज घेतली जाते. दुस-यांदा त्याच आजारासाठी दाखवायला गेलात तर फीज घेत नाहीत. इतर ठिकाणी आता प्रत्येक वेळी पाचशे रूपये घेतात. स्वस्त डॉक्टर म्हणजे दर्जा नाही असं काही नाही. ते मेडीकल कॉलेजेस ला व्याख्याते म्हणून आहेत. त्यांच्या हाताखाली जे डॉक्टर्स तयार झालेत ते ही आज नावाजले गेलेत.

इतकी कमी फी घेऊनही आनंदनगरला त्यांच्या प्लॉटवर त्यांनी हॉस्पिटल बांधलं. ते बांधताना खालचा मजला बँकेला दिला आणि कर्जाच्या हप्त्याइतकं भाडं बँकेनं त्यांना दिलं. हे सर्व डॉक्टरांवरील प्रेमापोटी. मी पण कन्फ्युज असलो कि लांबून त्यांच्याकडे येतो. इतके पेशंट तपासूनही हसतमुख असणारे, रात्रीबेरात्री इमर्जन्सी केसेस करूनही सकाळी फ्रेश असणारे हे सेवाभावी डॉ मानकर पाहीले कि रूढ अर्थाने नास्तिक असल्याने त्यांना काय म्हणावे हे समजत नाही.

वर डॉक्टरला बिलातले किती रुपये मिळतात हा उल्लेख वाचला म्हणुन पुढचे उदाहरण देत आहे.

गेल्या आठवड्यात माझ्या एका वहिनीला मुलगी झाली. प्रसुती नॉर्मल होती, मुलगीही जन्मतःच अगदी नॉर्मल, हेल्दी (टच वुड.. :).) आणि आज डिस्चार्ज देताना डॉक्टरने रु. ४५,००० चे बिल हातात ठेवले. प्रसुती नॉर्मल झाली हे सांगायचे कारण हेच की बाहेरचे वेगळे डॉक्टर वगैरे बोलवावे लागले नाही. प्रसुतीनंतर डॉक्टरने मोठ्ठी लिस्ट दिली औषधांची, डेटॉल वगैरे. ती बाहेरुन आणावी लागली. तो खर्च वेगळा. हॉस्पिटल घरापासुन लांब असल्याने बाळंतीणीला हॉस्पिटलात डबा पुरवणा-याकडुन रोजचे जेवण स्वतःचे पैसे घालुन घ्यावे लागले. हे सगळे जर आपल्याला स्वतःलाच करावे लागले तर मग ४५ हजार रुपये कसले घेतले? मी तर थक्क झाले ऐकुन. वहिनी म्हणाली, बिल बरोबर आहे, गेल्या वर्षी माझ्या बहिणीच्या नॉर्मल डिलीवरीचे अडतीस हजार घेतलेले इथे, त्यामानाने आता ४५ हजार म्हणजे जास्त वाढले नाहीत. हे काही पॉलीक्लिनिक किंवा हॉस्पिटल नाहीय. डॉक्टरीणबाईंचे स्वतःचे मॅटिर्निटी होम आहे. तरीही एवढे बिल??

Pages