ऑलिव्ह ऑईल संबंधी

Submitted by पूनम on 24 April, 2012 - 02:32

ऑलिव्ह ऑईलचा भारतीय स्वयंपाकात उपयोग कसा करतात ह्याविषयी माहिती हवी आहे. त्याआधी काही माहिती-
१) ऑलिव्ह ऑईल कधीही खाल्लेले नाही. त्याची चव कशी असते ह्याची कल्पना नाही.
२) भारतीय स्वयंपाकात, म्हणजे प्रामुख्याने 'फोडणी देणे' ह्यासाठी ते वापरता येईल का?
३) त्याची चव वेगळी जाणवते/ लागते का? रोजची भाजी, आमटी ऑलिव्ह ऑईल वापरून केली तर वेगळी लागते का?
४) त्याची फोडणी करू नये, ते तापवू नये, उलट ते कच्चंच खावं हे योग्य असेल तर कसं खाता येईल- भारतात मिळणारे पदार्थ वापरून? कुठे पाककृती असतील तर दुवा द्या, अथवा वेगळा धागा काढून लिहा कृपया.
५) अनेक प्रकारची ऑलिव्ह ऑईल्स पाहिली आहेत बाजारात. सुरूवात कोणत्या ऑऑपासून करावी?

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारताबाहेर असताना इटालियन रेस्तोरा मधे पास्ता बिस्तावर हिरवे ऑलिव्ह तेल ओतून घ्यायचो तसेच छोटे छोटे पावाचे तुकडे ऑतेलात बुडवून खायचो. कधी कधी लाल मिरच्या घातलेले लाल रंगाचे तेल असायचे.
मला तरी ती चव खुप आवडते. काही लोकांना नुसतेच कच्चे तेल आवडत नाही.
ऑतेलाचा मी स्वयंपाकात उपयोग कधी केला नाही पण इकडे अनेक अनुभवी जाणकार असतीलच.

४) त्याची फोडणी करू नये, ते तापवू नये, उलट ते कच्चंच खावं हे योग्य असेल तर कसं खाता येईल>>>ह्याबद्दल मला माहिती नाही पौर्णिमा पण जपानला असताना संपवायचं म्हणून काही दिवस मी सगळा स्वैंपाक ऑऑमध्ये केलाय. मला तरी चव, वास वेगळा नाही जाणवला.

भारताबाहेर असताना इटालियन रेस्तोरा मधे पास्ता बिस्तावर हिरवे ऑलिव्ह तेल ओतून घ्यायचो तसेच छोटे छोटे पावाचे तुकडे ऑतेलात बुडवून खायचो. कधी कधी लाल मिरच्या घातलेले लाल रंगाचे तेल असायचे.
मला तरी ती चव खुप आवडते. काही लोकांना नुसतेच कच्चे तेल आवडत नाही.
>>>>>> +१. हेच अगदी लिहायला आले होते. पिझ्झ्यावरही लाल मिरच्या घातलेले ऑऑ मस्त लागते. मी नेहमी जेवणात नाही वापरत पण सॅलड्स मध्ये आणि पास्ता करताना वापरते.

मी ऑऑ मध्ये बनवलेली भाजी खाल्ली आहे. तिची चव जास्त चांगली लागते. . जी कलिग ऑऑ वापरून भाज्या बनवायची तिने सांगितले होते की, ते इतर तेलांपेक्षा कमी प्रमाणात लागते.

आडो पण, मी पण अमेरिकेत असताना ऑऑ मेधे स्वयंपाक केलाय. मलाही नाही जाणवली निराळी चव.
सध्या पास्ता, सॅलेड इ. मधेच वापरते ऑऑ.

मी ही मागे याच ग्रूप मध्ये कुठल्याशा धाग्यावर ऑऑ संबंधी एक प्रश्न विचारला होता. त्याचे अजून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. केसांना लावायचे ते ऑऑ आणि स्वयंपाकात वापरायचे ते ऑऑ सेम की वेगवेगळे??

हेल्दी असते असं मी पण ऐकून आहे. मी पास्तामध्ये वै वापरते ऑऑच. पण भारतात बर्‍यापैकी महाग मिळते असं ऐकून आहे.

निंबुडा, सहसा केसांना लावायच्या तेलामधे अजुन काहीतरी गोष्टी असतात. बाटलीवर यादी असेल ती तपासुन पहा.
त्यात जर दुसरं काहीच नसेल तर ते सारखं असावं. नक्की नाही माहिती.

निंबे.. एक्स्ट्रा वर्जिन ऑऑ इटालियन फूड्स ,सॅलड्स मधे छान लागते..
केसांना मॉईश्चराईज करायला ही वापरू शकतेस. ड्राय केसांना वॉर्म ऑऑ चोळून्,ओलसर टॉवेल मधे गुंडाळून एखादा तास ठेवून नंतर शँपू करून टाक.

पर्सनली मला भारतीय जेवणात कोणत्याच प्रकारचे ऑऑ आवडत नाही..

अभय बंग यांच्या 'माझा साक्षात्कारी हृदयरोग' च्या शेवटच्या पानांमध्ये एक तक्ता दिलेला आहे.
वेगवेगळी तेल आणि मोनो/पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटस वगैरे.
तर त्यांचे म्हणणे नुसते ऑऑ वापरुनही फायदा नाही. मला ते पटल्याने गेली ८ वर्षे खालील तेलांचे मिश्रण वापरते. ऑलिव्ह ऑईल + कॉर्न ऑईल किंवा सोया तेल + तीळाचे तेल.
भाज्यांना वेगळा वास येत नाही.
तळणीसाठी वेगळे तेल. नुसते कॉर्न ऑईल.
भारतात ऑऑ प्रचंड जास्त महाग आहे. त्यामुळे त्या एक्स्ट्राव्हर्जिन ऑऑच्या फंदात पडले नाही.
परदेशात मात्र तेच.
http://revivelifeclinic.com/resources/foods-nutrition/fats-oils/cooking-...

पौर्णिमा, उत्तम केलंस, हा धागा सुरू केलास ते...
मलाही अनेक दिवस हेच प्रश्न पडलेत.

एका मैत्रिणीकडे एकदा ऑ.ऑ.त केलेली बिर्याणी खाल्ली होती. अजिबात तेलकट नव्हती, पण चव तितकीच छान होती. निराळा कुठला वासही जाणवला नाही.

आपल्या गोडेतेलाच्या तुलनेत ऑ.ऑ. खूप कमी वापरावं लागतं इतकं माहित आहे. (पण ऑ.ऑ.ची किंमत पाहता शेवटी पैश्यांच्या दृष्टीने हिशोब एकसारखाच होत असावा :फिदी:)

पौर्णिमा ऑऑ आरोग्यास उत्तम. कच्चं खावं, तापवू नये असं काही नाही. कच्चं आणि फोडणी सुद्धा करू शकतो, त्याला बिल्कूल उग्र किंवा वेगळी चव नसते. तेलासारखं तेल..भाज्या छान तुपकट होतात, थोडक्यात काय तर थोडंच पुरतं.
मी अ‍ॅमवेचं वापरतेय.

नॉट ओन्ली स्वयंपाक पण हिवाळ्यात त्वचा फार कोरडी होते तेव्हा ऑऑ ने मसाज केला की एकदम मऊ होते. शिवाय तिळाच्या तेलासारखा उग्र वास पण येत नाही अंगाला.

बरोबर रैना. सध्या इथे मिळणारी खाद्यतेलं आलटून पालटून वापरत आहे. त्यात ऑऑची एक बाटली आणावी असं वाटत आहे.
प्रचंड महाग आहेतच. त्यासाठीच आधी विचारलं. स्वयंपाकाच्या चवीत काही बदल कळत नाही हे वाचून हायसं वाटलं.
होलसेल मार्केटमध्ये त्यातल्यात्यात स्वस्त मिळत असावं. जसं की मुंबईचं क्रॉफर्ड मार्केट. तिथे ५ लिटरचे डबे पाहिलेत मोठे. पुण्यात शोधावं लागेल.

पौर्णिमा मी कॅनोला ऑईल हे ऑऑपेक्षा चांगलं असतं कोलेस्टरॉलसाठी असंही ऐकलंय. कोणी कितपत तथ्य आहे सांगू शकेल कां?

वर्षभराचं तेल कुणि एकदम वापरतं का? मला माहीत नाहिये म्हणून विचारतेय.
पौर्णिमा इव्हन सुर्यफूल तेल-सोयाबिन तेल, शेंगदाणा अशी कॉम्बिनेशन्स करून त्यात थोडं थोडं ऑऑ मिक्सायचं...

http://www.livestrong.com/healthy-oils/
हे अजून एक.

http://www.choice.com.au/reviews-and-tests/food-and-health/food-and-drin...

गोडेतेल किंवा डालडा पूर्वी सर्रास वापरायची पद्धत होती. ते पूर्ण म्हणजे पूर्ण बंद करा शक्य असेल तर.

पौर्णिमा मी Borges किंवा Leonardo या ब्रॅण्डचे ऑऑ भारतात असताना वापरायचे. मिक्स केल्यामुळे एक बाटली बरेच दिवस पुरते.
पाच लिटर -लागत नाही अगं एवढे, मिक्स करुन वापरायचे असेल तर.

दक्षिणा नाही. वर्षाचे तेल साठवण्याएवढी जागा आणि वातावरणही मुंबईत नव्हते.

पण ऑ.ऑ.ची किंमत पाहता शेवटी पैश्यांच्या दृष्टीने हिशोब एकसारखाच होत असावा>>> हो ना... पण आरोग्याच्या दृष्टीने जर किफायतशीर असेल तर ऑऑ नेहमीच वापरायचा विचार करायला हरकत नाही. मागणी वाढली की किंमतही खाली येईल अशी आशा Wink

http://www.maayboli.com/node/9538 - इथे स्वयंपाकात वापरायच्या तेलाविषयी खूप छान चर्चा आहे, पण ठोस निर्णयापर्यंत कोणीच पोचलेलं नाही Proud
तसेच रैना म्हणते आहे तो अभय बंगांच्या पुस्तकातला तक्ता बस्केने या बाफवर स्कॅन करून टाकला आहे.

१ मिनीट.. वेगवेगळी तेलं वापरायची ना? की ती मिक्स करायची?? मी आलटुन पालटुन आणते सनफ्लॉवर, राईस ब्रान, शेंगदाणा.

ओके, कावळ्यात एकत्र करायची कल्पनाही चांगली आहे.
धन्यवाद सर्वांचेच!

मन्जू बघते तो दुवा, धन्यवाद.

मी एक लिटरची पिशवी आणते एकेका प्रकारची. आता दक्षिणा/ रैना त्यातच ऑऑ घालावं असं म्हणत आहेत (ना?)

ओह.. मी वेगवेगळी वापरते. मग मिक्स करायच प्रमाण काय आहे??

मंजू, मला खरच फरक पडत नाही ग. Happy आणि सुदैवाने घरीही कुणाला काही तेल बदललय असं कळत नाही. Proud

अमृता,
बंगाच्या पुस्तकात आहे बहुतेक. मी तिन तेलं समप्रमाणात मिक्स करते. साधारण आठवडाभराचा स्वयंपाक कावळ्यातल्या तेलाच्या वर जाऊ देत नाही. मातोश्री आणि सासुबाई दोघी आल्या की गिवप मारते.

पूनम,
तिन पिशव्या तिन वेगळ्या बाटल्यात/बरणीत भरुन ठेवायच्या. आठवड्याच्या तेलाच्या कावळ्यात डायरेक्ट अंदाजे एकत्र करायचे. माझ्या काचेच्या फॅन्सी कावळ्यावर मोजायची पट्टी होती.
http://i00.i.aliimg.com/photo/v0/422668214/glass_kitchenware_oil_contain...
कोणाला तसले कावळे हवे असल्यास सांगुन ठेवा इकडुन पाठवेन.
भारतातही मिळतात.

पौर्णिमा हो मोठ्या बरणीत २ तेलं मिक्स केलीस त्यातच ऑऑ मिक्स केलं तरिही हरकत नाही. कावळ्यात किती वेळा खेळत बसणार?

Pages