हा पक्षी कोणता?
माझ्या बिघडलेल्या फोटोंकरता एक उपयोग शोधण्यात मी यशस्वी झालो आहे असे मला वाटते. खास करुन पक्षांचे फोटो. इथे मी असे फोटो टाकीन ज्यात पक्षी नीट ओळखु येत नाही, आणि तुम्हाला तो ओळखायचे आव्हान देईन. अर्थात उत्तरादाखल माझ्याजवळ त्या पक्षाचा चांगला फोटो देखील असेल. झब्बु देण्याबाबत तीच एक अट आहे. एक कोडेदार फोटो असेल तर एक उत्तरदार देखील असावा.
प्रश्न देतांना तुमच्या नावाचा उल्लेख करुन एक रनींग नंबर वापरा (उदा. माझा पहिला प्रश्न असेल aschig १)
उत्तर देतांना प्रश्नाच्या क्रमांक वापरता येईल. (या सुचनेकरता माधवला (व सावलीला सुद्धा) धन्यवाद)
चला तर करुया सुरु. (पुढच्या पोस्टींग मध्ये पहिला प्रश्न असेल).
आत्तापर्यंतचे प्रश्नः
aschig 1: उत्तर साधना (मृनिश - अर्धे उत्तर)
aschig 2: उत्तर सावली
aschig 3: उत्तर भुंगा (नादखुळा चे पण बरोबर होते)
aschig 4: उत्तर जयु
aschig 5: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 6: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 7: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 8: उत्तर नादखुळा
aschig 9: उत्तर सावली/भुंगा
aschig 10 (30 nov 2011):
aschig 11 (31 jan 2012): अर्धे उत्तर साधना/कापो/भुंगा
aschig 12 (29 mar 2012): उत्तर वेका
aschig 13 (10 apr 2012): उत्तर भुंगा
aschig 14 (10 apr 2012): उत्तर भुंगा/ shendenaxatra
aschig 15: (10 apr 2012): वेका
aschig 16: (27 apr 2012): वेका (/साधना - साधनेबद्दल)
aschig 17: (29 apr 2012): वेका (+ साधना/इंद्रधनुष्य)
aschig 18: (30 apr 2012): वेका/भुंगा
aschig 19: (24 may 2012): वेका/इंद्रधनुष्य
aschig 20: (9 oct 2012): वेका
aschig 21: (16 Feb 2013): वेका
aschig 22: (18 Feb 2013): rmd/2
aschig 23: (21 Feb 2013): सावली/भुंगा
aschig 24: (23 Feb 2013): rmd
aschig 25: (28 Feb 2013): वेका
aschig 26: (4 Mar 2013): वेका/rmd
aschig 27: (15 apr 2013): rmd/कांदापोहे
aschig 28: (9 may 2013): rmd
aschig 29: (14 may 2013): कांदापोहे
aschig 30: (21 may 2013): राज
aschig 31: (3 aug 2013): वेका
aschig 32: (4 oct 2013): साधना/rmd/सारीका
aschig 33: (20 Oct 2013): rmd
aschig 34: (21 Oct 2013): rmd
aschig 35: (21 Dec 2013):
लालु १:
सावली १ :Smew , Male - नादखुळा
अवल १: भुंगा
अवल २ : पर्वत कस्तुरी : नादखुळा
अवल ३ : सूर्यपक्षी : भुंगा, aschig, कांदापोहे
अवल ४ : कॉर्मोरंट : सावली, भुंगा
भुंगा, सचिन्_साची वगैरे (वेळ मिळाल्यावर क्रमांक व उत्तरे कोणी दिली हे लिहीन)
प्रश्न क्रमांक व उत्तर देणार्यांची नावे अशी इथे देत राहण्यासंबंधी एक सुचना:
तुम्ही प्रश्न टाकल्यावर मला संपर्कातुन एक्झॅक्ट वर्डींग कळवलेत तर मी तसेच्या तसे कॉपी-पेस्ट करु शकेन
उदा.: भुंगा ७: अनुत्तरीत
मग उत्तर मिळाल्यावरः
भुंगा ७: उत्तर दानखुळा
किंवा दोन्ही एकत्र (उत्तर मिळाल्यावर).
पहा जमल्यास.
गजानन १ उत्तर : हे घ्या -
गजानन १ उत्तर :
हे घ्या -
नाखु आणि अस्चिग कुठे गायब
नाखु आणि अस्चिग कुठे गायब झाले????
गजा, हा पक्षी चोचीवर आपटून
गजा, हा पक्षी चोचीवर आपटून निळीच्या पाण्यात पडल्यासारखं वाटतंय
(पक्ष्याला)
साधना, मेरी औकात उतनीही हय |
गजा हे चित्र कोकीळचच (नर)
गजा हे चित्र कोकीळचच (नर) आहे.
अश्विनी, अजून लोकं निळी वगैरे
अश्विनी, अजून लोकं निळी वगैरे वापरतात :प
अरे भुंगा तो पक्षी मोठा जरी झाला तरी तसाच दिसतो. काही फरक पडत नाही त्याच्या दिसण्यात.
बी, मला तो Yellow Canary
बी,
मला तो Yellow Canary किंवा Silver Throated Tanager पक्षी वाटतो आहे.
Common Tailorbird असु शकतो.
aschig १०: हा पक्षी कोणता?
aschig १०: हा पक्षी कोणता? पॅसॅडेना, कॅलीफोर्नीया, २१ मार्च २०११

aschig ११: हा पक्षी कोणता?
aschig ११: हा पक्षी कोणता? पॅसॅडेना, कॅलीफोर्नीया, २१ मार्च २०११

aschig १२: हा पक्षी कोणता?
aschig १२: हा पक्षी कोणता? पॅसॅडेना, कॅलीफोर्नीया, २१ मार्च २०११

आशिष १० :- टॉव्ही किंवा
आशिष १० :-
टॉव्ही किंवा स्पॅरो जातीतला
आशिष ११ :-
wren किंवा brown creeper
आशिष १२ मधला बर्ड ओळखणं कठीण
आशिष १२ मधला बर्ड ओळखणं कठीण आहे आणखी एखादा फोटो असेल तर ओळखता येईल.
aschig १० चे हे अजुन दोन
aschig १० चे हे अजुन दोन फोटो


aschig ११ चा अजुन एक फोटो. wren बरोबर आहे. subspecies ओळखता येते का पहा.

aschig १२ चा हा अजुन एक. हा तसा सोपा पक्षी आहे:

तो कॅरोलिना wren वाटतो आहे.
तो कॅरोलिना wren वाटतो आहे.
नाही, कॅरोलॅना wren नाही.
नाही, कॅरोलॅना wren नाही.
aschig १२ - हा पोपट आहे का?
aschig १२ - हा पोपट आहे का? पहिल्या फोटो मधल्या पोझ वरुन वाटतोय.
बर्याच दिवसांनी इथे आलेय
भुंग्या , माझ्या साठी १ कावळा
भुंग्या , माझ्या साठी १ कावळा चिमणी पोपट गिधाड पैकी कोणाचा तरी फोटो टाक ना ...मलाही काहीतरी ऑळखल्याचा आनंद मिळु दे


प्रगो,
अरे जरी भुंग्याने हे फोटो टाकलेच तर या चिमणी,कावळा,पोपट यांना अगोदर मी ओळखणार ,बरं का !
हो तो (१२) पोपट आहे (उपजात
हो तो (१२) पोपट आहे (उपजात ओळखायची आहे?)

wren (११) चा अजुन एक फोटो

व तिसर्याचा (१०) पण

स्मितहास्य - ४ नाव - माहीत
स्मितहास्य - ४
नाव - माहीत नाही
ठिकाण - संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. बोरिवली.
दयाळ असावा.
दयाळ असावा.
बसायची पद्धत वेगळी वाटते, पण
बसायची पद्धत वेगळी वाटते, पण सुर्यपक्षी असावा.
स्मितहास्य ४: सूर्यपक्षी नर
स्मितहास्य ४: सूर्यपक्षी नर आहे तो. बहुधा "शिंजिरच "पर्पल रम्प्ड सनबर्ड"
हाच आहे ना तो? मला स्मि चा
हाच आहे ना तो? मला स्मि चा फोटो दिसत नाहीय आता. पण घरुन पाहिला तेव्हा हाच वाटलेला.
मी ह्याला दयाळ समजते. हा दयाळ नसेल तर मग सांगा कोण आहे तो...
आता हे कोण ते सांगा धडाधड
आता हे कोण ते सांगा धडाधड -
साधना १ - हा खाटिक आहे असे मुलगी म्हणाली. पण इतक्या सुंदर पक्ष्याला खाटिक म्हणावे हे मला काही पटले नाही.
होय साधना तो खाटीकच आहे.
होय साधना तो खाटीकच आहे.
हा पण खाटिकच असावा पण हा
हा पण खाटिकच असावा पण हा रंगीत का नाही??
साधना, तो रुफस बॅक्ड श्राईक
साधना, तो रुफस बॅक्ड श्राईक आहे म्हणजेच खाटिक. खाटिकाचे घरटे हे काटेरी झाडावर असते. (सहसा) आणि मारलेले भक्ष्य तो खोडाच्या काट्यावर टोचून ठेवतो. त्याच्या ह्या सवयीने त्याला खाटिक नाव पडलय.
हा सिल्हुटीवरुन कबुतर वाटतोय,
हा सिल्हुटीवरुन कबुतर वाटतोय, पण मग शेपुट एवढे लांब? आणि लांब शेपटावरुन ककुच्या जातीतला समजावा तर चोच आखुड वाटतेय त्या मानाने
मला हे बदक आहे एवढेच माहित
मला हे बदक आहे एवढेच माहित आहे. पण तुम्हाला मात्र त्याची जात सांगता येईल
थव्यातली काही बदके
गावी याला बगळा म्हणतात, पण
गावी याला बगळा म्हणतात, पण यालाही काही नाव असेल ना?
साधना १ : या चित्रातील पक्षी
साधना १ : या चित्रातील पक्षी "राखी खाटिक" आहे.
वरील रंगीबेरंगी बदकाचे नाव आहे "ठिपक्यांचे किंवा राखी बदक (Spot Bill or Grey Duch)". याचे वैशिष्ट्य म्हणजे नारिंगी-तांबड्या रंगाचे पाय, पिवळे टोक असलेली चोच आणि पिसांवर खवल्याखवल्यांचा फिकट व दाट तपकिरी रंग असतो.
Pages