हा पक्षी कोणता?
माझ्या बिघडलेल्या फोटोंकरता एक उपयोग शोधण्यात मी यशस्वी झालो आहे असे मला वाटते. खास करुन पक्षांचे फोटो. इथे मी असे फोटो टाकीन ज्यात पक्षी नीट ओळखु येत नाही, आणि तुम्हाला तो ओळखायचे आव्हान देईन. अर्थात उत्तरादाखल माझ्याजवळ त्या पक्षाचा चांगला फोटो देखील असेल. झब्बु देण्याबाबत तीच एक अट आहे. एक कोडेदार फोटो असेल तर एक उत्तरदार देखील असावा.
प्रश्न देतांना तुमच्या नावाचा उल्लेख करुन एक रनींग नंबर वापरा (उदा. माझा पहिला प्रश्न असेल aschig १)
उत्तर देतांना प्रश्नाच्या क्रमांक वापरता येईल. (या सुचनेकरता माधवला (व सावलीला सुद्धा) धन्यवाद)
चला तर करुया सुरु. (पुढच्या पोस्टींग मध्ये पहिला प्रश्न असेल).
आत्तापर्यंतचे प्रश्नः
aschig 1: उत्तर साधना (मृनिश - अर्धे उत्तर)
aschig 2: उत्तर सावली
aschig 3: उत्तर भुंगा (नादखुळा चे पण बरोबर होते)
aschig 4: उत्तर जयु
aschig 5: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 6: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 7: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 8: उत्तर नादखुळा
aschig 9: उत्तर सावली/भुंगा
aschig 10 (30 nov 2011):
aschig 11 (31 jan 2012): अर्धे उत्तर साधना/कापो/भुंगा
aschig 12 (29 mar 2012): उत्तर वेका
aschig 13 (10 apr 2012): उत्तर भुंगा
aschig 14 (10 apr 2012): उत्तर भुंगा/ shendenaxatra
aschig 15: (10 apr 2012): वेका
aschig 16: (27 apr 2012): वेका (/साधना - साधनेबद्दल)
aschig 17: (29 apr 2012): वेका (+ साधना/इंद्रधनुष्य)
aschig 18: (30 apr 2012): वेका/भुंगा
aschig 19: (24 may 2012): वेका/इंद्रधनुष्य
aschig 20: (9 oct 2012): वेका
aschig 21: (16 Feb 2013): वेका
aschig 22: (18 Feb 2013): rmd/2
aschig 23: (21 Feb 2013): सावली/भुंगा
aschig 24: (23 Feb 2013): rmd
aschig 25: (28 Feb 2013): वेका
aschig 26: (4 Mar 2013): वेका/rmd
aschig 27: (15 apr 2013): rmd/कांदापोहे
aschig 28: (9 may 2013): rmd
aschig 29: (14 may 2013): कांदापोहे
aschig 30: (21 may 2013): राज
aschig 31: (3 aug 2013): वेका
aschig 32: (4 oct 2013): साधना/rmd/सारीका
aschig 33: (20 Oct 2013): rmd
aschig 34: (21 Oct 2013): rmd
aschig 35: (21 Dec 2013):
लालु १:
सावली १ :Smew , Male - नादखुळा
अवल १: भुंगा
अवल २ : पर्वत कस्तुरी : नादखुळा
अवल ३ : सूर्यपक्षी : भुंगा, aschig, कांदापोहे
अवल ४ : कॉर्मोरंट : सावली, भुंगा
भुंगा, सचिन्_साची वगैरे (वेळ मिळाल्यावर क्रमांक व उत्तरे कोणी दिली हे लिहीन)
प्रश्न क्रमांक व उत्तर देणार्यांची नावे अशी इथे देत राहण्यासंबंधी एक सुचना:
तुम्ही प्रश्न टाकल्यावर मला संपर्कातुन एक्झॅक्ट वर्डींग कळवलेत तर मी तसेच्या तसे कॉपी-पेस्ट करु शकेन
उदा.: भुंगा ७: अनुत्तरीत
मग उत्तर मिळाल्यावरः
भुंगा ७: उत्तर दानखुळा
किंवा दोन्ही एकत्र (उत्तर मिळाल्यावर).
पहा जमल्यास.
हा पक्षी कोणता आहे...
हा पक्षी कोणता आहे...
हा कोतवाल आहे. कात्रीच्या
हा कोतवाल आहे. कात्रीच्या पात्यासारखी दुभंगलेली शेपटी ही याला ओळखण्याची खूण.
श्रावणात पुरंदर किल्ल्याच्या
श्रावणात पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी हा पक्षी दिसला होता - कोणी नाव सांगू शकेल का ? एवढा एकच जरा बरा फोटो आला - ७-८ काढले तेव्हा....... (चिमणीएवढ्या आकाराचा किंवा जरा लहान)
हा अजून एक याच पक्ष्याचा फोटो -
भारद्वाज वाटतोय.. पण
भारद्वाज वाटतोय.. पण चिमणीच्या आकाराएवढा नसतो तो...
भारद्वाज आहे की हा... हा
भारद्वाज आहे की हा...
हा छब्बू...
>>> एवढा एकच जरा बरा फोटो आला
>>> एवढा एकच जरा बरा फोटो आला - ७-८ काढले तेव्हा....... (चिमणीएवढ्या आकाराचा किंवा जरा लहान)
भारद्वाज हा कावळ्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा असतो. हा दिसतोय भारद्वाजच. पण हे बहुतेक त्याचं पिल्लू असावं.
मित, हिम्सकूल, मास्तुरे - माफ
मित, हिम्सकूल, मास्तुरे - माफ करा, तो भारद्वाज वा त्याचे पिल्लू नक्कीच नाही - याचे डोळे अजिबात लाल नाहीत. (भारद्वाजाचे अगदी लालबुंद असतात). माझ्याकडे भारद्वाजाचे जवळून काढलेले फोटो आहेत.
हा पक्षी नीट निरखून पहा - याच्या डोक्यावर छोट्या तुर्यासारखे काहीतरी आहे - हा बहुतेक युवराज असावा असा माझा अंदाज आहे - कोणी जाणकार पक्षीतज्ञच सांगू शकतील म्हणून येथे हा फोटो टाकला आहे. कृपया गैरसमज नसावा.
आताच गुगलून पाह्यलं - तो क्रेस्टेड बंटिंग म्हणजे युवराजच आहे -
शशांकजी हा युवराजच मी काल शोध
शशांकजी हा युवराजच
मी काल शोध घेत होतो, पहिल्यांदा फोटो पाहिला तेव्हा हा भारद्वाजच वाटला पण मग तुमच्या पोस्ट मधे वाचले की तो चिमणी एवढा आहे.
मस्त फोटो आहे. तुमच्या
मस्त फोटो आहे. तुमच्या आधीच्या फोटोतील पाय व डोळ्यामुळे जाणवत होते तो भारद्वाज नाहीये ते.
युवराज सुंदर दिसतायत
युवराज सुंदर दिसतायत
धन्यवाद शशांक...मला प्रतिसाद
धन्यवाद शशांक...मला प्रतिसाद लिहिल्यावरच चूक लक्षात आली, पण संपादन करायला खरं उत्तर माहित नव्हतं. स्वर्गीय नर्तक (Paradise Flycatcher) ची मादी आहे का अशीही शंका आली होती...
अरे हो, चुकलंच. आधी भारद्वाज
अरे हो, चुकलंच. आधी भारद्वाज वाटला होता. माहितीबद्दल धन्यवाद!
आयला कसला जबरी तुर्रेबाज आहे
आयला कसला जबरी तुर्रेबाज आहे हा पक्षी... ह्या फोटोबद्दल धन्यवाद शशांक...
क्रेस्टेड बंटींग आहे ना
क्रेस्टेड बंटींग आहे ना हा?
वर पुरंदरे ह्यांनी लिहिलेले पाहिले नव्हते. क्रेस्टेड बंटींगच आहे हे वाचून मी ओळखू शकले ह्याचा आनंद झाला.
जबरी आहे पक्षी.
जबरी आहे पक्षी.
हा पक्षी कोणता?
हा पक्षी कोणता?

हा धनेश आहे. indian grey
हा धनेश आहे. indian grey hornbill
वा साधना - झाडे-पाने-फुले
वा साधना - झाडे-पाने-फुले याबरोबर पक्ष्यांविषयी ही माहिती आहे तुला!
हा माझ्या घराबाहेर फे-या
हा माझ्या घराबाहेर फे-या मारतो हल्ली
सकाळी फिरायला गेल्यावर पक्षी बघत जायचा छंद जडलाय हल्ली
aschig 11 (31 jan 2012) चे
aschig 11 (31 jan 2012) चे उत्तर लाल मिशांवाला बुलबुल (साधना/कापो/भुंगा यांचा तो बुलबुल असल्याचा कयास बरोबर होता). पॅसॅडेनामधे (सान मारीनो लगत) खूप झाले आहेत हे आजकाल.
aschig 12: ओळखा पाहु हा कोण? (DC मार्च २०१२)
मला मादी कोकीळ वाटतेय....
मला मादी कोकीळ वाटतेय....
हा त्याचाच अजुन एकः
हा त्याचाच अजुन एकः

रोलर??
रोलर??
रोलर नाही. हा त्याचाच अजुन
रोलर नाही. हा त्याचाच अजुन एक.
वॉशींग्टन डि सी (अमेरिका) मार्च २०१२
वा किती सुंदर पक्षी आहे.
वा किती सुंदर पक्षी आहे.
American Robin?
American Robin?
वेका, बरोब्बर. थोडे थांबून
वेका, बरोब्बर. थोडे थांबून मीच उत्तर न दिल्याचा फायदा झाला
हा त्या रॉबीनचा बरा फोटो:
पंखांची बाजू, पोट, शेपूट, डोळा, चोच. वसंताचे आगमन दर्शवणारा हा पक्षी.
हा angry bird कोणता? aschig
हा angry bird कोणता?
aschig 13: (केप टाऊन, एप्रील २०१२)
हा चश्मेवाला असावा.......
हा चश्मेवाला असावा....... ईम्ग्लिश नाव आठवत नहैये आता.
म्हणजे भारतात अगदी अश्याच
म्हणजे भारतात अगदी अश्याच डोळ्यांचा पक्षी आहे त्याला चष्मेवाला असं मराठी नाव आहे.
Pages