हा पक्षी कोणता?

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

माझ्या बिघडलेल्या फोटोंकरता एक उपयोग शोधण्यात मी यशस्वी झालो आहे असे मला वाटते. खास करुन पक्षांचे फोटो. इथे मी असे फोटो टाकीन ज्यात पक्षी नीट ओळखु येत नाही, आणि तुम्हाला तो ओळखायचे आव्हान देईन. अर्थात उत्तरादाखल माझ्याजवळ त्या पक्षाचा चांगला फोटो देखील असेल. झब्बु देण्याबाबत तीच एक अट आहे. एक कोडेदार फोटो असेल तर एक उत्तरदार देखील असावा.

प्रश्न देतांना तुमच्या नावाचा उल्लेख करुन एक रनींग नंबर वापरा (उदा. माझा पहिला प्रश्न असेल aschig १)
उत्तर देतांना प्रश्नाच्या क्रमांक वापरता येईल. (या सुचनेकरता माधवला (व सावलीला सुद्धा) धन्यवाद)

चला तर करुया सुरु. (पुढच्या पोस्टींग मध्ये पहिला प्रश्न असेल).

आत्तापर्यंतचे प्रश्नः
aschig 1: उत्तर साधना (मृनिश - अर्धे उत्तर)
aschig 2: उत्तर सावली
aschig 3: उत्तर भुंगा (नादखुळा चे पण बरोबर होते)
aschig 4: उत्तर जयु
aschig 5: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 6: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 7: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 8: उत्तर नादखुळा
aschig 9: उत्तर सावली/भुंगा
aschig 10 (30 nov 2011):
aschig 11 (31 jan 2012): अर्धे उत्तर साधना/कापो/भुंगा
aschig 12 (29 mar 2012): उत्तर वेका
aschig 13 (10 apr 2012): उत्तर भुंगा
aschig 14 (10 apr 2012): उत्तर भुंगा/ shendenaxatra
aschig 15: (10 apr 2012): वेका
aschig 16: (27 apr 2012): वेका (/साधना - साधनेबद्दल)
aschig 17: (29 apr 2012): वेका (+ साधना/इंद्रधनुष्य)
aschig 18: (30 apr 2012): वेका/भुंगा
aschig 19: (24 may 2012): वेका/इंद्रधनुष्य
aschig 20: (9 oct 2012): वेका
aschig 21: (16 Feb 2013): वेका
aschig 22: (18 Feb 2013): rmd/2
aschig 23: (21 Feb 2013): सावली/भुंगा
aschig 24: (23 Feb 2013): rmd
aschig 25: (28 Feb 2013): वेका
aschig 26: (4 Mar 2013): वेका/rmd
aschig 27: (15 apr 2013): rmd/कांदापोहे
aschig 28: (9 may 2013): rmd
aschig 29: (14 may 2013): कांदापोहे
aschig 30: (21 may 2013): राज
aschig 31: (3 aug 2013): वेका
aschig 32: (4 oct 2013): साधना/rmd/सारीका
aschig 33: (20 Oct 2013): rmd
aschig 34: (21 Oct 2013): rmd
aschig 35: (21 Dec 2013):

लालु १:

सावली १ :Smew , Male - नादखुळा

अवल १: भुंगा
अवल २ : पर्वत कस्तुरी : नादखुळा
अवल ३ : सूर्यपक्षी : भुंगा, aschig, कांदापोहे
अवल ४ : कॉर्मोरंट : सावली, भुंगा

भुंगा, सचिन्_साची वगैरे (वेळ मिळाल्यावर क्रमांक व उत्तरे कोणी दिली हे लिहीन)

प्रश्न क्रमांक व उत्तर देणार्‍यांची नावे अशी इथे देत राहण्यासंबंधी एक सुचना:
तुम्ही प्रश्न टाकल्यावर मला संपर्कातुन एक्झॅक्ट वर्डींग कळवलेत तर मी तसेच्या तसे कॉपी-पेस्ट करु शकेन

उदा.: भुंगा ७: अनुत्तरीत
मग उत्तर मिळाल्यावरः
भुंगा ७: उत्तर दानखुळा

किंवा दोन्ही एकत्र (उत्तर मिळाल्यावर).
पहा जमल्यास.

सुर्रेख टिपतोस रे कॅमेर्‍यात या पक्ष्यांना......... कमाल आहे तुझ्या सहनशक्तिची, चिकाटीची.....
माहितीही छान देतोस...

खरच कला आहे अगदी तुमच्यामध्ये पक्षांचे फोटो टिपण्याची.

पाणकावळा मल्लखांब करतोय काय ?

पाणकावळ्यांची ती नाजुक पोझ मी नेहमी पाहते. कारण ऑफिसला जाताना कोवळ उन पडलेल असत. हे कावळे असे पंख पसरून उन अंगावर घेत असतात.

अमेरिकेतले कावळेसुद्धा गोरे आहेत... आम्हाला फसवतात.... >> :d

खरच कला आहे अगदी तुमच्यामध्ये पक्षांचे फोटो टिपण्याची. > +1

वेका, इंधनु, त्यात हसण्यासारखे काहीच नाही. साधना फसली ते आधीचे फोटो अमेरीकेतील असण्याबद्दल. ते अफ्रिकेतले आहेत. अमेरीकेतील कावळे गोरे नाहीत, पण अफ्रीकेतील आहेत. मला चांगला फोटो मिळाला नाही. हा http://carolinabirds.org/Daniels/SouthAfrica/CapeBirdWorld/Crow,%20Pied%...मधील आहे.

CrowWhite2.jpg

So basically between SA n US of A crow has decided to be different from favored population color....:)

मला फक्त धागा वर आणयचा होता....:)

जरा जास्तच बिघडलाय हा फोटो...:)
मला फक्त झाड आणि वटवाघळासाऱखं काहीतरी दिसतंय बब्बा....

राखाडी धनेशसदृष्य पक्षी मान लपवुन बसलाय....

पण याचे डोळे पॅरॅकिटसारखे दिसताहेत. बहुतेक पॅरॅकिट असावा. पण पॅरॅकिट म्हटले की रंगीबेरंगी पक्षीच नजरेसमोर येतो (मी अर्थात फक्त फोटोच पाहिलेत Happy )

मला तर डोळेच दिसत नाहीत ...साधना तुमचं निरिक्षण सही आहे..
ते शेपटीवरून धनेशासारखं वाटायला लागलंय...वटवाघळावरून धनेश म्हणजे प्रगती बरी म्हणायची माझी...:)

चला आता आणखी एक थोडा दिसणेबल फोटो.....

डोळे आहेत ना.. वर पाहा. पांढरे बुब्बुळ नी त्यात काळी बाहुली. पॅरॅकिटचे असेच डोळे पाहिलेत. पण ह्या पॅरॅकिटने बरेच दिवस आंघोळ केली नाहीय बहुतेक.. Happy

बाकी आफ्रिकेतले कावळे गोरे म्हणजे कमाल झाली. माणसांनी काळा रंग सगळा स्वतःसाठी राखुन ठेवला काय??

मला तर मध्यभागी वाळक्या पानासारखं काहीतरी दिसतंय आणि या साधनाला त्याचं बुब्ब्बुळ आणि बाहुलीही दिसली ! गेल्या जन्मी (?) (हे अश्चिगच्या धाग्यावर Proud ) अर्जुन होतीस काय?

अश्चिग, तो आलता आणि लिप्स्टीक लावलेला पांढरा पक्षी मस्त होता. त्या पाणकावळ्यात काळ्या रंगाव्यतिरिक्त कावळ्यासारखं काहीच नाहिये तरी त्याला कावळा का म्हणतात?

पक्षी ओळखणं माझ्या अवाक्याबाहेरचं आहे पण फोटो बघून न राहवून काही कमेंट्स केल्या तर चालतील ना? चालत नसल्यास उडवते Happy

चालत नसल्यास उडवते

वा!!!! पायानी चालत नसल्यास थेट उडवायची कला तुझ्यात आहे मग 'हा पक्षी कोणता?' धाग्यावर तुझ्यापेक्षा लायक दुसरे कोणी असु शकेल का?

रच्याकने, माझी लेवल तुझ्याइतकीच आहे. फक्त मी निसर्गनिरिक्षणे तुझ्यापेक्षा जराशी जास्त करते आणि आपले अज्ञान लोकांसमोर मांडायला मला लाजही वाटत नाही (आपण अज्ञानी आहोत हे इतरांनी दाखवुन दिल्यावरच आपली ट्युब पेटते ना.. तोपर्यंत आपण सर्वज्ञानी आहोत असे समजायला आपले काय जातेय??? Happy )

पायानी चालत नसल्यास थेट उडवायची कला तुझ्यात आहे मग 'हा पक्षी कोणता?' धाग्यावर तुझ्यापेक्षा लायक दुसरे कोणी असु शकेल का? >>>> वा ! उद्या माझाच उडतानचा फोटो इथे डकवशील आणि विचारशील "हा पक्षी कोणता?" Proud

अगं, अज्ञान बरेच वेळा पाजळून झालंय माझं पण या गोष्टींवर जास्त वेळ देता येत नसल्याने कावळा (साधाच, पाण बिण नाही) आणि चिमणी, बदकंच ओळखता येतात.

अश्विनि के आणि साधना अशाने अस्चिग लवकर उत्तर देणार नाहीत... पण खरंय ते डोळे शोधुन डोळेच दुखायला लागले माझे... Happy

वेका, आपल्यासारख्या पक्ष्यांधळ्यांना बाणाच्या खुणेने पक्षी दाखवायला हवा की हा इथे इथे अश्या अश्या पोझमध्ये बसला आहे. चला माझी हाताची घडी तोंडावर बोट. वाचते फक्त Happy

येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
फायनली मला दिसला पक्षी
आता लोक्स ओळखा पटकन Happy
वेके इथे पण वेळ्काढुपणा करु नकोस
ओळख पटकन
तुला उमोची शपथ Proud

(तोंडावरचं बोट काढून) ऑ! तिथे डोळा आहे? मग भोवतीचा पक्षी कुठे आहे? खरंच माझ्या डोळ्याच्या खाचा झाल्या बहुतेक Sad

त्या मोठ्या पानासारख्या आकृतीच्या मध्ये फिक्कट रंगाचं पिटुकलं काहितरी दिसतंय तो पक्षी आहे का? त्याची सावली पानावर पडल्यासारखंही वाटतंय.

ओ मॅडम, तुम्ही आश्चिगच्या वाट्याचे डायलाग्ज मारु नका. ओळखा पटकन काय?? तुम्ही ओळखला तर नाव लिहा... Happy

ओ मॅडम, तुम्ही आश्चिगच्या वाट्याचे डायलाग्ज मारु नका. ओळखा पटकन काय?? तुम्ही ओळखला तर नाव लिहा...
>>>
हे कोणाला आहे?

c2P4220270_0.jpg

अगं हा एवढा मोठ्ठा पक्षी आहे की..

आता ख-या पक्ष्याचे फोटो आश्चिगने इथे टाकले की माझे दात माझ्याच पोटात जातील आणि इतर सगळेजण माझ्यावर दात काढतील Proud

रीया, मला वाटले तुला ओळखता आला हा पक्षी कोणता ते?

माझ्या मते पॅरॅकिट.. आता इतरांनी आपापली मते द्या..

पण मग ते मध्येच फिक्कट रंगाचं काय आहे? ती मोठी आकृती वाळक्या पानाची म्हणावी तर हिरवी पानं बरीच लहान आहेत त्यापेक्षा. आणि वाळक्या पानावर पक्षी बसला तर ते पान गळून जाईल आणि पक्षी उडून जाईल.

की ते पान बॅकग्राऊंडला आहे आणि लगतच्या पुढच्याच फांदीवर छोटा पक्षी बसला आहे? Uhoh

वाळकं काय आहे ते मला दिसत नाही. मला जोवर पक्षी दिसतोय तोवर ठिक आहे, एकदा का त्याच्या जागी वाळकं दिसायला लागलं तर मग पक्षी दिसायचा बंद होईल Happy मग कितीही प्रयत्न केले तरी तो पक्षी काही दिसणार नाही, वाळकं पानंच डोळ्यात भरेल...

Pages