चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारेंड बर झाले सांगीतलेस झॅक आणि मेरीबद्दल, मला ट्रेलर बघुन खूप बघावासा वाटत होता. असच ट्रेलर धमाल वाटले म्हणुन फर्गेटींग सारा मार्शलची डीव्हीडी आणली होती. फारच बंडल निघाला तो सिनेमा.
मॉन्स्टर्स व्हर्सेस एलिअन्स बघीतला. 3D होता त्यामुळे एकदा बघायला मजा आली, नाहीतर खूप खास नाही. आता 'अप' बघायचाय. तो पण 3D आहे.

हो तो सारा मार्शल ही बंडलच होता. ही मधल्या काळात गँग आलीय Seth Rogen वगैरे, काही लोकांना बहुधा खूप आवडत असावेत त्यांचे पिक्चर Knocked Up, Superbad वगैरे. मला काही खास वाटले नाहीत.

फारेंडा पाहीलास का इडीओक्रसी.. Happy मला तर बाबा आवडला तो..
काही ठीकाणी पाचकळपणा जास्त आहे .. ते जाउदे..
पण ते लांबलचक पसरलेलं कॉस्को पाहून मी फुटले होते!! Lol
आणि त्यातच लॉ चे शिक्षण! Rofl शक्य आहे ते ही फ्युचर मधे! Happy

हो ते जबरी आहे Happy कॉस्टको, गेटरेड, बारकोड ते सगळे मस्त आहे. लॉ चे शिक्षण त्यात तर भन्नाट कल्पना. आणि तो टाईम मशीन चा गुगली तर धमाल आहे.

आज स्टार मुव्हीज वर "व्हाईट फँग" पाहीला. इथन हॉक आणि त्या बर्फाळ प्रदेशातल्या लांडग्याने मस्त अभिनय(!) केला आहे. मला तर आधी वाटले कि हा त्या के.सी. बोकाडीयाच्या "तेरी मेहरबानियाँ" वर तर आधारीत नाही ना!(कारण हा ९१ साली आला होता तर तेरी मेहरबानियाँ ८५ साली!)
पण नाही ! हे जरा जास्तच नैसर्गिक चित्रीकरण आहे.त्यामधे कुत्र्याला फ्लॅशबॅक मधे जाता येते,रडता येते,डुख धरता येते, सुड उगवता येतो... वगैरे..वगैरे सारख्या माणसाच्या बोकांडी बसणार्‍या कल्पना नाहीयेत!(नाहीतरी बोकाडीयाचे सिनेमे लोकांच्या बोकांडीच बसतात म्हणा!)

तर हा लांडगे(श्वान)प्रेमीनी जरूर एकदा तरी पहावा असा सिनेमा ! इट्स वर्थ !!

सेठ रोगन चा Knocked Up मला तरी आवडला. लाईट कॉमेडी....मस्तच होती...Superbad..तसा बकवासंच म्हणावा लागेल. कॅथरीन Grey's Anatomy पेक्षा वेगळ्या ठिकाणी बघायला मिळतेय म्हणूनही Knocked Up बघितला..:)...(म्हणजे एका तिकिटावर ४ सिनेमे बघायचेच असं ठरवून गेलो होतो सगळे...कॅथरीनला पोस्टरवर बघून घुसलोच मग.)

(नाहीतरी बोकाडीयाचे सिनेमे लोकांच्या बोकांडीच बसतात म्हणा!) >>>
हे हे हे.... अगदी अगदी प्रकाश.. आपण शिरिष कणेकरांचे पंखे आहात काय? मी पण आहे..
त्यानी माझी फिल्लम्बाजी मधे म्हंटले आहे हे वाक्य..

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

ती कॅथरिन तिकडून आली काय? मी विचार करत होतो एकदम एवढी फेमस कशी झाली! तो गाजला हे खरे, पण मला आवडला नाही. bo-vish मग तिचा २७ ड्रेसेस म्हणूनही एक आला होता. मी पाहिलेला नाही, त्यामुळे कसा आहे माहीत नाही. त्या Judd Apatow चे बरेचसे पिक्चर फार काही विनोदी नाही वाटले.

Trainspotting बघायचा प्रयत्न केला पण १५ मिनीटातच बंद करून टाकला. भंगार वाटला तेव्हढातरी. पुढे बघावा काय? डॅनी बॉयल चे इतर चित्रपट तरी काय आहेत बघावे म्हणून आणला होता.

डॅनी बॉयेलचा २८ डेज लॅटर पहा.सही साय-फाय आहे. निर्मनुष्य लंडनचे सिन्स जबर्‍या.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

काल एक डाव धोबी पछाड पाहिला..

अशोक सराफ चे काम चांगले आहे..बाकी मुक्ता बर्वे, प्रसाद ओक वैगेरेंची कामे ठीक-ठाक..
एकदा पहाण्यासारखा आहे...फार काही विशेष नाही... एक सीन तर, 'अपना सपना मनी मनी' सारख्या तेवढ्याच टुकार पिक्चर मधला ढापलेला आहे.. हा पिक्चर कमी आणि नाटक जास्त वाटते.. Sad

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय पाहिला..
मलातरी फार आवडला. त्यामधला तो मुलीचा आणी सचिन खेडेकरच्या सीनला अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. Sad
मकरंद अनारसपुरे जबरदस्त... "केसभर गजरा आणि गावभर नजरा" Happy

महेश मांजरेकर थकलेला दिसतो. त्याचे घोडसवारीचे सर्व सीन चीटिंगने घेतले आहेत.
--------------
नंदिनी
--------------

'द व्हिजिटर' पाह्यला.
ही IMDB लिंक
http://www.imdb.com/title/tt0857191/

मला खूप ग्रेट वाटला नाही स्टोरी आणि स्क्रीनप्ले बघता. पण सगळ्यांचा अभिनय, संपूर्ण डिझाइन आणि कॅमेरावर्क एकदम वास्तवतावादी आणि कथा, व्यक्तिरेखांशी एकदम योग्य.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अरे यार तुम्ह सगल्यन्चा हि फिल्म समिक्शा वाचुन हसुनहसुन पोत दुखु लागले.... Happy

खास करुन नन्दिनि अनि दक्शिन.. अनि बरेच लोक.... Happy

मि हि नुकताच रेस पहिला... मला त्यातला सस्पेन्स खुप अवद्ल...

धन्यवाद
कनू

एक डाव धोबीपछाड पाहिला...

हा चित्रपट सुपरहिट (का/कसा ) झाला हे कळले नाही. टीवी वर लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या होत्या त्यावरुन धमाल विनोदी असेल असे वाटले होते. पण एकदम निराशा झाली.

नावाचा आणि कथेचा संबंध कळला नाही. अशोक सराफ जर त्याच्या प्रेमासाठी सगळे करतो तर डाव कसा काय झाला? त्याचे मराठी शिकणे, सुबोध भावे इ.इ. फार ओढुन ताणुन विनोद निर्मिती साठी आणले आहेत असे वाटले. त्याच्या मुलीचे पात्र(!) तर अजिबात पटले नाही. टीवी वर प्रोमोज मधे जेवढे प्रसंग दाखवले तेवढेच थोडे फार विनोदी वाटले.बाकी एकदम निराशा..(माझीतरी!)

कालच "माय लाइफ इन पिन्क" हा फ्रेन्च सिनेमा बघितला.
इथे त्याचे परिक्षण टाकणे किति योग्य ते माहिती नाही पण तरीही ..
लुडोविक नावाच्या एका लहान मुलाला मुलिंसारखे कपडे घालणे,
बाहुल्यांशी खेळणे अशा गोष्टींची आवड असते.
त्याला "मुलगा" बनविण्यासाठी त्याचे आई वडील आणी शेजारी,
थेरपिस्ट अशा सर्वांचा आटापिटा.. मुळात आपले काय चुकले हेच
न समजणारा तो निष्पाप लुडोविक.. त्या मुलामुळे आपले घर बदलावे लागलेले
कुटुंब..
खरोखर डोळे ओले करून जाणारा आणी विचारात पाडणारा सिनेमा.
( हाच सिनेमा हिंदित निघाला असता तर सर्वांच्या प्रयत्नाने लुडोविक "मुलगा" होतो
आणी शेवटच्या प्रसंगात शाळेतला बॉक्सिंग चा सामना जिंकतो असे दाखविले असते.)

Hi Friends,
माझ्या आयुश्यातिल सगळ्यात मोठि चुक म्हन्जे मि पहिलेला ' पछाड्लेला' चित्रपट.

त्यात काय comedy होति हे आजवर मला न उकललेले कोड आहे. Sad
भरत ने त्यात काय केले आहे हे त्याचे त्यालाच महित...
कोणि तो पह्ण्यचि चुक केलि आहे का?

धन्यवाद
कनू

पछाडलेला ठिक वाटला होता मला.
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

चिन्या,
मि ज्या मित्रा कडुन ति CD अणलि न ... त्याला खूप शिव्या घातल्या... Happy
कारण ति comedy मला रडवत होति...

आयुष्य सुन्दर आहे, त्याल आणखि सुन्दर बनवुया....

पछाडलेला मलाही आवडला नव्हता.

भरत जाधव हा लोकप्रिय पण अतिशय सामान्य कुवतीचा नट आहे. आणि त्याची सध्या चलती आहे म्हणुन त्याला चित्रपटात घेतात असे माझे वैयक्तीक मत आहे. त्याचा "जत्रा" हा चित्रपट कसा काय चालला हे मला अजुन कळले नाही.

मी बर्‍याच महीन्यांनी मराठी चित्रपट तेंव्हा बघत होतो त्यामुळे ठिक वातला असेल बहुतेक
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

२८ डेज लेटर मला प्रचंड किळसवाणा वाटला.. Sad
शेवटी शेवटी तर अतर्क्य होऊन संपता संपत नाही!

मात्र, ते भकास सिन्स अप्रतिम! Happy काही सिन्स ज्या अँगलने घेतले आहेत ते खरंच वेगळेच आहेत..

काल 'outsourced' पाहिला. जॉश हॅमिल्टन आणि आयेशा धारकर. दोघांचीही कामं चांगली.

या विकांताला एकही अ‍ॅनिमेशनपट प्रदर्शित झाला नाही त्यामुळे निकोलस केजचा Knowing बघीतला. मला नाही आवडला. रटाळ वाटला. त्यापेक्षा मागच्या विकांताला बघीतलेला I Love You Man बराच चांगला आहे.

कालच खुप ऐकलेला पण कधीही न पाहिलेला "थेलमा अ‍ॅन्ड लुईस" बघितला... बराच जुना आहे तसा (१९९१) पण अप्रतीम सिनेमा..
एम एम सी वर लागत राहतो.. नक्की बघा.... सुसन सॅरंडन आणी जीना डेवीस दोघींच पण काम झकास....
इतका आवडला की स्वतंत्र लेखनाचा धागाच सुरु करु म्हणतो या सिनेमाच्या काही आवडत्या बाबी मांडण्याकरता....

डबल धमाका
एक डाव धोबीपछाड आणि आलू चाट

धोबीपछाड डोकं बाजूला ठेऊन एन्जॉय करायला छान आहे... अशोक मामा जबरदस्त... बाकी लोकांमधे प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्री बरे... प्रसाद ओक त्यातल्या त्यात भाव खातो... किशोरी शहाणे दोन्ही नायिकांपेक्षा चांगली दिसते... 'अगं हेमा' गाण्याचा वापर मस्त...
माझ्याकडून ५ पैकी ३ तारे...

आलू चाट पण बरा आहे... पण खूप छान करता आला असता... आफताब प्रामणिकपणे बरं काम करतो... कुलभूषण खरबंदा आणि इतर फॅमिलीवाले डोक्यात जातात... अपवाद अ‍ॅपल सिंग आणि मनोज पह्वा... ते दोघं हमखास टाळ्या घेतात.. अ‍ॅपल सिंग चा छदामी मस्त... गोरी आणि आमना शरीफ ठीक ठाक... त्यातल्या त्यात गोरींच बरी... टीव्हीवर बघणेबल...
माझ्याकडून ५ पैकी १.५ तारे...
_______
सावर रे...

किशोरी शहाणे दोन्ही नायिकांपेक्षा चांगली दिसते... >>> अगदी अगदी अँकी... Happy
पण हा सिनेमा मला पिक्चर न वाटता नाटक जास्त वाटला....पण त्यात अनासपुरे नव्हता ही एक जमेची बाजु..कारण त्याचे ते तेच ते ग्रामिण धर्तीचे संवाद वीट आणु लागलेत.. अशोक सराफ नेहेमीप्रमाणे उत्तमच !!

पण नावाचा आणि सिनेमाचा काही संबंध लागत नाही....मला वाटले की काहीतरी पैलवानकी वर पिक्चर आहे का काय ?

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

मला पछाडलेला आवडला.. त्यात ब-यापैकी विनोदी प्रसंग आहेत, शिवाय सगळ्यांची कामेही अगदी व्यवस्थित आहेत. मी टीवीवर दोन तिनदा चालु असताना मधुन मधुन पाहिला, पण कंटाळा आला नाही.

धोबीपछाड एकदा पाहण्यासाठी ठिक आहे.


किशोरी शहाणे दोन्ही नायिकांपेक्षा चांगली दिसते... 'अगं हेमा' गाण्याचा वापर मस्त...
अगदी सहमत..... किशोरी आजही त्या गाण्यातल्याइतकीच छान टवटवीत दिसते. मुक्ताचे कामही आवडले.. मधुराला फारसे कामच नाहीय.. Sad

outsourced स्टार मुवीजवर लागलेला तेव्हा थोडा पाहिलेला. जे पाहिले ते फार आवडले होते. विशेषतः होळीचा प्रसंग :). सिडी आणुन पाहायला पाहिजे उरलेला...

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

जगात बहुतेक मि एकटिने थिअटर मधे पहिलेला माधुरि & अनिल चा 'राजकुमार' ...
ते सुध्धा family बरोबर... सगळे इतके बोर झाले... कि.....०००००

माधुरि चा मि पहिलेला सगळ्यात वाइट चित्रपट....

पण १-२ गाणि चान्गलि होति...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य सुन्दर आहे, त्याला आणखि सुन्दर बनवुया....!!!!!

मला पछाडलेला आवडला.. >> अ‍ॅशबेबी यांचाशी मी पण सहमत... काही लोकांना तो आता पाहिला तर थोडा पांचट वाटेल...पण ज्यानी तो पिक्चर रिलिज झाला त्यावेळी पाहिला असेल तर त्याना खरच आनंद झाला असेल... हळदी-कुंकु, बान्गड्या-चुडे, धोतर-साडी, रडारड, सासु-सुन्-दीर, किंवा एका शब्दात सांगायचे तर अलका कुबल टाइप सिनेमापासुन काहीतरी नविन वेगळे पहायला मिळाले.. Happy

त्यात दिलीप प्रभावळ्कर यांचे डोळे बघ-डोळे बघ करणे, बाबा लगिन हा डायलॉग.. भयानक पॉप्युलर Happy

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

अजुन एक ' पैज लग्नाचि' मि पाहिला, थिएटर मधे दोनदा ... ओके होता...
वर्षा छान दिसते त्यात...
प्रतिक्शा लोणकर खुप जाड दिसते पण.....

आणि अविनाश नारकर मला अजिबात आवडत नाहि.... तो जरा real life मधे तिरसट वाट्तो मला...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य सुन्दर आहे, त्याला आणखि सुन्दर बनवुया....!!!!!

Pages