३) खजुराचे लोणचे
साहित्य: अंदाजे १५० ग्रॅम खजूर, ३/४ लिंबे, पाव वाटी साखर, १ चमचा जिरे, १ चमचा बडिशोप, मीठ, पाव चमचा शेंदेलोण(काळं मीठ),लाल तिखट पाव चमचा. १ इंच आल्याच्या उभ्या कापट्या(जिंजर ज्युलियन्स),तिखटाचं प्रमाण चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता.
कृती: लिंबांचा रस काढून त्यात साखर विरघळून घ्यावी. त्यातच लाल तिखट, मीठ, शेंदेलोण घालावे. ढवळावे. बडिशोप व जिरे मिक्सरमधून अर्धे बोबडे बारीक करून घ्यावेत. याची अती बारीक पावडर करू नये. हेही या लिंबू रसाच्या मिश्रणात घालून ढवळावे. यातच आल्याच्या कापट्या घालाव्यात. खजूर स्वच्छ धवून बीया आणि नाके काढून उभे तुकडे करावेत. फडक्यावर पसरून खजूर तुकडे कोरडे करावेत. हे खजुराचे तुकडे वरील लिंबूरसाच्या तयार मिश्रणात घालून छान मिक्स करावे.
लोणचे तयार.
ही तीन्ही लोणची थंडीत जेवणाची/स्नॅकसची लज्जत वाढवतात. खजुराचे लोणचे विशेषत: पराठे तिखटमिठाच्या पुर्या या बरोबर छान लागते.
हे मी केलेले- झंपे, मी
हे मी केलेले-
झंपे, मी बाहेरच ठेवले आहे. (म्हणजे फ्रीजमध्ये नाही.) पण इकडे थंडी आहे. थंडीमुळे नंतर खार अजून घट्ट झालाय.
वा अँकनी.............. झंपी्
वा अँकनी..............
झंपी् हे फ्रिजबाहेर राहील.
सह्ही! करुन बघते!
सह्ही! करुन बघते!
मी पण केलं आज. फक्त मी अद्रक
मी पण केलं आज. फक्त मी अद्रक जरा जास्त घातलं. सगळ्यांना खूप आवडलं घरात.
थँक्स मानुषी.
मानुषी हे लोणचे किती दिवस
मानुषी हे लोणचे किती दिवस टिकते?
मस्त. मीही केलं. बडिशेप+जिरं
मस्त. मीही केलं. बडिशेप+जिरं ही चव एकदम बढिया जाते खजुराबरोबर!
अरे वा........ .सगळ्या
अरे वा........ .सगळ्या सुगरणींचं कौतुक!
पिहू ......तसं आठवडाभर तरी टिकतं पण जास्ती घातलंस तर फ्रिजात ठेव!
खजूर आणणं झालं नाही म्हणून
खजूर आणणं झालं नाही म्हणून घरी असलेल्या खारकांचं बारिक तुकडे करून लोणचं घातलं. खाराला फारच मस्त चव आहे. त्यात मुरलेल्या खारका किती अफाट चवीच्या लागतील !? (सध्या खाल्ल्या तर खार-खारिक अशी वेगवेगळी चव लागतेय.)
खूप धन्यवाद!
पाककृती ग्रूपापुरती मर्यादीत झाली आहे. सार्वजनीक करणार का?
खजुरा हो!
खजुरा हो!
मी आजच केलं . एकदम अफलातून
मी आजच केलं . एकदम अफलातून चव आहे .
नुसतंच खायला सुद्धा मस्त चविष्ट आहे
.
आजच केलं.खूप आवडलं.धन्यवाद या
आजच केलं.खूप आवडलं.धन्यवाद या रेसिपीसाठी!!
केलं मी हे - ताज्या
केलं मी हे - ताज्या cranberries आणि खजूर एकत्र करून - झकास झालय - मंडळ आभारी आहे ( आणि लोणचं भाजीसारखं हादडत आहे
)
मानुषी ताई, मी पण केल हे
मानुषी ताई, मी पण केल हे लोणच. कसल लाळगाळू होतं हे, सही.
धन्स एवढ्या चांगल्या रेसिपी करता.
सर्व सुगरणींना धन्यवाद आणि
सर्व सुगरणींना धन्यवाद आणि प्रोत्साहनही पुढील रेसिप्यांसाठी!
मस्त च आहे. नक्की करुन बघीन.
मस्त च आहे. नक्की करुन बघीन.
सह्ही... कूछ अलग रेसिपी....
सह्ही... कूछ अलग रेसिपी.... वॉव...!!!
Pages