१) १ वाटी उडीद डाळ
२) अर्धा टिस्पून हळद
३) चार पाच हिरव्या मिरच्या
४) एक इंच आले
५) चार पाच लसूण पाकळ्या
६) मूठभर कोथिंबीर
७) साजूक तूप एक टेबलस्पून
८) एक टिस्पून जिरे
९) अर्धा टिस्पून हिंग
१०) मीठ
१) उडदाची डाळ कोरडीच गुलाबी रंगावर भाजून घ्या.
२) त्यात पाणी घालून, अर्धा तास भिजत ठेवा.
३) त्यात हळद घालून, ती शिजवून घ्या. आवडीप्रमाणे कमी जास्त शिजवा, व जरा घोटून घ्या.
४) आले, लसूण, मिरच्या व कोथिंबीर वाटून घ्या.
५) तूप तापवून त्यात हिंग जिर्याची फोडणी करा.
६) त्यात मिरची कोथिंबीरीचे वाटण टाका व परता
७) मग त्यात शिजलेली डाळ व मीठ टाकून उकळा
बाजरीची भाकरी, घुटं, ठेचा आणि दही.. मस्त बेत जमतो.
(मी मक्याची भाकरी केलीय.)
घुटं पातळसर करतात. मी फोटोसाठी घट्ट ठेवलेय.
हा मराठमोळा प्रकार आहे पण सहसा हॉटेलमधे मिळणार नाही. थंडीच्या दिवसात मस्तच लागते.
गावरान तूप असेल तर आणखीनच छान.
मिरच्या वगैरे आपल्या आवडीप्रमाणे घ्या.
ह्यात काही ठिकाणी कांदा, खोबरे घालतात पण चिंच, गूळ नसतोच,
जीरे अर्धवट ठेचले की ते माँम
जीरे अर्धवट ठेचले की ते माँम माँम करुन बोबडं बोलतात.
मोद, रेसेपी वर काढल्या बद्दल धन्यवाद.
ही पाकृ उडवायची राहुन गेल्री दिनेशजींकडुन. बरे झाले. 
मोद म्हणजे जामोप्या की काय?
म्हणजे ओबडधोबड ठेवणे
म्हणजे ओबडधोबड ठेवणे
अगदी वस्त्रगाळ पावडर न करणे
घुट
घुट
त्या मध्ये ज्वारी ची भाकरी कुस्करून खाण्यात वेगळीच मजा आहे.
नाही. मी कोणाचाही डुआयडी नाही
नाही. मी कोणाचाही डुआयडी नाही. जुनं सेखन शोधत असता ही वाचनात आली... आवडली.
अरे वा मस्तच दिसतंय, टेस्टी
अरे वा मस्तच दिसतंय, टेस्टी असेल.
करुन बघायला हवं.
जिरं अर्धवट ठेचलं की त्याला आम्हीही अर्ध बोबडं म्हणतो, नुसतं बोबडं नाही.
हां मलाही तोच प्रश्न पडलेला
हां मलाही तोच प्रश्न पडलेला की चिंच गूळ असतो का? पण तुम्ही आधीच त्याचे उत्तर दिलेले आहे. धन्यवाद.
Pages