"सत्यमेव जयते" भाग ४ - (Does Healthcare Need Healing?)

Submitted by आनंदयात्री on 26 May, 2012 - 14:46

आज २७ मे च्या चौथ्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
सत्यमेव जयतेच्या वेबसाईटवरील या भागाची लिंक -
http://www.satyamevjayate.in/issue04/

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधनातै

माझ्या मुलीच्या वेळेस ढोले पाटीलच्या त्याच इस्पितळात तपासणीसाठी दोनदा अ‍ॅड्मिट केलं होतं. प्रत्येक वेळेस बिलात डॉक्टर व्हिजिट फी म्हणून सहा हजार आणि बिल वीस हजार. डॉक्टर तर फिरकले ही नव्हते. त्याच त्या सिस्टर्स ठराविक वेळेला येणार. रक्तदाब पाहणार आणि जाणार. प्रत्येक वेळी व्यवस्थित आहे सगळं म्हणायचे..

अकाउंटसमधे विचारलं तर म्हणाला इथून पुढे गायनॉकॉलॉजिस्टची चिट्ठी अ‍ॅडमिट होताना देत जाऊ नका म्हणाला म्हणजे बिलात ते सहा हजार रूपये येणार नाहीत ....

मस्त होता कालचा भाग.
आडून आडून बोलले जाणारे विषय ह्या भागामुळे सगळ्यांसमोर खुले झाले.:)

कट प्रॅक्टिस, बँडेड औषधांचा डॉक्टरांचा हट्ट, ऑपरेशनचे अव्वा च्या सव्वा चार्जेस सगळंच खूप भयानक आहे.

हे सगळं का आणि कुणामुळे सुरू झालं हा मोठ्ठा प्रश्न आहे.
म्हणजे पेशंटने डॉक्टरांवर अविश्वास दाखवायला, हाणामार्‍या करायला सुरूवात केल्याने डॉक्टरांनी " डिफेन्सिव प्रॅक्टिस " करायला सुरवात केली की डॉक्टरांनी धंदेवाईकपणा सुरू केल्याने पेशंटने डॉक्टरांवर अविश्वास दाखवायला सुरूवात केली ???

कुणाच्याही जिवाशी खेळ करणं हे पूर्णपणे अनएथिकल आहे आणि त्यावर लायसेन्स रद्द होण्यासारखी कडक कारवाई होणं, हेच योग्य आहे. काही उदाहरणे अशी घडली की बाकीच्यांना आपोआप जरब बसेल.

कालच्या भागाचा एकच धोका आहे तो म्हणजे सरसकट सगळ्याच डॉक्टरांकडे लोक संशयाने बघणार आणि डॉक्टर-पेशंट हे नातं आणखीन गढूळ होणार !

बाकी १.६ % , पाकिस्तान आणि तालियां हे सही होतं. Happy
डॉ. शेट्टींची विचारसरणीसुद्धा मस्त.

वर कोठेतरी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबाबत उल्लेख झाला. त्याबाबतचा कायदा आणि प्रक्रिया आहेच. पण हा भाग वैद्यकीय क्षेत्रातील लाडी-लबाडीबद्दल होता असे वाटते.

काल भारतातील काही डॉक्टरांशी बोलणे झाले. ह्या भागात चर्चिलेली मुद्दे/ अनैतिक प्रकार नाहीत असे नाही पण त्यामुळे समस्त डॉक्टर जमात लुटारु आहे असे चित्र रंगवले गेले आहे. अर्थात अनेकांनी चांगुलपणाची उदाहरणे दिली आहेतच पण एकुण डॉक्टरांची पण बाजु दाखवायला पाहिजे होती. मला कळालेले काही मुद्दे जे पुर्णपणे ह्या भागात दाखवले गेले नाही...
बर्‍याच वेळा असे म्हटले जाते की डॉक्टरांनी उगीच ऑपरेशन करायला लावली असे म्हटले जाते. डॉक्टरांचे म्हणणे असे की त्यावेळी त्यांच्यासमोर जे फॅक्ट असतात आणि ज्या तपासण्यांचे रिझ्ल्ट असतात त्याप्रमाणे त्यांच्या अनुभवावरून निर्णय घेतात. उदा. डॉक्टरांना वाटते की सी-सेक्शन करावे लागेल पण बाळंतपण अगदी नॉर्मल होते. मग लगेच म्हटले जाते की पैसे उकळण्यासाठी ऑपरेशन करायला सांगितले.
त्या ऑपरेशन बद्दल ... बहुतांश वेळा पेशंट्स मागे त्या ऑपरेशन साठी लागतात. आणि एखाद्या डॉक्टरने गरज नाही म्हणुन सांगितले तर लगेच दुसरीकडे जाउन ते करुन घेतात.
त्या खेड्यातील सर्वांचीच गर्भाशय काढुन टाकली असे दाखवण्यात आले. बर्‍याच जणांना हे अजुन पटले नाही. त्यांच्यामते हे संपुर्ण सत्य नाही. तरीपण टिव्हीवर दाखवले म्हणजे काही रिसर्च केला असेलच. त्यासंदर्भातील दुसरा मुद्दा... मलबारहील वर एक डॉक्टर आहेत. त्यांनी आयुष्यभर फक्त हिच (गर्भाशय काढणे) ऑपरेशन्स केली. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्याबद्दल का नाही दाखवले? ते उच्चभ्रु वस्तीतील डॉक्टर आहेत म्हणुन की अनेक बड्या लोकांच्या मर्जीतील आहेत म्हणुन?
भारत सरकारच्या आरोग्यखात्यातर्फे पुरवण्यात येणारी औष्धे ही जनेरीक असतात. डॉक्टरांच्या मते त्यात काहीही कॉलिटी मेंटेन केलेली नसते. कारण उघड आहे. ही औषधे बनवायला मिळावी म्हणुन खुप पैसे चारलेली असतात मग ती भरुन काढण्यासाठी ६०% खर्‍या औषधाची भुकटी आणि ४०% कुठलीतरी नॉन-टॉक्सिक पावडर वापरली जाते. त्यामुळे हवा तो परिणाम साधला जात नाही. जनेरीक औषधे वापरली का जात नाहीत याचे उत्तर डॉ. देवी शेट्टींनी का नाही दिले? पंतप्रधांनाना ट्रीटमेंट देताना डॉ. देवीशेट्टी हे जनरीक औषधे वापरतात का? ह्या जनरीक औषध प्रक्रियेतील घोटाळा न मांडता फक्त डॉक्टरांना लक्ष केले असे अनेकांना वाटले. ही जनेरीक औषधे एक्स्पोर्ट केली म्हणजे कोणत्या देशात? ज्या देशात काहीच उपलब्धता नाही अशा देशात काहीच नसल्या पेक्षा ही स्वस्तातील औषधे कधीही खपली जात असतील.
इब्लिस यांनी मांडलेला मुद्दा परत एकदा.. डॉक्टरांना इतर दुकानदारांप्रमाणे नियम लावलेत तर उगीच सेवा वगैरे करावी अशी अपेक्षा का?
कॅपिटेशन फी आणि वाढती खाजगी वैद्यकीय महाविद्यालये ह्यावर डॉ. देवी शेट्टी बोलले. ते स्वतः एमसीआय चे पदाधिकारी होते आणि त्यांचे एक पत्र अजुनही यंत्रणा हलवु शकते. खाजगी महाविद्यालयातील हे प्रकार माहिती आहेत तर त्यांना परवानगी देणारे मंडळ काहीच करत नाही. त्यांची मान्यता पण काढुन घेत नाही मग चुक कोणची?

इंशुरन्सचा मुद्दा मांडला. जामोप्या यांनी सांगितल्याप्रमाणे इंशुरन्सची पण दुसरी बाजु आहे. पण डॉ. देवी शेट्टी ज्या इंशुरन्स बद्दल बोलले ते अर्ध सत्य आहे असे कळाले. त्या इंशुरन्स मार्फत झालेल्या सर्व ट्रिटमेंटचा खर्च कर्नाटक सरकार उचलते. (रु१०-रु.३० व्यतिरिक्त सगळा खर्च ) कर्नाटक सरकारची कोणतीतरी आरोग्य योजना आहे त्यातुन सगळा खर्च होतो. तशा योजना (उदा. राजीव गांधी आरोग्य योजना, जिवनदायी) सगळ्या राज्यात आहेत पण शुन्य अंमलबजावणी ह्यामुळे सगळी जनता ह्यापासुन वंचित राहते.

डॉ देवी शेट्टी एमसीआयचे अध्यक्ष ?
त्यांचा सहभाग ग्रामीण भागात करत असलेल्या स्वस्तातल्या उपचारांबद्दल होता.

जेनरीक औषधांचा मुद्दा राजस्थान बद्दल होता. एमसीआयचे माजी अध्यक्ष एक कर्नल आणि आताचे डॉ तलवार होते. डॉ गुलाटींची मुलाखत कट प्रॅक्टीस आणि कॅपिटेशन फी बद्दल होती.

डॉ तलवार यांनी आंध्रातल्या त्या केसमधे लक्ष घालण्याचं मान्य केलं आहे. ही केस एमसीआयकडे आहे असा उल्लेख झाला होता यावरून धुआं है तो आग भी होगी असं वाटतं.

तसंच गरीब लोकांच उत्पन्न पाह्ता त्यांना अशा शस्त्रक्रियेसाठी भाग पाडणं हे चरकात पिळून काढल्यासारखं वाटतं. मलबार हिलमधल्या लोकांना काय नाक वाकडं झालं कर ऑपरेशन,स्कीन सैल झाली कर ऑपरेशन ... खर्चाचा भाग नसतोच इथं !

डॉ देवी शेट्टींनी काहीही अर्धसत्य सांगितलेले नाही हे तो भाग पाहिल्यावर कळेल. जीवनदायिनी योजनेत मजुराने दहा रूपये टाकले तर सरकार ३० रूपये जोडते हे स्पष्टपणे सुरूवातीलाच सांगितले आहे.

कालचा भाग हा नीयत,नीती बद्दल होता हे एकदा स्पष्ट झाल्यावर सगळ्या डॉक्टरांबद्दल संशय कोण कशाला घेईल ? सकारात्मक उदाहरणं पण डॉक्टरांचीच दाखवली ना ?

सरकारी दवाखान्यातील औषधाची क्वालिटी हा अलग मुद्दा आहे.. त्याचा अर्थ बाजारात मिळणारी जनरिक औषधे निकृष्ट असतात असा होत नाही.... चांगल्या कंपनीच्या जनरिक रेंज उपलब्ध आहेत.

डॉ. देवी शेट्टी हे सुद्धा एमसीआयचे एक वर्ष पदाधिकारी होते. आजही त्यांच्या शब्दाला मान आहे.
जनेरीक औषधांचा मुद्दा दुसरे डॉक्टर बोलत होते पण डॉ. देवी शेट्टी हे पण डॉक्टर आहेत आणि पंतप्रधांनावर पण उपचार करतात. ते जनेरीक औषधे का वापरतात का नाही हे सांगु शकतील का? सांगायचा मुद्दा हाच की जनेरीक औषधांमधे गुणवत्ता टिकवली गेलेली नसते त्यामुळे योग्य तो परिणाम होत नाही.
आंध्रामधल्या ती घटना दाखवली आहे म्हनजे काहीतरी झाले असावेच. त्या मलबारहीलच्या डॉक्टरांनी पण गर्भाशय काढणे एवढेच काम केले. म्हणुन तो उल्लेख होता. नाक वाकडे वगैरे बद्दल च्या ऑपरेशन बद्दल काही उल्लेख नव्हता.
नियतीनितीबद्दल हा भाग होता पण संपुर्ण माहिती समोर न आल्यामुळे प्रत्येकवेळी सगळे डॉक्टरांना संशयाच्या चष्मातुन पाहु लागतील. मी ज्यांच्याशी बोललो त्यांच्या मताप्रमाणे जे दाखवले ते खरे आहेच. पण त्या मागची कारणे काय ह्यावर पण थोडा प्रकाश टाकायला हवा होता.
असो वरील सर्व मुद्दे मी काही डॉक्टरांशी केलेल्या चर्चेतुन आलेली होती. कदाचित मला त्या विषयातील सखोल ज्ञान नसल्याने व्यवस्थित मांडता आली नसतील.

जनरीक औषधे म्हणजे काय? मला खरेच नाही कळाले. परत कोणालातरी विचारतो.
मला कळाल्याप्रमाणे आरोग्यखात्यातर्फे वाटप होणारी सर्व औषधे जनरीक असतात. कदाचित माझी समजुत चुकीची असेल.

हिंदी मधे बच्चेदानी ला मराठीत गर्भाशय असे नांव आहे.
गर्भदाणी नाही. उगा अत्तरदाणीत गर्भ ठेवल्यासारखे वाटते...

बाकी चालू द्या!

@महागुरू.

ती औषधे - सरकारी - सहसा जनरिक नसतात.
त्यासाठी 'रेट कॉन्ट्रॅक्ट' नावाचा भीषण पैसेखाऊ प्रकार असतो. खरेदी 'सेंट्रलाइझ' असते. बहुतेक बॉम्बे मार्केट (वर सांगितल्याप्रमाणे कमअस्सल) पण ब्रँडेडच असतात. खरेदी अगदी मंत्रालय/डायरेक्टरेट कडून होते. प्र-च-ण्ड पैसे खाल्ले जातात.
कधी कधी हे खूपच भयानक असते.
उदा. रेबीज (कुत्रे चावल्याने होणारा रोग) ची रेबीपुर लस आल्यावर सरकारी दवाखान्यात मिळणारी कुत्र्याची लस बंद पाडण्यात आली. जी खूप स्वस्त होती.
अक्खी हिंदूस्थान अँटिबायोटिक्स ही फायद्यात चालणारी कंपनी बंद पाडण्यात आली.
असो..
खेळ कॉर्पोरेट हॉस्पिटल वाल्या धनिकांचा अन औषध कं वाल्यांचा असतो. शिव्या डॉक्टर खातो.

***
ता.क.
जनरिक नेम म्हणजे औषधाचे खरे नाव. उदा. डालडा, सूर्यमुखी ही झाली ब्रॅण्ड नेम्स. 'तूप' हे झाले जनरिक नेम. समजले?

जेनरीक औषधांमधे गुणवत्ता नसते असं नाही.

केमिकल फॉर्म्युला लिहून देणं म्हणजे जेनेरिक औषध. थोडक्यात ८०० सीसी ची मोटार घ्यायची आहे हे सांगणं आणि मारूती कार घ्यायची आहे हे सांगणं हा फरक आहे.

बाजारात जाऊन -हीनाटिडीन मागितली कि एक रूपयात मिळते. पण विशिष्ट ब्रँडनेम ने मागितलीत तर ३८ रू च्या आसपास किंमत आहे. तीच गोष्ट पॅरासिटॅमॉलची.

पण एडस वर औषध कुणी शोधून काढल्यास ते इतरांना बनवता येणार नाही हा मुद्दा आहेच. पण पेटंटची मुदत संपल्यावर त्याच ब्रँड नेमचं औषध मागायची गरज नाही. केमिकल्स तीच राहणार असतील तर गुणधर्म कसे बदलतील ? अपवाद नकली औषधांचा !

( -ह चा -हि कसा करायचा ? :()

जागो मोहन प्यारे | 28 May, 2012 - 04:37
जनरिक मेडिसिन म्हणजे काय?

बाजाराय क्रोसिन, मेटासिन नावाने डोकेदुखीची गोळी मिळते.. ही झाली ब्रँड नावे..

आता त्यात औषध असते पॅरॅसिटेमॉल.. याच नावानेही बाजारात औषध मिळू शकते. हे झाले जेनेरिक नाव.. ही औषधे स्वस्त असतात.

ब्रँड नाव राखून ठेवायला खर्च असतो, शिवाय त्याच्या जाहीरतीसाठीही खर्च होतो. म्हणून ही औषधे महाग असतात

--------------------------------------------------------------------------------------------------------------

सरकारी दवाखान्यातूनही जनरिक औषधे मिळू शकतात... त्यांच्या क्वालिटीबाबत काही सांगू शकत नाही.

जनरिक औषधे चांगल्या कंपनीची बाजारातही मिळतात. ब्रँडेड औषध जसे चांगल्या स्ट्रिप पॅकमध्ये असते, तसेच हेही असते.

वर बाँबे मार्केटचा उल्लेख झाला.. डॉक्टर लोक आपल्या रुग्णाला स्वतः जवळच्या लूज गोळ्या २, ४,६ वगैरे घेऊन पुडी बांधून देतात.. हल्ली हे कमी होत आहे. या औषधांचे खास डॉक्तरांच्यासाठी १०० गोळ्यांचे वगैरे पुडे असतात. ते प्लॅस्टिकच्या पिशवीत १०० गोळ्या वगैरे असतात.. डॉक्टर स्वतःच्या बरणीत ते भरुन ठेवतात.. क्वचित या औषधाच्याही १००० च्या वगैरे बरण्या मिळतात..डॉक्तरही अगदी मर्यादीत असाच वापर करत असतात. १-२ दिवसाचे औषध वगैरे..... ही औषधे स्ट्रिप पॅक्मध्ये नसतात.. त्यामुळे औषध तयार करताना जरी योग्य प्रमाणात असले, तरी हवा, प्रकाश, हाताळणी, अशातून नंतर त्यांची गुणवत्ता ढासळते.... अशी औषधे बाजारात सामान्य माणसाला विकत मिळत नाहीत.. कारण ही १००, २००, १०० चे वगैरे पुडे असतात आणि ते केमिस्टकडून डॉक्टरानी घेऊन पेशंटना देणे अपेक्षित असते.... स्ट्रिपमध्येही याची उपलब्धता असू शकेल.

पण जनरिक मेडिसिन घेताना चांगल्या कंपनीचे घ्यावे, म्हणजे योग्य रिजल्ट येऊ शकेल.

हे आहे सिफ्रान ५००.. हे ब्रँडेड आहे.. १० टॅब. ९८ रु.

http://www.pirulapatika.hu/nagykep/210111758.jpg

आता त्याच्या बॉक्सवर, स्ट्रिपवर औषधाचे नाव दिसेल.. सिप्रोफ्लोक्ससिन.

आता त्या नावाने म्हणजे औषधाच्या जनरिक नावानेही ते बाजारात तशाच पॅकमध्ये मिळेल...

http://2.imimg.com/data2/VB/OF/MY-3431136/ciprofloxacin-tablets-250mg-50... तेच औषध , किंमत १० टॅब. ४०-५० रु.

It's amazing to see people earning in thousands are happy to pay 30/40rs to their doctor. Somebody is proudly coating the incidence where her father in law called his doctor worse than prosti. Don't you think the consultants time is also important and should cost to patient even if he is asking to continue the same treatment?

ईब्लीस , फक्त तुम्हि आणि मी एकमेकाना अनुमोदन देऊ कारण इथे प्रॅक्टिसिंग डॉ़क्टर आपण दोघेच आहोत बहुदा. Happy

होय साती.
वरच्या एका प्रतिसादात मी तेच म्हटलं मघा, की अमुक यांनी स्वतः डॉक्टर होऊन प्रॅक्टिस करावी, मग आनंदाने इन्स्टन्ट लॉ करून या तमाम डॉक्टरांना धडा शिकवावा.

@साधना | 28 May, 2012 - 21:22

>>वर डॉक्टरला बिलातले किती रुपये मिळतात हा उल्लेख वाचला म्हणुन पुढचे उदाहरण देत आहे.

गेल्या आठवड्यात माझ्या एका वहिनीला मुलगी झाली. प्रसुती नॉर्मल होती, मुलगीही जन्मतःच अगदी नॉर्मल, हेल्दी (टच वुड.. स्मित.) आणि आज डिस्चार्ज देताना डॉक्टरने रु. ४५,००० चे बिल हातात ठेवले. प्रसुती नॉर्मल झाली हे सांगायचे कारण हेच की बाहेरचे वेगळे डॉक्टर वगैरे बोलवावे लागले नाही. प्रसुतीनंतर डॉक्टरने मोठ्ठी लिस्ट दिली औषधांची, डेटॉल वगैरे. ती बाहेरुन आणावी लागली. तो खर्च वेगळा. हॉस्पिटल घरापासुन लांब असल्याने बाळंतीणीला हॉस्पिटलात डबा पुरवणा-याकडुन रोजचे जेवण स्वतःचे पैसे घालुन घ्यावे लागले. हे सगळे जर आपल्याला स्वतःलाच करावे लागले तर मग ४५ हजार रुपये कसले घेतले? मी तर थक्क झाले ऐकुन. वहिनी म्हणाली, बिल बरोबर आहे, गेल्या वर्षी माझ्या बहिणीच्या नॉर्मल डिलीवरीचे अडतीस हजार घेतलेले इथे, त्यामानाने आता ४५ हजार म्हणजे जास्त वाढले नाहीत. हे काही पॉलीक्लिनिक किंवा हॉस्पिटल नाहीय. डॉक्टरीणबाईंचे स्वतःचे मॅटिर्निटी होम आहे. तरीही एवढे बिल??

<<<<

अरेरे. फारच लुटलं हो तुम्हाला!
बाळ-बाळंतीणीसाठी वेगळी खोली होती का हो?
त्यात एसी वगैरे?
टीव्ही होता रूम मधे?
एकादी नर्स २४ तास ड्यूटीवर?
रूम दिवसातून २ वेळा जंतूनाशकाने पुसणे वगैरे?

पुण्यात एकाद्या हॉटेलात ३ दिवस नुसते रहायला गेलात तर मला वाटतं १०० - सव्वाशेत काम होत असेल नाही आजकाल तिन्ही दिवसांचं?? जेवण वै. त्यातच इन्क्लूड? त्यांच्या हॉस्पिटलला जागाही फुकटच दिलेली असणारे म्युन्सिपाल्टीने. तरी नुस्त्या रहाण्याचे इतके पैसे???

बरं इतक्या लांबचं हॉस्पिटल होतं म्हणजे तुम्ही स्वतः हून नसेल नं निवडलेलं?? कुणीतरी जबरदस्तीने नेऊन अ‍ॅडमिट केलं असणारे तुमच्या पेशंटला तिथे. किंवा त्या डॉक्टरीण बाईंनीच काहीतरी आग्रहाने बोलावलेलं असणारे.

त्यापेक्षा मी म्हणतो, घरीच केली असती नं डिलिव्हरि? 'नॉर्मल' च तर होती नं? किंवा दवाखानाच्च हवा होता, तर ससूनला ५ रुपयांत काम झालं अस्तं, हो की नै?

जौ द्या. तुमच्या प्रश्नाचे थोडक्यात उत्तरः बिल 'नॉर्मल' डिलिव्हरिचे घेतले असावे बहुतेक.

रच्याकने : नॉर्मल डिलिव्हरी कशी करतात ते ठाऊक आहे का हो तुम्हाला? Watchful expectancy & Masterly Inactivity असं शिकवलेलं असतं. खरं तर डॉक्टरने नुसतं बसून वाटच तर पहायची असते Wink

***
ता.क.
नवीन बाळ आल्याचं अभिनंदन
शाळेचा विचार करूनच ठेवलेला असेल ना बाळासाठी? अत्तापासून डोनेशन जमवा म्हणावं.. लाखभरात काम होईल जरा बरी शाळा असली तर..
रच्याकने, ते डोनेशन नक्की कशासाठी घेतात हो शाळेत? आई/बाळाच्या जिवाची जोखीम घेतात का ते शाळावाले त्यांच्या डोक्यावर? की पहाटे ४ वाजता 'होणार्‍या' पहिलटकरणीसाठी रात्रभर जागून सकाळी ५ वाजताच्या दुसर्‍या अडलेल्या बाळंतिणीचा जीव वाचवायला ऑपरेशन थिएटरमधे उभे रहातात??

>>>>>>>>>>>>>>.चांगल्या डॉक्टरांचे इथे नाव पत्ते दिले जात आहे. मुद्दा आहे तो हलगर्जीपणा करणार्‍या डॉक्टरांचा. जे चूक आहे ते चूकच त्यासाठी त्यांच्या वंशी जायला>>>>>>>>>>>>>>.<<<<

+१००

मी ही वरती असाअच किस्सा लिहिला की सँपलच हरवले. निदान होवुच शकत नाही की नकी कॅन्सर होता की नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा आता त्या ७० वर्षाच्या व्यक्तीला चेकाप साठी जावे लागेल. डॉक ला जराही त्याचे वाईट नह्वते वाटत. अतिशय निर्लज्जपणे ते कसे काय हरवले माहीत नाही. मी सँपल लॅबला पाठवण्यासाठी ठेवले व गुल झाले(अगदी ह्याच शब्दात साम्गितले निर्लज्ज डोकने).

आता दर सहा महिन्यांनी ह्या चाचण्ञा करा(प्रत्येक चाचणीतून जाताना होणारा त्रास हा वेगळा, शारीरीक व मानसिक).
त्या सँपल नुसार नकी कसली गाठ होती हे निदान झाले असते. ७० व्या वर्षी ह्या त्रासातून जावे लागणार का तर डॉकच्या हल्र्गर्जीपणामुळे.

ऑपरेशन खर्च ८३,००० , चाचणी खर्च(२२०००) आणी झालेला मानसिक व शारीरेक त्रास = ह्याबद्दल तक्रार केल्यावर १ लाख दिलेत, ते ही हे लिहून की ह्याची वाच्यता नावासकट कुठे करणार नाही. का तर ते एका नामांकित हॉप्सितल आहे. Sad

>>>पहाटे ४ वाजता 'होणार्‍या' पहिलटकरणीसाठी रात्रभर जागून सकाळी ५ वाजताच्या दुसर्‍या अडलेल्या बाळंतिणीचा जीव वाचवायला ऑपरेशन थिएटरमधे उभे रहा>>><<

सॉरी, पण हा पेशा आहे व त्यात हे ओघाने आलेच(वेळ, काळ बंधन नसणे). समाजसेवा तर नकीच करत नाहीत ना.( करावी अपेक्षा नाही). पण पेशा स्विकरल्यावर त्यात आलेली चॅलेंज स्विकारावी लागतातच. मग ते कुठलेही काम असो, तो एक भाग असतो कामाचा.

मी एखाद्या कामाचे पैसे घेत असेन तर माझे काम चांगलेच बजावेन. इतर काही "हाताबाहेरच्या" गोष्टी धरल्या नाहीत तर. पण ज्या माझ्या हातात आहेत त्याला मी जबाबदार राहीन असा अ‍ॅटीटूड दिसत नाही. फक्त पैशाचा खेळ आहे ह्या पेशात सुद्धा.

की त्यांना (डॉक्न) जबरदस्तीने करावे लागतेय्.(हे तुमच्याच भाषेत).

पैसे घेत आहात तर तशी सेवा असणे हे जरूरीचे आहे व त्च जेव्हा होत नाही तेव्हा नाराजी पसरतेच.

@ झंपी,
नक्कीच. पेशा नाही, धंदा आहे हेच मी सांगतो आहे.

पण त्या सँपल प्रकरणी १ लाखाची लाच घेऊन गप का बसलात तुम्ही?? असल्या निष्काळजीपणाला जरब बसलीच पाहिजे. यात तुमची चूक आहेच. उगा विव्हळण्यात अर्थ नाही. अन तुम्हीच म्हणालात सॅम्पल लॅब ने हरवलं आहे. सँपल गोळा करणारे रिसेप्शनिस्ट म्हणजे नॉन-मेडीकोज असतात. डॉक्टरने सँपल हरवलेले नाही. शिव्या डॉक्टरने कशाला खायला हव्यात तुमच्या??
>>>>झंपी | 28 May, 2012 - 13:09

कुठलही लहान हॉस्पिटल म्हणजे वाईट , मोठे हॉप्सिटल म्हणजे चांगले असे कुठचेह भेद ठेवु नये असे माझे मत आहे. एकाचा अतिशय वाईट अनुभव पाहून ठरवले. अनुभव मोठ्या हॉप्सिटलचा होता. हे एका मोठ्या नटीने काढलेल्या हॉस्पिटलचा होता.

ऑपरेशन नंतर सँपल चक्क हरवले व अतिशय मक्खपणे डॉ ने सांगितले.तक्रार केल्यावर त्यात कबूली लिहून घेतली की कुठे बोलणार नाही. व एक लाख दिले फक्त त्या माणसाला. कॅन्सरचे सँपल हरवले लॅबने विचार करा काय हाल झाले असतील. मोठ्या हॉस्पिटलात हे प्रकार झाले.
तेव्हा कुठलेच ठोकताळे लावणं आजकाल कठिण झालेय ह्या डॉ व हॉस्पिटलाबाबतीत.
<<<

पण पैसे किती घेणार ते डॉक्टरने आधी सांगितलेले असते. ते मान्य न करता अ‍ॅडमिट होता का तुम्ही? मेन्यूकार्ड न वाचता ऑर्डर दिलीत तर बिल भरताना खळखळ कशाला हवीये?
वरच्या उदाहरणात धक्का 'यांना' बसलाय. वहिनी म्हणतात वाजवी बिल आहे? त्याबद्दल काय म्हणणे आहे तुमचे?

कटकट नको म्हणून डॉक्टर लोक सहसा या असल्या तुम्ही सांगीतल्या तसल्या सांगीवांगीच्या घटनांना उत्तरे देत नाहीत.

डॉक्टरने शांतपणे सांगितले असेल. दिलगिरीही व्यक्त केली असेल. झंपी यांना ते मक्ख, निर्लज्ज वाटलेच असेल. कारण लाच खाल्ली गेली आहे ऑलरेडी. अन वर शब्दही बदललेले आहेत. आधी लॅबने हरवले, नंतर डॉक्टरने निर्लज्जपणे.

इतकाच सात्विक संताप आलेला होता, तर पोलीसात तक्रार का नाही केलीत?

दवाखान्याचा 'पेशा' नाही. ते दुकान आहे. शॉप अ‍ॅक्ट चं लायसन्स तिथे लटकलेले असते दर्शनी भागात अन तुमच्या सारखा नॉन-मेडिको शॉप इन्स्पेक्टर येऊन रीतसर लाचही वसूल करून जातो तिथून.

कोणत्याही दुकानात तुमचे सामान तुम्ही सांभाळायची जबाबदारी असते. सँपल नक्कीच तुमच्या ताब्यात दिले गेलेले असणार आहे. त्याशिवाय १ लाख लाच घेऊन गप बसत नाही कुणी Wink वस्तू तुमची. दुकानदार कशाला सांभाळेल? ग्यारेज मधे जाऊन फाटकी ट्यूब्/टायर बदलल्यावर ते सांभाळायची जबाबदारि कुणाची असते?
अजून एक अंदरकी बात सांगतो.
कॅन्सरचे सॅम्पल म्हणजे बायो-मेडिकल वेस्ट असते. ते नुसते फेकून देण्यासाठीही डॉक्टरला पैसे लागतात. अन ते फॉर्म्यालिनमधे असते. म्हणजे चुकून कुत्र्या कावळ्याने खाल्ले असेही होत नाही.

चिमुरीचे म्हणणे पटले, पण

> त्यामुळे डॉक्टरांनी औषधं लिहुन देताना ब्रॅन्डेड द्यावीत की जेनेरिक याचा व्यवस्थित विचार करणं हेच जास्त योग्य आहे.

जेनेरिक औषध उपलब्ध असल्यास ते घेण्यात काहीच वावगे नसावे.

रिसर्च/पेटंटचा मुद्दा सर्वस्वी वेगळा आहे. ती एक महागडी, आवश्यक आणि सध्यातरी पुर्णपणे कॅपिटलिस्टीक प्रोसेस आहे.

कुणीतरी डॉक्टरांनी खेडेगावात न जाण्याचा मुद्दा उपस्थीत केला होता (ते का जात नाहीत??)
तर, सर्वांना सहा महिने शहरात आणि सहा महिने खेडेगावात घालवावे लागतात (सरकारी कॉलेजातील डॉक्टरांना तरी). अनेक लोक त्यातून पळवाटा काढतात. माझा एक मित्र शहाणा असल्याने गेला होता. तिथे वेळेवर साधी-साधी औषधे पण पोचत नाहीत . अनेकदा त्यांना दूरून चालत आलेल्या लोकांना औषध म्हणून ब्लँक पिल्स द्याव्या लाग्त (प्लॅसिबो). ही गोष्ट २० वर्षांपुर्वीची - परिस्थीती आता बदलली असेल तर फारच छान.

तासाभरात सर्व मुद्दे कव्हर नाहीच होऊ शकत. काय करायचे ते शेवटी आपल्या हाती आहे. लोकांनी विचार करायला शिकावे - वेगवेगळ्या मुद्द्यांबद्दल सजग व्हावे, डोळे उघडे ठेवावेत, निवडून दिलेल्या लोकांना जाब विचारावा. ज्याला कोणाला जे कोणते ठोस मुद्दे सुचतील ते लिहावे (उदा. 'हे औषध जेनेरीक आहे का? नसल्यास याचे जेनेरीक औषध उपलब्ध आहे का? कोणत्या नावाने?' वगैरे प्रश्न विचारता येतील)

इब्लिस्/साती (आणि इतर डॉक्टर) : औषधांमधील रिलीज मेकॅनिझम किती महत्वाचे असते? काही ब्रँडेड औषधवाले म्हणतात की आमचे औषध एकदम रिलीज न होता हळुहळु होते व त्यामुळे जास्त चांगले आहे. कोणत्या बाबतित हे महत्वाचे ठरु शकेल?

इब्लिस्/साती (आणि इतर डॉक्टर) : औषधांमधील रिलीज मेकॅनिझम किती महत्वाचे असते? काही ब्रँडेड औषधवाले म्हणतात की आमचे औषध एकदम रिलीज न होता हळुहळु होते व त्यामुळे जास्त चांगले आहे. कोणत्या बाबतित हे महत्वाचे ठरु शकेल?

हेच लिवायला आलो होतो.

१. जे औषध ब्रँडेड ने मिळते ते जनरिकनेही मिळू शकते.

२. पण कधी कधी ब्रँडेड औषधात इतर गुणधर्म असतात.. उदा. कंबर दुखीवर एक औषध आहे. डायक्लोफिन्याक... आता हे औषध पूर्वी सोडियम सॉल्टच्या रुपात यायचे... पण सोडियमने बीपी वाढतो हे लक्षात आल्यावर आता ते पोटॅशियम डायक्लोफिन्याक असेही येऊ लागले.. औषध शास्त्राच्या दृष्टीने दोन्ही एकच. पण दुसर्‍याचे साइड इफेक्ट कमी. त्यामुळे जनरिकचे डायक्लोफिन्याक आणि डायक्लोफिन्याक पोटॅशियम यांची तुलना होऊ शकत नाही.. इथे ब्रँडेड औषध महाग, कारण त्यात वेगळा क्षार आहे, वेगळे फायदे आहेत.

३. सारांश, ब्रँडेड औषधात कधी कधी काही चांगले अधिक फायदे असु शकतात, म्हणून ते औषध महाग असु शकते.. प्रत्येक वेळी महागपणाचा संबंध नफेखोरी/ कमिशन याना जोडू नये ही नम्र विनंती.

खूपच छान एपिसोड. पण आलेल्या प्रत्येक डॉक्टर ची स्वतंत्र १ तासाची मुलाखत होऊ शकेल असे वाटले. इथे प्रत्येकाला फार थोडा वेळ मिळाला. तरीही उत्तम माहिती.

डॉ साती

ज्यांचे उत्पन्न हजारोंनी आहे त्यांनी डॉ ने पंधरा वीस रूपये घ्यावेत अशी अपेक्षा करणे (अनुवाद)..

तुम्ही जर मी दिलेल्या डॉ मानकरांच्या उदाहरणावरून म्हणत असाल तर आधीच स्पष्ट करतो. डॉक्टरांची केवळ काळी बाजू समोर येतेय म्हणून आवर्जून सकारात्मक उदाहरण दिलेले आहे. सेवाभाव शिकवून येत नाही. काय कमवायचं याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी. प्रत्येक जण पैशात सगळं मोजत नाही. एखाद्याला रोजचे तीनशे पेशंट स्वस्तात करून महिन्याला लाखभर रूपये मिळतात त्यात समाधान वाटत असेल तर एखाद्याला रोजचे पंधरा ते वीस पेशंट करून महिन्याला तीस लाख रूपये कमावूनही समाधान मिळत नसेल.

मला डॉ मानकरांकडे नंबर लावून जाणे शक्यच नाही. मी पाचशे रूपये वाल्या डॉ कडेच जातो. पण माझ्या मुलाच्या बाबतीत आलेला अनुभव लिहीतो. खूप दिवसांपासून त्याची पोटाची तक्रार असल्याने डॉ ना वेळोवेळी सांगितले. (या डॉ. च्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेता येणार नाही). त्यांनी प्रत्येक वेळी तपासलेही. मग लहान मूल लक्ष वेधून घेण्यासाठी करत असेल ही शंकाही बोलून दाखवली. त्यानंतर मंगेशकरला पोटाच्या स्पेशालिस्टकडे त्यांच्याच सल्ल्याने दा़खवले. त्यांनी सोनोग्राफी करवून घेतली (लॉजिकल आहे). छोटे खडे आहेत. हे औषध घ्या पंधरा दिवसात फरक पडायला हवा म्हणून सांगितले. पण मुलाची तक्रार चालूच होती. मुलामधे सहन शक्ती मोठ्या प्रमाणात असल्याने दुखलं खुपलं तरी बरेचदा तो सांगत नाही. य पार्श्वभूमीवर पोटाच्या तक्रारीचं पहायलाच हवं होतं. इथं मला डॉ मानकरांशिवाय पर्याय नव्हता. ते कमी फी घेतात म्हणून नाही तर त्यांच्या ज्ञानामुळेच.

त्यांच्याकडे सकाळी सहालाच जाऊन बसलो आणि नंबर लावला. डॉक्टरांनी मुलाला तपासलं. सगळे रिपोर्ट्स पाहीले आणि पांढरी कावीळ म्हणतो ना त्याप्रकारच्या काविळीची सुरूवात आहे असं सांगितलं. एकच टेस्ट करायला सांगितली. रिझल्टस तेच आले. मुलीला सगळ्या लसी वेळेत दिल्या होत्या. पण मुलाला काविळीची लस द्यायची राहिली कारण त्या वेळी त्याला ताप असल्याने नंतर देऊ म्हणून पुढे ढकललं होतं.

टेस्ट कुठे करायची, औषधं कुठून घ्यायची हे ते सांगत नाहीत. प्रिस्क्रिश्पन मेडीकल स्टोअरच्या कागदावर कधीच नाही. त्यावर फोन नंबर नसतो (!). एक सांगायचं राहीलं आता त्यांची फी साठ रूपये आहे. गर्दी तीच असते. मी त्यांना फी वाढवण्याबद्दल बोललो तेव्हां खळखळून हसले फक्त.. खूप जण असे आहेत ज्यांना साठ रूपये पण जमत नाहीत इतकंच बोलले.

सर्वांनी त्यांचं उदाहरण घ्यावं हे सांगण्याचा हेतू नाहीच इथं. गै. न. तुम्ही स्वतः ग्रामीण आणि मागास भागात कौतुकास्पद काम करीत आहात ज्याबद्दल तुम्हाला स्वतःलाच सांगावे लागेल. मुंबईचे डॉ कैलास गायकवाड देखील सामाजिक कामात पुढे असतात. जळगावचे डॉ ज्ञानेश पाटील यांच्याबद्दल माहीत नाही पण एकंदर त्यांचा स्वभाव पाहता ते ही समाजासाठी उदाहरण असतील हे खात्रीने सांगू शकतो.

मात्र हा एकमेव व्यवसाय असा आहे जिथे दुकानदाराला देव समजले जाते. जिथे दुकानदार ग्राहकाला रागवू शकतो. गाहक दुकानदारावर अंधविश्वास ठेवत असतो. म्हणूनच अपेक्षाभंगाचे दु:ख मोठे असते. पेशंट अशा वेळी वीस हजाराचे अनावश्यक बिल करायचे आणि त्या बिलातले सहा हजार रूपये डॉक्टरने अनावश्यक तपासणीसाठी पाठवले म्हणून खिशात टाकायचे याला कुणाकडे उत्तर आहे का ?

पंधरा रुपये नका घेऊ. पंधराशे घ्या, पण अनावश्यक औषधे, तपासण्या आणि शस्त्रक्रिया नकोत इतकी अपेक्षा तर ठेवता येईल ना ? परवाचा एपिसोड याबद्दलच होता. हलगर्जीपणा, चूक याबद्दल नव्हताच. डॉक्टर माणूस आहे आणि माणसाकडून चूक होते हे सुरूवातीलाच स्पष्ट केले गेले होते. तो एक वेगळा इश्श्यू आहे.

साती, माझेही तुला अनुमोदन.
सगळा विषय थोडा एकाच बाजूला झुकलाय असे वाटतेय निदान इथल्या चर्चेत तरी.

Pages