बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे एक उ. भा. कपल(हरयाणावी होते) आले होते ना एकदा जेवायला तेव्हा मी मराठी मेनूच केला. तेव्हा त्यातला नवरा लगेच म्हणाला वालाची उसळीचा एक घास घेवून(बायकोकडे बघत बघत) ये टेस्टी है और मस्त है थोडा चेंज. तर एकदम बरोबर मराठी मेनू केलेला ज्यास्त छान.

आमसूल कढी आणि सोलकढी हे वेगळे प्रकार आहेत.
सोलकढी जुन्या मायबोलीवर आहे. आमसूल कढी पूनम तुला माहिती असेलच बट्ट्याबरोबर करतात ती.
बाकी कुणाला आमसूलच्या कढीत इण्टरेस्त असेल तर -
http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/08/aamsool-kadhi.html

बटाट्याची (पिवळी)भाजी, उसळ, आमटी (वरणा ऐवजी),कोशिंबीर तळलेले सांडगे आवडतेच मोस्ट्ली सगळ्याना. फालुदा पण वेळ असेल तर करता येईल.

प्रिंसेस, स्टार्टर म्हणून छोटे छोटे साबुदाण्याचे वडे करू शकतेस. अतिशय आवडतात सगळ्यांना. किंवा सुरळीच्या वड्या तर पार्टीत कायम हीट ठरतात. कितीही करुन नेल्या तरी कायम कमीच पडतात.

धन्यवाद मनु, मिनोती, सीमा सावनी Happy

मिनोती ब्लॉग मस्तच आहे ग. खांदेशची आमसुल कढी !!! तुझ्या ब्लॉगवर लिहिल्याबद्दल धन्यवाद. तू लिहिलेली वाचुन तशीच बनवेन. Happy

सीमा, बटाट्याची पिवळी भाजी करणारे. सांडगे नाहीत ग माझ्याकडे Sad

सावनी, सुरळीच्या वड्या एकटीने नाही बनवल्यात कधी. ट्राय करुन पाहिन.

पुन्हा एकदा सगळ्याना धन्यवाद.

-प्रिन्सेस...

सागर, वाढदिवसाच्या शुभेच्छा! केक लई झ्याक....

मला एका "आईस्क्रीम पार्टी"साठी आईस्क्रीमला पूरक असा एखादा पदार्थ न्यायचा आहे. थोडीच मंडळी असल्यामुळे एकच, फार तर दोन पदार्थ असतील. snacksच पण पोट भर हवे. काय नेऊ? कोणी सुचवेल का?

स्मिता, मिक्स वेज कटलेट्स, बटाट्याचे पॅटीस, आलु टिक्की, मटार-बटाट्याचे सारण घालुन केलेले सँडविचेस, हमस आणि पिटा चिप्स, फलाफल बॉल्स नेता येईल. इथे मायबोलीवर एक डाळ-इडलीची रेसिपी आहे त्या इडल्या करुन सॉस बरोबर नेता येतील.

ढोकळा सांगितला नाही कारण आईसक्रीमबरोबर ते थोडे विचित्र लागण्याची शक्यता आहे.

मिनोती, धन्यवाद. मिक्स वेज कटलेट्स करीन बहुतेक. छान सुचवलंस.

पाणी-पुरी, भेळ किंवा रगडा-पॅटीस पण चांगले वाटेल. हे सगळं खाल्लं की आपण आईस्क्रीम खातोच नाही Happy

प्रीती :D, अग पण सगळ्यात चिंचेचे पाणी असरते ना, आईस्कीम बरोबर खुप नको खायला ते.

मला तर हे कॉम्बो खुप आवडतं, मला तर कधी काही झाले नाही Happy

प्रीती, खरंय. तुझ्या यादीतला रगडा-पॅटीससुध्दा आवडला होता. पण तेवढ्यात इथे मिसळ ठरलीय बहुमताने. आता तुझ्या आणि मिनोतीच्या सूचना पुढच्या वेळेसाठी ग. Happy

माला प्लीज मद्त करा माझ्या कडे friday la 3 couples व saturday ला ४ couples डिनर ला येनार आहेत.
माला सोपा मेनु सुचवा जाचि तयरि पहेले करता येइल कारन मला लहान २ months चि मुलगि आहे.

friday menu------?

saturday la---
पाव भाजि
पुलव
pineapple रायता

sweet ?

वेल१२३ ,सगळे ( किंवा तुम्ही )व्हेजीटेरियन आहात का ? तुम्ही देशात रहाता की परदेशात ? येणारे लोक फक्त देशी ( किंवा अतिपरिचितच ) पदार्थ खाणारे आहेत का ?

गाजर हलवा, बीट रूट हलवा , दुधी हलवा यातला एखादा प्रकार अगोदर करून ठेवता येईल अन दोन्ही दिवशी चालेल.( वेगवेगळे लोक आहेत असं समजून )

१ . मिसळ पाव , कोशींबीर अन बिसिबेळे भात किंवा चित्रान्ना
२. हाका नूडल्स, फ्राइड राइस, चिली पनीर या बरोबर लिची आइस क्रीम मिळाल्यास एकदम मस्त.
३. मसाले डोसे, वडा सांबार, यातली सर्व तयारी आधी करता येईल. डोसे सुद्धा आधी करून ठेवायचे अन मसाला घालताना गरम करायचे. वडे पण दुपारीच तळून आयत्यावेळी ओव्हन मधून जरा गरम करायचे.

(अवांतर, एवढं लहान बाळ असताना, लागोपाठ दोन दिवस पाहुणे, अन तेही मदती शिवाय ? किती दगदग होईल ! टाळता नाही का येणार. पुन्हा कधी तरी बोलवा, नाहीतर बाहेरून मागवा प्रकार )
३.

वेल१२३, एक असाच प्रश्ण विचारतेय, रागवू नकोस. शुक्रवारी जेवणं साफसफाइ,शनिवारी तेच खूप होइल ना गं? हं तुझा उत्साहावर पाणी नाही टाकायचे पण..

गोडात आईसक्रीम ठेवावी सरळ. आणि त्याप्रमाणे मेनू करावा. कशाला ते किचन मध्ये रवे,शिरे ढवळा. पाव भाजी अन आईसक्रीम मस्त आहे. बघ तुला पटले तर.
दुसर्‍या दिवशी मिसळ, आधीचे उरलेले पाव नी आईसक्रीम. ( हेच समजून की ती आदल्या दिवशी जेवल्यावर पुन्हा तीच लोक शनिवारी परत येणार नाहीत.) Happy

शोनु मी us ला आहे व येणारे लोक फक्त देशी आहे व मेनु व्हेजीटेरियन हवा आहे.तुमचे म्हनने बरोबर आहे दगदग होइल पण नवरा आहे मदतिला. त्या मुळे सोपा मेनु पहिजे आहे.chinease menu chan aahe.
manuswini ice cream chan watat aahe.
नवरा help करनार आहे
अजुन काहि बाहेरुन आनता येइल का

बाहेरून आणता येण्याजोगं : ढोकळे, समोसे, पात्रा. फरसाण आणि मुरमुरे आणलं तर घरच्या घरी भेळ. समोसे आणि चटण्या असल्या तर दही समोसे.
उंधियो मिक्स भाज्या आणि मसाला आणुन उंधियु पटकन होतो. चपात्या मिळत असतील तर ह्या भाजीबरोबर छानच. जळजळीत वाटत असेल तर त्यानंतर छानसा फोडणी आणि डाळींबदाणे घातलेला दही भात.
गोड घरीच करायचं असेल तर रिकोटा चीजची रसमलाई अप्रतीम होते. जराही कष्ट नाहीत.
जीथे रहाता तीथे अजुनही थंडी असेल तर घर सारखं बंद असणार. अश्यावेळी तळणं नको. बाळाला पण धुराचा त्रास होतो. तेव्हा शॉर्टकट मारून जे काय करता येईल ते चांगलं.
हे लोक एकमेकांना ओळखणारे नसतील तर दोन्ही जेवणांसाठी एकच मेनु ठरवून एकाच वेळेला भरपूर शिजवता येईल का? (दुसर्‍या दिवशीचे पाहुणे गेले की तेच जेवण नको वाटतं म्हणून आपण वरणभात करून खावा. Happy )

मृण्मयी, रिकोटाची रसमलाई??? पाककृती टाक ना प्लीज..........

thanks मृण्मयी रिकोटाची रसमलाई सुपर वाट्त आहे.
हे लोक एकमेकांना ओळखणारे नसतील तर दोन्ही जेवणांसाठी एकच मेनु ठरवून एकाच वेळेला भरपूर शिजवता येईल<<<<<< idea chan आहे.

धन्स मृण्मयी....सहीच रेसिपी आहे....

भारतिय बार्बेक्यू पार्टि आहे २०-२५ लोकान्ची , काय नेता येइल ?
मला आत्ता फ॑क्त चिकन आणि पनीर कबाब एवढेच आठवत आहे.

मक्याची कणसं, कबाब मधे पनीर, अननस, छोटे बटाटे, कांदे, ढबु मिरची असे लावुन नेऊ शकता.

लाल पिवळ्या शेंदरी भोपळ्या मिरच्या ग्रिल करून एका कागदी पिशवीत गुंडाळून ठेवा पाच सात मिनिटं. मग पिशवीतून काढून त्यांची साल काढा, आतल्या बिया वगैरे काढा अन लांब स्ट्रिप्स कापा १/२ इंच बाय दीड-दोन इंच. त्यात बारीक चिरलेल्या लसणीच्या पाकळ्या ( एका मिरचीला एक पाकळी लसूण, ) सी सॉल्ट, फ्रेश ग्राउंड ब्लॅक पेपर अन चांगलं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल घालून पाचेक मिनिटं ठेवा.
मग बागेत, इटालियन ब्रेड, फोकाचिया, चिआबाटा अशा ब्रेडच्या स्लाइसेस वर घालून सर्व्ह करा.

पनीर ला थोडं ओलं खोबरं, लसूण अन मीठ वाटून लावून ठेवून ग्रिल करता येईल.
श्रिम्प्स आवडत अस्तील तर ते बार्बेक्यु करता येतील. ( हिरवी चटणी - गरम मसाला -लाल तिखट- थोडं कच्चं तेल किंवा सांबाल सॉस- तिळाचं तेल -सॉय सॉस अन आल्याची पेस्ट असं लावून ठेवून )

चिकनचे हॉट डॉग किंवा सॉसेजेस मिळतात - ते ग्रिल करून , तुकडे करून त्यावर चाट मसाला/ लिंबू / कोथिंबीर पेरून सर्व्ह करता येईल.

सहज मिळत असतील अन आवडीने खाणारे असतील तर अर्ध्या शिंपलीतले ऑयस्टरस पण ग्रिल करून झकास लागतात ( पण २०-२५ जणं जर आवडीने खाणारे असतील तर खिशाचा विचार करायला लागेल )

पायनॅपल च्या गोल चकत्या ग्रिल करून त्याबरोबर आइसक्रीम अन चॉकलेट सॉस;
अंजीर अर्धे चिरून ग्रिल करून त्यावर थोडं फेटा चीझ अन जुना बाल्समिक व्हिनेगार ;
पेअर्स अर्धे करुन आतल्या बिया काढून ग्रिल करून त्याबरोबर आईसक्रीम.

पुरे का आता Happy

मटण खाणारे असतील तर सीख कबाब हमखास hit होणारा पदार्थ आहे. कृती इथे http://www.maayboli.com/node/4142 आहे. शिवाय sam's किंवा bjs मधे मिळणारे मोठे मश्रूम्स, हिरवी सिमला मिरची, हिरवे सफरचंद इत्यादी शानच्या बार्बेक्यूच्या तंदूरी चिकन मसाल्यात marinate करून एकदम झकास लागतात. marination ची कृती मसाल्याच्या पाकीटामागे दिलेली वापरणे. १००% यशाची खात्री! Happy

हाय,
कच्छी दाबेली बरोबर दुपारच्या वेळेला (४ वाजता) काय देता येइल? ७ मोठी माणसं आणि ३ दीड ते अडीच वर्षांची मुलं आहेत. मुलांसाठी मी पोटॅटो बॉल्स आणि चिकन बॉल्स करणार आहे.... इथे थंडी आहे त्याप्रमाणे मेन्यु सुचवा प्लिज....

टोमॅटो सूप कसे वातेल? स्वीट कॉर्न सूप पण चालेल. दाबेली बरीच हेवी होते त्यामुळे हलके काहितरी करावेस.

हाय मिनोती, लगेच उत्तर दिल्याबद्दल धन्स!
पण दुपारी ४ वाजता सूप?? जरा ऑड नाही का होणार? कारण थंडी आहे त्यामुळे चहा कॉफी तर होईलच...

Pages