ऑलिव्ह ऑईल संबंधी

Submitted by पूनम on 24 April, 2012 - 02:32

ऑलिव्ह ऑईलचा भारतीय स्वयंपाकात उपयोग कसा करतात ह्याविषयी माहिती हवी आहे. त्याआधी काही माहिती-
१) ऑलिव्ह ऑईल कधीही खाल्लेले नाही. त्याची चव कशी असते ह्याची कल्पना नाही.
२) भारतीय स्वयंपाकात, म्हणजे प्रामुख्याने 'फोडणी देणे' ह्यासाठी ते वापरता येईल का?
३) त्याची चव वेगळी जाणवते/ लागते का? रोजची भाजी, आमटी ऑलिव्ह ऑईल वापरून केली तर वेगळी लागते का?
४) त्याची फोडणी करू नये, ते तापवू नये, उलट ते कच्चंच खावं हे योग्य असेल तर कसं खाता येईल- भारतात मिळणारे पदार्थ वापरून? कुठे पाककृती असतील तर दुवा द्या, अथवा वेगळा धागा काढून लिहा कृपया.
५) अनेक प्रकारची ऑलिव्ह ऑईल्स पाहिली आहेत बाजारात. सुरूवात कोणत्या ऑऑपासून करावी?

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर स्वयंपाकात वापरणार असाल तर तेलं मिक्स करू नका. प्रत्येक तेलाचा उत्कलनबिंदू वेगवेगळा असतो. आलटून पालटून वापरा.

कच्ची घाणीचं मस्टर्ड ऑईलही मला आवडतं. कारल्याचे काप करायला मस्त लागतं.

मी सध्या लिओनार्डो आणि ऑलिटालिया अशा दोन वेगवेगळ्या कंपन्यांची एक्स्ट्रॉ व्हर्जिन ऑऑ वापरत आहे.

थँक्स रैना, माझ्याकडे टपरवेअरचा कावळा आहे. त्यावर मोजायची पट्टी होती खरी पण कालमानापरत्वे ती आता पुसली गेली आहे. त्यामुळे मी पण अंदाजेच मिक्स करेन. Happy

आत्ताच गेल्या आठवड्यात ५ लिटर सुर्यफुल तेल आणलं. Sad

मंजू अ‍ॅक्चूली फार आयडीयल सिच्यूएशन म्हणजे म्हणे एक लिटर चार जणांच्या कुटुंबाला पुरायला हवं महिनाभर.. Uhoh
इम्पॉसिबल आहे ते. Sad
पण मी ट्राय करावा म्हणते, त्यासाठी विशिष्ट भांडी वापरावी लागतील पण, ज्यात अन्न चिकटणार नाही. पण कणिकेत मात्र तेल सढळ हातानेच घालावे लागते. नै का?

मामी, केलास ना परत घोळ?? Proud आत्ता मी मिसळण्यावर आले होते.

रच्याक, मागे किरणच्या ऑफिसमधे एक न्युट्रिशनिस्ट आली होती तिने तेलं आलटुन पालटुन वापरायला सांगितलेली. तेव्हापासुन मी तसं वापरत्ये.

महिन्याला माणशी एक लिटर हे प्रमाण डॉक्टरांनी सांगितले आहे. तीन मोठी माणसं असतील तर महिन्याला तीन लिटरपेक्षा जास्त तेल वापरू नये. त्यापेक्षा जास्त लागत असेल तर तुम्ही तेलकट खाताय.

दक्षिणा, एकच लिटर??? Uhoh सर्व वेळचा स्वयंपाक घरात होत असेल तोही भारतीय पद्धतीने, तर अशक्य आहे हे.

ऑऑ चा फ्लेवर किंचित वेगळा असतो. हेल्थ म्हणून बघत असाल तर एक्स्ट्राव्हर्जिन सगळ्यात बेस्ट. ए व्ह म्हणजे थोडक्यात अगदी पहिल्या धारेचे. सगळे फायदे त्यात जास्त मिळतात.

ऑऑ जास्त तापवू नये म्हणतात त्यामुळे तळण्या वगैरे करू नयेत. मी कोशिंबीरींना वरून फोडणी घालायची असेल तर ऑऑ वापरते. एरवी सगळ्या देशी स्वैपाकाला राइसेला. काही कोकणी गोष्टी करायच्या तर खोबरेल तेल. तळण्या नसतातच. आणि मुळात तेलाचे प्रमाण पण कमी केलेले आहे.

इटालियन किंवा मेक्सिकन काही असेल करायचे तर ऑऑ. ऑऑ + लसूण + हर्ब्ज (बेसिल, ओरेगानो इत्यादी) असा एकत्रित फ्लेवर एकदम ऑथेन्टिक इटालियन येतो.
कधी कधी भाज्या मावे-कॉम्बो मधे बेक करायच्या तर तेव्हाही ऑऑ सगळ्या भाज्यांना पुसते वरून.

माझी मेक्सिकन राइसची रेसिपी बघ त्यात आहे ऑऑ चा वापर. तसेच लाजोच्या पास्ता रेस्पी कलेक्शनमधे माझीही एक रेस्पी आहे त्यातही आहे.

जर स्वयंपाकात वापरणार असाल तर तेलं मिक्स करू नका. प्रत्येक तेलाचा उत्कलनबिंदू वेगवेगळा असतो. आलटून पालटून वापरा.<<
अगदी मी पण हेच सांगणार होते पण ते कारण एक्झॅक्ट सांगता येत नव्हतं.

पण कणिकेत मात्र तेल सढळ हातानेच घालावे लागते. नै का?<<<
नाही. सढळ हे सापेक्ष आहे म्हणा पण दोन माणसांच्या दिवसभराच्या पोळ्यांना दोन-तीन चहाचमचे तेल हे सढळ आहे की नाही माहित नाही. मी एवढंच घालते.

मी बर्‍याचदा ऑऑ वापरते अगदी नेहेमीच्या तेला सारखं. मला काहीच वेगळं वाटलं नाही. तसही आमच्या कडे तेल वापरायचे प्रमाण बेताचे आहे. अगदी तळायच्या गोष्टी पण महिन्या तुन एखाददा केल्या जातात. मी सफोला गोल्ड आणि ऑऑ मिक्स वापरते. ६ जणांच्या फॅमीली ला मला २ लिटर एकुण तेल लागतं महिन्याला. त्या मुळे ऑऑ दर महिन्याला १ लिटर लागत, आणि परवडतं. पवईला सुपर मार्केट मध्ये मिळतं.

घरातल्या सगळ्यांचं आकारमान आणि साबां ना असणारा थोडा ह्रुदयाचा त्रास ह्या मुळे ऑऑ पसंत करते

फोडणीला घालताना एक किंवा दीड चमचाभर च वापरते. माझा हात तेल आणि साखरेला जरा आखडता आहे. मी गोड पदार्थ बनवायच्या भानगडीत पडत नाही. अगदी चहातही साखर घालताना हात आखडतो. जास्त तेलकट आणि गोड पदार्थ मी खाउ शकत नाही. ज्या जेवणात पुरी असेल, तिकडे काय खायचे हा प्रश्ण मला नेहेमी पडतो.

पौर्णिमा.... मस्त ऑऑ वापर फोडणी बीडणी साठी. काहीही चव वेगळी लागत नाही. मुळात घालायच च कमी.

जपानमधे रोज सगळ्या स्वयंपाकाला ऑऑ वापरायचे. काहीच वेगळे वाटायचे नाही.
इथे प्रचंड महाग आहे. पाव लिटरचे दिडशे रु. वगरे.
एका वेळेला वेगवेगळी तेले वापरायची असतील तर फोडणीला वेगळे, भाजीला वेगळे, चपात्यांना वेगळे असे वापरता येईल.
भारतीय स्वयंपाकात ऑऑ चपात्यांना मधे लावायला, पिठ मळायला, चटणीवर कच्चे, डांगरावर कच्चे असे घालुन खाता येईल. ( सर्व स्वयंपाक करायचा नसल्यास)

मी वाचले आहे कि मोठ्या माणसांना दर डोई साधारण पाऊण लिटर तेल एका महिन्याला. यापेक्षा जास्त अजिबात नको. नॉनव्हेज नेहेमी खात असल्यास यापेक्षा कमी.

पौ, तुझे आणि तुझ्या घरातल्यांचेही नाक किती तीक्ष्ण आहे?
माझ्या आजीला लोणी विकत आणून केलेलं तूप आणि पूर्ण घरी केलेलं तूप हे पानात वाढल्यानंतर जो वास येतो तेवढ्यावरून कळतं. मला वस्तू खराब होणार असेल तर आधीच लक्षात येते कारण तो वास बदलायला सुरूवात होते. असं काही असेल तुझं तर ऑऑ चा फ्लेवर वेगळा नक्की कळेल. किंचित शार्प आणि खमंग असतो. पण मला तो जाम आवडतो.

नी, तूप तर मलाही कळतं ग. Happy शिवाय माझ्यापेक्षा नवर्‍याचं नाक जास्त तीक्ष्ण आहे. जर्रा वस्तू खराब होत्ये अशी शंका आली की लगेच त्याला कळतं. पण हे तेलाचं नाही कळत. कदाचित आम्हला वाईट वास लगेच कळत असावेत किंवा तेलाच्या वासाची फारशी चिकित्सा केली नसेल. आता करेन म्हणते. Happy

मला बर्‍यापैकी धाकधूक होती, पण आता आणेनच ऑऑ. इतक्या जणींनी सांगितलंय की वापरायला हरकत नाही, तर एकदा वापरून बघूच आणि मग ठरवू Happy त्याच्या फायद्यांकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. समजा फोडण्या करून नाही आवडलं, तर कच्चं वापरता येईलच.
परत एकदा अनेकानेक धन्यवाद Happy

बंगांच्या पुस्तकात आहे माणशी तेलाचे प्रमाण. आमचे कधीच त्यावर जायचे नाही त्यामुळे विसरले. बस्के आली की पुस्तकात पाहुन तिला सांगता येईल.

मामी,
Uhoh पण लिहिले तर तसेच होते. थांबा लोकहो, पुन्हा वाचून कोणीतरी सांगु दे, मग करा.
आमच्या खानदानातल्या डॉक्टरांनी असेच करायला सांगीतले होते.

मामी म्हणतायेत ते बरोबर असेल तर
एका वेळेला वेगवेगळी तेले वापरायची असतील तर फोडणीला वेगळे, भाजीला वेगळे, चपात्यांना वेगळे असे वापरता येईल. >> हे स्वप्नाली म्हणते ते करता येईल.

माणशी महिन्याला पाऊणलिटर- हे स्वप्नालीने लिहिलेले, फारतर पौर्णिमाने लिहीलेले एक लिटर हे योग्य वाटते. आमचे कधीच जात नाही त्यावरती.
मुळात तेलात थबथबलेले काहीच केले नाही की एवढे तेल पुरेसे आहे. तवंग, तर्री नको (असलि तरी क्वचित). भाजी पानात वाढली की तेल लागता कामा नये ताटाला/ डब्याला/ कशालाही.

त़ळण बंदच असते. वर्षातून तिनचार वेळा होत असेल फारतर.

कणकेलाही नाही लागत सढळ हाताने. Happy

घरचे तूप मात्र वापरतो. तुपाची सवय जात नाही मात्र.

तेलाचा वापर कमी व्हावा म्हणुन मी नॉन्स्टिक वापरते बरीच वर्षे. वर्षाच्या वर्षाला कढया नियमीत बदलते त्या.
पण इथे आता पब्लिक म्हणतय की वापरु नये, तर बदलुन पाहणार आहे.

पूनम बरं झालं धागा उघडलास.. मी मध्ये गेले होते ऑऑ घ्यायला.. बरेच प्रकार, कंपन्या आणि किंमती बघुन नीट विचारुन मगच आणावं असा विचार करत परतले.
आम्ही दोघंच असतो तेव्हा महिन्याला साधारण १ लि.तेल लागतं.. रोज २ वेळा स्वयंपाक, भारतीय नाश्ता फक्त वीकांताला.. महिन्यातुन ७-८ वेळा बाहेर जेवण (कॅन्टीन वा हॉटेल). अर्थात तळण २-२.५ महिन्यातुन एखाद्यावेळी. हे जास्तच कमी झालं की काय? Uhoh

पण कणिकेत मात्र तेल सढळ हातानेच घालावे लागते. नै का?>>>
मी १० पोळ्यांच्या कणकेला १/२ चहाचमचा तेल घालते. पोळ्या अजुन मऊ व्हाव्यात म्हणुन हवंतर दुध घाला पण खूप तेल घालु नका असं ऐकलंय.

मी तो दुसरा बाफ वाचुन काढला.. कन्फ्युजन अजुनच वाढले. Sad
राइसेला ऑइल म्हणजे?

मी पण वापरत होते ऑ ऑ २००२ मधे जेव्हा नवर्‍याचे कोलेस्टेरॉल खुपच वाढले होते. त्या बरोबर, काळी भांडि पण घेतली आहेत. (FUTURA cooker सारखी.) त्यामुळे तेल कमी वापरुनहि पदार्थ खाली लागत नाहि. पण ऑ ऑ खुपच गरम आहे (कि त्याला गरम पडल माहित नाहि) त्यामुळे तोंड आले आणि Piles चा पण खुप त्रास झाला. तेल बंद केल्यावर लगेच हे प्रकार बंद झाले.

मंजू अ‍ॅक्चूली फार आयडीयल सिच्यूएशन म्हणजे म्हणे एक लिटर चार जणांच्या कुटुंबाला पुरायला हवं महिनाभर..
इम्पॉसिबल आहे ते. >>> नक्कीच पॉसिबल आहे. अर्ध्यावेळ हॉटेलात जेवायचं. Proud

मंजू अ‍ॅक्चूली फार आयडीयल सिच्यूएशन म्हणजे म्हणे एक लिटर चार जणांच्या कुटुंबाला पुरायला हवं महिनाभर..>> एक लिटर महिनाभर???????????????????
मी माणशी एक लिटर एक महिना असं ऐकलं होतं. तीच शंका फेडून घ्यायची होती.
आम्हाला तीन ते साडेतीन लिटर तेल महिन्याकाठी लागतं. दिवाळीला जरा जास्त लागतं.

बाकी तेल बदला किंवा बदलु नका,
Ornish Spectrum आणि डॉ बंग सेन्सिबल वाटतात
अर्थात

  • तुम्ही काय खाता (किती, केव्हा, कधी, कशाप्रकारे)
  • तुम्ही ताणाशी कसा सामना करता
  • तुमची अ‍ॅक्टिव्हिटी काय आहे
  • तुमच्या आयुष्यातील प्रेम आणि आधार

आरोग्याची आणि कदाचित सुखाची गुरुकिल्ली (असलीच तर) या सगळ्यांच्या एकत्रित परिणामांमध्ये सामावली आहे.

तेल बदलणे सहज होते. इतर गोष्टी जास्त अवघड आहेत. Wink

मी पुर्ण स्वयंपाक ऑऑ मधे करते. अजिबात वेगळा वास किंवा चव जाणवत नाही. ऑऑ फोडण्यांसाठी वापरता येते, ( for sauteing and grilling ) असे लेबल असलेले ऑऑ घ्यावे. एक्स्ट्रा वर्जिन ऑऑ कच्चेच वापरावे.
आमच्या ३ माणसांच्या स्वयंपाकासाठी १ लिटर तेल पुरते. (तळण करत नाही)

माझ्या डॉ. ने सांगितलंय त्याप्रमाणे माणशी जास्तीत जास्त पाच चमचे तेल / तूप / लोणी (किंवा सर्व मिळून) दिवसाला एका व्यक्तीसाठी भरपूर आहे. त्यात फोडणीचे, लोणच्याचे तेल, तूप, तयार / तळणीच्या पदार्थांमधील तेल इ. सर्व आले.

परदेशात वास्तव्य करणारे नातेवाईक सर्व स्वैपाकासाठी ऑऑ किंवा पाम ऑईल स्प्रे वापरतात. मला पाम ऑईल स्प्रे बरा वाटला. (तेल कमी पुरते.) रिफाईन्ड प्रकारातील आहे. परंतु त्याची चव / वास माझ्या नाकाला/ घशाला वेगळी जाणवलीच!!! घशात खवखवले ते वेगळेच! त्यामुळे तो बाद झाला. इतर लोकांना काही जाणवले नाही. :| मला सूर्यफूल तेल वापरायचेय खरेतर, पण त्याचीही चव लगेच घशाला वेगळी जाणवते व खवखवते.

रैना, घरच तूप जरुर खावं>> अमृता घरच्या तुपाचा मोह म्हणजे कामं वाढवून ठेवायचे धंदे गं. दूध, साय, लोणी तूप. तो तूप कढवल्याचा वास.... Proud
मी करते पण. Sad

रैना सौ फी सदी सच बात बोली.
मी मात्र घरी न करता चितळे किंवा सानेंना सलाम करते. मस्त असतं त्यांचं साजूक तूप. Happy

Pages