आम्रमाधुरी

Submitted by अश्विनीमामी on 18 May, 2012 - 12:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन मध्यम कैर्‍या, साखर, दूध, केशर वेलची सिरप.

क्रमवार पाककृती: 

आपण पन्ह्यासाठी जश्या कैर्‍या उकडून घेतो तश्या घ्यायच्या. गर गार झाला कि स्टीलच्या चाळणीत घालून किंवा मिक्सर मध्ये घालून एकजीव करायचा. मग त्यात चवीप्रमाणे साखर व लागेल तसे दूध घालायचे, दोन मध्यम कैर्‍या असल्यास साधारण दीड कप लागेल. सर्व मिसळून मग केशर वेलची सिरप किंवा केशराच्या काड्या दुधात खलून घालायच्या. फ्रिज मध्ये ठेवून गार करून सर्व्ह करायचे.

वाढणी/प्रमाण: 
तीन माणसांसाठी.
अधिक टिपा: 

मी वाटीत घालून चमच्यानेच खाल्ली. पण माझ्यामते मार्टीनी ग्लास मध्ये घालून वर एक व्हिप्ड क्रीमचे फूल व हापूस आंब्याची एक फोड, एक पुदिन्याचे पान अशी सजावट करूनही पाहुण्यांना वाढता येइल. अगदी साधा पदार्थ आहे. पूअर मॅन्स श्रीखंड!

माहितीचा स्रोत: 
काकू, वहिनी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काकू, उद्या रात्री तुमच्याघरी जेवायला येते. असे सांगितल्यावर काय खास करू असे काकुंनी विचारले. त्यांचे वय ऐशीच्या आस पास आहे. मी कसचे काय अहो वरण भात बेस्ट असे सांगितले. थकून रात्री जेवायला घरी पोहोचल्यावर हे सर्प्राइज खायला मिळाले. वरण भात पण मस्त लागत होता. जेवायला कंपनी असणे हे माझ्यासाठी फार ग्रेट. त्यात हे माझे दत्तक भाऊ, वहिनी व काकू. त्यामुळे मी फारच घाबरत त्यांच्या घरी राहायला गेले होते. पण काकुंनी आम्र माधुरी करून पार दिल खुश केले. त्यानंतर वहिनीने दोन मोठे बोल भरून आंबा आइसक्रीम खायला दिले. मी सो स्वीट, सो स्वीट या पलिकडे काहीच बोलू शकले नाही. त्यांची परवानगी घेऊनच ही पाककृती इथे लिहीली आहे.

अश्विनीमामी, पा़.कृ. छान आहे. नक्की करुन पाहणार.
ईकडे केशर वेलची सिरप कुठे मिळेल?? खूप शोधल सगळ्या मॉलमध्ये.
हे.ला जेवायला कधी येणार आहात????

केशर वेलची सिरप मॉल मध्ये नाही मिळणार. साधे प्रॉडक्ट आहे. मला ग्राहक पेठेत मिळाले होते. २१ तारखे परेन्त आहे ठाण्यात. कोणी असेल तर सांग मी कालच जाउन आले माहीत असते तर तुझ्यासाठी आणले असते.

करून बघाविशी वाटतेय.
अमा, ग्राहक पेठेत म्हणजे शीलाताई प्रॉडक्ट्सचे सिरप का? त्याचे कौतुक ऐकून ग्राहक पेठेतूनच घेतले. पण बाटली उघडल्यावर जेवढा गंध येतो, तेवढा पदार्थात मिसळल्यावर येतो का?

आर, केशर वेलची सिरप नाही मिळाले तरी केशर आणि वेलची सहज मिळतील.

वेलची आहे. चांगल केशर मिळण कठीण आहे, आणि ते दुधात घोळा, त्यापे़क्षा केशर वेलची सिरप पटकन वापरता येत. कालच शॉपर स्टॉप मध्येपण विचारून झाल, आणि आज मामींनी त्याचा उल्लेख केला. Happy

जागुताई मी तुला काय ग सांगणार, पन्ह्याला कसे अंदाजे घालतो तसेच. आंबट गोड चव कायम राहिली पाहिजे.

सशल, आम्ही पण अमृतखंडच म्हणतो. खूप वर्षात केलंच नाहीये.
धन्यवाद अश्विनीमामी, आठवण करून दिल्याबद्दल. करेन आता.