थंडीतली लोणची - ३) खजुराचे लोणचे.

Submitted by मानुषी on 14 December, 2011 - 01:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३) खजुराचे लोणचे

साहित्य: अंदाजे १५० ग्रॅम खजूर, ३/४ लिंबे, पाव वाटी साखर, १ चमचा जिरे, १ चमचा बडिशोप, मीठ, पाव चमचा शेंदेलोण(काळं मीठ),लाल तिखट पाव चमचा. १ इंच आल्याच्या उभ्या कापट्या(जिंजर ज्युलियन्स),तिखटाचं प्रमाण चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता.
DSCN1262.JPG

क्रमवार पाककृती: 

कृती: लिंबांचा रस काढून त्यात साखर विरघळून घ्यावी. त्यातच लाल तिखट, मीठ, शेंदेलोण घालावे. ढवळावे. बडिशोप व जिरे मिक्सरमधून अर्धे बोबडे बारीक करून घ्यावेत. याची अती बारीक पावडर करू नये. हेही या लिंबू रसाच्या मिश्रणात घालून ढवळावे. यातच आल्याच्या कापट्या घालाव्यात. खजूर स्वच्छ धवून बीया आणि नाके काढून उभे तुकडे करावेत. फडक्यावर पसरून खजूर तुकडे कोरडे करावेत. हे खजुराचे तुकडे वरील लिंबूरसाच्या तयार मिश्रणात घालून छान मिक्स करावे.
लोणचे तयार.
ही तीन्ही लोणची थंडीत जेवणाची/स्नॅकसची लज्जत वाढवतात. खजुराचे लोणचे विशेषत: पराठे तिखटमिठाच्या पुर्‍या या बरोबर छान लागते.

DSCN1263.JPG

वाढणी/प्रमाण: 
मैत्रीण.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

मंजूडी
चाटमसालातील इतर इथे इनग्रेडियंट्स कितपत सूट होतील अंदाज नाही.
मला नाही वाटत चांगलं लागेल.पण स्वता:च्या जबाबदारीवर करून पहायला हरकत नाही.(दात काढणारी बाहुली)

धन्स दिनेशदा खजूर पटकन संपतात पण खारका खूप राहतात. मानुषीताई मी खारकेचा प्रयोग करून पहाते स्वतःच्या जबाबदारीवर आणि फोटो टाकते.;-)

छान!

छान आहे रेसीपी.
पाटणकरांच ड्रायफुट लोणच असतं ,त्यात खारीक , काजु,किसमिस ,लिंबाच्या फोडी,मिरची वगैरे असतात. मस्त लागत एकदम. वरचा मसाल्यात तस करुन पहायला पाहिजे.

मानुषी, लोणचं एकदम मस्त झाले. मी मीठाऐवजी काळे मीठच वापरले. आणि आले फ्रोजन होते म्हणून किसून घातले. भन्नाट चव आहे. धन्यवाद!

मीपण केले, छान झाले आहे. बडीशेप भाजलेलीच होती म्हणून तशी घातली. मला वाटले लिंबाचा रस जास्त झाला की काय कारण अंगासोबत घट्ट रस नव्हता, तरी मी गूळ घातला होता. पण थोड्या वेळाने मिळून आला. खजूर थोडे कोरडेच होते.
मंजूडी, मी चाट मसाला घातला. Happy

सर्वांना धन्यवाद! आर्च जिरं आणि बडिशोप जर सादळलेली(मऊ पडलेली) असेल तर भाजावी. एकूणातच मिक्सरवर बारीक करण्यासाठी भाजावी. इतकी भाजू नये की जिरं बडिशोपेच्या चवी बदलतील.

मंजूडी
कोणताही खाद्यपदार्थ पॅकेटात भरण्यापूर्वी हाताळला गेला असण्याची/कुठे तरी ठेवला असण्याची शक्यता म्हणूनच फक्त!
नाहीतर आता हस्तपर्श विरहित अशीही प्रॉडक्ट्स आहेत बाजारात. त्यांच्या स्वच्छतेबद्दल काही शंका नाही.

काल केलं हे लोणचं. एकदम मस्त झालं. हा फोटू :

khajur lonache.jpg

मानुषीचं लोणचं इतकं कोरडं कसं दिसतंय? Uhoh
मी केलेल्या लोणच्याला भरपूर खार सुटलाय. मी चाट मसालाच घातला आणि आलं किसून घातलं.

मस्त आहे हे लोणचं...मी हे जिन्नस एकत्र करुन उन्हात ठेवते..२-३ दिवसात मुरते ..तसेच साखरेऐवजी खडी साखर घालुन केले..गुलकंदासाठी आणलेली खडीसाखर ती उरली होती..ते ही छान लागले..

सर्वांचं कौतुक!
मंजूडी खजुरा खजुरातल्या फरकामुळे असेल बहुतेक आणि आता माझंही लोणचं मुरल्यामुळे तेही फोटोतल्या इतकं कोरडं नाही राहिलं . थोडा रस सुटला आहे. आणि मी इथे सांगितल्या इतकी लिम्बंही नाही पिळली. नवरोबा फार आंबट खात नाही. मी ज्याच्यात्याच्यावर लिंबू पिळते.

मी ज्याच्यात्याच्यावर लिंबू पिळते.>> Lol

मी तू इथे सांगितल्याप्रमाणे ४ लिंबांचा रस घातला. लोणचं चाखून पाहिल्यावर खजूर आणि साखरेच्या गोडीला तेवढा आवश्यक आहे हे जाणवलं. Happy

Pages