ऑलिव्ह ऑईल संबंधी

Submitted by पूनम on 24 April, 2012 - 02:32

ऑलिव्ह ऑईलचा भारतीय स्वयंपाकात उपयोग कसा करतात ह्याविषयी माहिती हवी आहे. त्याआधी काही माहिती-
१) ऑलिव्ह ऑईल कधीही खाल्लेले नाही. त्याची चव कशी असते ह्याची कल्पना नाही.
२) भारतीय स्वयंपाकात, म्हणजे प्रामुख्याने 'फोडणी देणे' ह्यासाठी ते वापरता येईल का?
३) त्याची चव वेगळी जाणवते/ लागते का? रोजची भाजी, आमटी ऑलिव्ह ऑईल वापरून केली तर वेगळी लागते का?
४) त्याची फोडणी करू नये, ते तापवू नये, उलट ते कच्चंच खावं हे योग्य असेल तर कसं खाता येईल- भारतात मिळणारे पदार्थ वापरून? कुठे पाककृती असतील तर दुवा द्या, अथवा वेगळा धागा काढून लिहा कृपया.
५) अनेक प्रकारची ऑलिव्ह ऑईल्स पाहिली आहेत बाजारात. सुरूवात कोणत्या ऑऑपासून करावी?

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे दोन कण :

- ऑऑ शक्यतो कच्चे वापरावे (वरती एक दोन जणांनी कारणे दिली आहेत), सॅलॅड वगैरे ना!
- माणशी अर्धा किलो/लिटर तेल महिन्याला - माझ्या डॉक्टरांनी दिलेला सल्ला - त्यांचे म्हणणे की या कोट्यात तुम्ही तळण मॅनेज करू शकत असाल तर करा
- सर्व तेले आलटून पालटून वापरावीत म्हणजे सर्व तेला तील चांगली तत्वे मिळतात

हे सर्व करत असताना बाहेर चे खाणे फक्त "विशेष वेळांसाठी" जपून ठेवा, महिन्यातून एकदा फार्फार तर दोनदा! नाहीतर घरच्या स्वयंपाकाला अर्धा किलो महिनाभर वापरतो असे म्हणायचे आणि महिन्यातील दहा वेळेला बाहेर खायचे, बाहेरच्या खाण्यातून शरिरात गेलेल्या तेलाचा काही हिशोबच नाही

शिवाय मुख्य म्हणजे बाहेर जे तेल वापरले जाते ते शक्यतो स्वस्त (ज्याची आरोग्याच्या दॄष्टीने उपयुक्तता नाही), कदाचित वरचेवर तळणासाठी वापरले गेलेले असे असते त्यामुळे बाहेरचा तळलेला पदार्थ घरच्या तळलेल्या पदार्था पेक्षा कैक पटीने हानिकारक असू शकतो

इटालियन लोक ऑऑ सर्व पदार्थांसाठी कच्च्या रूपात आनि शिजवताना वापरत असतील ही पण तिकडे ते सहजी उपलब्ध असते म्हणून - अगदी ते हेल्दी आहे हा विशेष विचार करून नव्हे.

आणि दोन्ही प्रकाराने खाल्याने त्यातील विशेष आरोग्यकारी तत्वे (जी कच्चे खाताना जास्त मिळतात ) त्यांना मिळून जातातच.

शिवाय तिकडचे डोंगराळ हवामान इ. ला भरपूर तेल आणि चीज हे साजेसे आहे. पण इकडे शहरात राहून बुड पण न हलवता आपण त्याच प्रमाणात खाल्ले तर ते आपल्याला मानवणार आहे का याचा विचार करावा.

शिवाय आंधळे पणान मार्केटीम्ग ला न भुलता सारासार विचार करावा.

एक्स्ट्रा वर्जिन ऑऑ हे त्याच्या विशिष्ट चव, उग्र गंधासाठी प्रसिद्ध आहे म्हणुन च महाग पण आहे. पण तुम्ही त्याला तळायच्या तापमाना ला गरम केले तर त्याचे ते सगळे विशेष गुण त्या तापमानाला नष्ट होणार मग कशासाठी ती जास्त किंम त द्यायची?

त्यापेक्षा इकडे सहज उपलब्ध असलेले (आणि जवळ पास तसेच गुणधर्म असणारे) आणि म्हणुनच स्वस्त असणारे दुसरे तेल वापरा ना! मला राईस ब्रान किंवा सनफ्लॉवर चे पण चांगले वाटते तसे.

सोयाबीन
सनफ्लॉवर
व्हेजिटेबल (मिश्र असते - हे मी नंतर बाद केले कारण त्याचे आरोग्य विषयक गुणधर्म मला तितकेसे चांगले वाटले नाहीत - चव ठिक आणि सर्वात स्वस्त ७० रू किलो)
फिल्टर्ड शेंगदाणा ( सफोला वगैरे)

असे मी सध्या आलटून पालटून ( एका महिन्यात हे पुढच्या महिन्यात दुसरे अशा प्रकाराने - मिसळून नव्हे)
वापरते.

एकदा सरसो पण वापरून पाहणार आहे आवडले तर यादीत ते पण समाविष्ट करायचे.

अजून कोणते चांगले आहे का?

माझ्याकडे फिगारोचे ऑऑ आहे.
ते खाण्यासाठी वापरता येइल का ???
की खाण्याचे आनि स्कीन साठी वापरायचे वेगवेगळे असते ????

इथे विचारणे चुकेल कदाचित तरिही - ऑलिव्ह, शेंगदाणा, तीळ आणि मोहरी वगळता बाकीची कोल्ड प्रेस्ड तेले - सूर्यफूल, कॅनोला, राईसब्रान इत्यादी. मुंबईत मिळतात का? कुठे?

लहानपणी आम्ही करडीचे तेल (घाण्यात काढून गाळुन घेतलेले) त्याची चव छान असायची, अजून आठवते!

ते तब्येतीला चांगले असते असे आजी - आजोबा सांगत.

आता तर ते दुर्मिळच झाल्यात जमा आहे. बाकी जेंव्हा दिसते तेंव्हा आवर्जून घेतो.

ऑऑ हे परदेशी असतांन्नाच खाल्ले! ठीक वाट्ले...पण आपल्या तेलांची चवच बरी.

यक्ष करडईचे तेल आम्हीही लहानपणी खाल्ले आहे Happy फक्त फोडणीत ते चांगले तापवावे लागते जरा कच्चं राहिलं की वास येतो Sad

यक्ष करडईचे तेल आम्हीही लहानपणी खाल्ले आहे >> +१

पीठले , चटणीवर कच्चे तेल म्हणजे स्वर्ग Happy

@ वल्लरिच .. हो .. कुठल्याही सुपर मर्केट , किराणा दुकान , ऑईल डेपो मध्ये सहज मिळतात...
तुम्ही नेहमिचे ऑईल जिथुन घेता तिथेच विचारा मिळेलच..

वेल, घाण्यावरची तेले मुंबईत मिळण्याचं ठिकाण सापडलं का? मलाही सांग प्लीज.

हा धागा परत वाचून सरळ २-४ प्रकारची तेले थोड्या थोड्या प्रमाणात आणून ठेवावी यावर शिक्कामोर्तब होतंय माझं.
घाण्यावरचे करडई
घाण्यावरचे खोबरेल
राइस ब्रॅन ऑईल
लाइट ऑलिव्ह ऑइल (मला याचा स्वाद कोशिंबीरींना वरून फोडण्या घालतो त्यासाठी आवडतो)

हे सगळं एकेक लिटर आणून ठेवलं तरी मला ६ महिने किमान जाईल (स्वैपाकात तेल अगदी कमी वापरते. महिन्यातले ५-६ दिवस तरी आम्ही दोघे बाहेरगावी असतो) Happy

अमेरिकेत एक हॉटेल मध्ये बारीक चिरलेले लसूण ऑलिव्ह तेलात घालून ठेवले होते.आम्ही गेल्याबरोबर त्यांनी पाव आणले.ते ह्या तेलात बुडवून खाल्ले.नन्तर खाण्याची ऑर्डर दिली.मला तेंव्हा ते आवडले होते.

Pages