ऑलिव्ह ऑईल संबंधी

Submitted by पूनम on 24 April, 2012 - 02:32

ऑलिव्ह ऑईलचा भारतीय स्वयंपाकात उपयोग कसा करतात ह्याविषयी माहिती हवी आहे. त्याआधी काही माहिती-
१) ऑलिव्ह ऑईल कधीही खाल्लेले नाही. त्याची चव कशी असते ह्याची कल्पना नाही.
२) भारतीय स्वयंपाकात, म्हणजे प्रामुख्याने 'फोडणी देणे' ह्यासाठी ते वापरता येईल का?
३) त्याची चव वेगळी जाणवते/ लागते का? रोजची भाजी, आमटी ऑलिव्ह ऑईल वापरून केली तर वेगळी लागते का?
४) त्याची फोडणी करू नये, ते तापवू नये, उलट ते कच्चंच खावं हे योग्य असेल तर कसं खाता येईल- भारतात मिळणारे पदार्थ वापरून? कुठे पाककृती असतील तर दुवा द्या, अथवा वेगळा धागा काढून लिहा कृपया.
५) अनेक प्रकारची ऑलिव्ह ऑईल्स पाहिली आहेत बाजारात. सुरूवात कोणत्या ऑऑपासून करावी?

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह सप्रि डोळ्यात तेल घालुन वाचावी लागणार तुम्ही दिलेलै माहिती ...:)
आभार्स .. बघते आता ही बाट्ली तर संपेल इतक्यात ..
सलाड ड्रेसिंगच माझं पण वेगळ ऑओ आहे

थोड्क्यात एक नवीन अभ्यास सुरु आता आणखी काय...:)

तूप, लोणी, साय, - घरचे, विकतचे कसेही असू दे, त्यामधे सॅच्युरेटेड फॅट जास्त असतेच.
त्यामुळे त्या तुलतेत तेले बरी. वैविध्य असू दे. पण मिसळून नका वापरू. ऑऑ कच्चे चांगले, कॅनोला, सन्फ्लावर तळणीसाठी. भारतीय स्वयंपाकातील खमंग फोडणी हा प्रकार ऑऑसाठी चांगला नाही - त्यामधे तेल चुकीच्या तपमानापर्यन्त गरम होते. पर्यायाने त्यातील उपयुक्त घटक मरतात. त्यामुळे मी फोड्णी साठी इतर तेलेच वापरते. ऑऑ वापरले तर फार तापवत नाही. शिजवलेल्या पदार्थांची चव फार बदलत नाही. कच्चे वापरले तर एक वेगळा स्वाद जाणवतो, मला फार आवडतो.
साबुदाण्याच्या खिचडीत मात्र मला ऑऑची चव नाही आवडली. तूपाची खिचडी तब्येतीला फार वाईट असते.

धनश्री तुपाशिवाय खिचडीला खिचडिपण येत नाही न... Happy
मागे दिनेशदांनी सुचवल्याप्रमाणे QUinoa ची खिचडी करते तूप कमी चालतं

ह्यातून मिळणारे तेल हे Good cholesterol म्हणून शोधले गेलेले आहे. >>

कुठल्याही वनस्पतीजन्य पदार्थात कोलेस्टेरॉल नसते. डायेटरी कोलेस्टेरॉल ( आपल्या आहारातून शरीरात जाणारे ) हे फक्त प्राणिज पदार्थात असते - अंडी, दूध, मासे, मटण इत्यादी .

इथे अनेक पदार्थांचं न्यूट्रिशनल अनॅलिसिस आहे, गरजूंनी खात्री करून घ्यावी . खोबरेल तेल अन डालडा सदॄश व्हेजीटेबल शॉर्टनिंग यात सुद्धा कॉलेस्टेरॉल नाही.

http://ndb.nal.usda.gov/ndb/foods/list

कॉलेस्टेरॉलचा एकही कण आहारात नसला तरी सुद्धा शरिरात कॉलेस्टेरॉल निर्माण होत असते.

हे वेब एम डी मधल्या या लेखातून http://www.webmd.com/food-recipes/features/cholesterol-food

In a review of studies in which volunteers were fed eggs, researchers found that lowering the amount of dietary cholesterol by 100 milligrams a day resulted in only a 1% reduction in blood cholesterol levels. Replacing saturated fat with unsaturated fat had a much more beneficial effect on cholesterol.

रुम टेम्परेचरला घनरूप असणारे किंवा जराशा थंडीत गोठणारे स्निग्ध पदार्थ यांच्यात सॅचुरेटेड फॅट्स जास्त असतात . उदा खोबरेल तेल, डालडा, शॉर्टनिंग ( क्रिस्को ) वगैरे

वरच्या न्यूट्रिशनल अनॅलिसिस साइटवर आता खोबरेल तेल, पाम तेल , ऑऑ यांच्यातल्या सॅचुरेटेड फॅटी अ‍ॅसिड्सची तुलना करून पहा. मग ऑऑ हार्ट हेल्थ च्या दृष्टीने का चांगले मानले जाते हे कळेल.

छान माहिती मेधा. लिंक वाचतो आहे.

मी अनेक पुस्तकात असे वाचले आहे की जेवणात कारळाची चटणी, जवसाची चटणी खाल्ल्याने good cholesterol वाढते. रोज चालण्याची क्रिया, धावण्याचा व्यायाम केल्यानी good cholesterol वाढते.

बहुधा दोन तेलं एकत्र करू नयेत असाच मतप्रवाह दिसत आहे. एकाच वेळी विविध पदार्थांना वेगवेगळी तेलं वापरली तरी चालतील असं दिसतंय. (मी ही पद्धत अनुसरून बघणार आहे आता)

सनफ्लावर ऑईल शरीराला कित्पत चांगल असत? >>
मलाही हाच प्रश्न पडला आहे. मी फॉर्च्यून किंवा जेमिनी सनफ्लावर ऑईल हेच एकुलते एक तेल वापरते. मध्ये जरा बदल म्हणून धारा चे शेंगदाणा तेल आणले होते. तर पोळ्यांना, भाजीला वेगळा गोडेतेलाचा वास लागतो म्हणून मोदकने भंडावून सोडले. त्यामुळे परत कधीच शें.ते. आणले नाही.
(धागा ऑऑ संबंधीचा आहे म्हणून हा प्रश्न इतके दिवस विचारत नव्हते!)

सन्फ्लॉवर ऑईल चांगले आहे, काळजी नसावी.
जाहीराती पाहून आपण थोडे प्रभावित होतो.
मी ही आलिकडे सफोला गोल्ड वापरतेय. आधी तर जेमिनी सोया आणि सनफ्लॉवर वापरायचे.

कोणतंही एकच तेल चांगलं अथवा वाईट नाही. त्याचा वापर किती करतोय तेही पहायला हवे. त्याच्या बाजूने आणि विरुद्ध अ नेक गोष्टी सांगता येतील.
पण वेगवेगळ्या तेलांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात. त्या सर्वांचा फायदा व्हावा म्हणून खाद्यतेलं आलटून पालटून वापरावी असा सल्ला नुकताच मिळाला. मीही सूर्यफूल तेलच वापरत आहे इतकी वर्ष, न बदलता. पण आता बदलून पहायला काहीच हरकत नाही असं वाटतं.

मी फॉर्च्यून किंवा जेमिनी सनफ्लावर ऑईल हेच एकुलते एक तेल वापरते >>>>> मी ही

आता वापरायचे कोणते ??????

गोंधळ उडालेली बाहुली:................

ईथली माहिती वाचुन खरेच गोंधळ होतोय... Sad
पण हे करता येण्यासारखे....
* तेल न मिसळता वापरणे.
* ऑऑ न तापवता वापरणे. जसे सॅलडमधे, पोळ्या भाजून झाल्यावर त्यावर जरासा तेलाचा ब्रश लवणे,(मी पीठ मळताना, अन पोळ्या करताना देखिल अजिबात तेल वापरत नाही. पण बी यांच्या माहितीप्रमाणे..... पोळ्यांना तेल जरुर लावावे. कोरड्या पोळ्या खाल्ल्यांनी शरिरात वात निर्माण होतो. म्हणून पोळ्यांना तेलाचा हलका हात जरुर द्यावा.) माझा रोजचा स्वयंपाक ऑऑ मधे करते. पण आता फोडणीसाठी वेगळे तेल वापरावे म्हणते, पण मोहरी-जिरे तापलेल्या तेलात न टाकताही (तेलाशिवाय) छान तडतडतात. त्यामुळे तसेच भाजून वापरेन मग त्यासाठी तेल जास्त तापवावे लागणार नाही.
* तळण्यासाठी canola तेल वापरते. त्यात बदल नाही. तसेही वर्षातून जास्तीत जास्त ४ वेळा तळणे होते तेही नवर्याच्या फर्माईशीमुळे. तळण्याचा मला जाम कंटाळा येतो Happy

मोकिमीरा.......माझा हात तेल आणि साखरेला जरा आखडता आहे. मी गोड पदार्थ बनवायच्या भानगडीत पडत नाही. अगदी चहातही साखर घालताना हात आखडतो. जास्त तेलकट आणि गोड पदार्थ मी खाउ शकत नाही>>> अगदी अगदी. माझा हात तेल, साखर आणि मीठाला सुद्धा आखडता आहे. Happy आता उसगावात आल्यापासून तिखट खाणेही कमी झाले आहे.

आज ग्रोसरी आणायला गेले, तेल यादीत होते. तर ही सगळी चर्चा आठवत
माझा पुतळाच झाला थोडावेळ. शेवटी वेगळे ट्राय करायचे म्हणुन
कॅनोला आणले. Happy

वेगवेगळ्या तेलांमधे मोनो/पुलीअनसॅचुरेटेड फॅट्स चे प्रमाण वेगवेगळे असतेच, पण त्याही पेक्षा मुख्य म्हणजे कोणत्या तापमानावर ते सॅचुरेटेड मधे बदलते हे आहे (पुन्हापुन्हा तेच तेल फोडणीला वापरायचे नाही, डीपफ्राय करायचे नाही, कारण आधी असलेले चांगले फॅट्स त्यामुळे चांगले रहात नाहीत)

ऑलिव्ह ऑईल मधे हे कन्वरशन जास्त तापमानावर होतं म्हणून ते तेल चांगलं. तेल मिक्स केलेत तर तो फायदा थोडा कमी होणार (इतर तेलांमधील कन्वरशन मुळे).

त्यामुळे इतर तेलं कच्ची खावीत - खायचीच असली तर - (चटणीवर वगैरे) आणि ऑऑ फोडण्यांकरता वापरावे.

माझ्यामते पारंपरिक सात्विक जेवणाचा जर रोजच्या आयुष्यात अवलंब केला तर उगाच आहाराविषयक असलेले भयप्रद प्रश्न पडणार नाही. अलिकडच्या फ्युजन पाककृतींच्या वाटेला तर मुळीच जाऊ नये. शेकडो वर्षांपासून आपल्या पुर्वजांनी ज्या खायच्या प्यायच्या पद्धती शोधून काढल्या आहेत त्या मला आवश्यकतेपेक्षा अधिक पुरेशा वाटतात. उगाच हे नि ते ट्राय करुन स्वतःच्या शरिरावर अत्याचार करणे आहे. कारण आपले शरिर हे आपल्या सभोवतीचा निसर्ग, आपली गुणसुत्रे, आपले हंगामी फळ भाज्या ह्यानुसार वाढत असते. त्याचा विचार आपण न करता अमेरिकेत हे खातात म्हणून आपणही ते खायचं अशा चुकीच्या वाटेनी आपण जात असतो. ते टाळावं. अधूनमधून म्हणता म्हणता हल्ली दर आठवड्याला आपले पाय रेस्टॉरंटकडे वळतात. पार्ट्या काय असतातच. घरी जंक फुड पण असते. हे सर्व १००% टाळायला हवे.

ऑऑ फोडण्यांकरता वापरावे>> अरे देवा! हे काय नवीन?! मी असं वाचून आहे की ऑलिव्ह ऑईलचा स्मोकिंग पॉइंट (म्हणजे ज्या तापमानाच्या वर तापवलं तर तेलात free radicals तयार होतात ते तापमान) कमी असतो म्हणून तळणे, फोडणी याला ते योग्य नाही. आशिष, हे चुकीचं आहे का?

तुम्ही कुणी Grape Seed Oil याबद्दल ऐकलं आहे का? मागे एकदा वापरलं होतं मी मला खरं म्हणजे सगळी तेलं सारखीच वाटतात..एक सरसों चा सोडला तर जनरली वास बिस प्रश्न नाही आहे.
पण मी विचार करत होते की तीन महिने ऑऑ वापरायचं म्हंजे विकत घ्यायला ऑऑ च्या फ्याक्टरीतच जावं लागेल ताजं ताजं द्या म्हणून...
Grape seed जर आरोग्यासाठी बरं असेल तर मग ऑऑ ला बुट्टी देता येईल....
अवांतर ह्र्दयरोगतज्ज कुठलंही तेल हे शेवटी बेतानेच वापरावं असा सल्ला देताना वाचलं आहे ...

सप्रि: ऑऑ तळणे, फोडणी याला ते योग्य नाही >>>> अनुमोदन (आत्तापर्यंत वाचल्या प्रमाणे)..
>>> हे चूक वाटत आहे कारन मी हॉलंडमधे असताना ऑऑमधे तळलेले फलाफल खाल्लेले आहेत. तसेच फ्रेन्च फ्राईज पण खाल्लेले आहेत.

आता तेल कोणते वापरायचे ? ते हा धागा पूर्ण झाल्यावरच ठरवावे लागेल ......तोपर्यंत ...Sunflower oil ( सध्या घरी ते च आहे ...)

नाही बी. ह्या (म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी) बाबतीत अज्ञान दाखवणं महागात पडू शकतं. उलट इतकं ज्ञान उपलब्ध आहे, ते डोळे उघडून वाचलं/ ऐकलं तर फायदाच होईल.

शृष्टी१४, मला वाटतं शक्यतो स्वयंपाकात तेलाचा वापर कमी करणे आणि वेगवेगळ्या प्रकारची खाद्यतेलं आलटून पालटून वापरणे हे आपण करू शकतो.

Pages