१) १ वाटी उडीद डाळ
२) अर्धा टिस्पून हळद
३) चार पाच हिरव्या मिरच्या
४) एक इंच आले
५) चार पाच लसूण पाकळ्या
६) मूठभर कोथिंबीर
७) साजूक तूप एक टेबलस्पून
८) एक टिस्पून जिरे
९) अर्धा टिस्पून हिंग
१०) मीठ
१) उडदाची डाळ कोरडीच गुलाबी रंगावर भाजून घ्या.
२) त्यात पाणी घालून, अर्धा तास भिजत ठेवा.
३) त्यात हळद घालून, ती शिजवून घ्या. आवडीप्रमाणे कमी जास्त शिजवा, व जरा घोटून घ्या.
४) आले, लसूण, मिरच्या व कोथिंबीर वाटून घ्या.
५) तूप तापवून त्यात हिंग जिर्याची फोडणी करा.
६) त्यात मिरची कोथिंबीरीचे वाटण टाका व परता
७) मग त्यात शिजलेली डाळ व मीठ टाकून उकळा
बाजरीची भाकरी, घुटं, ठेचा आणि दही.. मस्त बेत जमतो.
(मी मक्याची भाकरी केलीय.)
घुटं पातळसर करतात. मी फोटोसाठी घट्ट ठेवलेय.
हा मराठमोळा प्रकार आहे पण सहसा हॉटेलमधे मिळणार नाही. थंडीच्या दिवसात मस्तच लागते.
गावरान तूप असेल तर आणखीनच छान.
मिरच्या वगैरे आपल्या आवडीप्रमाणे घ्या.
ह्यात काही ठिकाणी कांदा, खोबरे घालतात पण चिंच, गूळ नसतोच,
अहाहा..!! मस्त
अहाहा..!! मस्त
छान आहे.हे घुटं न भाकरी थंडी
छान आहे.हे घुटं न भाकरी थंडी च्या दिवसात खाण्याची पद्धत आहे ना !
माझी आई करते त्या घुट्याचा
माझी आई करते त्या घुट्याचा रंग हिरवा असतो आणि त्यात ती डाळं अजिबात दिसत नाही
ते वेगळं घुटं आहे का?
रीया, तोच प्रकार हा. मला
रीया, तोच प्रकार हा. मला कुठलीच डाळ जास्त शिजलेली आवडत नाही म्हणून तशी ठेवलीय.
वाटण जास्त घेतलं, तर हिरवा रंग येईल.
हं ! मला फार आवडतं घुटं
हं ! मला फार आवडतं घुटं !
नुसतं नाव घेतलं तरी तोंपासु.
उद्याच करायला सांगते आईला
यम्मी दिसतय एकदम! उडदाच्या
यम्मी दिसतय एकदम!
उडदाच्या डाळीमुळे चिकटसर होतं का हे?
लाजो, डा़ळ भाजून घेतल्यामूळे
लाजो, डा़ळ भाजून घेतल्यामूळे अजिबात चिकट होत नाही.
रीया, आईची काही वेगळी कृती असेल, तर वाचायला आवडेल.
ए.भा.प्र. हा काळा अख्खा उडिद
ए.भा.प्र. हा काळा अख्खा उडिद ना?
व्वा नावही भारी, चित्रही भारी
व्वा
नावही भारी, चित्रही भारी आणि पदार्थही भारी
माझ्या मामेभावाने हा प्रकार
माझ्या मामेभावाने हा प्रकार मला सरप्राईज म्हणून करून खाऊ घातला होता. प्रचंड आवडला होता मला. पण मी कधी करून पाहिला नाही. आज पुन्हा आठवण झाली त्याची.
आशु, ही डाळ आहे. अख्खे उडिद
आशु, ही डाळ आहे. अख्खे उडिद नाहीत.
बेफि, माहित असणार तूम्हाला हा पदार्थ, नक्कीच.
दक्षिणा, माझ्या माहितीप्रमाणे सातारा भागातच हा पदार्थ जास्त होतो.
माझ्या माहितीप्रमाणे सातारा
माझ्या माहितीप्रमाणे सातारा भागातच हा पदार्थ जास्त होतो.
>> करेच्ट..
घुटं हे नाव ही सातारीच..
माझ्या सासु-बाई पण हिरवं वाटण घालतात यात.. आणि बहुदा आमसूल पण
घुट्याला म्हणजे आम्ही उडदाची
घुट्याला म्हणजे आम्ही उडदाची भरड(च) (सालासकट भरडलेली) वापरतो.
भारीच
भारीच
मस्त मि पण करून पाहते आता
मस्त मि पण करून पाहते आता
मस्त आहे घुटं
मस्त आहे घुटं
मी हिरव्या मुगाचं घुटं खाल्लं
मी हिरव्या मुगाचं घुटं खाल्लं आहे..
झक्कास.....
झक्कास.....
मस्त आहे फोटो आणी पदार्थ.
मस्त आहे फोटो आणी पदार्थ.
दिनेशराव, नुकत्याच हाती
दिनेशराव,
नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार तुम्हाला मायबोलीवर पाककृतीचे फोटो टाकण्याची बंदी घालण्यात आलेली आहे
तडफड होणे, जळजळ होणे, त्यातून दुष्कृत्ये होणे असे प्रकार या फोटोंमुळे वाढल्यामुळे ही कारवाई करण्यात आली
पुढील बेदरकार वर्तनास 'पुन्हा भारतात येणे' ही शिक्षा मिळेल
नोंद घ्यावी
दिनेशदा आईला
दिनेशदा आईला विचारलं
आमच्याकडे पण अशीच करतात
बेफि, भारतवारी कुठे चुकलीय ?
बेफि,
भारतवारी कुठे चुकलीय ? येणारच आहे.
रिया, आभार. खरं तर खुप वर्षांपुर्वी वाचली होती हि कृती. आठवली तशी केली. पण आता खात्री पटली.
दिनेशराव, नुकत्याच हाती
दिनेशराव,
नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार तुम्हाला मायबोलीवर पाककृतीचे फोटो टाकण्याची बंदी घालण्यात आलेली आहे
तडफड होणे, जळजळ होणे, त्यातून दुष्कृत्ये होणे असे प्रकार या फोटोंमुळे वाढल्यामुळे ही कारवाई करण्यात आली
पुढील बेदरकार वर्तनास 'पुन्हा भारतात येणे' ही शिक्षा मिळेल
नोंद घ्यावी>>>>>>>>>>>>>>>>
मस्त. आमच्याकडेपण घुटं खूप आवडतं. भाकरी,घुटं आणि लसणाची चटणी हा बेत अगदी आवडीचाय.
क्लास!
क्लास!
घुट.. घुट.... घुट..... बोलू
घुट.. घुट.... घुट.....
बोलू नका कुठ.....
झकास....
मस्तच ! आणि तसा सोपाही वाटतोय
मस्तच ! आणि तसा सोपाही वाटतोय ! करून बघायला पाहिजे !
बेफिकीर,
घुटं हे नाव ही सातारीच
घुटं हे नाव ही सातारीच >>
आम्ही लहानपणी 'घुटं घ्या घुटं - सांगु नगा कुटं" असं म्हणत घुटं ओरपायचो
पण खूप पातळ असतं घुटं आमच्याकडे आणि रंगही हिरवा..
रेसिपी वाचतानाच इतकं तोंपासु
रेसिपी वाचतानाच इतकं तोंपासु होतं कि बस नै!!!
उद्याच्याउद्या केल्याशिवाय चैन पडणार नाही..
एक प्रश्न.. उडदा ची सालं काढलेली पांढरी डाळ घ्यायचीये ना??
कारण एक सालं असलेली उडीद डाळ ही असते...
अशी डाळ अक्खी घेतली तर कशी लागेल???
वर्षू, बिनसालाचीच डाळ
वर्षू, बिनसालाचीच डाळ घ्यायची.
ओके..
ओके..
Pages