थंडीतली लोणची - ३) खजुराचे लोणचे.

Submitted by मानुषी on 14 December, 2011 - 01:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३) खजुराचे लोणचे

साहित्य: अंदाजे १५० ग्रॅम खजूर, ३/४ लिंबे, पाव वाटी साखर, १ चमचा जिरे, १ चमचा बडिशोप, मीठ, पाव चमचा शेंदेलोण(काळं मीठ),लाल तिखट पाव चमचा. १ इंच आल्याच्या उभ्या कापट्या(जिंजर ज्युलियन्स),तिखटाचं प्रमाण चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता.
DSCN1262.JPG

क्रमवार पाककृती: 

कृती: लिंबांचा रस काढून त्यात साखर विरघळून घ्यावी. त्यातच लाल तिखट, मीठ, शेंदेलोण घालावे. ढवळावे. बडिशोप व जिरे मिक्सरमधून अर्धे बोबडे बारीक करून घ्यावेत. याची अती बारीक पावडर करू नये. हेही या लिंबू रसाच्या मिश्रणात घालून ढवळावे. यातच आल्याच्या कापट्या घालाव्यात. खजूर स्वच्छ धवून बीया आणि नाके काढून उभे तुकडे करावेत. फडक्यावर पसरून खजूर तुकडे कोरडे करावेत. हे खजुराचे तुकडे वरील लिंबूरसाच्या तयार मिश्रणात घालून छान मिक्स करावे.
लोणचे तयार.
ही तीन्ही लोणची थंडीत जेवणाची/स्नॅकसची लज्जत वाढवतात. खजुराचे लोणचे विशेषत: पराठे तिखटमिठाच्या पुर्‍या या बरोबर छान लागते.

DSCN1263.JPG

वाढणी/प्रमाण: 
मैत्रीण.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे मी केलेले-

lonche2.jpg

झंपे, मी बाहेरच ठेवले आहे. (म्हणजे फ्रीजमध्ये नाही.) पण इकडे थंडी आहे. थंडीमुळे नंतर खार अजून घट्ट झालाय.

अरे वा........ .सगळ्या सुगरणींचं कौतुक!
पिहू ......तसं आठवडाभर तरी टिकतं पण जास्ती घातलंस तर फ्रिजात ठेव!

खजूर आणणं झालं नाही म्हणून घरी असलेल्या खारकांचं बारिक तुकडे करून लोणचं घातलं. खाराला फारच मस्त चव आहे. त्यात मुरलेल्या खारका किती अफाट चवीच्या लागतील !? (सध्या खाल्ल्या तर खार-खारिक अशी वेगवेगळी चव लागतेय.)

खूप धन्यवाद!

पाककृती ग्रूपापुरती मर्यादीत झाली आहे. सार्वजनीक करणार का?

केलं मी हे - ताज्या cranberries आणि खजूर एकत्र करून - झकास झालय - मंडळ आभारी आहे ( आणि लोणचं भाजीसारखं हादडत आहे Lol )

मानुषी ताई, मी पण केल हे लोणच. कसल लाळगाळू होतं हे, सही.
धन्स एवढ्या चांगल्या रेसिपी करता.

Pages